✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हवीच असते मी!

न — नगरीनिरंजन, Sat, 01/14/2012 - 22:07
न्यूयॉर्कच्या अतिप्रगत रस्त्यांवर सिंगापूरच्या अदृष्य गल्ल्यांमध्ये रोमच्या ऐतिहासिक चौकाचौकात आणि मुंबईच्या प्रत्येक फुटपाथवर निवांत लोळत पडून असते मी तुमच्या दिशादर्शक नाकाखाली गाडीच्या पारदर्शक काचेबाहेर हवं तेच पाहणार्‍या डोळ्यांसमोर आणि तुमच्या घरामागच्या बोळीत सुखेनैव विहरत असते मी उंची मखमली बैठकींवर बसून सिंगल मॉल्टच्या घुटक्यांबरोबर कबाबसोबत तोंडी लावायला मला हटवायच्या गप्पा करतात तेव्हा पांढर्‍या गणवेशात 'सर्व्ह' करते मी अ‍ॅपलपासून बर्गरपर्यंत आणि केकपासून पिझ्झ्यापर्यंत ठासून भरलेल्या फ्रीजसमोर आमचा बबडू काही खातच नाही म्हणतात तिथेच अर्धपोटी भांडी घासते मी कचरा काढायला, गाड्या धुवायला मेहनत करायला न् ओझी वाहायला माणसं असणं अत्यावश्यकच असतं म्हणूनच घरात नको असले तरी बाहेर सगळ्यांना हवीच असते मी.

प्रतिक्रिया द्या
2373 वाचन

💬 प्रतिसाद (8)

खरं आहे

अगोचर
Sun, 01/15/2012 - 19:31 नवीन
बरोबर जमली आहे !
  • Log in or register to post comments

अहो ननि,

पैसा
Sun, 01/15/2012 - 20:14 नवीन
ती नसली तर सगळ्या राजकारण्यांची दुकानं कशी चालायची? "गरिबी हटाओ"च्या मोठ्यामोठ्या घोषणा देऊन लोकांना स्वप्नं कशी दाखवणार ते मग? आणि आमच्यासारख्याना कष्टाची कामं आयती कोण करून देणार?
  • Log in or register to post comments

मस्त!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 01/16/2012 - 11:27 नवीन
छान जमलीये.
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. एकदम मस्त झकास

गणेशा
Mon, 01/16/2012 - 23:46 नवीन
अप्रतिम .. एकदम मस्त झकास काव्य.. आवडेश
  • Log in or register to post comments

सुंदर जमलीये कविता. अत्यंत

मेघवेडा
Mon, 01/16/2012 - 23:48 नवीन
:( सुंदर जमलीये कविता. अत्यंत सूचक.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चतुरंग
Tue, 01/17/2012 - 00:13 नवीन
जियो! -रंगा
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Tue, 01/17/2012 - 10:25 नवीन
मस्त जमलीये!! :)
  • Log in or register to post comments

वाह.. .जियो ननि..

गवि
Tue, 01/17/2012 - 11:15 नवीन
वाह.. .जियो ननि..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा