Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सुहास..
Submitted by सुहास.. on Tue, 03/22/2011 - 16:09
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
डिसक्लेमर : १) सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत. २) कुठल्याही व्यक्तीच्या मृत्युचा तमाशा करण्याचा हेतु नाही. पुण्यात, कोणे एके काळी, ज्या भागाला संध्याकाळ च्या वेळेला , सामान्य माणसे टाळत असायचे, तो भाग म्हणजे येरवडा, याच येरवड्याचा शेवटचा कोपरा म्हणजे येरवडा जेलच्या भिंतीला लागुन असलेली पत्र्यांची पाच-एकशे घरे असलेली वसाहत. आधी आनंदनगर आणि नंतर त्याचे नामकरण नागपुरचाळ असे झाले. नागपुरचाळीत, किमान सतरा-अठरा तरी ' बाळ्या ' असतील, त्यामुळे प्रत्येक बाळ्या च्या नावाला आपोआपच आडनाव जोडलं जायच. तसचं या आख्ख्या झोपडपट्टीत, अल्पावधीत, एक प्रसिध्दी पावलेले कॅरक्टर म्हणजे लातुर-बाळ्या. अर्थात लातुर हे काही त्याच आडनाव नव्हत. लातुरच्या भुकंपानंतर अशीच काही वाचलेली मंडळी (जी तिथे असतानाच गरीब होती.) तिथुन निघुन आली त्यातलाच बाळ्या एक. कमी वयात भुकंपामुळे बसलेला मानसिक धक्का, अंगावर कुटंबातील सात माणसांच्या मृत्युच दुख: , भुकंपातून वाचलेल्या धाकट्या बहिणीची जबाबदारी, आणि परक्या प्रदेशात आल्यावर येणार्‍या अडचणी या मुळे बाळ्या जरा विक्षिप्ता सारखाच वागत असे. पण त्याला सगळ्या परिस्थितीतही मोठा आधार वाटत असे तो रोशनकाकांचा. रोशन ! कोणे एके-काळचा दादर स्टेशनचा सर्वात स्किल्ड पाकिटमार ! पण चोर पोलीसाच्या दोन पावले पुढे असला तरी एखाद्या दिवशी पकडला जातो असे म्हणतात. त्याच प्रकारे हा ही पकडल्या गेला आणि बदली येरवड्याच्या जेलमध्ये झाली. चार वर्षाची शिक्षा भोगुन , मोकळ आकाश आणि तंबाखुची तल्लफ घालवायला नागपुरचाळीत (तेव्हाचे आनंदनगर) आला आणि इथलाच झाला . जेलमधल्या कमाईवर चहाच दुकान टाकल आणि कर्मधर्म संयोगाने कोणी ही नातेवाईक नसलेल्या रोशनचा आख्ख्या नागपुरचाळीने 'रोशनकाका' केला. त्या चहाच्या दुकानाच नंतर किराणा मार्केट झाल. याच किराणा-मार्केट च्या बाहेर ते दोन लहान जीव, जवळ-जवळ भीक मागायच्या परिस्थितीत रोशनकाकांना दिसले तेव्हा त्यांना त्यांच्यांत उतारवयाचा आधार दिसला आणि बाळ्याचा ' लातुर-बाळ्या' झाला. बाळ्यानेही नंतर बहिणीला शिकवायचा वसा घेतला. आमच्या इथल्या पेपरवाल्याला आलेल्या अकाली अधुत्वामुळे, पेपरवाल्याची पेपरची आणि जोडीला दुधाची लाईन बाळ्याच्या हातात पडली. मेहनत करुन त्याने त्या धंद्याला अजुन बळकट केले आणि वर्ष दोन वर्षातच बाळ्या कमवायला लागला. रहायला रोशनकाकांच घर, बहिणी करिता नेताजी शाळा आणि धंद्या करिता दुधाची - पेपरची लाईन, इतक्या जिवावर एकुणच, बाळ्या वयाच्या १५ व्या वर्षीच सेटल झाला. सौ. सुलक्षणा बाळाराम धिवार हे कुरूप व्यक्तीमत्व दोन कारणांनी संपुर्ण नागपुरचाळीला ठावुक होते, एक म्हणजे ती अंगणवाडीची शिक्षीका 'सुलाताई' होती ,दुसर कारण म्हणजे ताईची आणि तिच्या सासुची दररोज ची खडाजंगी !! पहिल्या गल्लीतील्या डाव्या कोपर्‍यातुन, संध्याकाळी सातच्या सुमारास, बायकांचा भांडणाचा आवाज वाढायला लागला की लहान पोर-सोर देखील समजुन जायची की आजही रात्री नवाच्या सुमारापर्यंत कान पवित्र होणार. भांडणाच मुळ कारण होतं की सुलाताईचा नवरा , एक वर्षाच पोरं तिच्या पदरात टाकुन, दुसरीबरोबर पळुन गेला होता. त्यानंतर सासुचा संभाळ करुन ही सासु समाधानी नव्हती आणि एक दिवस सुलाताईंच्या सहनशक्ती चा बांध फुटला... बाळ्या नेहमी प्रमाणे संध्याकाळी ' बिल वसुली ' करुन परतला. तसा हा दररोजचा प्रोग्राम ! एकदा घरी आला की घराच्या मागच्या बाजुला असलेल्या लोखंडी ड्र्म मधुन पाणी घेवुन हात पाय धुवायचे, चहा घ्यायचा आणी रोशनकाकांच्या राशन दुकानात पडेल ती मदत करायची. पण त्या दिवशी जेव्हा तो ड्र्म पर्यंत जायला निघाला तेव्हा त्याला एक जोरदार किंकाळी ऐकु आली. धावत जाऊन पाहिल तर एक पाच फुटाचा जळता देह त्याचा अंगावर धावुन आल्यासारखा आला. त्याच्या पर्यंत पोहोचायचा आधीच तो देह कोसळला . बाळ्या चा हात ड्र्म पर्यंत जाईपर्यंत पर्यंत त्या देहाचा कोळसा झाला होता. भेदरलेला बाळ्या पळत जाउन सुलाताईच्या घरात बघतो तो तिथे दिड वर्षाच पोर केव्हाच जळुन खाक झाल होतं. सासु थरथरत एका कोपर्‍यात उभी होती. बाळ्या तेथेच बेहोश होवुन पडला. दोन तासाने जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो इस्पितळात होता.पण डोके मात्र प्रचंड जड झाले होते. समोर उभे असलेले रोशनकाका धुसर दिसले आणि पुन्हा बाळ्या निद्रिस्त झाला.त्याचे दोन दिवस त्याच अवस्थेत गेले. दोन दिवसांनी जेव्हा त्याला नीटपणे जाग आली तेव्हा तो बाळ्यासारखाच नव्हता च मुळी . त्याने रोशनकाकांना, बहिणीला, इतर सर्वांना ओळखले. पण सगळी गफलत !! रोशन काकांना डॉक्टर, बहिणीला रोशन काका, डॉक्टर ला नर्स आणि असे सर्वच घोटाळे !! त्यात बोलता-बोलता अचानक " हे sssss !! जळाली !! जळाली !! जsssssळाली !! " असे म्हणायचा. डोळे विचीत्रपणे फिरवायचा. डॉक्टरांनी चार-पाच दिवस वाट पाहिली आणि शेवटी त्याची मनोरुग्णालयात रवानगी झाली. क्रमश......
  • Log in or register to post comments
  • 14802 views
  • Once Upon A Time In Yerwada !! - २
  • Once Upon A Time In Yerwada - 3
  • Once Upon A Time In Yerwada - अंतिम

Book traversal links for Once Upon A Time In Yerwada !! - १

  • Once Upon A Time In Yerwada !! - २ ›

प्रतिक्रिया

Submitted by VINODBANKHELE on Tue, 03/22/2011 - 16:15

Permalink

सुन्न्न्न्न्न्न्न

काय लिहु? सुन्न्न्न्न्न्न्न
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 03/22/2011 - 16:17

Permalink

......

......
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 03/22/2011 - 16:17

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 03/22/2011 - 16:18

Permalink

काटा आला रे शेवटी.

:( काटा आला रे शेवटी.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 03/22/2011 - 16:19

Permalink

बापरे........

बापरे........
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 03/22/2011 - 16:19

Permalink

जाळ

जाळ आहे. धग लागली... वाचतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Tue, 03/22/2011 - 16:21

Permalink

खरच सुन्न :-(

खरच सुन्न :-( वाचवतं नाही. कोणी थांबवू शकेल का हे सगळं :( [I mean अशा घटना घडणं]
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 03/22/2011 - 16:23

Permalink

याच एरियात पूर्वी

याच एरियात पूर्वी राहिल्यामुळे अगदी खर्‍या बॅकग्राउंडसकट उभं राहिलं डोळ्यासमोर वाचताना. नागपूर चाळ भागात रहायला भाड्याच्या खोल्या शोधल्याचे दिवस आठवले. काटा आणणारं लिखाण. वाचतोय, वाट पाहातो.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Tue, 03/22/2011 - 16:23

Permalink

सुन्न

सुन्न.....!! वाचतेय!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 03/22/2011 - 16:29

Permalink

आयला मस्त कादंबरी हातात पडली

आयला मस्त कादंबरी हातात पडली , त्यात सुहासने ती लिहायची मनावर घेतली , आणि पहिल्याच भागात तुफान पकड .. काय खरा नाय ब्वाबा.... सुहाश्या मोठे मोठे भाग टाकत जा.... आणि परासारखी "भन्नाट" शेंडी लावू नका म्हणजे मिळवली
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 03/22/2011 - 16:33

Permalink

घरगुती भांडणाचा शेवट इतका

घरगुती भांडणाचा शेवट इतका भयंकर ? सुलाताई आणि तिच्या लहानग्याचा अंत खरच करुणास्पद . पुढचा भाग वाचायचा आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Tue, 03/22/2011 - 16:44

Permalink

.....

.......
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 03/22/2011 - 16:53

Permalink

शहारा आणणारे लिखान .. क्रमशः

शहारा आणणारे लिखान .. क्रमशः म्हणजे आजुन काय असे होउन राहिले आहे भाऊ. बाकी येरवडा भागातील हा परिचीत भाग असल्याने आनखिनच चित्र डोळ्यासमोर तरळुन गेली ते वेगळेच ..
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 03/22/2011 - 17:12

Permalink

वाचतोय...

पुढचा भाग येउद्यात. आपलाच मनोबा.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 03/22/2011 - 17:14

Permalink

...

... :(
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 03/22/2011 - 17:35

Permalink

सुहास धन्यवाद.

पुनरागमनायच , स्वागत पुन्हा एकदा आणि धन्यवाद लिहितं झाल्याबद्दल. अतिशय छान सुरुवात झाली आहे, अशा घटना मनावर आणि मेंदुवर फार भयानक परिणाम करुन जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 03/22/2011 - 17:43

Permalink

:(

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत on Tue, 03/22/2011 - 17:44

Permalink

<>><><><><<>

<.><.><.><.><.><<.>
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड अमिता on Tue, 03/22/2011 - 17:46

Permalink

बाप रे...

.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Tue, 03/22/2011 - 18:07

Permalink

अवघड आहे...

बाळ्याच्या मनोविश्वाचे काय झाले असेल? जळुन मृत्यु वगैरे बोलायला, ऐकायला, वाचायला, फारसे काही वाटत नाही पण मृत्युच्या सर्वात भयानक रुपांपैकी एक ते असते. मी मी म्हणणारे पोलिस, रेस्क्यु वर्कर्स, अगदी डेड हाऊसमधले कर्मचारीपण जळालेल्या, बुडालेल्या बॉड्या पहायला कचरतात. अन इथे तर बाळ्याने आख्खी जिवंत बाई धडाधड पेटुन मरताना पाहिली. अन कहर म्हणजे ती बाई एकटी नाही जळाली, बरोबर तिचं बाळ पण! दुष्मनावर पण असं काही पहायची वेळ येऊ नये. अन एव्हढं सगळं पहाण्यावरच बाळ्याच्या नशीबाचे भोग नक्कीच संपलेले नसणार. मेंटलला गेला म्हणजे उरला सुरला माणुस संपणारच. मेंटल अन जेल, दोन्हीमधे एक साम्य असतं. तिथं पाऊल टाकता क्षणीच माणसाचं आयुष्य संपतं. उरतं ते फक्त त्याचं सजीव प्रेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 03/22/2011 - 23:09

In reply to अवघड आहे... by प्रसन्न केसकर

Permalink

असेच म्हणेन

असेच म्हणेन
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 03/22/2011 - 18:42

Permalink

सुरवात चांगली आहे . कांदबरी

सुरवात चांगली आहे . कांदबरी दीर्घ असू दे . पु ले शु
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 03/22/2011 - 18:46

Permalink

त्याची काय अवस्था होणार काय

त्याची काय अवस्था होणार काय म्हैत? पु. भा. टा. त. वा. ना. :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 03/22/2011 - 19:05

Permalink

पूर्ण

पूर्ण झाल्यावर प्रतिसाद. नीट लिही. बैठक मार. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Tue, 03/22/2011 - 22:52

Permalink

हे कदाचित असच चालायचं. असाच

हे कदाचित असच चालायचं. असाच एक प्रकार आठवला. अ‍ॅक्सीडंट नंतर नवरा स्वतःच्या बायकोला मोठी बहीण समजुन वागत होता कित्येक वर्ष. मग शेवटी त्याने गळफास घेतला वेडाच्या भरात. बिचार्‍या मुलीचं काय? वय २८ वर्षे. काय करावं अशा पोरीनं? घटना घडत असतात, नेहमीच.. आपणही लोकांपेक्षा वेगळे नाही अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा क्षणभरासाठी थरकाप उडतो. पण आयुष्य असंच चालतं कदचित.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Tue, 03/22/2011 - 23:37

Permalink

नि:शब्द .............

नि:शब्द .............
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 03/22/2011 - 23:44

Permalink

...

...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 03/23/2011 - 00:02

Permalink

बापरे..! पुढे काय झालं??

बापरे..! पुढे काय झालं??
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 03/23/2011 - 01:03

Permalink

ह्म्म

ह्म्म. काही कटु आठवणी जाग्या झाल्या. लिहलं आहेस खतरनाक, गोष्ट नक्की पुर्ण कर.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Wed, 03/23/2011 - 01:13

Permalink

अरे बापरे , भीती वाटतेय

अरे बापरे , भीती वाटतेय वाचतानासुद्धा...
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 03/23/2011 - 01:33

Permalink

पूर्ण कर रे लवकर.

पूर्ण कर रे लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by निकिता_निल on Wed, 03/23/2011 - 05:21

Permalink

बापरे. भंयकर घटना आहे. पुढे

बापरे. भंयकर घटना आहे. पुढे काय होते?
  • Log in or register to post comments

Submitted by नारयन लेले on Wed, 03/23/2011 - 11:11

Permalink

लिखाण चा॑गले वाटले

रोज सकाळी वर्तमान पत्र हातात पड्ले की आशाच बातम्या वाचण्यात येतात. हे आसेच चालणार. विनित
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 03/23/2011 - 11:20

Permalink

सुहास लिहिते झाल्या बद्दल

सुहास लिहिते झाल्या बद्दल धन्स!! पण वाचवत नाही आहे. बहिण आहे ना त्याला? तीच काय?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 03/23/2011 - 12:12

Permalink

वाचतोय ...

जास्त क्रमशः नसावे आणि अशीच बैठक जमावी हीच अपेक्षा. वाचतो आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 03/23/2011 - 13:59

Permalink

काटा...

खुप खतरा लिहीतोयस भाऊ... सुन्न झालोय. पु भा प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by RUPALI POYEKAR on Wed, 03/23/2011 - 14:35

Permalink

जबरदस्त

पु भा प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Wed, 03/23/2011 - 15:49

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मि दाते on Wed, 03/23/2011 - 22:57

Permalink

बापरे,पुढचा भाग लवकर टाक

बापरे,पुढचा भाग लवकर टाक
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 03/23/2011 - 23:15

Permalink

गुड!

चांगलं उतरतंय चित्रण! अजून येऊ दे...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 03/25/2011 - 16:31

Permalink

भयानक. पुढे काय झालं हे

भयानक. पुढे काय झालं हे वाचण्याची उत्सुकता. दुर्दैव त्याला नुसतंच इस्पितळात पाठवून थांबलं नसेल. (बाकीचांनी लॉ ऑफ रँडमनेस वर लेख लिहीत बसावे वेळ जात नसेल तेव्हा ) *
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Sat, 03/26/2011 - 14:33

Permalink

(No subject)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Wed, 03/30/2011 - 16:27

Permalink

खतरनाक....मी अजुन त्या

खतरनाक....मी अजुन त्या धक्क्यातून बाहेर नाही आलो.. एक तर तो बिचारा आधिच भूकंपाच्या धक्क्यतून सावरायचा प्रयत्न करतोय, आणि हे काय लिहुन ठेवलय त्याच्या नशिबात ??? काय होईल पुढे ??? आणि त्याच्या बहिणीच काय होणार ???? पुढच्या भागाची वाट बघतोय...
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 03/30/2011 - 16:58

Permalink

लवकर पुर्ण कर

लवकर पुर्ण कर
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 03/31/2011 - 01:26

Permalink

पुढच्या भागाची वाट पाहात

पुढच्या भागाची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 03/31/2011 - 09:23

Permalink

पु भा प्र. सुन्न -प्यारे.

पु भा प्र. सुन्न -प्यारे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com