माजी आमदार का पाजी आमदार?
http://72.78.249.107/esakal/20111031/5343263362199730061.htm
माजी आमदारांची वाढती भूक
माजी आमदारांनी अशी मागणी केली आहे की आपल्या भक्कम वेतनाबरोबरच (२५००० महिना) आणखी सवलती आपल्याला आणि आपल्या पश्चात बायकामुलांना मिळाव्यात.
एका सहकार्याबरोबर ३५ हजार किमी वर्षाला इतका प्रवास फुकट असतो तो अजून वाढवून ५० हजार करावा.
जमल्यास फुकट हवाई प्रवास मिळावा अशा गंमतीच्या मागण्या काही माजी आमदारांनी केल्या आहेत.
काही प्रश्न
१.आमदारपद ही काही नोकरी नाही. त्यामुळे पेन्शन वगैरे प्रकार का लागू असावेत? आणखी त्यांना दिल्या जाणार्या ह्या सवलतींचा समाजाला नक्की काय उपयोग आहे?
२. माजी म्हणजे ह्या लोकांनी निवडणूक लढवली नाही किंवा पराभूत झाले आहेत. त्यामुळे ते आता लोकांचे प्रतिनिधी नाहीत. अशा लोकांची जबाबदारी सामान्य करदात्यांनी का घ्यावी?
३. ह्या मागण्या आमदार समूहच मंजूर करणार. आपणही कधीतरी माजी होणार हे ओळखून हे भावी माजी लोक, फार खळखळ न करता ह्या मागण्या मंजूर होण्याची शक्यताच जास्त. ह्यावर लोकांचा/न्यायालयाचा काही अंकुश लावता येणार नाही का?
४. त्या आमदाराबरोबरच बायका/नवरे, मुले ह्यांनाही सवलती द्यायची काय गरज आहे?
५. मुळात माजी आमदार हा वर्ग इतका विपन्न असतो का की त्याला असा सरकारी मलिदा द्यावा लागतो?
बाकी क्षेत्रात ठणठणाट असताना ह्यांचेच इतके लाड करायची गरज आहे का? समाजाला ते परवडेल का?
प्रतिक्रिया
ही बातमी वाचल्यावर (पेप्रात)
गडबड
गडबड नाही हो..
लोकशाही
पूर्वीच्या काळी हे
तुमच्या धाग्यावर पुन्हा आले