नवे धडे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Mar 2011 - 2:02 pm

शासनाने शिक्षणाला स्कीलबेस्ड करायचा विचार चालू केला आहे.
त्या नुसार अभ्यासक्रम येतील धडे येतील
नव्या धोरणानुसार इयत्ता पहीलीच्या भाषा शिक्षणाच्या पुस्तकातील काही धडे.

धडा पहीला.
उद्देश : विद्यार्थ्याना "अ " कार आणि "आ"कार याची समज यावी.
रमण भरभर चल
अकबर लवकर चल
अकबर ,रमण , कमल लवकर ,भरभर चला
मायकल हात धर.
बबन चखणा आण
रमण ताट आण
राजर पाव गरम कर
पाव एकदम कडक कर
अकमल फडका मार
फडका एकदम साफ मार.
कमल चखणा ताटात टाक.
करतार चखणा ताटातच खा.
अकबर गलास आण
शबनम गलास भर
रमण नवटाक मार .
रमण वमन कर.

शिक्षकांसाठी सूचना : शिक्षण हे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचावे तसेच शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्याला रोजच्या आयूष्यात व्हावा यासाठी स्कीलबेस्ड शिक्षण या धोरणांतर्गत शक्य तेथे शिक्षकानी प्रात्यक्षीकांवर भर द्यावा.
कार्यानुभव : या पाठावर आधारीत नाट्यछटा करा

डीस्क्लेमरः हे लिखाण एक स्वैर कल्पना आहे.

वावरआस्वाद

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

16 Mar 2011 - 2:21 pm | पर्नल नेने मराठे

विजु काजु खा.
कुंदन चुचुला वंदन कर. =))

रमताराम's picture

16 Mar 2011 - 2:23 pm | रमताराम

हुशार विद्यार्थ्यांनी अशी घाई करायची नाय हां. आजून 'उ'काराचा धडा शिकवला नाहीये गुर्जींनी.

पर्नल नेने मराठे's picture

16 Mar 2011 - 2:25 pm | पर्नल नेने मराठे

रमता हल्ली गमजा मारतो ;)

अवलिया's picture

16 Mar 2011 - 3:00 pm | अवलिया

ईकार सुद्धा शिकवला नाही...

पुष्करिणी's picture

17 Mar 2011 - 9:01 pm | पुष्करिणी

डायरेक्ट जोडक्षर चुच्स ?
पुढचा पोर्शन येतो म्हणून असं चालणार नाही ...

कुंदन's picture

19 Mar 2011 - 11:45 pm | कुंदन

हो ना , नाही तर जोडक्षर येतात अन बेसिकमध्ये लोच्या आहे असं व्हायच....
थोडक्यात काय पुढचे पाठ , मागचे सपाट.

अवलिया's picture

16 Mar 2011 - 3:01 pm | अवलिया

रमण यमन गा

मला सगळ समजल.
टारझन व परा या, जागा भरा.
कागद वाट पाहतय.
-वपाडावला याच बलावण हय का ?
(चखणा बनवणारा)

कुंदन's picture

16 Mar 2011 - 6:36 pm | कुंदन

प्रौढ शिक्शणाचे क्लासला जाता का?

रमताराम's picture

18 Mar 2011 - 1:46 pm | रमताराम

पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर पहिले छूट 'त्या शिक्षकाविरुद्ध अर्जी देऊन त्याला ढिसमिस करून टाकला'* विजुभाऊंनी, आणि आता स्वतःच क्लासेस चालू केले आहेत.

*वार्‍यावरची वरात मधल्या रामाकडून साभार.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2011 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार

पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर पहिले छूट 'त्या शिक्षकाविरुद्ध अर्जी देऊन त्याला ढिसमिस करून टाकला'* विजुभाऊंनी, आणि आता स्वतःच क्लासेस चालू केले आहेत.

ओह्ह ! असे आहे होय.

मला वाटले तिकडच्या माजोरड्या शिक्षकांशी आणि मुख्याध्यपकाशी पटले नाही म्हणुन विजुभौंनी स्वतःची वेगळी शाळा उघडली का काय ?

रमताराम's picture

18 Mar 2011 - 1:48 pm | रमताराम

दोआप्रकाटाआ

पद्मश्री चित्रे's picture

16 Mar 2011 - 6:58 pm | पद्मश्री चित्रे

कमल नमन कर च्या चालीवरिल धडा सही..
आणि इंग्लिश मधील गोपाल्,सीता,यास्मीन पण आठ्वले...
पण असले धडे शिकवायला गुरुजी पण तुमच्यासारकेच हवे ना.. अनुभवी, मनापासून (असे )धडे शिकवणारे..

मृगनयनी's picture

18 Mar 2011 - 10:26 am | मृगनयनी

विजु भौ!!!... होळीची तयारी सुरु केलेली दिस्तेय! अकबर... शबनम... सगळ्यान्नाच यावेळी रन्गवायचं ठरवलेलं दिस्तय! ;) ;)

___________________

रमण यमन गा!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

क ह र !!! _/\_

टार्या... कुठे आहेस रे!!!!! ;) ;)

टारझन's picture

18 Mar 2011 - 6:43 pm | टारझन

भुर्जी खातोय भुर्जी .. डबल भुर्जी ... तुला खायची का ?
ए भिकारचोट इलियास , एक डबल भुर्जी ला रे .. नयनी मॅडम के लिये ? ये नयनी मॅडम बहोत बडी मॅडम :) व्हाईट कलर है ;)

- टमटम बार मनिजर

पैसा's picture

16 Mar 2011 - 6:59 pm | पैसा

पुढचे धडे पटापट द्या. पहिला धडा बर्‍याचजणांना आधीच पाठ आहे!

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 9:28 pm | धमाल मुलगा

शाळा काय ड्यान्सबारमध्ये भरलीय काय? :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2011 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाळा काय ड्यान्सबारमध्ये भरलीय काय?
धमुशी सहमत. :)

शबनम,कमल, चखणा,गलास,नवटाक, आणि शेवटी वमन.
काय चाल्लंय राव विजुभौ. हे कोणत्या शाळेतले धडे आहेत ? :)

-दिलीप बिरुटे

ढ्यांसबारमधे जाण्यासाठीचे धडे असावेत

सुबक ठेंगणी's picture

17 Mar 2011 - 9:42 pm | सुबक ठेंगणी

नायतर चपला घाल.

नरेशकुमार's picture

18 Mar 2011 - 5:16 am | नरेशकुमार

वॉव !
ह्यो धडा शिकायला बालपन देगा देवा.

विजुभाऊ's picture

18 Mar 2011 - 10:57 am | विजुभाऊ

काय चाल्लंय राव विजुभौ. हे कोणत्या शाळेतले धडे आहेत ?
जीवनात शिक्षण उपयोगी पडावे म्हणून स्कीलबेस्ड शिक्षण द्यायचे ठरवलय. शिवाय
रमण करतार अकबर राजर हे सगळे यालाच हवेत ना
शबनम, कमल या महीला वर्गाचे प्रतिनीधीत्व करतात.
पुढच्या धड्यांमध्ये आकार उकार ईकार या अनुसार इकबाल ,झुबेदा . पासकल, रसीकलाल , महादू वगैरे येतील
पुढेमागे नन्हालाल अचोतानी , मायकेल व्हर्गीस ,दुर्वास शेकरू वगैरे ना आणेन.
सर्वाना बरोबर घेउन जाणारे शिक्षण महत्वाचे

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 4:12 pm | धमाल मुलगा

सरकारी वटहुकुम अगदी तंतोतंत पाळताय म्हणा की. ;)

  • सर्व धर्मांना प्रवेश,
  • अल्पसंख्यांकांच्या आरक्षित जागा,
  • महिलांच्या ३३% आरक्षणाचा विचार,
  • नवटाक सारख्या गोष्टीतून कुटीरोद्योगाला चालना,
  • चखणा तिथूनच आणण्यातून गावच्या महिला बचत गटाच्या प्रकल्पाला मदत.

लै भारी!
आम आदमी के साथ, विजुभाऊ (आय) का हाथ|

- डी. मुलगाम्बरम्.

कुंदन's picture

19 Mar 2011 - 3:38 pm | कुंदन

विजु भांग पाड.
डॉन्या केस कापुन ये.

नशिब कोणी अजुन

"कुंदन स्लिपींग पार्टनर हो"

असं वाक्य नाही लिहलं ते! ;-)

विजुभाऊ's picture

29 Mar 2011 - 4:48 pm | विजुभाऊ

मुलानो
गृहपाठ झालाय ना व्यवस्थीत
परवा परीक्षा आहे.
पेपरला सर्वानी नीटच यायचे
( कोण रे तो नीट च्या ऐवजी नीप म्हणाला. अकबर्‍या....घेरे त्याला कोपच्यात...आणि त्याच्या जवळचे मटेरीयल जप्त कर)