✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आर्क्टिक होम इन वेदाज, टिळक

आ
आशु जोग यांनी
गुरुवार, 08/04/2011 - 23:08  ·  लेख
लेख
आर्क्टिक होम इन वेदाज याबाबत काही गोष्टी शेअर करू इच्छितो. कुणाला अधिक माहीती असेल तर जरूर द्यावी, आनंद होइल. आर्क्टिक होम इन वेदाज हे टिळकांनी १८९८ च्या आसपास लिहिलेले आहे पण या विषयाची सुरुवात त्यांनी १८९३ ला केलेली दिसते. आपले म्हणणे मांडतान टिळकांनी रसायनशास्त्र, भूमिती, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे सूर्याची गती, पृथ्वीची गती, त्या दोघांमधील सापेक्षता पृथ्वीच्या कक्षेने सुर्याच्या कक्षेशी केलेला कोन ५००० ते ८००० वर्षांपूर्वी ध्रूवावर पडणार्‍या सूर्यकिरणांचा कोन त्यामुळे तिथे असलेले सरासरी तापमान, जे मानवाला अनुकुल होते. नंतर ध्रूवावर निर्माण झालेले हिमयुग. ध्रूवावर ६ महिने दिवस ६ महिने रात्र( ४ + ८ ही असेल) असे उल्लेख इराणी भाषा आणि संस्कृतमधील संबंध पूर्वीच्या काळी जगात काही ठिकाणी अश्म युग तर काही ठिकाणी लोह तांबे यांचा वापर हे एकाच वेळी सुरू होते. पृथ्वी स्वत:भोवती २४ तासात फिरते सूर्य ३६५ दिवसात फिरतो परंतु त्यांची एकमेकांबरोबरची त्यांची असलेली स्थिती पुन्हा जश्शीच्या तश्शी व्हायला २३००० वर्षे लागतात. इ. आहे यामधे हे पुस्तक खूप छोटे आहे पण समजून घ्यायला बरेच अवघड आहे. खूप विचार करत समजून घेत वाचावे लागते. यात अनेक भौमितिक आकृत्या आहेत, ते सारे विज्युलाईज करावे लागते. पुस्तक विलक्षण संशोधनावर आधारीत आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11447 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

अतिशय चांगला, महत्वाचा विषय.

चित्रगुप्त
Fri, 08/05/2011 - 00:00 नवीन
अतिशय चांगला, महत्वाचा विषय. हे पुस्तक जालावर वाचण्यासाठी उपलब्ध आहे का? मराठीत ?
  • Log in or register to post comments

रोचक विषय

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 00:16 नवीन
पृथ्वी स्वत:भोवती २४ तासात फिरते सूर्य ३६५ दिवसात फिरतो पूर्वार्ध खरा आहे... पण सूर्य नाय फिरत हो, ती पृथ्वी फिरते सूर्याभोवती ३६५ दिवसांत!! बाकी विषयावर इथे एक विक्षिप्त दुर्बिटणेबाई (हेड ऑफ द डिपार्टमेंट, खगोलशास्त्र, मिपा!) आहेत, त्या अधिक माहिती देऊ शकतील..... वर चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे या पुस्तकाच्या पीडीएफची लिंक देता आली तर बरं होईल. इंग्रजीसुद्धा चालेल (कोण तो दात काढून हसतोय रे?) :)
  • Log in or register to post comments

हे घ्या

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 02:01 नवीन
हे घ्या इंग्रजीतली लिंक - (लिंकाळ्याचा मित्र) आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

वा!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 02:54 नवीन
अनेक धन्यवाद! -लिंकाळ्याचा काका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आले, आले, आले

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 02:31 नवीन
सूर्य ३६५ दिवसात फिरतो
पिडा काकांनी चूक शोधली आहेच. सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.
परंतु त्यांची एकमेकांबरोबरची त्यांची असलेली स्थिती पुन्हा जश्शीच्या तश्शी व्हायला २३००० वर्षे लागतात.
तुमच्या या वाक्याचा संबंध बहुदा परांचन गतीशी असावा. परांचन गती म्हणजे पृथ्वीचा फिरण्याची गती. भोवरा फिरताना हळू फिरायला लागला की त्याचा आसही डोलायला लागतो, ती परांचन गती. पृथ्वीच्या परांचन गतीचं एक चक्र २३००० नव्हे, साधारण २६००० वर्षात पूर्ण होतं. एक चक्र (३६० अंश) पूर्ण करण्यासाठी २६००० वर्ष असल्यामुळे एक अंशातून आस हलण्यासाठी साधारण ७२ वर्ष लागतात. १ अंश म्हणजे सूर्याच्या (आणि पूर्णचंद्राच्या) व्यासाच्या दुप्पट अंतर. सामान्य माणसाचे आयुष्य १०० वर्ष पकडले तरी आकाशात सव्वा अंशाने ध्रुवतारा सरकलेला दिसेल, पण ही हालचाल एवढी कमी आहे की नीट निरीक्षणं केल्याशिवाय ही गती दिसणं शक्य नाही. आंद्या, लिंकबद्दल धन्यवाद. जमेल तसे वाचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

?

पंगा
Fri, 08/05/2011 - 02:39 नवीन
सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.
इतकी वाइड रेंज? (बाकी, माहिती रोचक आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वाईड रेंज?

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 03:49 नवीन
इतकी वाइड रेंज? खुळे की काय तुम्ही पंगाशेठ? अहो, वाईड रेंज तुमची! दुर्बिटणे बाईंच्या रिष्टवाचातला काटा सेकंदाने देखील सरकत नाही हजार वर्षे उलटल्याशिवाय! काय समजलेंत!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

दुर्बिटणेबैंचे सोडा

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:15 नवीन
:) दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर हेवन्ली बॉडीज़च्या विचलनाच्या रेंजबद्दल काय परिस्थिती आहे*? पृथ्वीबद्दल? चंद्राबद्दल? सूर्यमालेतील इतर ग्रहांबद्दल? * दुर्बिटणेबै या (१) हेवन्ली बॉडी आहेत, आणि/किंवा (२) त्यांची विचलनाची रेंज सिग्निफिकंट आहे, यांपैकी कोणताही दावा यातून मला (प्रत्यक्ष निरीक्षणाअभावी) करावयाचा नाही. वरील दोन वाक्यांच्या निकटसान्निध्यातून (close juxtaposition अशा अर्थी) तसा अर्थ प्रतीत होत असल्यास तो एक निव्वळ दुर्दैवी योगायोग आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मला तर असा अर्थ प्रतीत होतोय

शुचि
Fri, 08/05/2011 - 04:52 नवीन
मला तर असा अर्थ प्रतीत होतोय की नीरीक्षणांती तुम्हाला तसा दावा करायला अथवा नाकारायला आवडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

पुन्हा...

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:57 नवीन
...तसा अर्थ प्रतीत झाला असल्यास तोही एक निव्वळ योगायोग आहे. ;) तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हाण्ण हाण्ण

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 04:59 नवीन
हाण्ण हाण्ण !! बाकी हीच ऑपॉर्च्युनिटी घेउन उत्तर अमेरिकतल्या बृहन्मिपा शाकाहारी कट्ट्याचे शिंग फुंकावे काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

?

पंगा
Fri, 08/05/2011 - 05:01 नवीन
कळले नाही. (असो. तूर्तास एवढेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

नक्की

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 05:13 नवीन
नकी काय कळले नाही ? पहिले वाक्य की दुसरे ? >>(असो. तूर्तास एवढेच.) अजुनही बोललात तरी चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

नक्की

पंगा
Fri, 08/05/2011 - 07:49 नवीन
नकी काय कळले नाही ? पहिले वाक्य की दुसरे ?
दोन्ही. पण विशेषतः दुसरे.
अजुनही बोललात तरी चालेल :)
परत कधीतरी, सवडीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

वाट पहातोय

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 08:53 नवीन
>>परत कधीतरी, सवडीने. वाट पहातोय. बोलुयात व्यवस्थित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 05:08 नवीन
दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर हेवन्ली बॉडीज़च्या विचलनाच्या रेंजबद्दल काय परिस्थिती आहे*? पृथ्वीबद्दल? चंद्राबद्दल? सूर्यमालेतील इतर ग्रहांबद्दल?
का, का, माझं का सोडा? मी ही माणूसच आहे, मलाही आपलं म्हणा! विचलन म्हणजे काय? परिवलन का? सूर्यासारख्या वायूरूप वस्तूंचे परिवलन अशाच प्रकारे होते. सूर्याच्या परिवलनाचा वेग ध्रुवांवर सर्वात कमी आणि विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. पण हे फक्त पृष्ठभाग आणि तिथपासून काही अंतर (१/३ त्रिज्जा) आतच सूर्याचे परिवलन अशा प्रकारे होते. याला differential rotation (मराठी शब्द?) असे म्हणतात. ज्या भागात सूर्याचे (आणि इतर तार्‍यांचेही) परिवलन वायूपदार्थांसारखे न होता घनपदार्थांसारखे होऊ लागते त्याला टॅकोक्लाईन असे म्हणतात. सर्वच तार्‍यांचे परिवलन अशा प्रकारे होते. बाकी एअरपॉकेट्स आणि टर्ब्युलन्समधून प्रवास करताना हेवन्ली बॉडी आहे असं म्हणता येईल काय? विक्षिप्तपणामुळे विचलनाची (म्हणजे नक्की काय?) रेंज जास्त असण्याची शक्यता बरीच जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मोल्सवर्थ

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 05:14 नवीन
मोल्सवर्थनुसार differential rotation ला शुन्यलब्धी गती म्हणता येईल. चुभुद्याघ्या. - आंद्या उपक्रमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शुन्यलब्धी? शून्य हा शब्द

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 05:32 नवीन
शुन्यलब्धी? शून्य हा शब्द समजतो, पण लब्धी या शब्दाचा उगम काय? दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या, एकमेकांशी संबंधितच वस्तूंचा वेग वेगवेगळा आहे असा अर्थ शून्यलब्धी या शब्दातून प्रतीत होत नाही. calculus शी संबंधित वापरला जाणारा आणि परिवलनासंबंधित वापरला जाणारा differential हा शब्द एकच आहे. पण शून्य बाकी असा काही अर्थ इथे निघत नाही असे वाटते. कॉलिंग धनंजय, चिंतातुर जंतू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ठार मेलो!!!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 05:45 नवीन
कॉलिंग धनंजय, चिंतातुर जंतू. जरा हेड ऑफ द डिपार्टमेंट काय केलं लगेच या धाग्याचा 'उपक्रम' करायला निघाली ही!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

डिफरन्शियल

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 06:13 नवीन
का हो पिडाकाका, तुमची पिडण्याची पद्धत आणि माझी पद्धत एकसारखीच का असावी? डिफरन्शियल नसावी का? अवांतरः धाग्याचा खफ करणे याच चालीवर मिपाचे उपक्रम करता येणे शक्य आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

शून्यलब्धी

नगरीनिरंजन
Fri, 08/05/2011 - 06:09 नवीन
ते Limit of x->0 सारखं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो. मला एक अर्थ लागला तो

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 06:18 नवीन
हो. मला एक अर्थ लागला तो तसाच. पण त्याचाही काही उपयोग नाही. दोन जवळच्या अक्षांशावरच्या परिवलनाच्या वेगातला फरक जवळपास शून्याएवढा आहे, पण शून्य नाही म्हणून हा शब्द वापरणं ग्राह्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

परफेक्ट

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 06:30 नवीन
>>दोन जवळच्या अक्षांशावरच्या परिवलनाच्या वेगातला फरक जवळपास शून्याएवढा आहे, पण शून्य नाही परफेक्ट, यु सेड ईट !! डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो .... कारण यात नेहमी भाज्य - भाजकापेक्षा लहान असते. (चुकले असल्यास ज्ञानी पुरुषांनी दगडं मारु नयेत, समजाउन सांगावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यायचं गणित!

Nile
Fri, 08/05/2011 - 06:35 नवीन
डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो .... कारण यात नेहमी भाज्य - भाजकापेक्षा लहान असते.
हे कोणत्या डिफरंशियल इक्वेशन मध्ये करतो आपण? च्यायला ह्या गणिताच्या पाहिजे तेव्हा कुठे चरायला जातं कुणास ठावूक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

क्रायटेरिया

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 08:56 नवीन
क्रायटेरिया हा ज्ञानी 'पुरुषांनी' दगडे मारु नये होता, असो तुम्ही ज्ञानी आहात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नाय राव, खरंच विचारलेलं.

Nile
Fri, 08/05/2011 - 09:22 नवीन
नाय राव, खरंच विचारलेलं. डिफरंशियल इक्वेशनचं अन टेंड्स टू झीरोचं रिलेशन मला दिसत नाही आहे, म्हणून विचारतोय. काठावर पास होणारे लोक आम्ही, कशाला दगडं मारू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आता मलाही त्या डिफरंशियल

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 09:08 नवीन
आता मलाही त्या डिफरंशियल इक्वेशनची थिअरी नक्की आठवत नाहीये, पण डिफरन्सिएशन (मराठी शब्द?) म्हणजे एका क्वांटीटीच्या (मराठी शब्द?) संदर्भात दुसरी कशी बदलते याचं गणित म्हणजे डिफरन्सिएशन. या बदलाच्या प्रमाणाची दुसर्‍या कशाशी तरी केलेली तुलना म्हणजे डिफरंशियल इक्वेशन असंच ना? का मी उगाच काहीतरी निरर्थक लिहीलं आहे? तसं असेल तर डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो हे नीट समजलं नाही. असो. माझ्या मते डिफरन्शियल रोटेशन हा शब्द आला आहे तो हे सांगण्यासाठी: घनपदार्थाप्रमाणे होणारे परिवलन वेगळे आणि वायूच्या गोळ्यांमधे होणारे परिवलन वेगळे. व्हिस्कस ड्रॅग (मराठी शब्द?) असल्यामुळे विषुववृत्तावर वेग जास्त आहे आणि अक्षांशाप्रमाणे हा वेग ध्रुवाकडे जाताना कमीकमी होत जातो. शून्यलब्धी या शब्दावर माझा अजूनही आक्षेप आहे कारण लब्धी हा शब्द सुबोध नाही आणि शून्य या शब्दाने दिशाभूल होते आहे. सहज समजेल असा शब्द थोड्या विचारांती सापडावा. अवांतरः आपणांस दगड मारले जाऊ नयेत म्हणून ज्ञानी आणि पुरूष अशा दोन अटी टाकून आंद्याने भलताच डाव साधला आहे. -- (ज्ञानी ढ) अदिती अवांतरेतरः टिळकांच्या पुस्तकाचा विषय हा धाग्याचा मुख्य विषय आहे ना? अतिअवांतरः मला एचोडी बनवून पिडाकाका कुठे पळाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

क्वांटिटी

मिहिर
Fri, 08/05/2011 - 19:06 नवीन
क्वांटिटी= राशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 20:05 नवीन
>>शून्यलब्धी या शब्दावर माझा अजूनही आक्षेप आहे कारण लब्धी हा शब्द सुबोध नाही मग परांचन कसा चालतो तुम्हाला ? नावात फक्त परा असलं की सुबोध झाला का ? (अवांतरः तसे तर मग पराला परा भावे का म्हणायचे नाही ? ) तुमच्या या कंपुबाजीचा मी निषेध नोंदवतो. (तुर्तास इतकेच.) - आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

परांचन या शब्दाचा निदान

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 20:24 नवीन
परांचन या शब्दाचा निदान (मराठी आंतरजालावर 'देशद्रोही' धागा येण्यापूर्वी) वेगळा अर्थ निघत नव्हता. त्यातून तुमची सदाशिव पेठेबद्दल काही जळजळ असेलच तर खरडवहीचा सढळ हस्ते वापर करावा ही विनंती. तुमच्या निषेधास योग्य जागा दाखवण्यात आलेली आहे. मिहीरः धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तुमच्या प्रतिक्रियेतून मला

शुचि
Fri, 08/05/2011 - 06:58 नवीन
तुमच्या प्रतिक्रियेतून मला असं प्रतीत होतं आहे की ज्ञानी पुरषांनी दगड मारू नयेत पण ज्ञानी स्त्रियांनी मारले तर चालतील. जाऊ देत मी ज्ञानी नसल्याने हा पहा दगड खाली टाकला ;) ........ वाचलात तुम्ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ङिग्नीटी

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 08:56 नवीन
ङिग्नीटी .. ङिग्नीटी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

विचलन

पंगा
Fri, 08/05/2011 - 07:45 नवीन
विचलन म्हणजे काय?
Deviation अशा अर्थी तो शब्द वापरला होता. (विचलन म्हणजे deviation अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खिक्क

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 05:01 नवीन
>>सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो. पंगाशेठ आज विनोदाच्या मुडमध्ये असतील तर विनोद समजला असे म्हणेन, खिक्क ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

प्लीज, मलाही सांगा. मला नाही

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 05:32 नवीन
प्लीज, मलाही सांगा. मला नाही समजला. (ढ) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

(मूडमध्ये आहे, पण...)

पंगा
Fri, 08/05/2011 - 07:51 नवीन
मलाही नाही समजला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वर चित्रगुप्त म्हणतात

इरसाल
Fri, 08/05/2011 - 17:00 नवीन
वर चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे या पुस्तकाच्या पीडीएफची लिंक देता आली तर बरं होईल. इंग्रजीसुद्धा चालेल (कोण तो दात काढून हसतोय रे? काका सध्या मागच्या कंपनीतल्या पीएफ ची वाट बघतोय मला वाटले कि तुम्ही त्याचीच लिंक मागताय कि काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मीच तो

तिमा
Fri, 08/05/2011 - 18:15 नवीन
पिडा, मीच तो, दांत काढून हंसलो! कारण मला तुमचा प्रतिसाद वाचून पुलंच्या 'वरात' मधले शेक्सपिअरच्या दोन थडग्यांचे संवाद आठवले. आँ ? पिडांना पाठवलेले उत्तर इतक्या लांब कसे बुवा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आर्क्टिक होम इन वेदाज

सूर्याजीपंत
Fri, 08/05/2011 - 05:46 नवीन
आर्क्टिक होम इन वेदाज मध्ये लोकमान्यांनी मांडलेली अजून एक नवीन कल्पना आहे. ऋगवेदामधल्या " सुर्योदयात प्राक बहूनि आहानि आसन' या ऋचेच्या आधारे आर्यांचे मूळ वसतीस्थान उत्तर ध्रुव असावे असा सिद्धांत त्यांनी मांडला. तसेच भगवद्गीतेतील "मासानां मार्गशीर्षो हं " हा श्लोक आणि ऋगवेदातील वसंतसंपात हा मृगशीर्ष नक्षत्रात आला आहे, याचे गणित मांडून लोकमान्यांनी वेदकाल हा इसवीसनपूर्व ४००० ते इसवीसनपूर्व २५०० एवढा निश्चित केला.
  • Log in or register to post comments

विदेशी

सुनील
Fri, 08/05/2011 - 05:56 नवीन
अरेच्चा! सगळेच विदेशी. मग देशी कोण?
  • Log in or register to post comments

त्या बाजूने वाद घालणारे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 06:15 नवीन
त्या बाजूने वाद घालणारे देशीवादी असावेत. कोणीतरी कधीतरी असंही सांगितलं होतं की टिळकांनी हे मत नंतर मागे घेतलं. पुस्तक वाचून थोडा टाईमस्केलचा विचार केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

टिळकांनी हे मत नंतर मागे घेतला हे खरंय !!

सूर्याजीपंत
Fri, 08/05/2011 - 06:36 नवीन
टिळकांनी हे मत नंतर मागे घेतला हे खरंय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. न चिं केळकर लिखीत

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/05/2011 - 10:28 नवीन
सहमत आहे. न चिं केळकर लिखीत चरित्रात त्याचा उल्लेख येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्याजीपंत

ओळ आणि परिच्छेद

Nile
Fri, 08/05/2011 - 06:33 नवीन
ओळ आणि परिच्छेद यांविषयी माहिती असलेल्या एखाद्या पुस्तकाची लिंक डकवा रे कोणीतरी.
  • Log in or register to post comments

नंतर ध्रूवावर निर्माण झालेले

मदनबाण
Fri, 08/05/2011 - 07:35 नवीन
नंतर ध्रूवावर निर्माण झालेले हिमयुग. ह्म्म्म... मला उगाच अल् गोर यांची ही डॉक्युमेंट्री आठवली :--- An Inconvenient Truth... http://www.youtube.com/watch?v=Jxi-OlkmxZ4 ज्यांना कोणाला ही संपूर्ण डाउनलोड करुन पहाता येईल त्यांनी ती जरुर पहा.
  • Log in or register to post comments

आर्टीक होम

रणजित चितळे
Fri, 08/05/2011 - 09:19 नवीन
आर्टिक होम ... पुण्याला टिळक वाड्यावर उपलब्ध आहे पिडीएफ वर http://www.google.co.in/#hl=en&source=hp&q=arctic+home+in+vedas&oq=artic+home+in+v&aq=0s&aqi=g-s1&aql=&gs_sm=c&gs_upl=5265l8401l0l10881l15l12l0l0l0l0l889l2839l0.3.3.2.6-1l9l0&bav=on.2,or.r_gc.r_pw.&fp=dcbab90fb1105075&biw=1093&bih=485 येथे उपलब्ध आहे गुगल शोध.
  • Log in or register to post comments

टिळकांचे चुकीचे संशोधन...

योगप्रभू
Fri, 08/05/2011 - 13:42 नवीन
आर्यांचे मूळ वसतिस्थान उतर ध्रुव आणि ऋग्वेदाच्या रचनेचा काळ या दोन्ही मतांबाबत टिळकांनंतरच्या काळात महत्त्वाचे पुरावे समोर आले असल्याने टिळकांचे संशोधन प्रमाणभूत मानता येत नाही शिवाय ते चुकीचेही आहे. आर्य हे बाहेरुन आले होते, या पाश्चात्यांच्या संशोधनाला अनेक भारतीय विद्वान बळी पडले. १) वेद हे अपौरुषेय आहेत. अर्थात त्यांची निर्मिती कुणा एका व्यक्तीने केलेली नाही. विविध प्रदेशांत पसरलेल्या आणि वैदिक संस्कृतीचे पालन करणार्‍या ऋषींनी रचलेल्या ऋचांचे संकलन म्हणजे वेद. ही रचना एकाच काळात झालेली नाही. भिन्न काळांमध्ये होऊन गेलेल्या ऋषींनी त्यात आपापल्या परीने भर घातलेली आहे. हे संकलन म्हणजे एकच वेद होता, परंतु नव्या पिढ्यांना लक्षात ठेवण्यास सोईचे जावे म्हणून व्यासांनी त्याचे चार वेदांमध्ये विभाजन केल्याचे म्हटले जाते. त्यातील अगदी प्राचीन भाग म्हणजे ऋग्वेद. २) ऋग्वेदातील उषेचे वर्णन किंवा सहा महिन्याची दिवसरात्र यावरुन आर्य उत्तर ध्रुवावरील मूलनिवासी होते, अशी मांडली गेलेली उपपत्ती गोंधळात पाडते. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ भूस्थिती व अतिथंड हवामान लक्षात घेता दहा हजार वर्षांपूर्वी तेथे आर्यांसारखी समाजव्यवस्था असू शकेल का? गोपालन, घोड्यांचा वापर, यज्ञसंस्था ही आर्य संस्कृतीची चिन्हे ध्रुवीय प्रदेशाशी जोडणे धाडसाचे ठरेल. या ऋचा थोड्या बाजूला ठेऊन उर्वरित ऋग्वेद बघितला तर त्यातील दाशराज्ञ युद्ध, सप्तसिंधुंचा उल्लेख यावरुन या आदिवेदाची प्रमुख रचना भारत-अफगाणिस्थान-इराण या विशाल भूपट्ट्यात झाल्याचे दिसते. कुठे उत्तर ध्रुव आणि कुठे हा नद्यांच्या खोर्‍यातील प्रदेश? काहीच मेळ बसत नाही. ३) ऋग्वेदाचा काळ इसवी सनपूर्वी ४००० ते २५०० असा निश्चित केला असला तरी वैदिक संस्कृतीच्या पाऊलखुणा त्याहीपूर्वी मागे जाताना आढळल्या आहेत. तुर्कस्तानच्या अनातोलिया भागात सापडलेले नेवाली कोरी संस्कृतीचे अवशेष सध्यापासून ९००० वर्षे जुने आहेत आणि याच संशोधनाने पाश्चात्यांच्या 'आर्य हे बाहेरचे होते' या उपपत्तीला साधार चुकीचे सिद्ध केले आहे. नेवाली कोरी संस्कृतीतील ब्राह्मणाचे शिल्प, ज्ञानकेंद्रातील यज्ञकुंडे पाहाता तेथे खिस्तपूर्व ७००० वर्षे आधी वैदिक संस्कृती नांदत असल्याला भक्कम आधार मिळाला आहे. याचा अर्थ वेदांच्या निर्मितीस सुरवात त्याहीपूर्वी झाली असू शकेल. लोकमान्य टिळकांच्या २ महान चुकांमुळे विशेषतः ब्राह्मण समाजाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. १) आर्यांच्या उत्तर ध्रुव वसतिस्थान उपपत्तीमुळे 'ब्राह्मण हे बाहेरुन आले आहेत' अशी बोंब मारणार्‍यांना बोट दाखवायला आयतेच कोलित मिळाले. २) वेदोक्त प्रकरणात टिळकांच्या चुकीच्या भूमिकेमुळे करवीरचे शाहूमहाराज दुखावले गेले. त्यातून ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ अधिकच भडकली. जिचे निखारे अगदी आजही ब्राह्मण समाजाला चटके देताहेत.
  • Log in or register to post comments

उतम माहिती

आनंदयात्री
Fri, 08/05/2011 - 20:38 नवीन
उतम माहिती, विशेषतः नेवाली कोरीच्या माहितीबद्दल धन्यवाद. नेवाली कोरीबद्दल इथे असलेल्या माहितीतुन असे कळते की ही जागा आता एका धरणाच्या बॅकवॉटर मुळे पाण्याखाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

उत्तम माहिती!

बाळकराम
Mon, 08/08/2011 - 00:59 नवीन
उत्तम माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मस्तच

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/05/2011 - 16:21 नवीन
लेखन व प्रतिसादातुन छान माहिती मिळत आहे. पण ह्यापुढे अदिती सारख्या कंपूबाजांची विद्वत्ता दिसून येणार नाही असे धागे काढा अशी विनंती. परांचन
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा