✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा बुलेटिन-आजच्या ठ्ळ्ळ-क बातम्या

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 02/22/2012 - 18:37  ·  लेख
लेख
[या बातम्यांचा मुख्‍य उद्देश विनोदनिर्मिती नसून फक्त रिपोर्टींग आहे. एक टैम्पास कल्पना म्हणून आनंद घेणेत यावा इति विज्ञापना.] नमस्कार! मिपा बुलेटिनमध्‍ये सादर आहेत आजच्या ठ्ळ्ळ-क* बातम्या (*मनसेच्या खळ्ळं-फट्याक सारखं हे ठ्ळ्ळ-क वाचावं) भानामतीचा फेरा कायम विंगकमांडर ओकांनी आजही भानामतीचा फेरा कायम राखला. अंनिस ही कुठल्याही भोंदु बाबा इतकीच भोंदु संस्था आहे या त्यांच्या मताचा ओकांनी आज पुन्हा एकदा येथे पुनरुच्चार केला. गवि वगैरे सदस्यांनी अंनिस एकदाची हरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे; तर ननि यांनी भानामतीचे लेख सतत पडत असल्याने एखाद्या स्थळाचा किंवा आयडीचा बळी द्यावा लागेल अशी भीती बोलून दाखवली. नट्यांच्या अंगावरील कपडे गायब असण्‍यामागे भानामतीच असावी असा संशय अनेक सदस्यांनी बोलून दाखवला. यावर विंगकमांडर ओक गालातल्या गालात हसुन भानामतीवरचा नवीन लेख लिहायला बसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. धर्म-जातह‍िन होण्याचा हक्क असावा: हुप्प्या धर्म किंवा जातीचा कायदेशीर त्याग करता येणार नसल्याचा निर्णय नुकताच एका न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर हुप्प्या यांनी उडी घेतली. हुप्प्या यांनी धर्म-जातीचा त्याग करु न देण्‍याचा हा प्रकार मूर्खपणाचा आहे काय यावर चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात मिका यांनी संविधानातील कायद्यांच्या आधाराचे महत्त्व पटवून देण्‍याचा प्रयत्न केला यावर हुप्प्या यांनी संविधान हा धर्मग्रंथ नसून त्यात बदल संभवतात असे जोरदार प्रतिपादन केले. हे चर्चासत्र मध्‍येच सोडून जाऊन मूकवाचक यांनी सर्व मानव प्राण्यांनी जात धर्माचा त्याग करुन केवळ 'सस्तन प्राणी' म्हणवून घ्‍यायला हवे असे उद्व‍िग्न मत व्यक्त केले. अनेक नामवंत सदस्यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. मेणबत्ती व टोपीबाजीवरुन कहर नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीकडे मेणबत्तीप्रेमी व टोपीबाजांनी पाठ फिरवली. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन कॉमन मॅन यांनी केले. या प्रतिपादनावर अनेक सदस्य उखडले असून ननि यांनी कॉमन मॅन असले धागे टाकण्यापूर्वी कॉमन सेन्स वापरत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. चिडलेल्या ‍ननिंकडे तिरक्या नजरेने पाहून कॉमन मॅन यांनी मनसे-सेनेच्या संभाव्य युतीवर हळूच धागा टाकला. संपादक मंडळाने हस्तक्षेप करुन हा धागा वेळीच बासनात गुंडाळला. कॉमॅंच्या या धाग्यावर रिवाजाप्रमाणे मतमतांतराचा धुराळा उडाला. त्या धुरळ्यावरच 'मेणबत्त्या-टोप्या-टोप्या-मेणबत्त्या' उसळत राहिल्या आणि नवे लेखन तपासणार्‍यांच्या डोक्याला शॉट लागला. एकूणच कॉमन मॅन हा मिपासाठी चिंतेचा विषय बनत असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. चिमण्या हद्दपार होणे क्लेशकारक : लिना शेडसाळे मोबाईल क्रांतीपूर्वी लाखोंच्या संख्‍येने आढळणार्‍या चिमण्‍या आज नामशेष होत आहेत. मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या पक्ष्‍याचे नामशेष होणे क्लेशकारक असल्याचे मत शेडसाळे यांनी व्यक्त केले. शेडसाळेंनी व्यक्त केलेल्या या मतावर गविंनी चिमण्यांना रहाण्‍यासाठीच्या पेट्यांचा उपाय सुचवला. अनेक सदस्यांनी चिमण्या आजही अस्तित्वात असून त्यांच्याबद्दल चिंता करण्‍याची गरज नसल्याचे गवि म्हणाले. चिमण्यांचा धागा पाहून प्रकाश यांनी कावळे उडवून पाहिले - पण ते फुसके निघाले. सडाफटिंग पा‍कसिद्धीवर पब्लिक खूश विमे, प्रास आणि गवि यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका दूरस्थ स्थळी सडाफटिंग पाकसिद्धीचे आयोजन करण्‍यात आले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी तिघांनीही आपापल्या पाककौशल्याचे दर्शन घडवले - ते दर्शन झाल्यानंतर कित्येक सदस्यांनी इनो घेतल्याची कबुली दिली आहे. अशा सडाफटिंग पाकसिद्धी बैठका होण्याची नितांत गरज असून पुढील पाकसिद्धी इंदुरच्या आसपास होईल अशी चिन्हे आहेत. भाजे लेणीतील गूढाचा उलगडा होणार मिपाचे इंडियाना जोन्स वल्ली यांनी नुकतीच भाजे येथील लेण्‍यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना लेणीत आढळलेल्या गूढाबद्दल अभ्यासपूर्ण शैलीत विवेचन केले आहे. लेणीतील गजमूर्ती कोणाची आणि तिचा काळ नेमका कुठला या मुद्यांसह वल्लींनी प्राचीन लेणीनिर्मितीकडे लक्ष आकर्षित केले. यावेळी चित्रा यांनी लेणीतील गजमूर्ती प्रसेनजीत व अजातशत्रूची असेल असे मत व्यक्त केले. यासंदर्भात वल्ली व चित्रा यांच्या दरम्यान रंगलेल्या संवादाचा वाचकांनी आनंद घेतला. वल्ली यांच्यावर हौशी इतिहासप्रेमींना लेण्‍यांमध्‍ये घेऊन जाण्‍याची जबाबदारी आल्याबद्दल मत विचारले असता त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या. पाभेंना झाली गावाकडची आठवण आज पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांना गावाकडची आठवण झाली आहे. मुक्तछंदात केलेल्या या काव्यात त्यांनी गावाकडचे चित्र जीवंत केले असून ते पाहून अनेक सदस्य गावाकडे निघाल्याचे कळते. टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ प्रतिष्ठान तर्फे आमचेकडे पेस्टवण्यासाठी आलेला असुन आम्चा यात व्यक्तिशः कुठेही हात अगर लेखणी नाही...तसे काही यक्कू प्रतिष्ठान व अन्य कुणाला वाटल्यास तो एक वैचारिक योगायोग समजावा ;-)
  • मिपा बुलेटिन-आजच्या ठ्ळ्ळ-क बातम्या..(अंक दुसरा)

Book traversal links for मिपा बुलेटिन-आजच्या ठ्ळ्ळ-क बातम्या

  • मिपा बुलेटिन-आजच्या ठ्ळ्ळ-क बातम्या..(अंक दुसरा) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
बातमी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10536 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

यक्कू प्रतिष्ठानचे हापिसामधुन

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/22/2012 - 18:46 नवीन
यक्कू प्रतिष्ठानचे हापिसामधुन सदर लेख पिसता येत नसले कारणाने,तो त्यांनी आंम्हाला पिसावयास दिला आहे याची नोंद घेणेत यावी ;-) म्हणजे मुळ लेखक यक्कू,फक्त वापरलय आमचं कुंकू... ;-) त्यामुळे प्रतिसाद यक्कूंच्या नावानी पाडावेत ही इनंती ;-)
  • Log in or register to post comments

२ न्युज राहिल्या...

वपाडाव
Wed, 02/22/2012 - 18:46 नवीन
मालक, अजुन २ ब्रेकिंग न्युज बाकी राहिल्या की हो...
*यशोधन वर्तक यांचे मिपावर धडाक्यात आगमन - आगमनातच तिळे* *म्हातार्यांना बालपणत नेणारी जागुतै यावेळेस घेउन आलीये - बकुळफुले*
  • Log in or register to post comments

+१

मोहनराव
Wed, 02/22/2012 - 18:48 नवीन
*यशोधन वर्तक यांचे मिपावर धडाक्यात आगमन - आगमनातच तिळे*
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@यशोधन वर्तक यांचे मिपावर

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/22/2012 - 22:56 नवीन
@यशोधन वर्तक यांचे मिपावर धडाक्यात आगमन - आगमनातच तिळे*>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+१

हंस
Wed, 02/22/2012 - 18:48 नवीन
बातम्यांचा आढावा भारी घेतला आहे, दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

दर आठवड्याला हे सदर चालवावे

विसोबा खेचर
Fri, 02/24/2012 - 11:07 नवीन
दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
अगदी सहमत.. छानच रिपोर्टींग..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

भले...भले!

अन्नू
Wed, 02/22/2012 - 18:59 नवीन
Image removed. आत्ताची जिलेबी खमंग आणि गोग्गोड झाली.
दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
++१००. आता होऊनच जाऊ द्यात.
  • Log in or register to post comments

@यक्कु..

मी-सौरभ
Wed, 02/22/2012 - 19:32 नवीन
मोगॅम्बो खुष हुवा :D
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
Wed, 02/22/2012 - 21:21 नवीन
मिपा बुलेटीन हे सदर दर आठडयाला येत राहावे अशी यक्कुशेठना विनंती.
  • Log in or register to post comments

>.> टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ

आशु जोग
Wed, 02/22/2012 - 21:50 नवीन
>.> टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ प्रतिष्ठान तर्फे आमचेकडे पेस्टवण्यासाठी आलेला असुन आम्चा यात व्यक्तिशः कुठेही हात अगर लेखणी नाही...तसे काही यक्कू प्रतिष्ठान व अन्य कुणाला वाटल्यास तो एक वैचारिक योगायोग समजावा << ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे
  • Log in or register to post comments

@ही देखील एक महत्त्वाची बातमी

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/22/2012 - 23:04 नवीन
@ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे>>> व्वा...काय चाणाक्ष आहात हो तुंम्ही? पण त्या बात मधे मी कुठाय..? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

एकूण मजा आहे तर ! संतोष

आशु जोग
गुरुवार, 02/23/2012 - 23:17 नवीन
एकूण मजा आहे तर ! संतोष पावलो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भन्नाट...

मन१
Wed, 02/22/2012 - 21:58 नवीन
आम्हाला हापिसातून मिपाअ‍ॅक्सेस नाही. त्यामुळे असले धागे उपयुक्त.
  • Log in or register to post comments

आधी बुधवारच्या कविता होत्या

५० फक्त
Wed, 02/22/2012 - 22:12 नवीन
आधी बुधवारच्या कविता होत्या आता बातम्या, काय काय ठेवलंय त्या बुधवारात कोण जाणे.
  • Log in or register to post comments

काय ५०

मी-सौरभ
गुरुवार, 02/23/2012 - 18:49 नवीन
पुणेकर असून तुम्हाला बुधवारात काय काय आहे ते माहीत नाही :( अरेरेरेरे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

टिट्..टिट्..टिट्..टिssssट्...

पाषाणभेद
गुरुवार, 02/23/2012 - 03:20 नवीन
टिट्..टिट्..टिट्..टिssssट्... नमस्कार. यक्कू प्रतिष्ठान. अत्रुप्त आत्मा आठवड्याच्या बातम्या देत आहे. ठळक बातम्या: भानामतीचा फेरा कायम धर्म-जातह‍िन होण्याचा हक्क असावा: हुप्प्या मेणबत्ती व टोपीबाजीवरुन कहर चिमण्या हद्दपार होणे क्लेशकारक : लिना शेडसाळे सडाफटिंग पा‍कसिद्धीवर पब्लिक खूश भाजे लेणीतील गूढाचा उलगडा होणार पाभेंना झाली गावाकडची आठवण {{नंतर पहिल्या ४ बातम्या देणे}} [[पहिल्या ४ बातम्यांनंतर विश्रांती. त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा यांनी पाण्याशी संबंधीत विधी करावेत. त्यावेळेदरम्यान यक्कूप्रतिष्ठान काही सरकारी छापाच्या जाहिराती वाजवेल. त्यांची एक झलक: टिंग...टिंग...टिंग... १) कोरस: मिसळपाव मिसळपाव खाव खाव खाव खाव याहो या मिसळपाव खा मिसळपाव खाणे अन वाचणे शरीराला हितकारक असते. मिसळपाव.कॉम संकेतस्थळाकडून जनहितार्थ प्रसारीत. २) "काय ग सगूणे, ज्येवायला काय क्येलंय?" "ह्ये काय इचारनं झालं का धनी? त्ये यक्कू प्रतिष्ठान रेडू वर न्हेमी सांगत्यात की मिसळपाव खा...मिसळपाव खा...म्हून. इसरलात का काय? त्येंचं ऐकूनशान आपल्या घरीबी दर्रोज मिसळपावच बनती बघा. तुमी कांदा कापायला घ्या. म्या ताटं करतीच." टिंग...टिंग...टिंग...टिडींग... ]] {{नंतर पुन्हा उरलेल्या बातम्या देणे}} शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या: {{पुन्हा ठळक बातम्या वाचणे/ लिहीणे}} यापुढील बातमीपत्र पुढल्या बुघवारी सकाळी प्रसारीत होईल. यक्कू प्रतिष्ठानवरील बातमीपत्र संपले. नमस्कार. डिर्डीढिंग..डिर्डीढिंग..डिर्डीढिंग..डिर्डीडिर्डीडिर्डीढिंग... (खालील यक्कू प्रतिष्ठानचे गीत वाजवावे.) जनजन सतत बोलती मनामनात विचार करती चारी ठाव चारी ठाव मिसळपाव मिसळपाव
  • Log in or register to post comments

ह्या ममिसळपाव मिसळपाव

सूड
गुरुवार, 02/23/2012 - 09:35 नवीन
ह्या ममिसळपाव मिसळपाव मिसळपाव वरुन पूर्वी प्रभातवर गप्पा म्हणून एक एकांकिका यायची. त्याची आठवण झाली.त्यातत योगेश सोमण असा बोंबलत असायचा, ' जरुर या , भेट द्या, लाभ घ्या, माझ्याऽऽऽ बायकोचीऽऽऽ खानावळ' आणि माधवी सोमण 'येणार नाही' असं म्हणून धाडकन त्या सेल्समनच्या तोंडावर दार बंद केल्याचा अभिनय करायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

@त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 16:10 नवीन
@त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा यांनी पाण्याशी संबंधीत विधी करावेत.>>> Image removed. पाण्यशी सं-बंधित अनेक विधी आहेत,पण आंम्ही पटकन करू शकू असा विधी म्हणजे श्राद्ध...! आम्चे येथे वैकुंठ कैलास कृपे करुन येथिल मृतवत आयडींना कायमची मुक्ति देण्यासाठी Image removed. त्यांचे पिंड दर्भा ऐवजी त्यांच्याच धाग्यांच्या सं-दर्भावर ठेवले जातील,व आठवणींच्या पाण्याने विधिवत तर्पण करुन मिळेल..तरी इच्छुकांनी आपल्या आवडत्या मृतवत आय.डीं.चे नाव लवकरात लवकर नोंदवावे...प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य...त्वरा करा,आणी लवकर नावे भरा...! अंतिम मुदत..येत्या रविवारचे आत...किंवा फार फार तर,सोमवार बाहेर मंगळवार पर्यंत ... आपला(च) आत्मंम भट्ट बुले-टिन कर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

____/\____ कहर....! यकु आणि

प्यारे१
गुरुवार, 02/23/2012 - 09:48 नवीन
____/\____ कहर....! यकु आणि भटजी, दोघांनाही सा न. खतरा हाय राव! मुख्य बातम्यांबरोबर खालच्या सरकत्या पाट्या सुद्धा सुरु करु या... पराची गुलजार नार कुठपर्यंत आली (पहा कधीतरीच)... गविंनी केला नवीन एअर क्रॅश... स्पावड्यानं पाहिलं नवीन ग्रहण... प्राजुतै/क्रांतीतैनं नवीन पुरस्कार जिंकला... ५० फक्त ची विवाहबाह्य संबंधांवरची नवीन थरारक मालिका... गणेशा/ प्रकाशची नवीन कविता... पियुशाची नवीन जिल्बी... सानिका आणि स्वप्निलमध्ये चमच्यांवरुन वाद.... वल्लीची भटकंती आता एका 'नवीन अँकर'बरोबर....बिकां/ श्रामो यांनी संघाची घेतली बाजू ;) .... गणपा पाकृ करताना फसला...!
  • Log in or register to post comments

अजुन काही

अन्या दातार
गुरुवार, 02/23/2012 - 10:01 नवीन
मिपावर फुटकळ धाग्यांची रेलचेल. मदतीच्या धाग्यांमुळे बोर्डाचा खफ. जोड्या जुळवा (आयडी व विशेषणांच्या बरं का ;) ) मिपा विशेष स्पर्धा- प्रायोजक चौकटराजा पत्तेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 10:10 नवीन
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो पंच आहे तो मराठीत नाही रे. "मिपा पर मददयाचना करनेवाले धागों का कहर.. अफरातफरी का माहोल.." "मिलिटरी स्कूलवाले धागे पर मुतभेड.. बवाल में कई प्रतिसादों के लापता होने की आशंका.." "यौन शिक्षा संबंधित धागोंपर नाराज जनता का हमला.. लेखक ने बदली अपनी चाल.. गुलाबों की कथा लिखकर अपनायी गांधीगिरी.." "मंदाकिनी कांड मेरे निजी आयुष्य की सत्यघटना..परा का सनसनीखेज खुलासा.." "सडाफटिंग कट्टा मामले में मेरे शामिल होने का आरोप - एक साजिश.. गवि का हैरतअंगेज खुलासा.. बोर्डपर खलबली.."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मुठभेड

राजो
गुरुवार, 02/23/2012 - 11:23 नवीन
मुठभेड :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

_____/\____ कहर आहेत

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 11:59 नवीन
_____/\____ कहर आहेत हेडलाइन्स!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो

हंस
गुरुवार, 02/23/2012 - 13:50 नवीन
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो पंच आहे तो मराठीत नाही रे पटलं हो! आणि ब्रेकिंग न्यूज एकदम चुरचुरीत! ओर भी आन्दो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

छान छान

पियुशा
गुरुवार, 02/23/2012 - 10:06 नवीन
छान छान :)
  • Log in or register to post comments

दर बुधवारी हे बुलेटिन

स्वातीविशु
गुरुवार, 02/23/2012 - 10:54 नवीन
दर बुधवारी हे बुलेटिन प्रसारीत करावे, ही विनंती. :-)
  • Log in or register to post comments

भन्नाट पोस्ट

पप्पु अंकल
गुरुवार, 02/23/2012 - 11:53 नवीन
च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक….एक नंबर पोस्ट आहे….. जोरदार टाळ्या या भन्नाट प्रकारासाठी.. दर आठवड्याला हे सदर चालवावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

हहपुवा

नगरीनिरंजन
गुरुवार, 02/23/2012 - 11:54 नवीन
खतरनाक बुलेटीन आहे! दर आठवड्याला यायला काहीच हरकत नाही!
मिपाचे इंडियाना जोन्स वल्ली
=)) =)) खपलेलो आहे!
  • Log in or register to post comments

एकनाथ, गवि आणि पाभे .. जबरीच

गणेशा
गुरुवार, 02/23/2012 - 13:59 नवीन
एकनाथ, गवि आणि पाभे .. जबरीच हो .. बुलेटीन चालते ठेवा ..
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

पैसा
गुरुवार, 02/23/2012 - 14:10 नवीन
कहर आहे! यकु, गवि, भटजी आणि पाभे "मिपा पर चौकडी के खतरनाक कारनामे!!" धमाल आली. बुलेटिन कोणीही लिहा पण चालू ठेवा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
गुरुवार, 02/23/2012 - 19:38 नवीन
>>धमाल आली. बुलेटिन कोणीही लिहा पण चालू ठेवा म्हणजे झालं. +१, हेच म्हणतो. मजेशीर प्रकार आहे, ह्याचे एका चांगल्या मजेशीर उपक्रमात रुपांतर झाले तर नक्कीच आवडेल. पुढच्या धाग्याची वाट पहातो आहे. नियमीत लिहावे ही विनंती - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झक्कास..

चिगो
गुरुवार, 02/23/2012 - 16:20 नवीन
मस्तच आहे हा प्रकार.. गविंचा "मिपा इंडीया टिव्ही" पण खासच.. दर आठवड्याला पुनःप्रक्षेपण व्हायला पाहीजे ह्याचं..
  • Log in or register to post comments

.

अन्नू
Sun, 02/26/2012 - 15:28 नवीन
अहो एक ब्रेकिंग न्युज राहीली की हो, "आपल्या जिलीबीवर कधीच ढुंकून न बघणारे डॉक्टरसाहेब आता मिपावरच्या इतर लेखांवर आपली मते टंकायला लागलेत."
  • Log in or register to post comments

काहीतरीच ...छे, छे.. ही तर भानामतीच झाली की

शशिकांत ओक
Mon, 02/27/2012 - 11:33 नवीन
मित्रा अतृप्त आत्म्या काय हे!, ओकांच्या लेखनाला टॉप बिलिंग !!... वाचवत नाही मित्रा!!!,
विंगकमांडर ओक गालातल्या गालात हसुन
जे अंनिसवाल्या अनेकच्या घसटीतील व प्रेमळ संबंधातील, त्यानी ओकांना कुठे व कसाही का असेना प्रथम क्रमांकाचा मान (?) खरोखर अतृप्त आत्मांच्या वासनांशी भानामती नामक करणीताईंचा काही विशेष संबंध असल्याशिवाय असल्याशिवाय - (पहा हा शब्द न कळत दोनदा टाईप होण्यामागे काहीतरी 'राज' असेल काय?) हे घडणे शक्य नाही असे एक पुर्वीचे अंनिस प्रेमी व आताशेचे वाळीत पडलेल्या प्रकाश काकांचे मत असेल असे मानतो.
  • Log in or register to post comments

=)) मस्तच

मीनाक्षी देवरुखकर
Mon, 02/27/2012 - 12:03 नवीन
=)) मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा