सरकारी कचेरीचे जाहिर आभार.....
जानेवारी २०१० मध्ये मी माझी आधीची कंपनी सोडून सद्य कंपनीत आलो. येताना भविष्य निर्वाह निधीचे (प्रॉव्हिडंट फंडचे) पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचा अर्ज(application) आधीच्या कंपनीत निघायच्या दिवशी भरले.
सुमारे पाचेक महिन्यांनी संपूर्ण रक्कम व्यवस्थित माझ्या खात्यात जमा झाली.(online e-banking transfer झालेले होते.)
त्यासाठी मला कुठलाही follow up घ्यावा लागला नाही.खरे तर घेण्याइतका वेळही काही कारणाने नव्हता म्हणा.
जमा झालेली रक्कम माझ्या सारख्या निम्न मध्यमवर्गीय माणसासाठी बर्यापैकी मोठी होती.रक्कम मिळाल्यावर हायसे वाटले. माझ्या आसपासच ज्यांनी कंपनी बदलली होती, त्यातीलही बहुतांशांचे पैसे असेच दोन्-पाच आठवड्याच्या फरकाने आले होते. काही अल्प जणांचे अजूनही यायचे आहेत, त्यासाठी आम्ही पी एफ हापिसात आताच जाउन आलोत. फाइल हलली आहे. दोनेक आठवड्यात पैसे येइलसं दिसतय. ह्या अल्प मंडळिंना मात्र वर्षभर उशीर झाला हे खरे. पण हे थोडेच होते.
इथे सरकारी काम असले, त्यातही एखादी पैसे मिळण्याशी निगडित बाब असली तर सरकारी कचेरीची एक नकारात्मक प्रतिमाच समोर उभी राहते. ह्या खात्याचा/कचेरीचा तसा अनुभव आलेला नाही. म्हणून मुद्दाम प्रशासनाचे जाहिर आभार मानतोय. माझा स्वतःचा पासपोर्टही कागदपत्रे दिल्यावर व्यवस्थित बनून ४५ दिवसात आला होता.तेव्हा कुणी पैशाची थेट मागणी केली नाही. पण कागदपत्रात कै च्या कै दोष काढून असंख्य खेटे मारायला लागले होते. पण तेही काम कुठलाही अनावश्यक छदामसुद्धा खर्च न करताच झाले होते.
आम्ही १९९८ मध्ये प्रथमच घरी भा.सं. नि. लि(BSNL) चा भूरेषीय (Landline) प्रथमच घेतला होता, तोही एक पैसा न चारता, फारशा कटकटी न होता मिळाला होता.
त्रास झाल्यावर आपण सरकार ह्या संस्थेच्या नावाने शंख करतोच. पण तसेच सर्कार ह्या संस्थेमुळे आपली काही कामे सुरळीत झाली तर "ही कामे चांगली झालित" असा feedback द्यावासा वाटला. हे सांगण्याची सरकारी संस्थळावर वगैरे कुठे सोय आहे का? कळल्यास बरे.
तुमचेही चांगले अनुभव इथे टंकले तर एक छानपैकी संकलन होइल.
वाचने
7144
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
माझा पासपोर्ट रिन्यू होऊन
माझ्या काही शंका:-
In reply to माझ्या काही शंका:- by मन१
मन आणि मन१ हे डुआयडी आहेत असे
In reply to मन आणि मन१ हे डुआयडी आहेत असे by धन्या
हो.
In reply to हो. by मन१
लई भारी !!!
In reply to लई भारी !!! by धन्या
मूळ
बाकींच्या खात्यांच्या तुलनेत
खरे
प्रकाटाआ
मन
दिरंगाई
In reply to दिरंगाई by सुनील
हे खाते म्हणजे दगडापेक्षा विट
आमाला आभार मानायची संधी कदी देनार ?
आपापला अनुभव वेगळा असू शकतो.
पीएफच्या बाबतीत माझा अनुभव
In reply to पीएफच्या बाबतीत माझा अनुभव by यकु
<<<पैसे मिळून गेल्यानंतरही
In reply to <<<पैसे मिळून गेल्यानंतरही by शिल्पा ब
>>>बाकी पैसे न घेतासुद्धा
In reply to पीएफच्या बाबतीत माझा अनुभव by यकु
असे काय करता ...
निवडणूक ओळखपत्र
In reply to निवडणूक ओळखपत्र by टिनटिन
मी स्वतः जाउन मुंबईत फॉर्म
बरं झालं तुमचं काम
आभार कसले?
In reply to आभार कसले? by नेत्रेश
अहो पण हळुहळु का होईना प्रगती
५ महीने हा मोठा कालवधी आहे
In reply to ५ महीने हा मोठा कालवधी आहे by मराठी_माणूस
>>>>>>>५ महीने हा मोठा कालवधी
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by उदय
कौतुक नेमकं कसं सांगावं हे
In reply to माझा अनुभव by उदय
तुमचं कौतुक वाटलं.
In reply to माझा अनुभव by उदय
खरंच कौतुक आहे
पासपोर्ट!
In reply to पासपोर्ट! by मन१
मुख्य शंका --
In reply to पासपोर्ट! by मन१
पासपोर्ट रिन्यू केला मागच्या
In reply to पासपोर्ट रिन्यू केला मागच्या by गणामास्तर
सहमत
In reply to पासपोर्ट रिन्यू केला मागच्या by गणामास्तर
चिंचवड पोलिस स्टेशन ला
In reply to चिंचवड पोलिस स्टेशन ला by नाव आडनाव
चांगला मुद्दा टाकलाय तुंम्ही.
जानेवारी २०१०