पालेस्टाईन बद्दल भारताचे युनोस्कोतील मतदान
मिपावर ही चर्चा सुरु होईल असा अंदाज होता. पण ती न झाल्याने मिपा करांचे मत जाणून घेण्यासाठी हा धागा काढत आहे.
पश्चिमात्य तसेच अरब वर्तमानपत्रांत सोमवारी एक खूप गाजलेली बातमी भारतीय वृत्तपत्रात ना येवढी गाजली ना त्यावर टिव्हिवर चर्चा झाल्या. सोमवारी म्हणजे ३१ आक्टो ला पॅलेस्टाईनला युनोस्कोत मतदानाच्या प्रक्रियेतून सदस्यत्व मिळाले. ज्या संस्थेनं (पॅलेस्टाईन) इस्त्राईलला, पर्यायाने युनोच्या एका पूर्ण सदस्यालाच, मान्यता दिलेली नाही अशा संस्थेने मतदानात युनोस्कोचे सदस्यत्व दणदणीत विजयाने मिळवले.
या घटनेचे अनेक कांगोरे आहेत. त्याचे दूरगामी पडसाद भारतापर्यंत सुद्धा पोचले जाऊ शकतात.
अशा प्रसंगातील भारताच्या पारंपारीक दृष्टीकोणाकडे बघितलं तर भारत सहसा मतदान टाळून आपल्या अलिप्ततावादी धोरणाचे कारण पुढे करतो. त्यामागे "खरी कारणे" बरेचदा अशी असतात...
- महासत्तेच्या विरोधात जाऊन तोटा करुन न घेणे
- अरब देशांना दुखवून आपल्या स्थानिक राजकारणात (व्होट बँकेला दुखवून) तोटा न करुन घेणे
- दुसर्यांच्या भांडणात पडूण स्वतःच्या कटकटी वाढवून न घेणे
- अजून काही?
- अरब देशांची चाप्लुशी करणे व पर्यायाने आपल्या व्होट बँकेला न दुखवने. सध्या अण्णा फॅक्टरमुळे अडचणीत आलेल्या युपीएला पुढील निवडणुकीत कुणालाही दुखवून चालणार नाही म्हणून?
- मागील काही घटनांत भारताने अमेरिकेची री ओढली आहे. त्यामुळे काही तज्ञ भारतावर टीका करत आहेत. या घटनेतून भारताला हे दाखवायचे असू शकते का की आम्ही अमेरिकेची री ओढत नाही?
- का ब्रिक देशांसहीत अफ्रिकन सहकारी ज्या पारड्यात मत टाकत आहेत त्या पारड्यात मत टाकल्याने आपण त्यांच्या सोबत आहेत हे दाखणे? ?
- हे मतदान युनोस्कोचे होते. त्यांच्या माध्यमातून पॅलेस्टाईनच्या गरजू जनतेला मदत व्हावी हा उदात्त हेतू.
- वा अजून काही कांगोरे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बस्स,....
चांगला विषय
पॅलेस्टाईनचा भूभाग
मैत्री आहेच
ह्या व अनेक आंतरराष्ट्रीय
मुस्लिम लांगूलचालन
@ राजघराणे सहमती दळाव्लीच
भारताची अवस्था
पिंडा काका वादग्रस्त मुद्ददे
आनंदी आनंद
जेरुसलेम
धन्यवाद
भास्कर साहेबमी j भारत भावी
वेगळाच दृष्टीकोन
लखूजी धन्यवाद भारत चीन च्या
पोतडी
मला योग्य वाटते