Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Wed, 11/24/2010 - 18:09
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे.. आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली .. पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!! संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली.. हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !! मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने.. गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!! कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला.. लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं.. त्याचा पुनर्जन्म झाला.. आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !! ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही.. लाईम अँड लेमोनी लिम्का.. ही जुनी लाइन तर आजही नव्यानं जागी झाली आहे.. "ये नोकझोंक शरारतें" वाल्या फ्रेश अ‍ॅडसोबत तो परत आलाय..!! मला लिम्का "प्यायला" फार आवडायचा नाही. पण त्याच्या बुचाच्या आत रबरी स्टिकर मिळायचा..डिस्ने चा.. आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश वर्तन करून, तिथल्या स्टाफकडे फेकलेली लिम्काची बुचं मागायचो..मी लाज सोडायचो आणि आई बाबाना लाज आणायचो.. कधी चुकून कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर मोठ्यांकडून झालीच तर लिम्का मागवायचा...दोन घोट पिऊन निर्लज्जपणे टाकून द्यायचा (म्हणजे बिचार्‍या आईला प्यायला लावायचा..आई हे देवाचं रूप..!!) ..आणि (मुद्द्याचं..!!) बूच मिळवायचं.. नजर भंगारवाल्यासारखी सदैव होटेलातल्या खाली पडलेल्या बुचांच्या ढिगावर..लाल बुचात स्टिकर नसतो.. हिरव्या बुचातच असतो हे मी लवकरच शोधून काढलं होतं.. माझी बोटं आणि नखं पत्र्याची बुचं खरवडून खरवडून कुरतडल्यागत दिसायची.. डोनाल्ड डक मला जाम आवडायचा...मऊ मऊ रबरावर छापलेले रंगीत मिकी, डोनाल्ड, स्क्रूज, लुई, ह्युई, ड्युई..त्यांची मऊ थप्पी बोटांत दाबून भाव मारायचा मित्रांमधे.... त्या स्टिकर्सची एक्सचेंज व्हैल्यूही खूप होती..चार पाच स्टिकर्सच्या "बदली" एखादं मॅग्नेट (त्या वेळच्या पोरांच्या भाषेत "लवचिंबक") सुद्धा मिळू शकायचं..कोण म्हणतं की वस्तुविनिमय फार जुना झाला.. आमच्या शाळेत तर त्याचं "कमोडिटी एक्सचेंज" होतं.. अमुक एक इतके स्टिकर्स जमा केले की काहीतरी बक्षीस मिळतं अशीही एक बोलवा होती.. पण मी कधीच माझे स्टिकर द्यायला तयार झालो नसतो.. ............ कॅडबरीजचं "डबल डेकर" हे माझं अगदी पहिलं प्रेम..थोडं कुरकुरीत..खुटखुटीत आणि बरंच बरंच टेस्टी..हे जर कोणाला आठवत असेल तर मला खूप ग्वाड वाटेल. ..त्याचं जाणं मला खूप धक्का देऊन गेलं..मिलिंद बोकिलांच्या "शाळा" मधल्या शिरोडकरच्या जाण्यासारखं.. पण आयुष्य पुढं जात राहातं.. (.. फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी...!!!) ..तसंच मग कधीतरी कॅम्पको चॉकलेट आलं.. कॅडबरीजच्या जगात काही नाही तरी फक्त एक चेंज म्हणून ते सॉलिड आवडलं.. कुठे गेलं ते काय माहिती..शोधतोय शोधतोय.. मग काही वर्षांनी नाद सोडून दिला.. ..... डबल कोला.. हे एक पेय .. आणि रोला कोला नावाच्या गोळ्या.. रोला कोला..रोला कोला..इसमें कोला का मजा अलबेला..!! रोला कोला...कोला का गोला.. !! बघा अजूनही जिंगल आठवतेय मला... साल्या या जिंगल्स ही गायब झाल्या..नवीन विजुअल अ‍ॅड्सच्या तंत्रामधे.. ... नोगा जाम.. मस्ती भरा स्वाद खरा.. ... लाईफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां.. ... माल्टोवा मम.. ... दातों को सडने से बचाता है कोलगेट.. पेस्ट आहे पण जिंगल गेली. ... सुधा सुधा सॉफ्ट ड्रिंक काँन्सेन्ट्रेट अड़तीस गिलास एक पैकेट से बने.. तेरा तरह के स्वाद नये नये.. ... शार्प नावाचं पेन...रेनोल्ड्स ०.४५ फाईन कार्ब्युअर .. न्युट्रामूल..अंकल चिप्स..(बोले मेरे लिप्स..आय लव्ह अंकल चिप्स..).लॅक्टो किंग.. "O.K. च्युईंग गम".."डबल बबल गम".. एक्स्ट्राँग गुलाबी पेपरमिंट..पॉपिन्स.. रावळगाव.. हे सर्व ब्रँड एकतर संपले..किंवा त्यांचा चार्म तरी गेला.. अनब्रँडेड चिजा तर मोजण्यापलिकडच्या.. मनोज पान शॉपच्या बरणीतल्या लाल गोळ्या..किंवा पांढर्‍या दूधगोळ्या.. लिमलेट्च्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या गोळ्या (५ पैसे..!!).. चंदा आईस्क्रीम नावाच्या ढकलगाडीतली गार गार लाल कांडी.. कालाखट्टावाला पेप्सीकोला..खारट बर्फाळ प्लॅस्टिकच्या पिशवीचं टोक दातांनी तोडून गार गोड थेंब जिभेवर चोखायचे.. प्रत्येक brand कड़े स्वत:चं काही ख़ास होतं..आहे..!! प्रत्येक brand कड़े स्वत:ची काही बात होती.. आहे..!! आणि आपल्यातही ... कुछ ख़ास है हम सभी में.. कुछ बात है हम सभी में.. बात है..ख़ास है.. क्या स्वाद है जिन्दगी में..!! ...
  • Log in or register to post comments
  • 30918 views

प्रतिक्रिया

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 11/25/2010 - 07:09

In reply to बेसनलाडूजी,"ओके"ची जिंगल पुढे by गवि

Permalink

विको टर्मरिक क्रीम

कुंदन सा बदन दमके चंदन सी सुगंध महके हल्दी चंदन के उपटन से रूप सदा निखरे निखरे विको ने हल्दी चंदन को औषध के रूप में अपनाया विको टर्मरिक क्रीम को रचकर देश-विदेश में पहुंचाया आणि 'बन्नो'फेम जाहिरात - देखो चंदन सी महके हमारी बन्नो रूप की आज रानी बनी है बन्नो कील मुहासों को जड से मिटाये हल्दी चंदन के गुण इस्मे समाये त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 11/25/2010 - 21:37

In reply to विको टर्मरिक क्रीम by बेसनलाडू

Permalink

विकोच्या जाहिरातीत संगिता

विकोच्या जाहिरातीत संगिता बिजलानी आहे कि काय?
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 11/26/2010 - 01:58

In reply to विकोच्या जाहिरातीत संगिता by रेवती

Permalink

होय तसे दिसतेय खरे

(अंदाजपंचे)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 11/25/2010 - 09:47

Permalink

किराये की बुल्डोझर पे

किराये की बुलडोझर पे बैठे भाडे के टट्टु, दम है तो चला बुलडोझर्.....एकदम कूऊउल.
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on गुरुवार, 11/25/2010 - 12:50

In reply to किराये की बुल्डोझर पे by स्पंदना

Permalink

थोडं करेक्शनः भाडे के

थोडं करेक्शनः भाडे के बुल्डोझर पे बैठे किराये के टट्टु दम हे तो बढ आगे! प्रतिक्षा लोणकर होती त्यात! कुठला तरी चहा पित असायची.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 01/31/2012 - 21:55

In reply to थोडं करेक्शनः भाडे के by मी ऋचा

Permalink

अपर्णातै, मी-रुचा---

भाडे के बुल्डोझर पे बैठे किराये के टट्टु दम हे तो बढ आगे!
सपट परिवार चहा... सुर्रर्रर्र के पियो...
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 10:42

Permalink

संदर्भ लागत नाही

संदर्भ लागत नाही अपर्णाताई. ऐकल्यासारखं वाटतंय पण नाहीही. काय आहे हे?
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on गुरुवार, 11/25/2010 - 12:29

In reply to संदर्भ लागत नाही by गवि

Permalink

कोणत्यातरी चहाची जाहिरात होती

कोणत्यातरी चहाची जाहिरात होती ती..
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 11/25/2010 - 11:20

Permalink

१. जरास्सा उफ्फ... जरासा आह..

१. जरास्सा उफ्फ... जरासा आह.. जरासा ओहो.. यही तो प्रॉमिस की शान है. २. एक कुठल्या तरी क्वायरची अ‍ॅड होती. तेव्हा इंग्रजी यायचं नाही,.(आताही जास्त येतं असा गैरसमज नाही) तरी ती अ‍ॅड मस्त वाटायची. आता त्यातलं फक्त 'मम्मी नेम' असं काहीतरी आठवतंय. ३. दिनेश सुटिंग-शर्टिंग. त्यात सुनील गावस्कर एका माणसाच्या हातातल्या कोनातलं आईस्क्रीम उडवून लावतो हे उगीचच आवडायचं. ४. आणि नेस्ले चॉकलेटच्या जाहिरातीपण छान होत्या. बर्‍याचशा होत्या त्यातली 'बीत गये दिन गुडियोंके आये नहीं अभी साडीके, तो फिर क्यूँ ना खाये अमूल चॉकलेट" हीच तेवढी आठवतेय आता.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 12:45

In reply to १. जरास्सा उफ्फ... जरासा आह.. by मस्त कलंदर

Permalink

एक कुठल्या तरी क्वायरची अ‍ॅड

एक कुठल्या तरी क्वायरची अ‍ॅड होती. तेव्हा इंग्रजी यायचं नाही,.(आताही जास्त येतं असा गैरसमज नाही) तरी ती अ‍ॅड मस्त वाटायची. आता त्यातलं फक्त 'मम्मी नेम' असं काहीतरी आठवतंय.. क्वॉयर डेकोर फ्रॉम क्वॉयर बोर्ड.. असं काहीतरी होतं का? दिनेश, मला वाटतं, टेक द वर्ल्ड इन योर स्ट्राईड्..असं काहीतरी.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on गुरुवार, 11/25/2010 - 11:57

Permalink

जुन्या जाहिरातींचा आपला एक

जुन्या जाहिरातींचा आपला एक जमाना होता...
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on गुरुवार, 11/25/2010 - 12:27

Permalink

खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या

खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या जाहिरातीही अजून आठवतात, कारण तेव्हा रिमोट हातात नसायचा -नव्हे रिमोट मला तर माहीतही नव्हता ....त्या जाहिरातीही पाहायला आवडायच्या ज्यांचा उल्लेख झाला नाही त्या मला काही आठवतात... १. मैने कहा कुछ तुमने सुना .. क्या, क्या... ओरीयंट, ओरीयंट , ओरीयंट फ्यान... हवाये ताजी थंडी ,तस्सली जीवन भर कि ओरीयंट, ओरीयंट , ओरीयंट फ्यान... २. मेलडी खो खुद जन जावो..(मी नेहमी 'मेलडी खावो खुचान्जावो असे ऐकायचो) ३. आवो चाले हम लेकर अपनी टोबु सयाकले , अपनी टोबु सयाकले (यातला लहान मुलगा शान होता)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 12:41

In reply to खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या by जोशी 'ले'

Permalink

मस्तच अ‍ॅडिशन्स..

मस्तच अ‍ॅडिशन्स झाल्या..टोबू सायकलें.. ओरिएंट प्रमाणेच उषा फॅन्सची पण होती काहीतरी. परत सूर्या ट्यूब्ज, सूर्या बल्ब्ज. थॅक्स जोशीले साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on गुरुवार, 11/25/2010 - 12:55

Permalink

अमृत मलम त्वचेचे

अमृत मलम त्वचेचे संरक्षण! अमृत मलम त्वचेचे संगोपन!! अमृत मलम.. अविनाश नारकर आणि रेणुका शहाणे आणि इतर दोन तीन लोकं होते एक लहान मुलगा/मुलगी आणि एक आजोबा! अजुनही कधी कधी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:11

In reply to अमृत मलम त्वचेचे by मी ऋचा

Permalink

अमृत मलम तर हिट होतीच्..पण

अमृत मलम तर हिट होतीच्..पण कैलास जीवन मधे ती वाटीने आजोबांचे तळपाय चोळणारी आजी आणि आजोबांच्या चेहर्‍यावरचे गुदगुल्या होत असल्यासारखे भाव..!! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by satish kulkarni on गुरुवार, 11/25/2010 - 13:21

Permalink

सिन्कारा...

इन्हे चाहिये हमदर्द क सिन्कारा.. आनि तो अशक्त तरुण काच फोडुन येतो... हा हा हा...
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:09

In reply to सिन्कारा... by satish kulkarni

Permalink

ये बेचारा काम के बोझ का मारा.

ये बेचारा काम के बोझ का मारा. इन्हे चाहिये हमदर्द का टॉनिक सिंकारा.. पूरे परिवार के लिये ..हमदर्द का टॉनिक सिंकारा..
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on Fri, 01/17/2014 - 16:04

In reply to ये बेचारा काम के बोझ का मारा. by गवि

Permalink

तो तरूण, जावेद जाफरी होता

तो तरूण, जावेद जाफरी होता
  • Log in or register to post comments

Submitted by महानगरी on गुरुवार, 11/25/2010 - 15:03

Permalink

मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग

मॉन्टे कार्लो च्या जाहिराती मधले 'Nothing is gonna change my love for you' गाणे जीव टाकुन बघत असू तसेच बॉम्बे डाईंग मधला शशी कपूर चा मुलगा करण कपूर. एक फॅण्टा ची अ‍ॅड पण मस्त होती. आनि कुणाला ती चौकोनी गुलाबी काजुकंद वडी आठवत नाही? अजूनही मिळते ती..
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 15:08

In reply to मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग by महानगरी

Permalink

एका ठराविक किराणा मालाच्या

एका ठराविक किराणा मालाच्या दुकानात मिळायची बरीच वर्षं. चौकोनी पारदर्शक आणि मधे सोनेरी टिकलीसारखा कागद्..तीच ना?
  • Log in or register to post comments

Submitted by महानगरी on गुरुवार, 11/25/2010 - 15:22

In reply to एका ठराविक किराणा मालाच्या by गवि

Permalink

नाही नाही

दहाचे पाकिट असायचे. मस्त गुलाबी रंगाची, काजुकंद च म्हणायचे तिला. चपटी, चौकोनी आणि मऊसर.. काजुकतली ची गरिबडी नातलग आहे ती....
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 15:46

In reply to नाही नाही by महानगरी

Permalink

पारदर्शक म्हणजे वडी नव्हे.

पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. रॅपर. अनंत अँड आठवलेंची ना? अशी का? Image removed. गूगलवर कुठेच चित्र मिळेना म्हणून फोटोशॉपमधे कामचलाऊ चित्र बनवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by महानगरी on गुरुवार, 11/25/2010 - 17:18

In reply to पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. by गवि

Permalink

बरोब्बर ..

सोनेरी ठिपका प्रथमच बघितला पण....
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 17:24

In reply to पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. by गवि

Permalink

तो फक्त कागद असायचा सोनेरी..

तो फक्त कागद असायचा सोनेरी..बहुधा ए ए (अनंत आठवले ट्रेड्मार्क) लिहिलेला.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Fri, 11/26/2010 - 09:59

In reply to नाही नाही by महानगरी

Permalink

मिळते अजून ती... देसाई बंधू

मिळते अजून ती... देसाई बंधू च्या दुकानात अजून ही मिळते.. मी आणते बर्‍याच वेळेला!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 02/01/2012 - 14:59

In reply to मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग by महानगरी

Permalink

चौकोनी गुलाबी काजुकंद वडी

चौकोनी गुलाबी काजुकंद वडी आठवत नाही ती अनंत अँड आठवले ची काजू वडी होती. अजूनही मिळते. बिनाका टुथपेस्ट च्या बॉक्स मधे एक रबरी खेळणे मिळायचे. मला तर शाळेतल्या कंपासपेटीतल्या खोडरबराचा वास अजून आठवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुराग on गुरुवार, 11/25/2010 - 15:23

Permalink

मार्लेक्स आणि एमआर काफि

शिटि जल्दि बजाए ओर खाना पकाए
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:07

In reply to मार्लेक्स आणि एमआर काफि by अनुराग

Permalink

एम आर कॉफी डीटेल्स न देता

एम आर कॉफी डीटेल्स न देता बायपास केलीत ते चांगलं केलंत. एक होती ती :" डबल मजा है और कम दाम, एम आर कॉफी जिसका नाम" आणि दुसरी "रिअल प्लेझर डजन्ट कम इन्स्टंट.." एम आर च ना ती पण? असो.
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on गुरुवार, 11/25/2010 - 15:44

Permalink

अजुन एक........जो बिबी से

अजुन एक........जो बिबी से सचमुच करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इन्कार...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 11/25/2010 - 17:18

Permalink

मस्त धागा!

बिल्ले गोळा करण्यात निर्लज्जतेची कमाल पातळी गाठलेली होती. त्यावेळी लग्नाच्या रिसेप्शनला बुफे डिनर नसे तर तिरंगी आइसक्रिम किवा कोल्डड्रिंक असायचे. लिमका, गोल्डस्पॉट नाहीतर थप्स अप. ते पिण्यापेक्षा जेथे क्रेट ठेवलेले असत तेथे जाऊन बुचं गोळा करण्यात जास्त रस आणि पर्यायाने बरोबरच्या मोठ्यांना कुठून आणलं ह्या कार्ट्याना इथे असे वाटायला लावायचे.पण मग तेथे आलेली इतर मुलंही बुचं आणि बिल्ले गोळा करण्याच्या उद्योगाने आपापल्या पालकांना लाज आणत असत. हॅप्पी डेज आर हिअर अगेन... ही जाहिरात खूप आवडायची . सर्फ की खरिदारीमेही समझदारी है ! वाले ललिताजी उडान मालिकेत आली तेव्हा काय भारी वाटलं होतं. आणि आसरानीची एक रामलक्ष्मण बल्ब देना, रामलक्ष्मण नही भाई, सिल्व्हेनिया लक्ष्मण.. सारे घर के बदल डालूंगा... जब मै छोटा बच्चा था बडी शरारत करता था.... बजाज बल्बची ही पूर्ण जाहिरात क्वचित दाखवत, कधी बच्चा, कधी जवान तर कधी बूढा... वाली कडवी दाखवत असत. अशा कितीतरी अनेक... ब्लॅक अ‍ॅन व्हाइट टीव्ही च्या काळातल्या खूप आठवणी ताज्या झाल्या. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/25/2010 - 17:26

In reply to मस्त धागा! by स्वाती दिनेश

Permalink

बिल्ला...

बिल्ला..येस्..बुचाला मूळ लहानपणचा शब्द दिल्याबद्दल धन्स स्वातीजी.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/25/2010 - 17:42

Permalink

सूप्परडूप्पर हिट्ट है

सूप्परडूप्पर हिट्ट है भौ! एकदम मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:07

In reply to सूप्परडूप्पर हिट्ट है by धमाल मुलगा

Permalink

धन्स..

धन्स..
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Fri, 11/26/2010 - 10:35

Permalink

गगनविहारी यांची पोतडी....!!

श्री.गगनविहारी यांचे या धाग्याबद्दल आभार थोडे जास्तच मानले पाहिजेत कारण या निमित्ताने त्यांनी इथल्या अनेक सदस्यांना 'Tour De Nostalgia' घडविली आणि त्यातून प्रकट होत आहे निखळ आनंद जो वर्षानुवर्षे आपण मनी जतन केलेला असतो. खूप आनंद झाला या आठवणी वाचून. मलाही यातील बर्‍याच आठवतात त्यामुळे द्विरूक्ती टाळत आहे, तरीही अजून ज्यांचा उल्लेख झालेला नाही पण स्मरणी आहेत त्यापैकी काही : १. कोणत्याही शब्दांचा भाषेचा अजिबात उल्लेख न करताही अत्यंत प्रभावी ठरलेल्या Fevicol च्या सर्वच जाहिराती...त्यातही राजस्थानच्या रेताड रस्त्यावरून जाणारी ती परिवहन मंडळाची प्रवाशांनी लडबडलेली बस...! व्वा !! [हल्लीहल्ली व्होडाफोनच्या झूझूंनी अशीच धमाल केली आहे.] २. मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची अनेकविध कारणांनी गाजलेली (की गाजविलेली??) TUFFS बूटांची जाहिरात. ३. प्रिती झिंटा आणि वर्गमित्र आपल्या मागण्यासाठी संप आणि उपोषण करीत आहेत आणि प्रिती हळूच कुणाला नकळत कुर्रम कुर्रम Perks खाते. ४. एक फारच जुनी....टीव्हीवर की थिएटरमध्ये पाहिलेली [कदाचित मॅगेझिन्समध्येही असेल].... चेरी ब्लॉसम बूट पॉलिशची...."Something special is coming on your way...." ~ मॉडेल बहुतेक नफिसा अली होती. ५. अर्चना जोगळेकरची ती एक खट्याळपणाची "शादी और तुमसे..? कब्बी नही..." ~ प्रॉड्क्ट विसरलो. कदाचित श्री.गगनविहारींच्या पोतडीत असेल. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 11/26/2010 - 10:38

In reply to गगनविहारी यांची पोतडी....!! by इन्द्र्राज पवार

Permalink

>>"शादी और तुमसे..? कब्बी

>>"शादी और तुमसे..? कब्बी नही..." पान पसंद.. पान का स्वाद, गज़ब की मिठास... जाता जाता, अजून कुणाला "काय झालं?", "बाळ रडत होतं" का आठवली नाहीय?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:56

In reply to >>"शादी और तुमसे..? कब्बी by मस्त कलंदर

Permalink

पान पसंदची सीरीजच होती.

पान पसंदची सीरीजच होती. भारती आचरेकर लाटणं घेऊन, अशी पण एक होती. मस्त कलंदर, आधीच उत्तर दिल्याबद्दल धन्स.. प्लीज कोणीतरी माझ्या दातात अडकलेल्या सुपारीसारखी ती न आठवणारी जाहिरात काढा रे. "जीवनाला वेग हवा, रिस्क हवी आणि दरवर्षी नवं मॉडेलही हवं.." (मुलगी नाक मुरडून फोटो फेकून देत) "उद्या मलाही बदलशील.." "हमखास पैसे मिळवण्याचा / फायद्याचा (??) एकच मार्ग - शेअर्स.." (मुलगी तुच्छतेने फोटो फेकून देत): "(शी) नको ग बाई.." ...काय होतं ते...?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 10:58

In reply to गगनविहारी यांची पोतडी....!! by इन्द्र्राज पवार

Permalink

प्रतिसाद बघून मलाही खूप आनंद

प्रतिसाद बघून मलाही खूप आनंद झालाय..सर्वांना आपल्यासारखेच अनुभव आहेत हे बघून.. इन्सान खुद की ही नही, दूसरे की छाती में भी जिन्दा रहने का सबूत मांगता है..
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Fri, 11/26/2010 - 10:58

Permalink

ख्ल्लास

ख्ल्लास धागा................(ख्ल्लास=क्लास हा शब्द जोर लावुन )
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Fri, 11/26/2010 - 16:49

Permalink

आठवत असलेले काही दुवे....

गगनविहारी : आपण म्हणता ती जाहिरात बहुधा इंदिरा विकास पत्र किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांची असावी. त्यात रामायणफेम दीपिका चिखलिया होती. तिला ३ स्थळे सांगून येतात. पहिल्या दोघांचे संवाद आपण दिलेच. तिसरा म्हणतो, ' नोकरीची शिल्लक बचत प्रमाण पत्रांत गुंतवली. हे गॅरेज काढले. आता भवितव्याची चिंता नाही.' त्यावर दीपिका लाजून 'बाबा' असे म्हणत होकार देते. ओन्ली विमलच्या जाहिरातीत पारशी सुंदरी होती का? गार्डन वरेलीच्या जाहिरातीत पर्सिस खंबाटा होती. पानपसंदच्या जाहिरातीत अर्चना जोगळेकर व भारती आचरेकरप्रमाणेच आणखी एक हिंदी अभिनेता होता. (बहुतांश खलनायकी भूमिका करणारा. नाव सांगेल का कोणी?) तो घरमालक असतो. चिडून म्हणत असतो, 'भाडा नही देना हो तो खाली कर दो मकान' तेच पानपसंद खाल्ल्यावर गोड हसून म्हणतो, 'अगर भाडा नही देना हो तो क्यू न मकान खाली किया जाय' काही आणखी रंजक जाहिराती आय लव्ह यू रसना धारा धारा... शुद्ध धारा. (घर सोडून जाणार्‍या चिमुरड्याला पोस्टमनकाका 'घर मे मा जलेबिया पका रही है' असे सांगून परत आणतात ती जाहिरात मस्तच. पानपराग पानमसाला (एक से मेरा क्या होगा?) फिनोलेक्स पाइप्सचे जिंगल लक्षात राहणारे झुळझुळ पाणी, खेळवा रानी आणायचं कुणी? सांगतो राणी फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी सपट चहाप्रमाणेच 'मगदूम चहा' ची जाहिरात ऐकली आहे का? सातारा-सांगली-कोल्हापूरच्या लोकांना नक्कीच ठाऊक असेल. त्यातला संवाद 'सखू चा टाक पावन्यास्नी' 'चा नगं' 'का वं? सवाष्णिनं कुंकवाला आनं मर्दानं चा ला न्हाई म्हनायचं नसतं' 'पन आमी फकस्त मगदूम च्याच पितो' 'आन आमी काय उनपानी पितो काय? आमीबी आमच्या आजाच्या काळापासून मगदूम चा च पितो.' 'आसं म्हनता? मग हून जाऊंदे डबल'
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/26/2010 - 17:00

In reply to आठवत असलेले काही दुवे.... by योगप्रभू

Permalink

निघाली निघाली...दातात अडकलेली

निघाली निघाली...दातात अडकलेली सुपारी निघाली एकदाची. पण उपयोग काय? >>>>>>>>>> पानपसंदच्या जाहिरातीत अर्चना जोगळेकर व भारती आचरेकरप्रमाणेच आणखी एक हिंदी अभिनेता होता. (बहुतांश खलनायकी भूमिका करणारा. नाव सांगेल का कोणी?) तो घरमालक असतो. चिडून म्हणत असतो, 'भाडा नही देना हो तो खाली कर दो मकान' तेच पानपसंद खाल्ल्यावर गोड हसून म्हणतो, 'अगर भाडा नही देना हो तो क्यू न मकान खाली किया जाय' >> "तो कोण...?" हा नवीन सुपारीचा तुकडा अडकवलात दाढेत आमच्या.. बसतो आता आठवत..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Wed, 02/01/2012 - 15:24

In reply to निघाली निघाली...दातात अडकलेली by गवि

Permalink

गवि,

तुझी सुपारी मी काढतो. (दातांचा नसलो तरी मी पडलो वैद्यकिय व्यावसायिक ना, हे जमलंच पाहिजे ;-)) असो. तो अभिनेता होता सी. एस्. दुबे. Image removed. या चित्रामध्ये तरुण विजु खोटे बरोबर खुर्चीवर बसलेले दिसतात तेच ते सी. एस्. अर्थात चंद्रशेखर दुबे. झालं समाधान? खुश? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 02/01/2012 - 15:31

In reply to गवि, by प्रास

Permalink

परफेक्ट प्रासदादा.. यहीच्च है

परफेक्ट प्रासदादा.. यहीच्च है वो... जुनाट दातदुखी एकदम थांबली.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 01/31/2012 - 21:56

Permalink

थ्यांक्स गवि...

