आर्क्टिक होम इन वेदाज, टिळक

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
4 Aug 2011 - 11:08 pm
गाभा: 

आर्क्टिक होम इन वेदाज याबाबत काही गोष्टी शेअर करू इच्छितो.
कुणाला अधिक माहीती असेल तर जरूर द्यावी, आनंद होइल.

आर्क्टिक होम इन वेदाज हे टिळकांनी १८९८ च्या आसपास लिहिलेले आहे
पण या विषयाची सुरुवात त्यांनी १८९३ ला केलेली दिसते.

आपले म्हणणे मांडतान टिळकांनी रसायनशास्त्र, भूमिती, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास
अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे

सूर्याची गती, पृथ्वीची गती, त्या दोघांमधील सापेक्षता
पृथ्वीच्या कक्षेने सुर्याच्या कक्षेशी केलेला कोन

५००० ते ८००० वर्षांपूर्वी ध्रूवावर पडणार्‍या सूर्यकिरणांचा कोन
त्यामुळे तिथे असलेले सरासरी तापमान, जे मानवाला अनुकुल होते.

नंतर ध्रूवावर निर्माण झालेले हिमयुग.

ध्रूवावर ६ महिने दिवस ६ महिने रात्र( ४ + ८ ही असेल)
असे उल्लेख

इराणी भाषा आणि संस्कृतमधील संबंध

पूर्वीच्या काळी जगात काही ठिकाणी अश्म युग
तर काही ठिकाणी लोह तांबे यांचा वापर हे एकाच वेळी सुरू होते.

पृथ्वी स्वत:भोवती २४ तासात फिरते
सूर्य ३६५ दिवसात फिरतो

परंतु त्यांची एकमेकांबरोबरची त्यांची असलेली स्थिती
पुन्हा जश्शीच्या तश्शी व्हायला २३००० वर्षे लागतात.

इ. आहे यामधे

हे पुस्तक खूप छोटे आहे पण समजून घ्यायला बरेच अवघड आहे.

खूप विचार करत समजून घेत वाचावे लागते.

यात अनेक भौमितिक आकृत्या आहेत, ते सारे विज्युलाईज करावे लागते.

पुस्तक विलक्षण संशोधनावर आधारीत आहे

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

5 Aug 2011 - 12:00 am | चित्रगुप्त

अतिशय चांगला, महत्वाचा विषय.
हे पुस्तक जालावर वाचण्यासाठी उपलब्ध आहे का? मराठीत ?

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 12:16 am | पिवळा डांबिस

पृथ्वी स्वत:भोवती २४ तासात फिरते
सूर्य ३६५ दिवसात फिरतो

पूर्वार्ध खरा आहे...
पण सूर्य नाय फिरत हो, ती पृथ्वी फिरते सूर्याभोवती ३६५ दिवसांत!!

बाकी विषयावर इथे एक विक्षिप्त दुर्बिटणेबाई (हेड ऑफ द डिपार्टमेंट, खगोलशास्त्र, मिपा!) आहेत, त्या अधिक माहिती देऊ शकतील.....

वर चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे या पुस्तकाच्या पीडीएफची लिंक देता आली तर बरं होईल. इंग्रजीसुद्धा चालेल (कोण तो दात काढून हसतोय रे?)
:)

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 2:01 am | आनंदयात्री

हे घ्या इंग्रजीतली लिंक

-
(लिंकाळ्याचा मित्र)

आंद्या

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 2:54 am | पिवळा डांबिस

अनेक धन्यवाद!
-लिंकाळ्याचा काका
;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 2:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सूर्य ३६५ दिवसात फिरतो

पिडा काकांनी चूक शोधली आहेच. सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.

परंतु त्यांची एकमेकांबरोबरची त्यांची असलेली स्थिती
पुन्हा जश्शीच्या तश्शी व्हायला २३००० वर्षे लागतात.

तुमच्या या वाक्याचा संबंध बहुदा परांचन गतीशी असावा. परांचन गती म्हणजे पृथ्वीचा फिरण्याची गती. भोवरा फिरताना हळू फिरायला लागला की त्याचा आसही डोलायला लागतो, ती परांचन गती.
पृथ्वीच्या परांचन गतीचं एक चक्र २३००० नव्हे, साधारण २६००० वर्षात पूर्ण होतं. एक चक्र (३६० अंश) पूर्ण करण्यासाठी २६००० वर्ष असल्यामुळे एक अंशातून आस हलण्यासाठी साधारण ७२ वर्ष लागतात. १ अंश म्हणजे सूर्याच्या (आणि पूर्णचंद्राच्या) व्यासाच्या दुप्पट अंतर. सामान्य माणसाचे आयुष्य १०० वर्ष पकडले तरी आकाशात सव्वा अंशाने ध्रुवतारा सरकलेला दिसेल, पण ही हालचाल एवढी कमी आहे की नीट निरीक्षणं केल्याशिवाय ही गती दिसणं शक्य नाही.

आंद्या, लिंकबद्दल धन्यवाद. जमेल तसे वाचते.

पंगा's picture

5 Aug 2011 - 2:39 am | पंगा

सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.

इतकी वाइड रेंज?

(बाकी, माहिती रोचक आहे.)

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 3:49 am | पिवळा डांबिस

इतकी वाइड रेंज?
खुळे की काय तुम्ही पंगाशेठ?
अहो, वाईड रेंज तुमची! दुर्बिटणे बाईंच्या रिष्टवाचातला काटा सेकंदाने देखील सरकत नाही हजार वर्षे उलटल्याशिवाय!
काय समजलेंत!!!
:)

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:15 am | पंगा

:)

दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर हेवन्ली बॉडीज़च्या विचलनाच्या रेंजबद्दल काय परिस्थिती आहे*? पृथ्वीबद्दल? चंद्राबद्दल? सूर्यमालेतील इतर ग्रहांबद्दल?

* दुर्बिटणेबै या (१) हेवन्ली बॉडी आहेत, आणि/किंवा (२) त्यांची विचलनाची रेंज सिग्निफिकंट आहे, यांपैकी कोणताही दावा यातून मला (प्रत्यक्ष निरीक्षणाअभावी) करावयाचा नाही. वरील दोन वाक्यांच्या निकटसान्निध्यातून (close juxtaposition अशा अर्थी) तसा अर्थ प्रतीत होत असल्यास तो एक निव्वळ दुर्दैवी योगायोग आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

मला तर असा अर्थ प्रतीत होतोय की नीरीक्षणांती तुम्हाला तसा दावा करायला अथवा नाकारायला आवडेल ;)

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:57 am | पंगा

...तसा अर्थ प्रतीत झाला असल्यास तोही एक निव्वळ योगायोग आहे. ;)

तूर्तास इतकेच.

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 4:59 am | आनंदयात्री

हाण्ण हाण्ण !!

बाकी हीच ऑपॉर्च्युनिटी घेउन उत्तर अमेरिकतल्या बृहन्मिपा शाकाहारी कट्ट्याचे शिंग फुंकावे काय ??

पंगा's picture

5 Aug 2011 - 5:01 am | पंगा

कळले नाही.

(असो. तूर्तास एवढेच.)

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 5:13 am | आनंदयात्री

नकी काय कळले नाही ?

पहिले वाक्य की दुसरे ?

>>(असो. तूर्तास एवढेच.)

अजुनही बोललात तरी चालेल :)

पंगा's picture

5 Aug 2011 - 7:49 am | पंगा

नकी काय कळले नाही ?

पहिले वाक्य की दुसरे ?

दोन्ही.

पण विशेषतः दुसरे.

अजुनही बोललात तरी चालेल :)

परत कधीतरी, सवडीने.

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 8:53 am | आनंदयात्री

>>परत कधीतरी, सवडीने.

वाट पहातोय. बोलुयात व्यवस्थित.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 5:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर हेवन्ली बॉडीज़च्या विचलनाच्या रेंजबद्दल काय परिस्थिती आहे*? पृथ्वीबद्दल? चंद्राबद्दल? सूर्यमालेतील इतर ग्रहांबद्दल?

का, का, माझं का सोडा? मी ही माणूसच आहे, मलाही आपलं म्हणा!

विचलन म्हणजे काय? परिवलन का?

सूर्यासारख्या वायूरूप वस्तूंचे परिवलन अशाच प्रकारे होते. सूर्याच्या परिवलनाचा वेग ध्रुवांवर सर्वात कमी आणि विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. पण हे फक्त पृष्ठभाग आणि तिथपासून काही अंतर (१/३ त्रिज्जा) आतच सूर्याचे परिवलन अशा प्रकारे होते. याला differential rotation (मराठी शब्द?) असे म्हणतात. ज्या भागात सूर्याचे (आणि इतर तार्‍यांचेही) परिवलन वायूपदार्थांसारखे न होता घनपदार्थांसारखे होऊ लागते त्याला टॅकोक्लाईन असे म्हणतात. सर्वच तार्‍यांचे परिवलन अशा प्रकारे होते.

बाकी एअरपॉकेट्स आणि टर्ब्युलन्समधून प्रवास करताना हेवन्ली बॉडी आहे असं म्हणता येईल काय? विक्षिप्तपणामुळे विचलनाची (म्हणजे नक्की काय?) रेंज जास्त असण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 5:14 am | आनंदयात्री

मोल्सवर्थनुसार differential rotation ला शुन्यलब्धी गती म्हणता येईल. चुभुद्याघ्या.

-
आंद्या उपक्रमी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 5:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुन्यलब्धी?
शून्य हा शब्द समजतो, पण लब्धी या शब्दाचा उगम काय? दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या, एकमेकांशी संबंधितच वस्तूंचा वेग वेगवेगळा आहे असा अर्थ शून्यलब्धी या शब्दातून प्रतीत होत नाही. calculus शी संबंधित वापरला जाणारा आणि परिवलनासंबंधित वापरला जाणारा differential हा शब्द एकच आहे. पण शून्य बाकी असा काही अर्थ इथे निघत नाही असे वाटते.
कॉलिंग धनंजय, चिंतातुर जंतू.

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 5:45 am | पिवळा डांबिस

कॉलिंग धनंजय, चिंतातुर जंतू.
जरा हेड ऑफ द डिपार्टमेंट काय केलं लगेच या धाग्याचा 'उपक्रम' करायला निघाली ही!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 6:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

का हो पिडाकाका, तुमची पिडण्याची पद्धत आणि माझी पद्धत एकसारखीच का असावी? डिफरन्शियल नसावी का?

अवांतरः धाग्याचा खफ करणे याच चालीवर मिपाचे उपक्रम करता येणे शक्य आहे काय?

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 6:09 am | नगरीनिरंजन

ते Limit of x->0 सारखं वाटतंय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 6:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो. मला एक अर्थ लागला तो तसाच. पण त्याचाही काही उपयोग नाही. दोन जवळच्या अक्षांशावरच्या परिवलनाच्या वेगातला फरक जवळपास शून्याएवढा आहे, पण शून्य नाही म्हणून हा शब्द वापरणं ग्राह्य वाटत नाही.

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 6:30 am | आनंदयात्री

>>दोन जवळच्या अक्षांशावरच्या परिवलनाच्या वेगातला फरक जवळपास शून्याएवढा आहे, पण शून्य नाही

परफेक्ट, यु सेड ईट !!
डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो .... कारण यात नेहमी भाज्य - भाजकापेक्षा लहान असते.
(चुकले असल्यास ज्ञानी पुरुषांनी दगडं मारु नयेत, समजाउन सांगावे.)

Nile's picture

5 Aug 2011 - 6:35 am | Nile

डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो .... कारण यात नेहमी भाज्य - भाजकापेक्षा लहान असते.

हे कोणत्या डिफरंशियल इक्वेशन मध्ये करतो आपण? च्यायला ह्या गणिताच्या पाहिजे तेव्हा कुठे चरायला जातं कुणास ठावूक!

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 8:56 am | आनंदयात्री

क्रायटेरिया हा ज्ञानी 'पुरुषांनी' दगडे मारु नये होता, असो तुम्ही ज्ञानी आहात !!

नाय राव, खरंच विचारलेलं. डिफरंशियल इक्वेशनचं अन टेंड्स टू झीरोचं रिलेशन मला दिसत नाही आहे, म्हणून विचारतोय. काठावर पास होणारे लोक आम्ही, कशाला दगडं मारू?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 9:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता मलाही त्या डिफरंशियल इक्वेशनची थिअरी नक्की आठवत नाहीये, पण डिफरन्सिएशन (मराठी शब्द?) म्हणजे एका क्वांटीटीच्या (मराठी शब्द?) संदर्भात दुसरी कशी बदलते याचं गणित म्हणजे डिफरन्सिएशन. या बदलाच्या प्रमाणाची दुसर्‍या कशाशी तरी केलेली तुलना म्हणजे डिफरंशियल इक्वेशन असंच ना? का मी उगाच काहीतरी निरर्थक लिहीलं आहे? तसं असेल तर डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो हे नीट समजलं नाही.

असो. माझ्या मते डिफरन्शियल रोटेशन हा शब्द आला आहे तो हे सांगण्यासाठी: घनपदार्थाप्रमाणे होणारे परिवलन वेगळे आणि वायूच्या गोळ्यांमधे होणारे परिवलन वेगळे. व्हिस्कस ड्रॅग (मराठी शब्द?) असल्यामुळे विषुववृत्तावर वेग जास्त आहे आणि अक्षांशाप्रमाणे हा वेग ध्रुवाकडे जाताना कमीकमी होत जातो.

शून्यलब्धी या शब्दावर माझा अजूनही आक्षेप आहे कारण लब्धी हा शब्द सुबोध नाही आणि शून्य या शब्दाने दिशाभूल होते आहे. सहज समजेल असा शब्द थोड्या विचारांती सापडावा.

अवांतरः आपणांस दगड मारले जाऊ नयेत म्हणून ज्ञानी आणि पुरूष अशा दोन अटी टाकून आंद्याने भलताच डाव साधला आहे.
-- (ज्ञानी ढ) अदिती

अवांतरेतरः टिळकांच्या पुस्तकाचा विषय हा धाग्याचा मुख्य विषय आहे ना?

अतिअवांतरः मला एचोडी बनवून पिडाकाका कुठे पळाले?

मिहिर's picture

5 Aug 2011 - 7:06 pm | मिहिर

क्वांटिटी= राशी

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 8:05 pm | आनंदयात्री

>>शून्यलब्धी या शब्दावर माझा अजूनही आक्षेप आहे कारण लब्धी हा शब्द सुबोध नाही

मग परांचन कसा चालतो तुम्हाला ? नावात फक्त परा असलं की सुबोध झाला का ? (अवांतरः तसे तर मग पराला परा भावे का म्हणायचे नाही ? )

तुमच्या या कंपुबाजीचा मी निषेध नोंदवतो.

(तुर्तास इतकेच.)

-
आंद्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 8:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परांचन या शब्दाचा निदान (मराठी आंतरजालावर 'देशद्रोही' धागा येण्यापूर्वी) वेगळा अर्थ निघत नव्हता. त्यातून तुमची सदाशिव पेठेबद्दल काही जळजळ असेलच तर खरडवहीचा सढळ हस्ते वापर करावा ही विनंती.

तुमच्या निषेधास योग्य जागा दाखवण्यात आलेली आहे.

मिहीरः धन्यवाद.

तुमच्या प्रतिक्रियेतून मला असं प्रतीत होतं आहे की ज्ञानी पुरषांनी दगड मारू नयेत पण ज्ञानी स्त्रियांनी मारले तर चालतील. जाऊ देत मी ज्ञानी नसल्याने हा पहा दगड खाली टाकला ;) ........ वाचलात तुम्ही :)

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 8:56 am | आनंदयात्री

ङिग्नीटी .. ङिग्नीटी !!

पंगा's picture

5 Aug 2011 - 7:45 am | पंगा

विचलन म्हणजे काय?

Deviation अशा अर्थी तो शब्द वापरला होता.

(विचलन म्हणजे deviation अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.)

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 5:01 am | आनंदयात्री

>>सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.

पंगाशेठ आज विनोदाच्या मुडमध्ये असतील तर विनोद समजला असे म्हणेन, खिक्क ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 5:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्लीज, मलाही सांगा. मला नाही समजला.

(ढ) अदिती

पंगा's picture

5 Aug 2011 - 7:51 am | पंगा

मलाही नाही समजला. :(

इरसाल's picture

5 Aug 2011 - 5:00 pm | इरसाल

वर चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे या पुस्तकाच्या पीडीएफची लिंक देता आली तर बरं होईल. इंग्रजीसुद्धा चालेल (कोण तो दात काढून हसतोय रे?

काका सध्या मागच्या कंपनीतल्या पीएफ ची वाट बघतोय मला वाटले कि तुम्ही त्याचीच लिंक मागताय कि काय.

तिमा's picture

5 Aug 2011 - 6:15 pm | तिमा

पिडा,
मीच तो, दांत काढून हंसलो! कारण मला तुमचा प्रतिसाद वाचून पुलंच्या 'वरात' मधले शेक्सपिअरच्या दोन थडग्यांचे संवाद आठवले.

आँ ? पिडांना पाठवलेले उत्तर इतक्या लांब कसे बुवा ?

सूर्याजीपंत's picture

5 Aug 2011 - 5:46 am | सूर्याजीपंत

आर्क्टिक होम इन वेदाज मध्ये लोकमान्यांनी मांडलेली अजून एक नवीन कल्पना आहे. ऋगवेदामधल्या " सुर्योदयात प्राक बहूनि आहानि आसन' या ऋचेच्या आधारे आर्यांचे मूळ वसतीस्थान उत्तर ध्रुव असावे असा सिद्धांत त्यांनी मांडला. तसेच भगवद्गीतेतील "मासानां मार्गशीर्षो हं " हा श्लोक आणि ऋगवेदातील वसंतसंपात हा मृगशीर्ष नक्षत्रात आला आहे, याचे गणित मांडून लोकमान्यांनी वेदकाल हा इसवीसनपूर्व ४००० ते इसवीसनपूर्व २५०० एवढा निश्चित केला.

सुनील's picture

5 Aug 2011 - 5:56 am | सुनील

अरेच्चा! सगळेच विदेशी. मग देशी कोण?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 6:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या बाजूने वाद घालणारे देशीवादी असावेत.
कोणीतरी कधीतरी असंही सांगितलं होतं की टिळकांनी हे मत नंतर मागे घेतलं. पुस्तक वाचून थोडा टाईमस्केलचा विचार केला पाहिजे.

टिळकांनी हे मत नंतर मागे घेतला हे खरंय !!

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2011 - 10:28 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. न चिं केळकर लिखीत चरित्रात त्याचा उल्लेख येतो.

Nile's picture

5 Aug 2011 - 6:33 am | Nile

ओळ आणि परिच्छेद यांविषयी माहिती असलेल्या एखाद्या पुस्तकाची लिंक डकवा रे कोणीतरी.

नंतर ध्रूवावर निर्माण झालेले हिमयुग.

ह्म्म्म...
मला उगाच अल् गोर यांची ही डॉक्युमेंट्री आठवली :---

An Inconvenient Truth...
http://www.youtube.com/watch?v=Jxi-OlkmxZ4

ज्यांना कोणाला ही संपूर्ण डाउनलोड करुन पहाता येईल त्यांनी ती जरुर पहा.

रणजित चितळे's picture

5 Aug 2011 - 9:19 am | रणजित चितळे

आर्टिक होम ... पुण्याला टिळक वाड्यावर उपलब्ध आहे

पिडीएफ वर http://www.google.co.in/#hl=en&source=hp&q=arctic+home+in+vedas&oq=artic... येथे उपलब्ध आहे गुगल शोध.

योगप्रभू's picture

5 Aug 2011 - 1:42 pm | योगप्रभू

आर्यांचे मूळ वसतिस्थान उतर ध्रुव आणि ऋग्वेदाच्या रचनेचा काळ या दोन्ही मतांबाबत टिळकांनंतरच्या काळात महत्त्वाचे पुरावे समोर आले असल्याने टिळकांचे संशोधन प्रमाणभूत मानता येत नाही शिवाय ते चुकीचेही आहे. आर्य हे बाहेरुन आले होते, या पाश्चात्यांच्या संशोधनाला अनेक भारतीय विद्वान बळी पडले.

१) वेद हे अपौरुषेय आहेत. अर्थात त्यांची निर्मिती कुणा एका व्यक्तीने केलेली नाही. विविध प्रदेशांत पसरलेल्या आणि वैदिक संस्कृतीचे पालन करणार्‍या ऋषींनी रचलेल्या ऋचांचे संकलन म्हणजे वेद. ही रचना एकाच काळात झालेली नाही. भिन्न काळांमध्ये होऊन गेलेल्या ऋषींनी त्यात आपापल्या परीने भर घातलेली आहे. हे संकलन म्हणजे एकच वेद होता, परंतु नव्या पिढ्यांना लक्षात ठेवण्यास सोईचे जावे म्हणून व्यासांनी त्याचे चार वेदांमध्ये विभाजन केल्याचे म्हटले जाते. त्यातील अगदी प्राचीन भाग म्हणजे ऋग्वेद.

२) ऋग्वेदातील उषेचे वर्णन किंवा सहा महिन्याची दिवसरात्र यावरुन आर्य उत्तर ध्रुवावरील मूलनिवासी होते, अशी मांडली गेलेली उपपत्ती गोंधळात पाडते. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ भूस्थिती व अतिथंड हवामान लक्षात घेता दहा हजार वर्षांपूर्वी तेथे आर्यांसारखी समाजव्यवस्था असू शकेल का? गोपालन, घोड्यांचा वापर, यज्ञसंस्था ही आर्य संस्कृतीची चिन्हे ध्रुवीय प्रदेशाशी जोडणे धाडसाचे ठरेल. या ऋचा थोड्या बाजूला ठेऊन उर्वरित ऋग्वेद बघितला तर त्यातील दाशराज्ञ युद्ध, सप्तसिंधुंचा उल्लेख यावरुन या आदिवेदाची प्रमुख रचना भारत-अफगाणिस्थान-इराण या विशाल भूपट्ट्यात झाल्याचे दिसते. कुठे उत्तर ध्रुव आणि कुठे हा नद्यांच्या खोर्‍यातील प्रदेश? काहीच मेळ बसत नाही.

३) ऋग्वेदाचा काळ इसवी सनपूर्वी ४००० ते २५०० असा निश्चित केला असला तरी वैदिक संस्कृतीच्या पाऊलखुणा त्याहीपूर्वी मागे जाताना आढळल्या आहेत. तुर्कस्तानच्या अनातोलिया भागात सापडलेले नेवाली कोरी संस्कृतीचे अवशेष सध्यापासून ९००० वर्षे जुने आहेत आणि याच संशोधनाने पाश्चात्यांच्या 'आर्य हे बाहेरचे होते' या उपपत्तीला साधार चुकीचे सिद्ध केले आहे. नेवाली कोरी संस्कृतीतील ब्राह्मणाचे शिल्प, ज्ञानकेंद्रातील यज्ञकुंडे पाहाता तेथे खिस्तपूर्व ७००० वर्षे आधी वैदिक संस्कृती नांदत असल्याला भक्कम आधार मिळाला आहे. याचा अर्थ वेदांच्या निर्मितीस सुरवात त्याहीपूर्वी झाली असू शकेल.

लोकमान्य टिळकांच्या २ महान चुकांमुळे विशेषतः ब्राह्मण समाजाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
१) आर्यांच्या उत्तर ध्रुव वसतिस्थान उपपत्तीमुळे 'ब्राह्मण हे बाहेरुन आले आहेत' अशी बोंब मारणार्‍यांना बोट दाखवायला आयतेच कोलित मिळाले.
२) वेदोक्त प्रकरणात टिळकांच्या चुकीच्या भूमिकेमुळे करवीरचे शाहूमहाराज दुखावले गेले. त्यातून ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ अधिकच भडकली. जिचे निखारे अगदी आजही ब्राह्मण समाजाला चटके देताहेत.

आनंदयात्री's picture

5 Aug 2011 - 8:38 pm | आनंदयात्री

उतम माहिती, विशेषतः नेवाली कोरीच्या माहितीबद्दल धन्यवाद.

नेवाली कोरीबद्दल इथे असलेल्या माहितीतुन असे कळते की ही जागा आता एका धरणाच्या बॅकवॉटर मुळे पाण्याखाली आहे.

बाळकराम's picture

8 Aug 2011 - 12:59 am | बाळकराम

उत्तम माहिती!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2011 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार

लेखन व प्रतिसादातुन छान माहिती मिळत आहे.

पण ह्यापुढे अदिती सारख्या कंपूबाजांची विद्वत्ता दिसून येणार नाही असे धागे काढा अशी विनंती.

परांचन

टिळकांच्या या पुस्तकाबद्दल खुप ऐकले होते (अजुन वाचले नाही).
महाभारतात होणार्‍या घटना कदाचीत त्यांनी जसे लिहिले आहे वर्णन केले आहे दिवसांचे अश्याच वातावरणात घडल्या आहेत हे ऐकले आहे. (स्वता काहीच संशोधन केलेले नाहि)
आणि बर्‍याच वर्षापुर्वी पृथ्वीवरील आत्ताची ठिकाणे हे वेगवेगळ्या जागांवर होती. हळु हळु त्यांची जागा बदलत गेली, तसे तेथील वातावरन पण बदलले.
अयोद्या(with india) पण म्हणे वेगळ्याच जागेवर होती, हळु हळु सरकली आहे ति इकडे असे ऐकले आहे. (स्वता स्वता काहीच संशोधन केलेले नाहि)

असो या विषयी जास्त अभ्यास नसल्याने फक्त जे ऐकले आणि पटते आहे तेच बोललो.
मात्र टिळकांची चुक वगैरे मला वाटत नाहिये. त्यांनी ज्या अभ्यासावर सर्व लिहिले आहे ते योग्यच आहे असे मनोमन वाटते.

आशु जोग's picture

6 Aug 2011 - 12:01 am | आशु जोग

बर्याच लोक्स नी
पुस्तक वाचलेले दिसत नाही

कळले आम्हाला

--

पण काही जण ज्यांनी आपुलकीने माहीती दिली त्यांचे आभार

विभूतियोग या गीतेच्या १० व्या अध्यायामधीलमासानां मार्गशीर्षो'हम् चा याला संदर्भ असावा.
या विषयावर त्यांनी मृगशीर्ष नावाचा लेख लिहिला होता

ज्याचे मॅक्समुल्लर साहेबांनी टिळकांच्या निष्कर्षांशी मतभेद असूनही कौतूक केले होते.

मोहेंजोदडो हडप्पाचा शोध १९२२ ला लागला
पण त्याच्याशी साशर्म्य असणारे निष्कर्श टिळकांनी कितीतरी आधी मांडलेले दिसतात.

आय. आय. टी. किंवा सायंसच्या भाषेत ज्याला थीओरीस्ट म्हणतात तसा सारा प्रकार आहे

हे वाचण्याचा प्रयत्न केल्यावर असे वाटते की हे आपले आपण समजून घेणे अवघड आहे

कुणीतरी गुरु हवा ज्याला गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, संस्कृत, भाषा यांचे चांगले ज्ञान आहे

अशी एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली ती म्हणजे जयंत नारळीकर