✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गीतगुंजन - १

प
प्रास यांनी
Wed, 12/07/2011 - 17:42  ·  लेख
लेख
सध्या आपल्याला हवा तेवढा वेळ आपण आपल्या आवडत्या गोष्टीसाठी काढू शकू अशी काही परिस्थिती नाही. पण म्हणून आपल्याला त्या गोष्टींपासून फार काळ स्वत:ला दूर ठेवणंही अशक्य होतं. आपली आवड आपल्याला खरं तर 'डेवलप' करावी लागते. पण कधी कधी कुठल्याशा एका क्षणी आपल्याला आपल्या त्यापूर्वी कधी न जाणवलेल्या आवडीचा शोध लागतो नि मग आपण ती आवड जोपासायचा प्रयत्न करू लागतो. माझंही असंच झालेलं. वयाच्या १७ - १८ वर्षापर्यंत शाळेतल्या क्रमिक पुस्तकाबाहेरचं इंग्लिश जराही न कळणार्‍या मला पाश्चात्य संगीतात गोडी निर्माण झाली, मग माझ्यापरीने मी ती आवड जोपासायला लागलो. खूप वर्ष चांगलं - वाईट जे मिळेल ते ऐकलं आणि मग आज थोडंफार संगीत समजतंय असं म्हणू शकतो. अर्थात जे समजतंय ते हिमनगाचं पाण्याबाहेरचं टोकंच आहे याची जाणीव आहे तरी स्वानंदासाठी पुरेसं आहे असं आपलं मला वाटतं. मिपाच्या व्यासपीठावर या विषयाशी संबंधीत काही लिहिल्यानंतर अनेकांनी लिखाण आवडल्याच्या खरडी केल्या, व्यनि धाडले. काहींना त्या लिखाणामुळे या संगीतात रस निर्माण झाला पण ज्या अडचणी मला आलेल्या त्याच त्यांनाही येत होत्या. अशा वेळेला काय करावं? काय चांगलं आहे? कोणतं गाणं ऐकावं? कुणाचं संगीत - गायन ऐकावं? पाश्चात्य संगीतातले वेगवेगळे प्रकार कसे समजून घ्यावे? कोणती गाणी ऐकत ही आवड जोपासावी? वगैरे वगैरे. खरं तर हा खूप गहन प्रश्न होता कारण पाश्चात्य संगीताच्या दुनियेची व्याप्तीही खूप मोठी आहे. मग आता मी माझ्यापुरता यातून मार्ग काढायचं ठरवलं आणि जसं शक्य होईल तसं आपल्या आवडत्या एखाद्या गाण्यावर चार ओळी लिहून त्याची माहिती नि त्या गाण्यातला आनंद आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करण्याचा विचार पक्का केला. त्यासाठीच ही 'गीतगुंजन' मालिका सुरू करत आहे. खरं तर ही कल्पना मागे 'रे चार्ल्स'च्या गाण्याची पोस्ट लिहिताना आली आणि आज तिला मूर्त रूप दिलं जातंय. या संबंधी सगळ्या पोस्ट गीतगुंजन नावानेच तयार होतील मात्र या नावापुढे गाण्यानुसार पुढची पुढची संख्या येईल म्हणजे कधी पुढे शक्य झाल्यास गीतगुंजन पोस्ट्सचं एकत्रीकरणही सुलभ होईल. मला आशा आहे की या माझ्या प्रयत्नाने नव्याने पाश्चात्य संगीतात गोडी निर्माण झालेल्यांना नक्की मदत मिळेल. या संदर्भात तुम्हा मिपाकर दोस्तांच्या काही सूचना असतील तर मला जरूर ख. व. आणि व्य. नि. द्वारे कळवाव्यात. ठीक तर, आता गीतगुंजन मालिकेचं पाहिलं पुष्प जोडतो. गीतगुंजन - १ : You Don't Know How It Feels एम टीव्हीचं भारतात नुकतंच पदार्पण झालं होतं तेव्हाचा काळ. साल बहुतेक ९३-९४ असावं. कॉलेजात जायला सुरुवातच केलेली असल्याने शिंगं फुटायला लागलेली. वर्गातल्या इंग्लिश मिडियम मधल्या मुलांच्या गप्पा, अलाणा रॉक ग्रूप, फलाणा पॉप ग्रूप, हा लीड सिंगर नि तो लीड गिटारीस्ट, असल्या काहीतरी असायच्या. हे नवं होतं आणि माहिती शून्य. तेव्हा नव्याने सुरू झालेल्या एम टीव्हीचा आसरा घेतला आणि तत्कालीन माहिती जमा करू लागलो. याच दरम्यान भेटला टॉम, टॉम पेटी. टॉम बराच जुना संगीतकार - गायक आहे. 'टॉम पेटी अ‍ॅण्ड हार्टब्रेकर्स' हा याचा ग्रूप. रॉक म्युझिकमधलं मोठं नाव. मल्टीपल इन्स्ट्रुमेन्ट्स वाजवणारा, गीतकार, संगीतकार आणि गायक आणि मला भावलं, त्याचं मी ऐकलं-पाहिलेलं, पहिलंच गाणं 'You don't Know How It Feels'. साधे, अगदी मलाही समजू शकणारे शब्द, एका छानशा मंद तालात वाजणारा ड्रमसेट आणि स्वतः टॉमची इलेक्ट्रिक गिटार नि त्याचा हार्मोनिका. या हार्मोनिकाने त्यावेळी घातलेलं गारूड आजही तसंच आहे आणि त्यातही मुख्य म्हणजे त्याची ती कोणताही अभिनिवेश नसलेली त्या गाण्यातली गायकी. एक वेगळंच रसायन बनतं या सगळ्याचं. टॉम पेटीचं हे गाणं इथे ऐका - इंग्लिश गाण्याला विडीओ असतो, हे तेव्हा नवंच होतं. आणि या गाण्याचा विडीओही मला आवडलेला. त्यावर्षीचं एम टीव्हीचं Best Music Video Award याच गाण्याच्या विडीओला मिळालेलं. हा विडिओ इथे पोस्ट होत नाही आहे पण तो इथून टिचकी मारून बघता येईल. जरूर बघा, आवडेलच याची गॅरेण्टी! -------------------------------------------------------------------- हे गीतातले शब्द - Let me run with you tonight I'll take you on a moonlight ride There's someone I used to see But she don't give a damn for me But let me get to the point, let's roll another joint And turn the radio loud, I'm too alone to be proud You don't know how it feels You don't know how it feels to be me People come, people go Some grow young, some grow cold I woke up in between A memory and a dream So let's get to the point, let's roll another joint Let's head on down the road There's somewhere I gotta go And you don't know how it feels My old man was born to rock He's still tryin' to beat the clock Think of me what you will I've got a little space to fill So let's get to the point, let's roll another joint And let's head on down the road There's somewhere I got to go And you don't know how it feels You don't know how it feels No, you don't know how it feels to be me You don't know how it feels You don't know how it feels No, you don't know how it feels to be me
  • गीतगुंजन - १८ : November Rain
  • गीतगुंजन - १९ : 'Piano Man'
  • गीतगुंजन - २
  • गीतगुंजन - २० -> 'She's Always A Woman'
  • गीतगुंजन - ३
  • गीतगुंजन - ४
  • गीतगुंजन ५
  • गीतगुंजन - ६ : Its My Life -> Bon Jovi
  • गीतगुंजन - ७: 'Thriller' -> Michael Jackson
  • गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating
  • इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)
  • गीतगुंजन - ११ : When I Come Around -> Green Day
  • गीतगुंजन - १२ : Black Or White -> Michael Jackson
  • गीतगुंजन - १३ : Daddy Cool -> Boney M
  • गीतगुंजन - १४ : I Don't Wanna Miss A Thing -> Aerosmith
  • गीतगुंजन - १५ : व्हॅलेन्टाईन डे स्पेशल
  • गीतगुंजन - १६ : The Shoop Shoop Song (Its In His Kiss)
  • गीतगुंजन १७ : Hole In My Soul

Book traversal links for गीतगुंजन - १

  • गीतगुंजन - १८ : November Rain ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6537 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

उत्तम लिखाण.बाकी पाश्चात्य

प्रचेतस
Wed, 12/07/2011 - 17:59 नवीन
उत्तम लिखाण. बाकी पाश्चात्य संगीत मायकेल जॅक्सन सोडून अजिबातच ऐकलेले नाही, तुमच्या लेखांमुळे त्याची थोडीतरी माहिती होईल.
  • Log in or register to post comments

नवी माहिती

पैसा
Wed, 12/07/2011 - 19:58 नवीन
इंग्लिश गाणी मुलांमुळे कानावर पडतात. त्यात फार काही माहिती नाही, पण आता मी पण त्याना काही शब्द सांगू शकेन!
  • Log in or register to post comments

प्रास.. अतिशय उत्तम मालिका

गवि
Wed, 12/07/2011 - 20:27 नवीन
प्रास.. अतिशय उत्तम मालिका सुरु केली आहेस.वाट पहात होतो. हे गाणं फ़ार छान वाटलं आहे.गिटारचे अफ़लातून झंकार अन हार्मोनिकाचा पंकार यांचा मस्त मिलाप. मूड बन गया दोस्त.हे गाणं माहीत नव्हतं.खूप आभार.अजून लिही..
  • Log in or register to post comments

हार्मोनिका मस्त

मराठी_माणूस
Wed, 12/07/2011 - 21:17 नवीन
हार्मोनिका मस्त
  • Log in or register to post comments

एक नंबर !!

अर्धवटराव
गुरुवार, 12/08/2011 - 00:46 नवीन
संपूर्ण फॉलोव करावी अशी आणखी एक मालिका मिपावर सुरु झालिय.... अत्यानंद होतोय. थेंक्स प्रास (पाश्चात्य संगीतातला औरंगझेब) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

त्याच गाण्याचा आणखी एक लाइव्ह व्हिडिओ

बहुगुणी
गुरुवार, 12/08/2011 - 02:45 नवीन
नंतरच्या कालावधीतला आहे: Image removed." alt="" /> चांगला लेखनविचार, सुंदर गाणं. धन्यवाद! प्रत्येक वेळी नवीन कलाकार आणणार का? आणि तुमच्या व्यतिरिक्त इतरही contributors असतील का?
  • Log in or register to post comments

संग्राह्य लेखन. पुढील

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/08/2011 - 05:08 नवीन
संग्राह्य लेखन. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

छान ! मालिकेस शुभेच्छा

पियुशा
गुरुवार, 12/08/2011 - 09:42 नवीन
छान ! मालिकेस शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

नीट ऐकलं गाणं. रॉक अँड रोल

गवि
गुरुवार, 12/08/2011 - 10:13 नवीन
नीट ऐकलं गाणं. रॉक अँड रोल स्टाईलमधे असलेल्या गाण्यावर प्रीस्ले / बीटल्सचा प्रभाव दिसतोय.. प्रीस्लेचाच खरंतर.. आता जॅझविषयी प्लीज काहीतरी येऊ दे. हा खूप मजेशीर प्रकार वाटतो.. पाँप पाँप करणारी ट्रंपेट्स आणि थडम थडम करणारे ड्रम्स.. अधेमधे रॅपचे तुकडे.. जॅझ हा भारतात सिनेसंगीतात नेहमी ऐकायला न मिळणारा प्रकार आहे.. "जाने तू या जाने ना" (तू बोले ग्लास आधा खाली, मैं बोलूं आधा भरा..) हे नवीन गाणं हा मला आठवणारा एकच अपवाद.. आणखी कोणाला माहीत असतील तर सांगावीत ही विनंती..
  • Log in or register to post comments

काही हिंदी जॅझ गाणी

बहुगुणी
गुरुवार, 12/08/2011 - 23:34 नवीन
ग वि: खालील काही जुनी-नवी हिंदी गाणी जॅझवर आधारित आहेत असं म्हणता येईल असं वाटतं: जुनी गाणी 'इना मिना डिका' - चित्रपट 'आशा' 'मेरा नाम है चिन चिन चू' - चित्रपट 'हावरा ब्रिज' 'आंखोंमें तुम' - चित्रपट 'हाफ टिकट' 'तुम जैसोंको तो पायल में बांध लूं' - चित्रपट 'गरम मसाला' 'आज रात जी ले' - चित्रपट 'टॅक्सी ड्रायव्हर' 'हम आपकी आंखोंमे इस दिल को बसा दे तो' हे 'प्यासा' चित्रपटातील गाणं म्हणे ब्राझिलियन जॅझवर आधारित आहे. नवी गाणी (माझ्या काळाच्या मानाने नवी! :-)) कैसी पहेली है ये जिंदगानी - चित्रपट 'परिणीता' (हे गाणं Louis Armstrong च्या 'A kiss to build a dream on' या गाण्यावर आधारित आहे असं वाचलं होतं) 'ये निगाहें झुकी झुकी' - चित्रपट 'खोया खोया चांद' 'मिस्टर हुआ है ऐसा हाल क्यूं' - चित्रपट 'संकट'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रास मालक, एक दोन तीन

५० फक्त
Fri, 12/09/2011 - 08:20 नवीन
प्रास मालक, एक दोन तीन पोरींचा ग्रुप आहे, त्यांचं एक गाणं आहे ' लिसन टु द रेडिओ' असा काहीतरी, पुर्वी माझ्याकडे त्याचा व्हिडो होता, त्याबद्दल लिहाल का जरा.
  • Log in or register to post comments

माझ इंग्रजी गाण्याच ज्ञान

किचेन
Fri, 12/09/2011 - 18:36 नवीन
माझ इंग्रजी गाण्याच ज्ञान ब्रायन अडम्स आणि मायकल जाक्सन एवढाच मर्यादित आहे. आणि यांची गाणीही तळटीपा असल्याखेरीज समजत नाहीत. तुम्ही येथे गाण्याचे शब्द तंकावाल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा