✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

म
मृगनयनी यांनी
Fri, 05/21/2010 - 10:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55509 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

राजीव

अरुंधती
Fri, 05/21/2010 - 19:27 नवीन
राजीव गांधींविषयी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्या काळातील त्यांचा माध्यमांसमोर संयत वावर, अचानक अंगावर आलेली जबाबदारी इ.इ. गोष्टींमुळे का कोण जाणे, त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती मनात दाटून यायची. आणि त्याचा कॉन्ग्रेसला भरपूर फायदा झाला. रातोरात त्यांना कॉन्ग्रेसचा उत्तराधिकारी मिळाला. त्यांच्या हत्येनंतर पुन्हा तीच सहानुभूती उर्वरित गांधी कुटुंबियांना मिळत आहे व मिळत राहील. भारतातील ते अघोषित राजघराणे आहे व भारतीय लोक त्यांची प्रजा! म्हणजे असं चित्र तरी दिसतं! म्हणूनच इतके भ्रष्टाचाराचे, जबाबदारी पुरी न पाडण्याचे आरोप होऊनसुध्दा तेच लोक आज सत्तेच्या केंद्रस्थानी दिसतात. अवांतर : राजीव गांधी माणूस दिसायला देखणा! त्यांचे हसरे, प्रसन्न छायाचित्र बघायला छान वाटते. इतर म्हातार्‍या-कोतार्‍या राजकारण्यांच्या चेहर्‍यांच्या तुलनेत त्यांचा चेहरा खूपच फोटोजनिक होता असे आपले माझे मत! :-) Image removed. Image removed. Image removed. Image removed. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

राजीव

कानडाऊ योगेशु
Fri, 05/21/2010 - 19:33 नवीन
राजीव गांधीना आदरयुक्त श्रध्दांजली. त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करण्याइतके ज्ञान माझ्याकडे नाही. पण क्लिंटनरावांचा प्रतिसाद आवडला. सध्याच्या परिस्थिती कसाही असला तरी काँग्रेस पक्षाखेरीज देशाला नेतृत्व देण्याची क्षमता अजुन कुठल्या दुसर्या पक्षात आहे? प्रमोद महाजनांनंतर भाजपाची हालत तर पाहवेनासी झाली आहे. राजीव गांधींपेक्षा मॅडम कांकणभर जास्तच धूर्त व चाणाक्ष वाटतात. पंतप्रधान होण्याची संधी असतानाही "अंतरात्मा की आवाज" वगैरे मेलोड्रामा करुन समस्त विरोधकांच्या थोतरीत मारली होती. @आणि घराणेशाही वगैरे बद्दल.. जे कॉग्रेंसमधल्या घराणेशाही बद्दल बोंबलत होते त्यांनी काय तारे तोडले हे आपण पाहतच आहोत. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

या लेखातील

डावखुरा
Fri, 05/21/2010 - 20:59 नवीन
या लेखातील दुर्मिळ छायाचित्रे आणि अरुताई,भेंडी काका,क्लिंटन ,वहीदा,नयनीतै...यानी फारच छान माहीती दिली... छान माहितीपुर्ण धागा.... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" :)
  • Log in or register to post comments

राजीव

पक्या
Fri, 05/21/2010 - 21:29 नवीन
राजीव गांधींना श्रध्दांजली . क्लिंटन यांचा माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. लेखातील छायाचित्रे पण छान आहेत. राजीव गांधींबद्द्ल कोणाचे कसेही मत असले तरी भारताला एक देखणा आणि हसर्‍या व्यक्तीमत्त्वाचा पंतप्रधान मिळाला होता ह्यावर कोणाचेच दुमत नसेल . :) -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

मेल्या म्हशीला मणभर दूध

हुप्प्या
Fri, 05/21/2010 - 21:50 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दूध असे म्हणायची पद्धत आहे. राजीव गांधींनी टेलिकॉमसाठी जे काही केले ते चांगलेच केले. अर्थात त्यांच्या मासाहेबांनी हे आधीच हाती घेतले असते तर आपल्याला जास्त फायदा झाला असता. बोफोर्स हे एक प्रकरण होते तसे शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणे ही राजीव गांधींनी केलेली एक घोडचूक. रानटी, धर्मपिसाट, जुन्या चालीरीति उराशी कवटाळून बसणार्‍या मुल्ला मौलवींची दाढी कुरवाळण्याचे हे नसते धंदे करून देशाला विशेषतः मुस्लिम जनतेला कित्येक वर्षे मागे नेले. मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे. ही घातक प्रथा पडल्यामुळे बाकीचे धर्मही मलापण हे हवे ते हवे असे करणार हे नक्की. दुसरे म्हणजे रामजन्मभूमीचे स्थळ हिंदूंना खुले करुन दिले. त्यामुळे जी आग भडकली आहे तिच्या ठिणग्या आजही उडत आहेत. परिणामांना तोंड द्यायची ताकद नसताना, परिणाम ओळखायची कुवत नसताना मतांकरता असले सवंग उपाय करून पुढील अनेक वर्षांकरता लोकांचे वाटोळे करायचे हे धंदे. कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील. त्याबद्दल विरोधकांनी राजीव गांधींचे आभार मानायला हवेत. एक शंका, राजीवजीनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता असे ऐकून आहे. तरीही त्यांचे जाहीर अंत्यसंस्कार हे हिंदू पद्धतीने झाले असे आठवते. ही त्यांची इच्छा होती का सहानुभूती मिळवण्याकरता केलेली ढोंगबाजी?
  • Log in or register to post comments

काही प्रश्न

क्लिंटन
Sat, 05/22/2010 - 00:11 नवीन
शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणे ही राजीव गांधींनी केलेली एक घोडचूक.
मान्य. राजीव गांधींच्या कारकिर्दीला लागलेल्या डागांमध्ये हा एक डाग नक्कीच आहे.
मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे.
या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती. काही प्रश्न: १. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते? २. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला? ३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय? याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
ही घातक प्रथा पडल्यामुळे बाकीचे धर्मही मलापण हे हवे ते हवे असे करणार हे नक्की.
गेल्या २५ वर्षांमध्ये इतर कोणत्या धर्माने (त्या धर्माच्या लोकांनी) अशा मागण्या केल्या आहेत?
कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील.
एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते. आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते. आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन ) या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता. काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे. २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा?
राजीवजीनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता असे ऐकून आहे.
नक्की संदर्भ देऊ शकाल का? अशा ऐकिव माहितीला किती महत्व द्यावे? ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

काही वाटेल

शिल्पा ब
Sat, 05/22/2010 - 00:19 नवीन
काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. हा तर आपल्या राज्यकर्त्यांच्या जुना गुण आहे...जरा खुट्ट वाजणार म्हंटले कि घातले लोटांगण...खंबीरपणा कसा तो नाहीच...कशाला घाबरतात देव जाणे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मेल्या

आंबोळी
Sat, 05/22/2010 - 11:11 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दूध हे लै आवडल.... सहमत आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

मेल्या

मितभाषी
Sat, 05/22/2010 - 16:49 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दूध>>> =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

निदान राजीव गांधींमुळे आज आपल्या सरकार ला

वेताळ
Fri, 05/21/2010 - 22:11 नवीन
७० हजार कोटीचा काल फायदा झाला हे मला पटते. :| तसेच लॉर्ड मॉउंट्बॅटन जन्माला आले म्हणुन १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,त्याप्रमाणे राजीव गांधी भारतात जन्माला आले म्हणुन भारताला संगणकाची ओळख झाली हे पण पटले. :D वेताळ
  • Log in or register to post comments

तसेच लॉर्ड

मितभाषी
Sat, 05/22/2010 - 17:01 नवीन
तसेच लॉर्ड मॉउंट्बॅटन जन्माला आले म्हणुन १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,त्याप्रमाणे राजीव गांधी भारतात जन्माला आले म्हणुन भारताला संगणकाची ओळख झाली हे पण पटले. >>>>>>>>> =)) =)) =)) =)) राजीवजींची हत्या अत्यंत क्रुर पधदतीने झाली हे एक वेळेस मान्य केले तरी म्हणुन ते हिन्दुस्थानचे हिरो होवु शकत नाहीत. म्हणुनच ते जनमाणसाचा आक्रोश वगैरे फिल्मी वर्णन अस्थायी वाटले. परंपरेने मिळालेल्या सत्तेची खुर्ची उबवण्यापलिकडे त्यांनी भरीव असे काहीही केलेले स्मरणात नाही. काँग्रेस पक्षात अनेक योग्यतेचे तरुण होतेच कि त्यावेळी. यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढायचे सोडुन दुसरे काय केले. तर यांनी फक्त डोक्यावर गोल पांढर्‍या टोप्या चढवुन इफ्तार पार्ट्या झोडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

"अस्थायी" नाही बे!

पंगा
Sat, 05/22/2010 - 22:52 नवीन
म्हणुनच ते जनमाणसाचा आक्रोश वगैरे फिल्मी वर्णन अस्थायी वाटले.
"अस्थायी" नाही. "अस्थानी". "अस्थायी" बोले तो, unstable. "अस्थानी" बोले तो, out of place. अर्थ बदलून जातो ना बे! - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

क्लिंटन

श्रावण मोडक
Sat, 05/22/2010 - 00:27 नवीन
मी फक्त क्लिंटनच्या प्रतिसादांसाठी हा धागा वाचतोय. या धाग्यावरील प्रतिसाद स्वतंत्रपणे काढून त्याला एकत्र गुंफले तर क्लिंटनचा एक उत्तम लेख होऊ शकेल. राजीव गांधींविषयी आवश्यक माहिती देणारा, त्याचवेळी त्या माहितीच्या मूल्यांकनाची एक चौकटही दाखवणारा.
  • Log in or register to post comments

तीच विनंती

विकास
Sat, 05/22/2010 - 01:29 नवीन
या धाग्यावरील प्रतिसाद स्वतंत्रपणे काढून त्याला एकत्र गुंफले तर क्लिंटनचा एक उत्तम लेख होऊ शकेल. अशीच विनंती त्यांना आत्ता खरडीद्वारे केली आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अगदी

मस्त कलंदर
Sat, 05/22/2010 - 15:47 नवीन
अगदी सहमत.. क्लिंटन आणि विकास , माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वर

विकास
Sat, 05/22/2010 - 03:07 नवीन
वर विशेषकरून क्लिंटन यांनी अनेक मुद्दे आणले आहेत तसेच इतरांनी देखील आणले आहेत. हे उत्तर त्या सर्वांना एकत्रित आहे असे समजावे: सर्वप्रथम राजीव गांधींच्या काळात चांगल्या घडलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या नेतृत्वाखाली घडल्या असे नक्कीच म्हणता येईल, त्यांचा विचार करू
  1. वर आलेली एक गोष्ट म्हणजे टेलीकम्युनिकेशन्स आणि तत्सम विषयातील मोठा फरक. सॅम पित्रोदा यांचे नाव वर आले आहेच.
  2. जॉर्ज बूश (पहीले) यांनी सुपरकाँप्युटींग भारताला न देण्याचे ठरवले आणि त्या संदर्भात उद्दामपणा केला. त्यावेळी भारतीय शास्त्रज्ञांनी तो प्रकल्प जिद्दीने उचलला आणि राजीवजींनी त्याला सक्रीय पाठींबा दिला - तो म्हणजे परम प्रकल्प. ज्याने भारताचे अधुनिक तांत्रिक क्षेत्रातील नाव वर आले. विजय भटकर सगळ्यांना माहीत असतीलच. यावर बरेच काही लिहीता येईल. पण तुर्तास इतकेच.
  3. लोंगोवाल करार करून पंजाब प्रश्नावर तोडगा काढण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न. तसाच करार आसाम स्टूडंट्स युनियन (आसू) बरोबर केला आणि मला वाटते मिझोराममधे पण. यातील प्रत्येकाला काही अंशी यश आले. अपयश आले असले तरी टिका करण्यासारखे नाही.
  4. आईने केलेली ऑपरेशन ब्लूस्टारच्या वेळची संवाद न करण्याची चूक, ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेस भरून काढली आणि यशस्वी ऑपरेशन केले.
  5. अरूणाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला. हे खूप महत्वाचे होते आणि आजही आहे. (वरील करार तसेच अरूणाचल प्रदेशाच्या बाबतीत तत्कालीन गृहसचीव राम प्रधान यांचा महत्वाचा भाग होता).
  6. बाकी एक स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व मिळाले. त्यात वर एका प्रतिसादात आल्याप्रमाणे, दिसणे उपयोगी पडले. पण तो दोष होऊ शकत नाही.
मात्र जसे वर उल्लेखलेल्या गोष्टी नक्कीच स्पृहणीय आहेत, तशाच त्यांच्या तितक्याच मोठ्या चुका पण झाल्या आहेतः
  1. सगळ्यात मोठ्ठी चूक ही शहाबानो प्रकरण. वर क्लिंटन यांच्या हिंदूकोड बिलाच्या मुद्यापेक्षा ही मोठी घोडचूक होती. कारण नेहरूंनी घटना दुरूस्ती केली नव्हती. त्यांच्या नातवाने सुप्रिमकोर्टाचा निर्णय उलटवायला घटनाच बदलली. आणि ती देखील आमच्या कडे ३/४ बहुमत आहे आम्ही काही करू शकतो या माजाने.
  2. श्रीलंकेत पाठवलेली शांतीसेना. कुठलाही प्लॅन न करता केलेले हे कृत्य होते. वर एका प्रतिसादात त्या सैनिकांनी तेथे जाऊन अत्याचार केले असे म्हणले आहे. वास्तवीक उलटेच झाले होते. हे भारताचे व्हिएटनाम होते. त्यात सैनिकांचे हाल झाले. तेथे मरून आणि त्याहीपेक्षा माघार घेतल्यावर येथे आल्यावर जी वाईट ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे. त्याचेच फळ एका अर्थी त्यांनी भोगले जसे इंदीरा गांधींनी पंजाबमुळे भोगले.
पंतप्रधान असताना शेवटच्या काळात ते वैयक्तिक कितीही चांगले असू शकतील असे वाटले तरी त्यांचे "सत्तेच्या दलालांवर" (हे त्यांचे शब्द आहेत) काहीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले. मग उगाच "हम उनको उनकी नानी याद दिलायेंगे" वगैरे सारखे पोकळ टाळ्याखाऊ बोलणे करणे चालू झाले. थोडक्यात नेतृत्व म्हणून कच्चेच ठरले. फक्त जिथे जिथे त्यांना चांगले सल्लागार मिळाले तेथे तेथे त्यांचे निर्णय यशस्वी ठरले. स्वतःच्या दिशा देणे हा वेगळाच मुद्दा झाला. हे वास्तव आहे असे वाटते. आता क्लिंटन यांच्या दोनच प्रश्नांना उत्तरे: सर्वप्रथम, यात भाजपाची बाजू घेणे हा उद्देश नाही... मी भारतात सध्या रहातही नाही आणि त्या अर्थाने राजकारणाशी संबंधही नाही.. राजीवजींना विरोध कोण करते बघा-- भाजीपचे (भारतीय जीना पक्षाचे) नेते. भारतीय राजकारणातील विरोधाभास कसा स्पष्टपणे दिसतो बघा. राजीवजींच्या विरुद्ध भाजपा आणि संघ परीवार हा केवळ शहाबानोप्रकरणामुळे गेला होता. हिंदू द्वेष्टे व्हिपी सिंग यांनी राजीव द्वेष हा बोफोर्स च्या निमित्ताने चालू केला आणि "तुमच्याहून अधिक स्वच्छ" हे राजीवजींना दाखवण्याच्या निमित्ताने वाढवत ठेवला. भाजपाने त्याचा राजकीय फायदा नक्कीच उचलला. विशेष करून बोफोर्स संदर्भात. आजही त्यात भ्रष्टाचार झाला नाही हे कोणी अमान्य करत नाही, फक्त किती झाला आणि त्यात राजीव किती सहभागी होते हा मुद्दा कुणालाच कळू शकणार नाही. तसेच थोडेफार, काँग्रेसने जॉर्ज फर्नांडीस यांच्या विरुद्ध आवाज उठवला, सत्तेत आल्यावर चौकशा समित्या बसवल्या आणि आता स्वतःच त्यांच्या विरुद्धच्या चौकशा विशेष प्रसिद्धी न देता थांबवल्या आहेत. बाकी पॉलीटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज हे प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवावे. गांधीचे पुतळे काढून नथुरामचे ठेवा असे म्हणणारे भुजबळ हे नंतरच्या लगेचच्या निवडणूकीत काँग्रेसला चालले होते हे वास्तव आहे. तेच वास्तव समाजवादी विचारसरणीत देखील असेल. कदाचीत एकमेव अपवाद असेल तर तो कम्युनिस्टांचा, पण मग त्यांना भारतापेक्षा चीन चालतो हे अजून एक भयानक प्रकरण... मात्र वरील प्रतिसादात असे दिसते की असे केवळ भाजपनेच केले अथवा असे भाजपने करू नये. अनेक लोक म्हणतात की राजीव गांधींना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून पंतप्रधान केले. मला ते पटत नाही. फार तर त्यांना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले हे मान्य करता येईल. पण पंतप्रधान म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले होते. हे विधान अर्धसत्य आहे. पूर्ण नसण्याचे थोडे कारण इतकेच, की काही झाले तरी ते केवळ गांधी-नेहरू घराण्यातील म्हणून इंदिरा गांधींच्या निधनानंतर पंतप्रधान होऊ शकले. वास्तवीक कायद्याप्रमाणे विचार केल्यास मंत्रीमंडळात "नेक्स्ट इन लाईन" असलेले (मला वाटते) प्रणवकुमार मुखर्जी अथवा नरसिंहराव हे हंगामी पंतप्रधान होयला हवे होते. मात्र राजीव स्वतः मंत्रीमंडळात देखील नव्हते. ते कलकत्यात होते. त्यांना बोलावून त्यांचा शपथविधी करवून मग इंदीरागांधींच्या निधनाची बातमी जाहीर केली गेली. नंतर अर्थातच ते ८५च्या निवडणूकात स्वबळ आणि इंदिराहत्येच्या सहानभूती लाटेवर निवडून आले. त्या घटनेला खूपच प्रसिद्धी मिळाल्याने, अगदी पाश्चात्य देशातील एका (ब्रिटीश की अमेरिकन) बाईची पण मुलाखतीत "बिचार्‍याची आई गेली" असली प्रतिक्रीया वाचल्याचे आठवते. तेथे भारतातील जनतेचे काय विचारता? मुखर्जी आणि राव यांना त्याकाळात हंगामी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल (राजकीय पॉवर वनवासाची) शिक्षा झाली होती असे आठवते. असो. यावरील इतर मुद्यांवर वेगळी डोळस चर्चा झाली तर उत्तम असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

क्लिंटन
Sat, 05/22/2010 - 09:11 नवीन
कारण नेहरूंनी घटना दुरूस्ती केली नव्हती. त्यांच्या नातवाने सुप्रिमकोर्टाचा निर्णय उलटवायला घटनाच बदलली.
शाहबानो प्रकरणी राजीव सरकारने नक्की कोणती (किती क्रमांकाची) घटनादुरूस्ती केली? कारण या यादीमध्ये तर राजीव सरकारच्या काळात अशी कोणती घटनादुरूस्ती केल्याचे म्हटलेले नाही. मिलीगॅझेट या भारतीय मुस्लिमांच्या मासिकातील ताहिर महमूद यांचा हा लेख तर अशी कोणतीच घटनादुरूस्ती केली नाही असे म्हणतो. तसेच राजीव सरकारने Muslim Womens Act 1986 पास केला आणि २८ सप्टेंबर २००१ मध्ये दुसऱ्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा ’घटनाबाह्य किंवा देशहितविरोधी किंवा स्त्रीहितविरोधी’ नाही असे स्पष्टपणे म्हटले. घटनादुरूस्ती ही हिंदुत्ववादी संघटनांनी पसरवलेली भूलथाप आहे असेही हा लेख म्हणतो. हा लेख मिलीगॅझेटमध्ये आला असल्यामुळे पूर्णपणे पूर्वग्रह नसलेला असेल असे वाटत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचा २००१ मधील निर्णय कुठे बघायला मिळाला (इंटरनेटवर) तर चांगले होईल. केंद्र किंवा राज्य सरकारने केलेला कोणताही कायदा घटनाविरोधी असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्दबादल करू शकते. तसे अधिकार न्यायालयाला आहेत. घटनेच्या ९व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले कायदे मात्र न्यायालयाच्या कक्षेबाहेर आहेत. २-३ वर्षांपूर्वी त्या परिशिष्टातील कायदेपण न्यायालयाच्या अधिकारकक्षेबाहेर नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असे वाचल्याचे आठवते. पहिल्या घटनादुरूस्तीद्वारे १९५१ साली हे नववे परिशिष्ट घटनेला जोडण्यात आले.त्यात जमिनदारीविरोधी कायद्यांचा समावेश होता. त्यानंतर १९९४ मध्ये तामिळनाडूत ५०% पेक्षा जास्त आरक्षण ठेवायचा कायदा नवव्या परिशिष्टात जोडण्यात आला. नवव्या परिशिष्टात कोणताही कायदा जोडायलाही घटनादुरूस्तीची गरज आहे. सरकार मनात येईल तो कायदा नवव्या परिशिष्टात घटनादुरूस्तीशिवाय टाकून मोकळे होऊ शकत नाही. कारण घटनेतला एक शब्द बदलायचा/ नवीन जोडायचा असेल तरी घटनादुरूस्ती करावी लागते असे वाटते. माझा स्वत:चा मुस्लिम धर्मांधतेला आणि धर्माच्या नावावर केलेल्या हिंसाचाराला प्रखर विरोध आहे हे ज्यांनी माझे मनोगतापासून मिपावरचे लिखाण वाचले आहे त्यांना तर नक्कीच माहित आहे. पण वस्तुनिष्ठ अभ्यास करताना सत्य परिस्थिती काय आहे हे बघणे महत्वाचे आहे हे तर नक्कीच.जर अशी घटनादुरूस्ती राजीव सरकारने केली नसेल तर वारंवार तसे का ठासून सांगितले जाते?
त्यांचे "सत्तेच्या दलालांवर" (हे त्यांचे शब्द आहेत) काहीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले.
यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. अनेक प्रसंगी त्यांचे नेतृत्व कमी पडले. मला स्वत:ला असे वाटते की राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा ते करू शकले नाहीत हे त्यामागचे कारण आहे.
मात्र वरील प्रतिसादात असे दिसते की असे केवळ भाजपनेच केले अथवा असे भाजपने करू नये.
मान्य. असा संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. माझ्या स्वत:च्या लिखाणात अलिकडच्या काळात भाजपवर जास्त टिका असते याचे एक कारण आहे. मागे म्हटल्याप्रमाणे एके काळी मी भाजपचा कट्टर समर्थक होतो. कधीकधी वाटते की माझे भाजप समर्थन अडवाणी आणि वाजपेयींपेक्षाही जास्त कट्टर होते. त्या पक्षाला मी आपले मानले होते. आणि त्यामुळेच त्यांनी केलेल्या अपेक्षाभंगाचे दु:ख जास्त होते.
वास्तवीक कायद्याप्रमाणे विचार केल्यास मंत्रीमंडळात "नेक्स्ट इन लाईन" असलेले (मला वाटते) प्रणवकुमार मुखर्जी अथवा नरसिंहराव हे हंगामी पंतप्रधान होयला हवे होते.
या बाबतीत राज्यघटना काहीच बोलत नाही. किंबहुना राज्यघटनेच्या दृष्टीने हंगामी पंतप्रधान नसतोच. तसा उल्लेख राज्यघटनेत नाही. तसेच काही कारणाने पंतप्रधानाची जागा रिकामी झाल्यास (राजीनामा, निधन) किंवा कधीही लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही व्यक्तीस पंतप्रधान होता येईल.त्यासाठी ती व्यक्ती ’नेक्स्ट इन लाईन’ असायला पाहिजे असे नाही. उद्या तात्या अभ्यंकरांना जर लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेल तर ते ही भारताचे पंतप्रधान बनू शकतात. पण बहुतांश वेळी अशी ’नेक्स्ट इन लाईन’ व्यक्तीच बहुमताचा पाठिंबा मिळवू शकते आणि पंतप्रधान बनू शकते. पण तसा नियम नाही. निकोलस न्यूजन्ट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रात असे वाचले आहे की इंदिराजींवर गोळ्या झाडल्या आणि त्या वाचायची शक्यता फारच कमी आहे हे कळताच राष्ट्रपती झैल सिंह येमेन दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीला यायला निघाले. ते विमानात असताना त्यांनी राजीव गांधींना पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे असे त्यांनी ठरविले. ते दिल्लीला परतल्यावर कॉंग्रेस संसदीय पक्षाचे राष्ट्रपतींना राजीव गांधींना नवा नेता नियुक्त केल्याचे पत्र कॉंग्रेस नेते जी.के. मूपनार यांनी त्यांना दिले आणि त्यानंतर राजीव गांधींचा शपथविधी झाला. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली होती का याची कल्पना नाही पण तशी ती झाली असे म्हणायला वाव नक्कीच आहे. समजा कॉंग्रेस संसदीय पक्षाने राजीव गांधींऐवजी प्रणव मुखर्जींना आपला नेता म्हणून निवडले असते तर राष्ट्रपतींवर प्रणव मुखर्जींना पंतप्रधान म्हणून शपथ द्यायचे बंधन होते का? तर तसे नाही. कारण पंतप्रधान म्हणून कोणाला नेमावे हा केवळ राष्ट्रपतींचा विशेषाधिकार असतो. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून ७व्या लोकसभेत (१९८०-८४) सभागृहाला सामोरे गेले असतील असे वाटत नाही कारण इंदिरा गांधींवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आठवड्यातच ८ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांची घोषणा झाली. अशा परिस्थितीत संसदेचे अधिवेशन झाले असायची शक्यता कमीच.तेव्हा राजीव गांधींकडे बहुमत नसते तर त्यांचा ७व्या लोकसभेत पराभव व्हायची शक्यता नव्हती. पण ८ व्या लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांपैकी बहुमताचा त्यांना पाठिंबा होता हे कसे नाकारता येईल?तो तसा नसता तर ते पंतप्रधान म्हणून ५ वर्षे टिकू कसे शकले?
मुखर्जी आणि राव यांना त्याकाळात हंगामी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल (राजकीय पॉवर वनवासाची) शिक्षा झाली होती असे आठवते.
राव यांना नाही तर प्रणव मुखर्जी १९८६ ते १९९२ या काळात कॉंग्रेसबाहेर होते. ज्या चार मंत्र्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी राजीव गांधींबरोबर शपथ घेतली त्यात नरसिंह रावांचा समावेश होता आणि त्यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. शीखविरोधी दंगलीदरम्यान अकार्यक्षमतेचा आरोप त्यांच्यावर होतो याचे कारण त्या काळात ते गृहमंत्री होते. प्रणव मुखर्जींना मात्र मंत्रीमंडळात स्थान नव्हते. विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

१२५ आणि घटना

विकास
Sat, 05/22/2010 - 18:04 नवीन
खालील उत्तर माझ्या मर्यादीत माहितीवर आणि थोडेफार इंटरनेट सर्च वर आधारीत. मर्यादीत याचा अर्थ - मी काही याचा अभ्यासक म्हणून अभ्यास केलेला नाही. तसा येथे कुणाचाही असल्यास अवश्य भर घालावी: शहाबानो खटला हा फौजदारी कायद्याच्या (क्रिमिनल प्रोसिजर कोड) १२५ कलमाखाली चालू होता. या कलमा अंतर्गत धर्माचा विचार न होता केवळ स्त्री इतकाच विचार होता. जो "सेक्यूलर इंडीयाचा" भाग होता/आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा या संदर्भाने होता. अगदी थोडक्यातः
Clause ( b ) of the Explanation to section 125 (1) of the Code, which defines "wife" as including a divorced wife, contains no words of limitation to justify the exclusion of Muslim women from its scope. Wife, means a wife as defined, irrespective of the religion professed by her or by her husband. Therefore, a divorced Muslim woman so long as she has not married, is a wife for the purpose of section 125.
अर्थात याचा संबंध हा कुठल्याही धर्माशी नसून व्यक्तिस्वातंत्र्य आणि हक्काशी, तेही स्त्रीयांच्या हक्काशी आहे, जे घटनेने सर्वांना समान दिले आहेत. सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा बर्‍याचदा "केस लॉ" ठरतो. अर्थात पुढील सर्वच निर्णयांवर कायदा नसतानाही कायदाच ठरतो. मुस्लीम समाजाला, किमान त्यातील काहींना त्यामुळे हे त्यांच्या धर्मावर केलेले आक्रमण वाटले. तसे वाटले ह्यावर कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. तसे वाटणे आणि त्या विरुद्ध बोलणे ह्याचे स्वातंत्र्य देखील घटनेने प्रत्येकाला दिले आहे. मात्र त्याला देशाच्या अधिकृत नेतृत्वाने कसे हाताळावे हा येथे मुद्दा आहे. राजीव सरकारने तिथेच गडबड केली. आणि Muslim Womens Act 1986 हा कायदा अस्तित्त्वात आणून मुस्लीम महीलेस असलेले इतर महीलांसारखे स्वातंत्र्य काढून टाकले. त्यामुळे हे जर शाब्दीक च्छल केला तर घटना दुरूस्ती नाही असे म्हणता येईल. पण केस लॉ हा जसा लॉ नसतो तरी असतो, तसेच या संदर्भात घटनेने दिलेले हक्क एखाद्या कायद्याने काढणे हे देखील घटनादुरूस्ती किमान घटनेला बायपास करणे असते असे म्हणता येईल. यात माझ्या लेखी आक्षेपार्ह काय घडले? जर कोणी आवाज उठवला तर आम्ही तो संसदेचा वापर करत, बायपास करू शकतो. (येथे मुसलमान असतील पण असे हिंदू अथवा अजून कोणी असले तरी घडता कामा नये). हा अत्यंत चुकीचा संदेश देशातील जनतेला मिळाला आणि आधीच होत असलेल्या लोकशाहीच्या थट्टेचे क्रूर थट्टेत झपाट्याने त्यांच्या आणि नंतरच्या काळात परीवर्तन घडले. आज पर्यंत ते सातत्याने होत आहे. पक्ष कुठलाही असूंदेत.... माझा स्वत:चा मुस्लिम धर्मांधतेला आणि धर्माच्या नावावर केलेल्या हिंसाचाराला प्रखर विरोध आहे येथे हा प्रश्न नाही, तसे जस्टीफिकेशन पण जरूरीचे नाही. माझा मुसलमानच काय, कुठल्याही धर्मांधतेला विरोधच आहे आणि मला माहीत आहे तुमचा देखील. पण एकदा का असे देशात धर्मांधता नको म्हणून ठरवले की अगदी राजकीय तडजोडीचे निर्णय घेताना पण कसे घ्यावेत ह्यातून नेतॄत्व ठरते. भाजपवर जास्त टिका असते याचे एक कारण आहे. मागे म्हटल्याप्रमाणे एके काळी मी भाजपचा कट्टर समर्थक होतो. हे समजू शकतो. हा प्रकार कोणीच सामान्य (राजकारणात नसलेल्या) माणसाने करू नये असे वाटते. माझ्या लिखाणावरून मी भाजपाचा म्हणणारे महाभाग पाहीले आहेत. पण भाजपाचे नेते पण असे म्हणणार नाहीत... :) असे जेंव्हा आपण होतो तेंव्हा भ्रमनिरास हा होतोच. भारतीय जनतेने असा भ्रमनिरास जनता पार्टीच्या सरकारच्या शेवटी पाहीला होता. नंतर उरला तो केवळ सिनिसिझम. तेच अनेक हिंदुत्ववाद्यांचे रालोआच्या काळात झाले. मात्र मी अनेक मोठ्या लोकांना भेटलो आहे, ज्यांच्या राजकीय पक्षांकडून कधीच अपेक्षा नव्हत्या - जरी वर्तमानपत्रे काही छापून आणत असली तरी. त्यांचे म्हणणे सिंपल - आपण समाजात काम करतो ते करत राहू या, कुठल्याच राजकारण्यांकडून काही घडेल याची अपेक्षा करू नका...मी अनेकांना निवडणूकांच्या वेळेस सांगायचो. की आलटून पालटून किमान दोन प्रमुख पक्षातील माणसांना निवडून द्या. त्यात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सगळेच आले. काही वर्षांनी त्यांना त्यांची राजनिती स्वतःचे जॉब्ज वाचवण्यासाठी तरी खर्‍या अर्थाने लोकाभिमुख आणि देशाभिमुख करावी लागेल. असो. तुर्तास आपल्या वरील प्रतिसादास इतकेच उत्तर. राव संदर्भात चूक मान्य. आठवणींचा गोंधळ झाला. मात्र, त्यांना जरी गॄहखाते दिले होते तरी नंतर नव्याने तयार केलेल्या मनुष्यबळ विकासाचे मंत्री करून त्यांची पदोन्नती केली असे देखील म्हणले गेले होते. त्यामुळे माझा गोंधळ झाला. धन्यवाद -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

बोफोर्स

प्रदीप
Sat, 05/22/2010 - 09:29 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण चर्चा, विशेषतः क्लिंटन व विकास ह्यांचे प्रतिसाद. राजीव गांधींचे नाव आले की हमखास बोफोर्सचा उल्लेख होतो. त्यात त्यांचा अथवा त्यांच्या निकटवर्तीयांचा हात किती होता, ह्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही. पण मला वाटते, असल्या आरोपांच्या संदर्भात एक पॅटर्न लक्षात घ्यावयास व्हावा. आपल्या सामाजिक जीवनास नोकरशाहीची जबरदस्त मगरमिठी आहे. राजकारण्यांचीही आहे आणी आपण त्यांच्यावर सदैव (रास्त) आगपाखड करत असतोच. पण राजकारणी निदान काही अंशी का होईना, जनतेस अकाऊंटेबल तरी आहेत. निवडणूकांतून त्यांचे उच्चाटन होऊ शकते. नोकरशहांचे तसे नाही. त्यांना अकाउंटेबलिटीच नाही. असल्या वातावरणात, त्यांच्यावर कसलेही सरळ अथवा आडून वार कुणी केले, की मग त्या व्यक्तिची खैर नसते. राजीवच्या बाबतीत हेच झाले. आता नक्की संदर्भ वगैरे नाहीत पण 'स्वछ, चारित्र्यवान' अशी त्याची प्रतिमा असतांना, काही नोकरशहांचे त्याने जाहीर अपमान केले होते. त्यानंतर बोफोर्स प्रकरण 'बाहेर' आले. जॉर्जचे तेच झाले. मला आठवते त्यानुसार लडाख/लेह ह्या अति उंच व दुर्गम टापूत कार्यरत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या बर्फावर चालणार्‍या गाड्यांची खरेदीविषयी नोकरशहांनी नेहमीप्रमाणेच घोळ घातलेला होता, कागद इथून तिथे जात होते. हे लक्षात आल्यावर जॉर्ज ह्यांनी काही संबंधित नोकरशहांना मुद्दाम त्या दुर्गम भागात पाठवले. त्यानंतर त्याच्यावर, कधी नव्हे ते व तसले, खाबूगिरीचे आरोप झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

नोकरशहा

श्रावण मोडक
Sat, 05/22/2010 - 10:59 नवीन
नोकरशहांबाबत प्रदीप यांनी लिहिलेल्या मुद्याशी सहमत. राजीव, जॉर्ज म्हणूनच नव्हे तर एरवीही अनेकदा असे घडले आहे. नोकरशहांना अकाऊंटेबल करण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यात अनेक चांगल्याही राजकारण्यांचा बळी जातो. येथे आणखी एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. अंतिमतः राजकारण्याकडे जे सत्तेचे पद असते त्या आधारे नोकरशहांना चाप बसवण्याचे काम आपल्याकडे पुरेशा हिंमतीने झालेले नाही. ते करण्याची जबाबदारीही राजकारण्यांचीच आहे. पण राजकारणी जाते-सूप हा न्याय ध्यानात घेतच नाहीत आणि व्यवस्था आहे अशी राहण्यास मदत होत जाते. अनेकदा होते असे की, 'प्रशासनावर मांड असलेला नेता' अशी ज्याची प्रतिमा असते तो नेता वास्तवात या नोकशाहीला हाताशी धरूनच अनेक नको ते उद्योग करत असतो. ही नोकरशाहीला आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी राजकारण्यांना टाळता येणार नाही. अरूण भाटिया हे एक उदाहरण दोन्ही बाजू टोकावर गेल्यावर काय घडते ते दाखवण्यासाठी पुरेसे बोलके आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

राजीव गांधी

समंजस
Sat, 05/22/2010 - 12:26 नवीन
राजीव गांधी यांना विनम्र आदरांजली!!!! (धागा आदरांजलीशी संबधीत असल्यामुळे, त्यांच्या गुणदोषांवर चर्चा करणे मला व्यक्तीशः बरं वाटत नाही. शिर्षस्थानी कोणताही नेता असू देत, सत्तेत राहण्याकरीता जातीय मतांचं राजकारण खेळणे हे कॉन्ग्रेस पक्षाचं वैशीष्टय आहे. मग ते जुनं शहाबानो प्रकरण असू देत की सध्याचं अफझलगुरू प्रकरण.)
  • Log in or register to post comments

विकास आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 05/22/2010 - 16:10 नवीन
विकास आणि क्लिंटन यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण साठवली आहे. अदिती
  • Log in or register to post comments

सर्व

तिमा
Sun, 05/23/2010 - 12:54 नवीन
सर्व प्रतिसाद वाचल्यावर त्यांचे दोन भाग पडतात असे वाटते. एक म्हणजे निपक्षपाती भूमिका नसल्याने गुडघ्यात मेंदु असल्यासारखे प्रतिसाद आणि क्लिंटनसाहेबांसारखे अभ्यासपूर्ण संतुलित प्रतिसाद. एखादा माणूस संपूर्णपणे चांगला वा वाईट असत नाही. तरी त्याचे मूल्यमापन योग्य रीतीने करता आले पाहिजे. मिपावर मला नेहेमीच काही विचारी मंडळी तर काही मॉब सायकॉलॉजी असलेली मंडळी दिसतात. असो, शेवटी ही लोकशाही आहे.
  • Log in or register to post comments

पुढील चर्चा

क्लिंटन
Wed, 05/26/2010 - 01:39 नवीन
नमस्कार मंडळी, मला या चर्चेचा TRP विनाकारण वाढवायचा नाही. तरीही हे लिहिणे गरजेचे वाटते. अनेकदा मी मिपावरील माझे लेख/प्रतिसाद माझ्या मराठी ब्लॉगवरही पोस्ट करतो. आणि माझा ब्लॉग ’मराठी ब्लॉगविश्व’ वर निगडीत केलेला असल्याने मला माझ्या ब्लॉगवरही काही प्रतिसाद येतात. राजीव गांधींवरच्या या लेखावरील प्रतिसादावर आणखी काही प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर आले. त्याची उत्तरे मी माझ्या ब्लॉगवरच एकूण तीन भागांमध्ये दिली आहेत. त्याचा दुवा राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिसादास माझे उत्तर -- भाग ३ आहे आणि त्यातच यापूर्वीच्या लेखांचाही दुवा दिला आहे. मूळ पोस्टवर आलेल्या प्रतिसादाला उत्तर भाग १ मध्ये, भाग १ वर आलेल्या प्रतिसादास उत्तर भाग २ मध्ये आणि भाग २ ला आलेल्या प्रतिसादाचे उत्तर भाग ३ मध्ये दिले आहे. ती चर्चा वाचायला काही मिपाकर तरी इच्छुक असतील असे वाटते म्हणून हा प्रतिसाद. --विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

आज २१ मे. २०११.

मृगनयनी
Sat, 05/21/2011 - 15:31 नवीन
आज २१ मे. २०११. :| राजीव'जींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! :| ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ Rajeev'jee.... Still Love You... Still Miss You..... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

राजीवजींच्या स्मृतीला विनम्र

अप्रतिम
Sat, 05/21/2011 - 17:45 नवीन
राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
  • Log in or register to post comments

अगदि टाईम्स नाऊ वर चाललेल्या

जयंत कुलकर्णी
Sat, 05/21/2011 - 18:57 नवीन
अगदि टाईम्स नाऊ वर चाललेल्या चर्चसारखे वाटले. म्हणजे कसे ती चर्चा कशी स्पेक्ट्रम राजाच्या भ्रष्टाचारावर चालू होते आणि भाजपमधे पण हेच चाललेले आहे यावर संपते. राजाच्या भ्रष्टाचाराचा स्पेक्ट्रम केव्हाच चर्चेआड होतो. सगळे एक नंबरचे राजकारणी. शेवटी वाईट गोष्टींच्या प्रमाणावरच चर्चा करावी अशी सुचना आहे. म्हणजे कसे --- तुमची इतकी वर्षे सत्ता, तुम्हाला एकूण एवढी मते, तुमचा एवढा भ्रष्टाचार...... आमची एवढी वर्षे सत्ता, आमची मते एवढी, आमचा भ्रष्टाचार एवढा..... आता बोला कोण चांगले आणि कोण वाईट.... :-) :-)
  • Log in or register to post comments

कालची आमटी आज उकळून(नवीन

आंबोळी
Sun, 05/22/2011 - 22:11 नवीन
कालची आमटी आज उकळून(नवीन फोडणीही न देता) वाढण्याच्या मृगनयनींजींच्या प्रयत्नांपुढे नतमस्तक आंबोळी
  • Log in or register to post comments

आम्बोळी'जी!... शिळ्या आमटातलं

मृगनयनी
Mon, 05/23/2011 - 17:53 नवीन
आम्बोळी'जी!... शिळ्या आमटातलं पाणी एक ग्रॅमने वाढवल्याबद्दल आभार!! राजीवजींची पुण्यतिथी सत्कारणी लागली म्हणायची!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

मसाले कमी पडत असतिल तर मागनी

नरेशकुमार
Mon, 05/23/2011 - 18:09 नवीन
मसाले कमी पडत असतिल तर मागनी करन्यात यावी. इथे वर्शानुवर्शे दळुन दळुन दळललेले मसाले मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

*~*~*~ राजीव'जींना सर्व

मृगनयनी
Mon, 05/21/2012 - 10:14 नवीन
*~*~*~ राजीव'जींना सर्व (सूज्ञ) मिसळपावीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धान्जली~*~*~* राजीव'जी.... आज इतक्या वर्षांनन्तरही.. तुमचा तो हसरा, उमदा, आश्वासक चेहरा आठवत राहतो..... तुमची बोफोर्स'सारखी इतरही काही प्रकरणे सर्वज्ञात असूनही का कुणास ठाऊक.. पण तुमच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटत आलेला आहे... तुमच्यासारखा "पन्तप्रधान" होणे आता कधीच शक्य नाही..... LOVE YOU... MISS YOU.... RAJEEV'JI ... :| अवान्तर :- राजीव'जी तुमच्या थोडेफार सद् गुण आणि कर्तव्यनिष्ठा (आणि अक्कलही) तुमच्या मातृमुखी मुलामध्ये असती.. तर कदाचित देशाचे कल्याण झाले असते...
  • Log in or register to post comments

नाठाळाला श्रद्धांजली नाही.

राजघराणं
Mon, 05/21/2012 - 18:36 नवीन
.
  • Log in or register to post comments

भारतीय राजकारणात फक्त आणि

मृगनयनी
Mon, 05/21/2012 - 18:57 नवीन
:( :( :( भारतीय राजकारणात फक्त आणि फक्त '"नाठाळ" लोकच लागतात! नाहीतर तर मग त्यांची "घर का ना घाट का.. सिर्फ आण्णा के मोर्चे का" अशी अवस्था होते. राजीव'जी खानदानी राजकारणी होते. अर्थात ते त्यांच्या आईइतकेही पार पोचलेले वगैरे नव्हते!!! तुलनेने कमी नाठाळ होते. अर्थात एक गोष्ट मात्र खरी, की त्यांच्या बद्दल तमाम भारतीयांना जो विश्वास आणि आदर वाटायचा.. तो आत्तापर्यन्त कुठल्याही पन्तप्रधानाबद्दल वाटलेला नाही ( अंशतः अपवाद- अटलबिहारी वाजपेयी) कम्प्युटर प्रणाली फक्त राजीव'जींमुळे इन्डियात आली... (याचा ऑलरेडी वर सविस्तर उल्लेख आहे..) तसेच त्यांचे व्यक्तिमत्वही पन्तप्रधानपदास सुसह्य, योग्य होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला.. त्याबद्दल जास्त हळहळ वाटते... उलट सध्याचे काही (तोन्ड वाकडे असणारे) राजकारणी पाहिले, की राजीव'जींच्या ऐवजी ह्या लोकांच्या बाबतीत का असे झाले नाही.. असा सहजविचार मनात डोकावतो!.. (पक्षी: नाठाळपणा आणि निर्लज्जपणा इतका या लोकांमध्ये ठासून भरला आहे...राजीवजींपेक्षा कैक पटीने जास्त!!... त्यामुळे....)
  • Log in or register to post comments

राजीव.....जीं

विजय_आंग्रे
Mon, 05/21/2012 - 19:11 नवीन
हा(जी), हा(जी), करायची सवय काँग्रेजवाल्यांना कदाचीत मो.क. गांधी नंतर आलेल्या आणि त्यांचेच आडनाव घेतलेल्या या इतर गांधी आडनावाच्या बाटग्यानी लावली. मॅडमजी, राहुलजी,
  • Log in or register to post comments

(No subject)

अविनाशकुलकर्णी
Mon, 05/21/2012 - 22:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पगडीधारी कोण?

क्लिंटन
Mon, 05/21/2012 - 22:31 नवीन
कुलकर्णीकाका, या फोटोतला पगडीधारी कोण? बियंत सिंह हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या बलवंत सिंह राजौनाच्या चेहऱ्यात आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यात बरेच साम्य दिसत आहे. जरा हा फोटो बघून सांगता का? तशीच मिशी, तशीच दुभंगलेली दाढी!! तुम्ही दिलेल्या फोटोतली व्यक्ती नक्की कोण? बलवंत सिंह राजौना तर नव्हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

अविनाश'जी... वरच्या फोटोतल्या

मृगनयनी
Mon, 05/21/2012 - 22:49 नवीन
अविनाश'जी... वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!! पण या सगळ्यांमध्ये एक साम्य म्हणजे हे सगळे लोक "अविवाहित" आहेत. ;) अटल'जी, कलाम'जी, अण्णा हजारे (आय थिन्क न. मोदी पण)..... ह्या सगळ्यांना लग्न म्हणजे काय हे माहित नाही.. यांना मुलंबाळं नाहीत... त्यामुळे मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी यांना काहीही करायचे नाही. त्यामुळे थोड्याफार नि:स्वार्थीपणे हे सगळे अविवाहित लोक देशासाठी वेळ देऊ शकतात. ;) परन्तु गान्धी घराण्याचे मात्र असे नाही. त्या घराण्यातल्या "वरूण गान्धी" पर्यन्तच्या सगळ्या पिढ्यांचे लग्न झालेले आहे. मातृमुखी आल्पशिक्षित राहुल गान्धी पण अफगाणिस्तानाचे अघोषित जावई आहेत. ते जाऊदेत... पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही. तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला. आणि तसेही गांधी घराणेशाहीविरुद्ध ओरडणार्‍या आणि मुलंबाळं असणार्‍या राजकारण्यांनीही शेवटी आपल्याच मुलाला-नातवाला राजकीय वारसदार बनवले आहे.. अगदी मुलापेक्षा कितीतरी पटीने उजव्या असलेल्या पुतण्याला डावलले गेले... (पक्षी: बाळ, उद्धव, आदित्य, राज ठाकरे...) आता बाय चान्स कधी कुणाला महानगरपालिका चालवायला मिळते.. तर कुणाला देश!!!... शेवटी दोन्ही ठिकाणी निवडून आपणच देतो ना!.. इथे राजकारणात घुतल्या तान्दळासारखे कुणीच्च नसते..त्यामुळे फक्त गान्धी घराणे तेवढे वाईट.. आणि बाकीचे सगळे चान्गले... असे म्हणणे चुकीचे ठरते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

<<<पण आपल्या पुढच्या पिढीच्या

शिल्पा ब
Mon, 05/21/2012 - 23:49 नवीन
<<<पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही. तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला. किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

किती हजार कोटी म्हणजे उचीत

मृगनयनी
Tue, 05/22/2012 - 15:05 नवीन
किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !
हेहेहे.... कितीही कोटी मिळाले... तरी कमीच्च असतात.. जोपर्यन्त इन्कम्टॅक्स आणि सीबीआय वाले यांची मालमत्ता अधिकृत घोषित करून न भरलेल्या टॅक्सवरती कार्यवाही करत नाहीत.. तोपर्यन्त सगळं उचितच समजायचं!!! .. तरी बरं.. गान्धी घराणेवाले स्वतःकडे आणि स्वतःच्या नावावर बर्‍यापैकी सम्पत्ती असल्याचे जाहीर तरी करतात. नाही तर अजित पवार!... त्यांचा मुलगा म्हणे पुण्यात शिकयला आहे.. तो लॅन्ड माफिया अविनाश भोसले (सन & सॅन्डवाला) च्या एका आलिशान बन्गल्यात भाडेतत्वावर राहतो.. त्या बन्गल्याचे डिपॉझिट आहे १ कोटी रुपये.. आणि मन्थली भाडे आहे.. ५ कोटी!... अर्थात तशी स्टॅम्पपेपरवर आणि इतर कागदोपत्री नोन्द आहे म्हणे!!!!... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

महारथी??

क्लिंटन
Tue, 05/22/2012 - 09:21 नवीन
वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!!
मृगनयनीजी तुमच्या प्रतिसादातील एका वाक्याला हा उपप्रतिसाद असला तरी तो तुम्हाला किंवा कोणाही एकाला उद्देशून नाही. तुम्ही राजीव गांधींच्या फ्यान आहात याची कल्पना आहे. (गांधी घराण्यातील इतर व्यक्तिंविषयीची तुमची मते माहित नाहीत). वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कुलकर्णी काकांनी दिलेल्या फोटोतील पगडीधारी व्यक्ती दहशतवादी बलवंत सिंह राजौना आहे असे मला वाटते.हे चुकीचे असल्यास बरोबर माहिती द्यावी ही विनंती. गांधी घराण्यातील व्यक्तींची (किंवा कोणाचीही) आंधळी भक्ती नको हे अगदी मान्य.पण त्याचबरोबर आंधळा द्वेषही नको ना? गांधी घराण्यातील व्यक्तिंचा इतका आंधळा द्वेष करावा की एखादा दहशतवादी पण नि:संशय आदर देण्यायोग्य महारथी वाटावा हे कितपत योग्य आहे?आणि अशा मनुष्याचा फोटो कलामसाहेब, वाजपेयी, अण्णा हजारेंच्या फोटोबरोबर देऊन तो फोटो प्रसिध्द केलेल्याला नक्की काय म्हणायचे आहे कोणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

क्लिन्टन'जी.. तो फोटोतला

मृगनयनी
Tue, 05/22/2012 - 15:11 नवीन
क्लिन्टन'जी.. तो फोटोतला दाढीवाला सरदार "बलवन्तसिन्ग" आहे.. हे मला माहित नव्हते... असो..त्याचा फोटो इतर महारथींबरोबर नको होता.... या विधानाशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आवरा!

दादा कोंडके
Mon, 05/21/2012 - 23:54 नवीन
ह्या पुरुषमंडळी बरोबरच जयललीथा :), मायावती वगैरेंचे देखील फोटू द्यायचे की हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

भावपूर्ण श्रद्धान्जली

अप्रतिम
Mon, 05/21/2012 - 22:37 नवीन
भावपूर्ण श्रद्धान्जली
  • Log in or register to post comments

?

विकास
Mon, 05/21/2012 - 23:59 नवीन
भावपूर्ण श्रद्धान्जली हे ही दिवस जातील. म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का? अर्थ कळला नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

असेच म्हणायचे असेल

कवटी
Tue, 05/22/2012 - 09:37 नवीन
म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का? मला वाटतय त्याना असेच म्हणायचय.... णैणी'तै दर मे महिन्यात हा धागा वर आणतात... लोक पण ' आलाच आहे शिमगा तर बोंबलून घेउ' असे म्हणून उलट सुलट प्रतिसाद देतात... विकास'भौंना हेच दिवस बहुतेक घालवायचे असतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

२१ बोफोर्स तोफान्ची सलामी

अविनाशकुलकर्णी
Tue, 05/22/2012 - 14:44 नवीन
२१ बोफोर्स तोफान्ची सलामी
  • Log in or register to post comments

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~.

मृगनयनी
Tue, 05/21/2013 - 19:18 नवीन
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~..राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली..~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

ठ्ठो =)) =)) =))

बॅटमॅन
गुरुवार, 05/21/2015 - 17:38 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) (प्रतिक्रिया आणि आवाज दोन्हींसाठी लागू आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

शिसार्‍या

arunjoshi123
Fri, 09/06/2013 - 15:35 नवीन
मला भारतीय असल्याची भारतीय लोकांच्या वर्तनाने बर्‍याचदा भयंकर शिसारी आली आहे. त्यातील राजीव गांधीच्या निगडीत आठवणी अशा - १. 'जब तक सुरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा' या गाण्याची प्रसिद्धी. ( हे १९८४ मधे निवडणूक गीत होते. प्रचारासाठी हे गाणे चालू होताच गावातल्या बायका कशा रडायला चालू करायच्या ...) २. युद्धानंतर चर्चिलची गरज नाही म्हणून त्याला पाडणारा युके आणि सहानुभूतीच्या लाटेत राजीवला मिळालेले अशक्यप्राय बहुमत यांची वृत्तपत्रांत चर्चा. ३. दैनिक लोकमतच्या 'देशाला ..... च्या मजबूतीची गरज - पंतप्रधान' टाइपच्या १९८४ ते १९८९ पर्यंतच्या बातम्या. (प्रकार अति झाल्यामुळे शिसारी, तसा मुळात यात वाईट काही नाही.) ४. राम जेठमलानी संसदेत राजीव गांधीला रोज १० प्रश्न विचारत. राजीवचे सबब विषयांतले ज्ञान आणि नाठाळपणा. ५. श्रीलंकेत साध्या सैनिकाने त्यांच्या डोक्यावर रायफल आपटली. कपाळमोक्ष झाला असता, बिचारे कसेबसे वाचले. (तसे राष्ट्रपतींची डबल झडती घेतली जाणे, ट्रॉफी देणार्‍या कॄषिमंत्र्यांना आमच्याच भारतात विदेशी कॅप्टनकडून धक्का देऊन लोटले जाणे, इ घटनांमुळे सबब जाणीव बोथट पडली आहे.) ६. न्यायसंस्थेच्या अवमानाचा पायंडा. शाहबानो प्रकरणानंतर 'न्यायालय' नावाच्या प्रकरणाच्या इज्जतीची दुरावस्था. ७. राजीव क्यूट आहे म्हणून त्याला मत देणार्‍या कॉलेजकुमारी ८. समाजवादाचे खानदानी प्रेम ९. अर्थव्यवस्थेला १९९१ कडे लोटणे. यातून तर हा बाबा नामानिराळा सुटला आहे.
  • Log in or register to post comments

*~*~*~* राजीव'जी... आपल्या

मृगनयनी
Wed, 05/21/2014 - 10:42 नवीन
*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* ......... खरंतर खेदाने म्हणावे लागतेय.. की बरे झाले.. आज आपण नाही आहात!!!! आपल्या सुपुत्राची व पक्षाची एकंदर कार्यक्षमता लक्षात घेता, संपूर्ण देशवासीयांनी "काँग्रेस आय"ला नाकारले आहे. अर्थात आज आपण असता तर कदाचित परिस्थिती बरीच वेगळी असती. आपले ज्ञान व खानदानी राजनीती आपल्या मुलामध्ये- चि. राहुलमध्ये, उतरू शकली नाही... हे दुर्दैव!!!! निवडणुका जवळ आल्या, की लोकांना आपला "आजीसारखा" चेहरा दाखवून, जास्त न बोलता शहाण्या राहणार्‍या सौ. प्रियांका वद्रा'ही फारसा प्रभाव पाडू शकल्या नाही. प्रत्येक वेळी "इंदिरा गांधी"ची स्टाईल मारून चालत नाही... तेवढे कर्तृत्व व गुणही अंगी असावे लागतात... हे कळायला बराच उशीर झाला. आपल्या पत्नी- श्रीमती सोनिया'जींनी रडत खडत का होईना... काही वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. पण त्यात देशप्रेमाचा, नाविन्याचा, प्रॉडक्टीव्हिटीचा, पॉझिटीव्ह स्ट्रॅटेजीचा अभाव असल्यामुळे आणि त्यांचे आता वयही बर्‍यापैकी झाल्याने .... लोकांना काँग्रेस'चा कंटाळा आला. तुलनेने भारताचे भावी पंतप्रधान- "श्री. नरेन्द्र मोदी" हे प्रॅक्टीकल व रिलायबल आहेत. त्यांचे "इरादे" पक्के आहेत. मुख्य म्हणजे काँग्रेस'वाल्यांसारखी हवेतल्या फुग्यांसारखी स्वप्ने तरी त्यांनी (अजूनपर्यन्त) दाखवलेली नाहीत. आणि संघाचे उर्फ हाफचड्डीवाल्यांचे सुसंस्कार त्यांच्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने भाजपा'ला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. राजीव'जी... कदाचित तुम्ही जिथून कुठून आपल्या भारतदेशाकडे पाहत असाल.. तर इथली एकंदर परिस्थिती.. तुम्हालाही कळत असेल... किमान देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी "कॉग्रेस" पेक्षा "भाजपा" कितीतरी पटीने चांगला आहे!!!!!! कदाचित तुम्हीदेखील म्हणत असाल...- "अब की बार मोदी सरकार!!!! *~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा