आशीर्वाद
महेंद्र
नमस्कार मित्रांनो,
होय मीच, दचकू नका
मी महेंद्र सिंघ धोणी
मागच्या आठवड्यात सचिन ने या संस्थळाची माहिती दिली, आणि इथलं वातावरण बघून मी याचा सदस्य झालो.
मित्रांनो मला आज तुमच्या आधाराची फार गरज आहे
विश्वचषकाची धामधूम सुरु आहे , आपल्या संघाला याबाबतीत फेवरेट मानलं जातंय , खरं आहे, आहे आपला संघ बलवान.
पण या सगळ्याचं दडपण आलंय हो माझ्यावर, आता तुम्ही म्हणालं त्यात कसलं दडपण, एवढे करोडो रुपये तर कमावतोस.
पण तसं नाहीये, पैसे हि गोष्ट वेगळी, पण तुम्हा करोडो भारतीयांच्या अपेक्षा २४ तास डोक्यावर बाळगणं, खूप कठीण गोष्ट आहे.
माझा इतिहास तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हाला तो माहित आहेच, पण मी सुद्धा साधारण माणूसच आहे
मी सुद्धा चिडतो, मला सुद्धा राग येतो, पण एवढ्या कमी वयात कर्णधार पद अंगावर आल्यामुळे अचानक पोक्तपणा आला आहे, (मी केस कापले ते याच साठी, तो थिल्लर पण वाटायचा )इकडची धमाल वाचली आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं
तर या चषकादरम्यान मी तुमच्यात असणार आहे, नंतरच माहित नाही. पण हे दोन महिने तर नक्की. कारण सध्या खूप ताणात वावरतो आहे
मला तुम्ही सूचना करू शकता, टिप्स देऊ शकता. मी सुद्धा तुम्हाला माझी मत विचारेन, माझे प्लान discuss करेन .
प्रत्येक सामन्याच्या आदल्या दिवशी मी इथे असेन. मला तुमची खरच मदत हवी आहे
पर्वाचा सामना कसाबसा जिंकलो, आपले गोलंदाज कमी पडत आहेत, पण रविवारचा सामना " साहेबांबरोबर " आहे.
मी कोणाला गोलंदाज म्हणून निवडू ?
टोस जिंकण्यासाठी कुठल्या देवाला साकडं घालू ?
प्रश्नच प्रश्न.
मदतीच्या आणि तुमच्या आशीर्वादाच्या अपेक्षेत
---- धोणी
प्रतिक्रिया
इथे वेळ दवडण्या परीस
पर्वाचा सामना कसाबसा जिंकलो,
+१
पैशासाठी नको तर देशासाठी
-१
बरं झालं भेटलात.
हा हा हा हा हा हा हा ननी कहर
तिच्यायला कोणालाबी साहेब
कोण साहेब??
धोनी साहेब आत्ताच मिळालेल्या
तुमचं भविष्य काय म्हंतंय वो
भावड्या, कप जिंकला नाहीस तर
'भावड्या, कप जिंकला नाहीस तर