लै दिसांनी ह्या धाग्यावर रिप्लाय द्यायला आलोय..... आम्ही सुद्धा उकंडे-नाल्या-गटारं सर्वतोपर फिरुन काडेपेटीचे कव्हर गोळा करत असु... लै भारी वाटायचं तेव्हा.... (लवचिंबक मस्त) काही अ‍ॅडिशन्स माझ्यातर्फेही... १. लिसन्सी सोप = राहुल पानी चला जायेगा... २. सौंदर्य साबुन निरमा = तुम हुस्नपरी, तुम जाने जहॉ, तुम सबसे हसीं, तुम सबसे जवॉ... --(आता ह्या अ‍ॅडमध्ये सोनाली बेंद्रेच्याऐवजी हंसिका मोटवानीला घेतले आहे.) ३. निरमा सुपर = ओ हो, दिपिकाजी. आइये, आइये. ये लिजिये आपका सब सामान तैयार... ये नही वो...लेकिन आप तो हमेशा वो महेंगीवाली टिकिया... लेती थी... लेकिन वही सफेदी वही झॉग कम दामों मे मिले, तो कोइ ये क्युं ले, वो न लें... मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को... एक प्रश्न :: ४. दुरदर्शनवर एक गाणं यायचं. त्याचे बोल पुर्ण आठवत नाहीत. (१९९५च्या आसपास असेल कदाचित) ==> सौरमंडलमे टिमटिम करते तारें अनेक है... XXXX XXXX गीत सुनाते पक्षी अनेक है....पर निराकार निर्विकार अनंत गगन एक है... कुणाला माहिती असेल तर या खाली पोस्ट करा प्लीज....
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 02/01/2012 - 15:50

In reply to थ्यांक्स गवि... by वपाडाव

Permalink

तू "एक चिडिया , अनेक चिडिया"

तू "एक चिडिया , अनेक चिडिया" या अ‍ॅनिमेटेड गाण्याविषयी म्हणत आहेस का? ("फिल्म्स डिव्हिजनची भेट" बहुधा) त्याचेही शब्द असे अनेक / एकवाले होते.. Image removed. या चित्रावरुन बघ आठवून..
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 02/01/2012 - 16:19

In reply to तू "एक चिडिया , अनेक चिडिया" by गवि

Permalink

नाही गवि...

हे गाणे तर मला माहिती आहे... पारध्याची कथा अन एकीचे बळ वाली कंसेप्ट आहे ह्यात.... मी म्हणतोय ते गाणे खुप वेगळे आहे... व्हिडो मध्ये जे पुसटंसं आठौतंय ते असं की... भारतातील वेगवेगळ्या चालीरिती (मराठीत कल्चरल डायव्हर्सिटी) एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय... (मंदिरातील पुजेपासुन = काकडआरती सदृश, मशिदीतील अजान, सुवर्णमंदिरातील गुरवाणी वेग्रे वेग्रे) गाण्याचा शेवट असा होतो की, गुंजती है चहु दिशा मे, दिल की धडकन एक है. अपना चमन एक है, अनंत गगन एक है... दिल की धडकन एक है !
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसखी on Tue, 01/31/2012 - 22:48

Permalink

खूपच छान धागा आहे..

खूपच छान धागा आहे.. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारा... मे महिन्याच्या सुट्टिला चुलत- आत्ये भावंडे घरी आल्यावर जणू सगळ्या जाहिराती म्ह्णून दाखवून आपल्या ऊत्तम स्मरण शक्तीची प्रचिती देण्याची चढाओढच असायची.. अजून एक जाहिरात आठवली.. जरूरत है..जरूरत है..जरूरत है.. हां हां मिस मेरी कुकर की.. कलावती की सेवा करे जब पती जी !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 01/31/2012 - 22:55

Permalink

अरे दुरदर्शनवरील अनेकता में

अरे दुरदर्शनवरील अनेकता में एकता - (एक चिडीया, अनेक चिडीयां), अन्न का हर दाना बचाओ आदींबाबत कुणीच बोलत नाही? येथे पहा
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Tue, 01/31/2012 - 23:35

Permalink

धागा वाचून पाठिला डोळे फुटले

मामच्या कमोडीटी एक्स्चेंज मध्ये काय होते ? वाचा :- १. सिगारेट पा़कीटे - चांदी सहीत. २.भिंग ३.लोहचुंबक ४ बेचकी / गलोल ५. चाक / चक्र / गाडा ( लोखंडी रिंग व एक अँग्युलर काठी घेऊन ऊग्गाच फिरवत फिरवत फिरणे ) ६. बोर / चिंचा / आवळे /कैरी ७. चिक्की (१पैसा एक ) ८.फुगे / शिट्टी / पाणफुगा / चाकु-ब्लेड (पात ) ९. एम. आर. आय. चा बॉल ( इ. ८ वी ते १० वी ) १०. इ़को - स्केच पेन. ११ . गोट्या - ह्याचा भाव क्रुडतेलाच्या भावासारखाच कधी कधी भलताच वधारायचा. माझ्याकडे इ . ७ मध्ये ४० गोट्या होत्या. तेव्हा मी खूप श्रीमंत होतो . अकरावीत "आईने " फेकुन दिल्या -१०-१५ च असतीत , त्यावेळच्या भावना काय सांगाव्या ? गर्भपातच की हो तो !!! मारकेट , शाळेपूर्वी व नंतर १ तास जोरात असे . मधली सुट्टी हे मिनी मारकेट. चालू तासाला क्वचित " अकाऊंट "सेटलंमेंट ही होत . ऊधारी होती , वायदा बाजार होता , गॅरेंटर होते , मारामारी होती . पण हलकट / बुडवेगीरी नव्हती . जाहिराती विषयी थोडेसे १.माला वेंगरकर ( आमचे एक आजोबा त्याला "वेंगसकर" म्हणायाचे!) कुटुंवाची "विजिल" ची अ‍ॅड आठवली. आमच्या कमोडिटी एक्स्चेंज मधे पुढील गोष्टी असत. २ .पामोलीव दा जबाब नही - फावड्या ३.शेविंग आणि मी - गोदरेज शेविंग राऊंड ( काय साल प्रॉडक्ट !!! ) ४. निकी - ताशा नावची काय भानगड होती , आठवत नाही . ५.प्रकाश म्हाका तेल - ह्याने केस तर गळतातच पण झोपही लागत नाही , ह्या विडंबना सहित. ६. एक तितली , अनेक तियलीया - हे पण काही तरी होतेच. ७. प्रणय रॉय चे वॉट द गूड वर्ड प्रायोजित करणारी ब्रिटिश एअर वेज ची " इट्स बॉय " ही जबरा अ‍ॅड ...ग. वी . बरोबर आहे की गल्ली हुकली . ८. विनोद खन्नाची सिंथोल ची अ‍ॅड ९. एशिअन पेंट्चा "गट्टु " १०. नजरा वळ्ती परत अशी सुपर रिन्ची चमक. ११. ऊत्तम लाकुड मजबुत शिसे - नटराज (कि अप्सरा ) पेन्सिल फक्कड दिसे. थोडा चावटपणा - जुन्या काळातला आहे , समजुन घेणे १. पाच मिनीटे काम , तिन वर्षे आराम - तांबी बसवा ( काही कळायचच नाही हो ! ) २. वी . आय . पी अंडर वेअर बनियान .........." फीलिंग्स " (येथे एक डोळा मारणारी स्मायली ) जाणकाराना पोहोचल्या का ? आणि हो , ज्यानी विचार कसा करायचा ह्याची शिंगे फोडली ते दोन महाभाग होतेच . १.कुणीही प्रायोजित न केलेले पण नेमके / अचुक / तर्क-शुध्द असे गोविंद तळवलकरांचे मटाचे ( पत्र नव्हे , मित्र (कुत्र! ))अग्रलेख. २. लोकसत्ते मधिल माधव गडकरींची "चौफेर ".
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Wed, 02/01/2012 - 00:10

Permalink

"अय्या! टारझन बाळाराम

"अय्या! टारझन बाळाराम मधे..." कैक वर्षांपुर्वी रेडीयोवर सतत लागायची ही बाळाराम मार्केट ची जाहिरात. नुकतीच त्याची नवीन आव्रुत्ती ऐकली कोणत्यातरी रेडीयो वाहिनी वर. जुन्या जाहिरातीचा चार्म जरी त्यात नसला तरी जुनी आठवण जागी होऊन मस्त वाटले. "साडीमें साडी, पराग साडी" ही भाग्यश्रीची जाहिरात अशीच विनाकारण लक्षात राहणारी. "काय झालं?...बाळ रडत होतं" या ग्राईप वॉटरच्या जाहिरातीवर शालेय दर्जाचे असंख्य पाचकळ विनोद प्रचलित झाले होते. ट्रंप कार्ड वगैरेंच्या अनेक वर्षं आधी "बिग फन" नावाचं चुइंग गम मिळायचं. त्याबरोबर क्रिकेटपटूचे छोटेसे व अत्यंत अस्पष्ट फोटो आणी ट्रंप कार्ड वर अस्ते त्याप्रमाणे संक्षीप्त माहिती असायची..
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 02/01/2012 - 00:12

Permalink

४. निकी - ताशा नावची काय भानगड होती , आठवत नाही .

'निकि ताशा किचनेट' नावाच्या फरीदाबादच्या स्वयंपाकघरातील मल्टी-गॅस-बर्नर, मायक्रोवेव्ह वगैरे उपकरणांची जाहिरात असायची ती..."Anything is possible with Niki Tasha Kitchenette" अशी जिंगल असे. (त्यावेळी!) प्रचंड खर्चिक पण आकर्षक वगैरे असायच्या त्यांच्या शेगड्या. जुना पण वाचनखूण करून ठेवायला हवा असा नॉस्टॅल्जिक धागा वरती आणल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com