✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(चेतन सुभाष गुगळे- ??)

स
सोत्रि यांनी
Mon, 12/19/2011 - 15:35  ·  लेख
लेख
{([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. http://www.misalpav.com/node/20105 मिसळपाव ह्या संस्थळावर वाचकावस्थेत असताना एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या ''ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)' च्या पंचवीस प्रकरणांचा संच (०८-२०११) दाखल झाला. प्रगल्भ आणि परिपक्व लेखनशैलीची ओळखच चेतन सुभाष गुगळे यांच्या ह्या मालिकेतून झाली. कितीतरी दिवस मिपावर त्या मालिकेचे पारायण केले जायचे आणि चेतन सुभाष गुगळेंचे विचार, त्यांचा एकंदर अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात, आंतरजालावर होत नसलेल्या वैचारिक लेखनामुळे होणारी तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. चेतन सुभाष गुगळेंचे लेख ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाचे बाजारू लेख नव्हते - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे. ते लेख वाचूनच अंतरजालावर आणि विवीध मराठी स‍ंस्थळांवर येणार्‍या काही थिल्लर लिखाणाकडे बघणे बंद झाले. भारताला भरताची कशी गरज आहे, गुन्हेगारीने कशी देशाची वाट लावली आहे, मतदान न करता आपणही त्यात अजाणता कसा त्या अराजकतेत भाग घेतोय वगैरे मुद्यांवरुन कित्येकदा वाद घालून झाले.. अशीच काही महिने गेले. चेतन सुभाष गुगळेंचे लेख आणि काही प्रमाणात तेही विस्मरणात गेले. काल-पर्वा फेसबुकवर पुन्हा एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या लिखाणाची लिंक समोर आली. त्यात मात्र चेतन सुभाष गुगळे आध्यात्मिक बाबांसोबत बसून आजही ’अशारिरीक प्रेम’ ह्या विषयावर ( मी वाचले तेव्हाचा काळ ०६-११ २०११) तेच विचार, त्याच तळमळीने, 'ऐसी अक्षरे रसिके मिळवीन' ह्या तडफेनं वाचकांसमोर मांडताना दिसत होते. मन आपोआप कितीतरी महिने मागे गेले. लेख संपला. पुढे एक चर्चा वाचून मात्र काळीज चिरुन गेले. त्या चर्चेमधे चेतन सुभाष गुगळे यांचे 'मिसळपाव' ह्या मराठी संस्थळांवरून महानिर्वाण झाले असे चर्चिले गेले होते. हे कधी झालं? आपल्याला कळलं कसं नाही? कदाचित काहीतरी घोळ असेल म्हणून चेतन सुभाष गुगळेंच्या मिसळपाव वरील महानिर्वाणाची बातमी शोधू लागलो. गुगलची कितीतरी पाने उलटवली.. पण एकाही लेखानं चेतन सुभाष गुगळेंच्या अंतरजालीय महानिर्वाणाची बातमी दिलेली नव्हती. फार दिवस नाही झाले ते जाऊन.. ह्याच वर्षीच्या नोव्हेंबर मध्‍ये चेतन सुभाष गुगळे गेले. त्यांच्या मिसळापाव ह्या मराठी स‍ंस्थळांवरील मंचांवर केलेल्या चर्चा तेवढ्‍या दिसल्या. डोकं सुन्न झालंय! अशा व्यक्तीकडे, मराठी स‍ंस्थळांकडून, अंतर्जालाकडून एवढे दुर्लक्ष होऊ शकते, व्हावे का? मिसळपाव सारखी मराठी स‍ंस्थळं खरंच विकली गेलेली आहेत? चेतन सुभाष गुगळे जन्मभर ’मतदान का करावे’, ’गुन्हेगारी कशी रोखावी’, ’प्रस्थापितांचे क‍पूं’ ह्याविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्‍या सारखा होता? एक ध्‍येय घेऊन जीवन झोकून देणारी चेतन सुभाष गुगळेंसारखी माणसे समाजाला, अंतर्जालाला, मराठी स‍ंस्थळांना खरंच नको असतात? ही असं वेड्यासारखं एकच एक ध्‍येय घेऊन जीवन समर्पित करणार्‍या चेतन सुभाष गुगळेंची शोकांतिका की नेहमी स्वत:मध्‍ये मश्गुल असलेल्या तथाकथित 'समाजाची (मिपाकरांची)' शोकांतिका? चेतन सुभाष गुगळें - अधिकृत संकेतस्‍थळ: http://www.che-su-gu.com/ (सध्या बंद पडले आहे, उगाच टायपत बसू नये) छायाचित्र साभार.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36027 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

असेच म्हणते

sneharani
Tue, 12/20/2011 - 10:47 नवीन
लेख अजिबात पटला नाही!
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कय चाललय तुमच ?

ईन्टरफेल
Mon, 12/19/2011 - 21:47 नवीन
???????????????????????????? / . / / , , . . ,भांडु नका प्रतेक ठिकनि आसे होत आसते त्याला नजर आंन्दाज करायचे आसते . आम्हि वचकांनि काय? करायच ! . . . . . . . .. . . . .एक वचक

श्रद्धांजलि सभा वेळ आणि

आशु जोग
Mon, 12/19/2011 - 23:40 नवीन
श्रद्धांजलि सभा वेळ आणि ठिकाण कळवा (आधी सांगितलेत तर तेवढ्यापुरते दुकान बंद ठेवीन म्हणतो)

सदर धाग्याचा अंत्यसंस्कार

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 00:00 नवीन
सदर धाग्याचा अंत्यसंस्कार झाला तर मला कळवा हो... ;-) दहाव्याला पिंडाला शिवणारा रिमोट कंट्रोल वरचा कावळा,आणी तेराव्याला जेवणारे(कोणताही धागा क्षणार्धात कचाकचा खाऊन टाकण्याची कप्याशिटी असलेले :-p ) श्राद्धाचे eब्राम्हण आंम्ही पुरवू ;-)

एन्टरटेनिंग

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 03:59 नवीन
लेखन आवडलं, स्पेशली ही कल्पनाच एकदम युनिक वाटली. पण गुगळेजींच्या फोटोचा वापर मात्र निश्चितच आक्षेपार्ह आहे.. हा भाग वगळता, लेखन एन्टरटेनिंग वाटले.

इंट्या, नक्की काय युनिक वाटले

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 12/20/2011 - 14:57 नवीन
इंट्या, नक्की काय युनिक वाटले ते एकदा सांगच रे. आम्हा पामरांना पण कळू देत.
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

एका शब्दात उत्तर: कल्पना.

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 22:26 नवीन
एका शब्दात उत्तर: कल्पना.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

स्पेशली,युनिक,फोटो,एन्टरटेनिंग

मन१
Tue, 12/20/2011 - 15:07 नवीन
स्पेशली,युनिक,फोटो,एन्टरटेनिंग हे सर्व शब्द वीसेक शब्दांच्या प्रदीर्घ प्रतिसादात दिसले. चांगले ठळकपणे जाणवले.
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

स्पेशली,युनिक,फोटो,एन्टरटेनिं

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 22:30 नवीन
स्पेशली,युनिक,फोटो,एन्टरटेनिंग हे सर्व शब्द वीसेक शब्दांच्या प्रदीर्घ प्रतिसादात दिसले. चांगले ठळकपणे जाणवले.
सॉरी ड्युड. जरा घाईत होतो म्हणुन उस्फुर्तपणे लिहिले तसे.
↩ प्रतिसाद: मन१

मला मायकल जॅक्सनचं घोस्ट हे

शिल्पा ब
Tue, 12/20/2011 - 04:45 नवीन
मला मायकल जॅक्सनचं घोस्ट हे गाणं खुप आवडतं.

which one ?

आत्मशून्य
Tue, 12/20/2011 - 15:19 नवीन
orignal or hanis club experience remix version... ?
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

atyant stutya prayatna

आत्मशून्य
Tue, 12/20/2011 - 15:14 नवीन
jar targeted wyaktinech aakshep ghetala nasel tar... Dhaga vegalya unchivar suruvatilach gelaa he nakki... Pan nantar ti unchi rakhali n gelyane v pravashyani godhal ghalun payalatla dosh lavalyane vimanachaa crash zala he nakki...

मिपावरची बरीच मंडळी श्री चेतन

किचेन
Tue, 12/20/2011 - 15:45 नवीन
मिपावरची बरीच मंडळी श्री चेतन गुगळे यांचे चाहते आहेत .पण इतक्या दिवसांनी कोणाला तरी आठवण झाली आणि त्यावर धागा काढण्याची गरज भासली ह्यातच सर्व काही आले.उरलेल्या व्यक्तींनी जळण्यात काही अर्थ नाही.जर कोणी गुगळे कोण हे विसरले असतील किवा त्यांचे लिखाण वाचलेच नसेल तर मात्र फोटोची गरज नक्कीच आहे. सोकाजीराव लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

आपल्या विनोदबुद्धीचे मला

मोदक
Tue, 12/20/2011 - 19:15 नवीन
आपल्या विनोदबुद्धीचे मला पहिल्यापासूनच फार कौतुक वाटत आलेले आहे. (ह. घ्या) :-) मोदक.
↩ प्रतिसाद: किचेन

सोक्या, तुम चूक्याच

शाहिर
Tue, 12/20/2011 - 19:11 नवीन
खर तर जरा जास्तच लिहितो आहे , फार परीचय नसताना... तुम्ही नापसंती दर्शविणारे प्रतिसादांना सरळ सरळ फाट्यावर मारले आहे..खरे तर तुमचे पूर्वी खुप कौतुक केले आहे मि पा करंनी .. आणि तुम्ही नक्किच त्या साठी पात्र आहात .. पण आज जेव्हा कित्येक मि पा करांनी नापसंती दर्शवली तेव्हा तुम्ही खिलाडुपणे लेख चुकला किंवा तो कसा बरोबर आहे हे पटवून द्यायला हवा .. जे तुम्ही केला नाहीत .. केवळ चेसुगुंनी आक्षेप घेतला नाही म्हणून मि नामा निराळा अशीच तुमची भुमिका दिसली .. तांत्रिकद्रूष्ट्या ती भुमिका बरोबर असेलही ...पण .. शेवटी आमच्या मनातील भावना " सोक्या, तुम चूक्याच" अशी राहिली .. ( सोक्या असे मैत्र भावनेने लिहिले आहे , गैर समज नसावा)

शाहीर, तुम्हारी 'नजरचुक'च हुव्या ;)

सोत्रि
Tue, 12/20/2011 - 19:20 नवीन
http://www.misalpav.com/node/20138#comment-360384 - (माणूस) सोकाजी
↩ प्रतिसाद: शाहिर

हा लेख अजून इथे आहे हे पाहून

नितिन थत्ते
Tue, 12/20/2011 - 19:19 नवीन
हा लेख अजून इथे आहे हे पाहून आश्चर्य वाटते. :(

थत्तेचाचा, http://www.misalpa

सोत्रि
Tue, 12/20/2011 - 19:23 नवीन
थत्तेचाचा, http://www.misalpav.com/node/20138#comment-360395 ह्यावर आपले काय म्हणणे आहे? - (जिज्ञासू) सोकाजी
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रश्न कुणाला?

नितिन थत्ते
Tue, 12/20/2011 - 19:27 नवीन
गुगळे यांनी तुम्हाला दोषमुक्त केले आहे. असे असले तरी हा धागा उडवायला हवा असेच माझे अजूनही मत आहे. हा धागा इथे अजून असल्याबद्दलचे आश्चर्य तुम्हाला उद्देशून नाही तर संपादकमंडळास उद्देशून आहे.
↩ प्रतिसाद: सोत्रि

हम्म...

दादा कोंडके
Tue, 12/20/2011 - 23:22 नवीन
सहमत आहे. सुरुवातीला धागाकर्ता आणि ज्याच्यावर घागा काढला आहे दोघांचाही आक्षेप नसल्यामुळे करमणुकप्रधान धागा म्हणून मी ही प्रतिसाद दिला होता. (पण आता बुच मारल्यामुळे संपादनही करू शकत नाहिये. कृपया सं.मं.ने काढून टाकावा). पण आता हा धागा उडवायला हवा असं वाटतय खरं. च्यायला, धागाकर्ता आणि ज्याच्यावर घागा काढला आहे त्यांची कोणतीही चूक नाही. बहुतेक (मेजॉरीटी) सद्स्यांना या धाग्यात आक्षेपार्ह वाटत नसेल, पण धागा चुकीचा आहे हे खरं. लोकशाहीत पण हीच गोची आहे. म्हणजे नियमावर बोट ठेउन धागा उडवू शकत नाही, आणि खूप लोकांचं मतही या धाग्याबाबत निगेटीव नाहिये.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा