मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नास्तिक !!!

फिझा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
समुद्र किनाऱ्यावर लिहावीत अक्षरे काही अर्थपूर्ण ... काही निरर्थक ..... मग सगळेच पुसून टाकावेत ..... वेचावेत खडे एक एक आयुष्यातले आणि दिशाहीन भिरकावून द्यावेत .... समुद्रालाच विचारावी मग किंमत अक्षरांची,आठवणींच्या खड्यांची ... घट्ट मुठीत धरून ठेवलेल्या ओल्या रेतीची.... त्यातून ठिबकणारे पाणी ......थेंब थेंब तसेच हजारो विचार तुझ्या अस्तित्वाचे .....थेंब थेंब ती रेती मग लाटांमध्ये सोडून द्यावी जणू स्वतालाच पाण्यामध्ये सोडावे .... पायाखालची रेती वाहून जावी लाटांबरोबर आणि आपण मात्र क्षणभरात सावरावे .... पाहावा फक्त तो विरघळणारा लाल रंग ...... दिवस मावळून सूर्य निघेल मग परतीच्या प्रवासाला समुद्राबरोबर... बुडणाऱ्या सूर्याचे सांत्वन न करता मग आपणही निघावे काही तर्कांबरोबर ... मनात परत तीच हुरहूर घेऊन.... स्वताशीच ताटातूट झालेले आपण ...... पायाला चिकटलेले वाळूचे कण जसे झटकू शकत नाही ....... तसेच ...सगळीकडे तुझ्या अस्तित्वाची जाणीव असताना मी स्वताला 'नास्तिक' म्हणून शकत नाही !!!!

वाचन 5255 प्रतिक्रिया 0