वसई किल्ला, मिपाकरांसोबत
वसई किल्ला- तीन्ही बाजूंनी पाणी व जमिनीवरून चिंचोळा रस्ता अशी याची रचना. मूळ मराठी सरदाराने उभारलेला व पुढे गुजराथच्या सुलतानाच्या ताब्यात आलेला व त्यापुढे पोर्तुगीजांनी बळकावलेला व त्याची भक्कम पुनर्बांधणी केलेला एक अभेद्य दुर्ग. पुढे चिमाजीअप्पांच्या अतुलनीय शौर्याने हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.
रविवार करावे लागणारे हापिसचे काम ऐनवेळी पुढे ढकलेले गेल्यामुळे माझा मुंबई प्रवासाचा मार्ग सुकर झाला व मी आणि मोदक पिंपरीला भल्या सकाळी सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढलो, सूड पुण्याहून बसलेलाच होता. तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या. सूड बदलापूरला जाऊन ठाण्याला आम्हाला जॉईन होणार होता. किसनदेवांनी ठाण्यात मामलेदार मिसळ खाऊ घालून आम्हास तृप्त केले. आधी पोटोबा मग विठोबा या उक्तीला जागून आम्ही तिघे कौपिनेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन १२.३० च्या आसपास ठाणे बस थांब्यावर आलो. सूडही थोड्याच वेळात तिथे आला. मीरारोड स्थानकावर उतरून तिथून विरार लोकल पकडली आणि १५ मिनिटातच वसई रोड स्थानकावर उतरलो. लगोलग मागच्या लोकलने चर्नीरोडवरून विलासराव व आत्मशून्य येऊन पोहोचले. वसई रोड स्थानकावरच्या हाटेलात पोटपूजा उरकून दोन रिक्षांद्वारे आम्ही ६ जण वसई किल्ल्यात डेरेदाखल झालो.
किल्लाची तटबंदी चहूबाजूंना दिसत होती तेव्हा आम्हास समजले की आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी आहोत व डांबरी सडक थेट किल्ल्याच्या मध्यभागापर्यंत आली आहे. तिथल्या जवळच्याच एका भव्य चर्चच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. . पोर्तुगीज आणि रोमन शैलीचा सुंदर मिलाफ इथल्या इमारतीच्या धाटणीत आढळतो. तिथूनच एका चोरवाटेने आम्ही एका मोकळ्या प्रांगणात आलो. सर्वत्र वाढलेल्या झाडीतच इमारतींचे भग्नावशेष दिसून येत होते. एका प्रवेशद्वारातून झाडीभरल्या वाटेनं जात आम्ही एका उत्तुंग इमारतीपाशी आलो. उंच उंच कमानी मध्ये पटांगण व शेवट मनोरा अशी याची रचना. मनोर्यावर जायला गोलाकार भुयारी जिने खोदलेले आहेत. ४ मजली जिने चढून जाऊन आम्ही मनोर्यावरच्या बुरुजावर पोहोचलो. तिथून चहूबाजूंचे दृश्य नजरेस येत होते. वसईची खाडी व त्यापल्याडच्या समुद्राचे लोभस दर्शन होत होते. इतर तीनही बाजूंना उभारलेले उंच उंच भक्कम तट दाट झाडीने कोंडल्यागत वाटत होते.
१. चर्चची भव्य इमारत
२. चर्चचा अंतर्भाग
३. पडके बुरुज, उद्धस्त भिंती
४. मनोर्याची इमारत
५. मनोरा
६. मनोर्याच्या पार्श्वभूमीवर मिपाकर (किसन, आशू, मोदक, सूड, विलासराव)
७. इमारतीचा अंतर्भाग
मनोरा उतरून आलो. तटालगतच्या पायर्यांवरून पश्चिमेकडच्या तटावर आलो. आता समुद्र अगदी जवळच दिसत होता. जेमतेम फूटभराची अरूंद वाट सुमारे ३०/३५ फूट उंचीच्या तटावरून पुढे सरकते. त्यावरून भिंतीला खसटूनच आम्ही एका बुरुजावर आलो. मोदकाने तिथे तटाच्या दगडांना मध्यभागी ठोकलेले जाड्सर खिळे व दुसर्या बाजूंना असलेल्या खाचा याचा वापर करून बुरुजांचे भक्कम बांधकाम होत असे असे विशद केले. पायर्या उतरून हनुमान मंदिराजवळील दरवाजाने बाहेर आलो. इथून लांबच लाब पसरलेला किल्ल्याचा अजस्त्र घेर दिसत होता. किल्यात असलेल्याच डांबरी सडकेने चालत आम्ही चिमाजीअप्पा पेशव्यांच्या स्मारकापाशी पोहोचलो. स्मारक अतिशय निगुतीने राखलेले आहे.
१७३७ साली मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहिल्या बाजीरावाने चिमाजीअप्पांच्या हाती वसईची मोहीम सोपवली. तुंबळ लढाई करूनही वसईचा किल्ला दाद देत नव्हता. अखेर चिमाजीअप्पांनी दलदलीच्या बाजूने चढाई करण्याचे ठरवले. मराठ्यांचे सैन्य सेंट सेबेस्टीयन बुरुज फोडून आत शिरले व हातघाईच्या लढाईनंतर वसईचा अभेद्य दुर्ग स्वराज्यात आला. पुढे १७८० नंतर मात्र तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.
८. मोदक आणि सूड तटाच्या अरूंद वाटेवरून भिंतीला लगटून चालताना
९. तटाच्या खिडकीतून दिसणारी वसईची खाडी व मधला खाजणाचा प्रदेश
१०. वसईची खाडी
११. हनुमान मंदिराच्या इथे असलेला दरवाजा
१२. चिमाजीअप्पांचा पुतळा
चिमाजीअप्पांना मनोमन वंदन करून आम्ही किल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. इथे काही पोर्तुगीज शैलीतल्या चिन्ह प्रतिमा , तसेच काही शिलालेख कोरलेले आहेत. बाजूलाच काही भव्य इमारती आहेत. ते बघत बघतच पेशव्यांनी स्थापन्न केलेल्या वज्रेश्वरी देवीचे व नागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
१३. भव्य इमारती
१४. कमानदार रचना
१५. पडक्या भिंती
१६. काही पोर्तुगीजकालीन चिन्हे
१७. पोर्तुगीजांचा सागरी सत्तेचे निदर्शक चिन्ह
१८. अजून काही अवशेष
ते पाहून दर्या दरवाजातून आतल्या कोळीवाड्यात शिरलो ते किनार्यावर जाण्यासाठी. इथले सर्व कोळी लोक किरिस्तांव आहेत. थोड्याच वेळात जेट्टीवर पोहोचलो. तिथे मिपाकरांच्या मनमुराद गप्पा रंगल्या. आशूच्या नर्मदा परिक्रमेविषयी एक छोटंसं चर्चासत्र तिथं पार पडलं. आशूचे अनुभव ऐकल्यानंतर वसईच्या मच्छीमार बोटी पाहून मासे जाळ्यात कसे गावतात, जाळे समांतर लावतात का लंबाकार, आत शिरलेले मासे बाहेर का पडू शकत नाहीत यावर एक काथ्याकूट झाला पण निष्कर्ष कुठलाच निघाला नसल्याने मिपावर काथ्याकुटात हा विषय मांडावा का यावर खल झाला. किनार्यावर मनमुराद गप्पा मारून परत किल्ल्यातल्याच डांबरी रस्त्यावर आलो तिथून बस पकडून वसई रोड स्थानकावर आलो. वसई - ठाणे एसटी पकडून मी,सुड, किसनदेव आणि मोदक निघालो. आशू आणि विलासराव लोकलने चर्नीरोडला जाण्यास निघाले.
१९. जेट्टीवर
२०. सूर्यास्ताच्या सुमारास
२१. वसईचे सहा शिलेदार
ठाण्यास स्पा आणि विमे स्वाद मध्ये आमची वाटच पाहात होते. स्वादची स्वादीष्ट थाळी अमर्यादित बासुंदीसह रिचवून प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. मी आणि मोदक मात्र किसनदेवांच्या घरी मुक्कामास गेलो ते दुसर्या दिवशीचा कान्हेरी लेण्यांचा कार्यक्रम ठरवूनच. त्याविषयी लवकरच...

वाचने
21199
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
झक्कास हो वल्लीशेठ. फोटॉ
In reply to झक्कास हो वल्लीशेठ. फोटॉ by धन्या
ध (जा)न्या
In reply to ध (जा)न्या by मी-सौरभ
पुढचं मी सांगतो, धनाजीराव,
In reply to पुढचं मी सांगतो, धनाजीराव, by प्रास
नाय नाय
In reply to नाय नाय by इरसाल
नाय नाय नाय ओ इर्याशेठ !
नेहेमी प्रमणे झक्कास
In reply to नेहेमी प्रमणे झक्कास by अत्रुप्त आत्मा
इथे परिच्छेद द्यायचा र्हायला
In reply to इथे परिच्छेद द्यायचा र्हायला by प्रचेतस
@छे छे. थेंबभर बासुंदी पण
मस्त
छानच आहे वसई चा किल्ला आणि लेख
झकास!
जबराट फोटू , आणि उत्तम
In reply to जबराट फोटू , आणि उत्तम by स्पा
झकास वृत्तांत..
In reply to झकास वृत्तांत.. by मोदक
मोदकाचा णिशेद
झक्कास.. मी भरपूर काही मिस
+१
In reply to +१ by रामदास
@ गवि, रामदास काका थाळीत २
In reply to @ गवि, रामदास काका थाळीत २ by स्पा
बरोबर हेच लिहायला आलो
In reply to बरोबर हेच लिहायला आलो by सूड
हे माहीत नव्हतं.. अनेक
In reply to बरोबर हेच लिहायला आलो by सूड
नुस्ती बासुंदी ?
व्वा ...
मस्त .. वल्लि तु कितव्या
In reply to मस्त .. वल्लि तु कितव्या by जेनी...
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by स्पा
काऊंटींग कुठून (कन्च्या
In reply to काऊंटींग कुठून (कन्च्या by प्यारे१
शिंपल है...
In reply to शिंपल है... by धन्या
शेवटचा पोट्टु राईट साइडने
In reply to शेवटचा पोट्टु राईट साइडने by अन्नू
तुम्ही सगळे असे कसे चमे लोक्स
In reply to तुम्ही सगळे असे कसे चमे लोक्स by प्यारे१
समझ्या समझ्या हमकु समझ्या!
In reply to तुम्ही सगळे असे कसे चमे लोक्स by प्यारे१
+१
In reply to तुम्ही सगळे असे कसे चमे लोक्स by प्यारे१
@प्यारक सराफ (हातात चेंडू
लय भारी....!
मस्त मस्त... श्रीदत्त
मस्त वृत्तांत वल्ली,मजा
In reply to मस्त वृत्तांत वल्ली,मजा by प्यारे१
बूच मारले आहे...
In reply to बूच मारले आहे... by मोदक
१८ कशाला ? म्हणजे तोवर कशाला
मस्त
मस्त रे एकदम भारी रिपोर्ट
In reply to मस्त रे एकदम भारी रिपोर्ट by ५० फक्त
सविस्तर शिव्या वैयक्तिक भेटित
In reply to सविस्तर शिव्या वैयक्तिक भेटित by मालोजीराव
+१
वल्ली, फोटो खरोखरच छान ! या
In reply to वल्ली, फोटो खरोखरच छान ! या by जयंत कुलकर्णी
नक्कीच येऊ द्यात. वसईचा
In reply to वल्ली, फोटो खरोखरच छान ! या by जयंत कुलकर्णी
नेकी और पूछ पूछ... येउद्या
In reply to वल्ली, फोटो खरोखरच छान ! या by जयंत कुलकर्णी
@जकु
In reply to @जकु by मी-सौरभ
+ १०^५३७
वसईच्या जवळ राहत असूनही कधी
वल्लीने वृत्तांत मस्त
In reply to वल्लीने वृत्तांत मस्त by सूड
एक नवदांपत्य वाटावं अशा व्यक्ती-व्यक्तीण...
छान वर्णन
झक्कास कट्टा झालेला दिसतोय
मजा केलीत दोस्तहो. कान्हेरीची
मस्तच
मी वाटच पाहत होतो ह्या कट्ट्याच्या माहितीची
वल्लीने लिहिलेल्या वृत्तांतास
लहानपण आठवले !
सुरेख.
मस्त वृत्तांत!
मस्तच वृत्तांत! सगळ्यांनीच
अप्रतिम मित्रांनो. लेखन
एकदम सुरेख वर्णन
मला रामदास काका
हे हे हे मी परवा पाहीला हा
सहाव्या क्रमांकाचे