✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग २

स
सुधीर काळे यांनी
Sat, 02/19/2011 - 22:51  ·  लेख
लेख

Book traversal links for जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग २

  • ‹ जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग १
  • Up
  • पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9369 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

मला पण आठवतोय

पैसा
Sun, 02/20/2011 - 17:14 नवीन
या सामन्यातला थरार!
  • Log in or register to post comments

चषक जवळ-जवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हातातून निसटलाच होता

सुधीर काळे
Sun, 02/20/2011 - 17:52 नवीन
मला अजूनही डोनाल्ड धावबाद झाल्यावर मिड विकेट आणि मिड ऑन च्या आसपास एकमेकांना विळखा घालून विजय साजरा करणारे वॉर्न, वॉ वगैरे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पिचच्या मधोमध भडकलेला क्लुसेनर यांच्या छब्या डोळ्यासमोर आहेत....... त्यादिवशी चषक जवळ-जवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हातातून निसटलाच होता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

थरार डोळ्यासमोर उभा राहीला.

चिंतामणी
Sun, 02/20/2011 - 18:05 नवीन
त्या बरोबरच पुढील वाक्यानेसुद्धा आठवणी जाग्या झाल्या. बरोबरीत सुटलेला पहिला कसोटी सामना होता रिची बेनो आणि फ्रँक वॉरेल यांच्या संघातला. त्या काळात बघायला मिळणे ही दुर्मीळ गोष्ट होती. पण कालांतराने आमच्या शाळेतील एका शिक्षकांनी "त्या" कसोटी सामन्याची चित्रफीत आणून शाळेत दाखविली होती. त्याच्यासुध्दा आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments

शिक्षक असावेत ते असे!

सुधीर काळे
Sun, 02/20/2011 - 20:09 नवीन
शिक्षक असावेत ते असे! नशीबवान आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

हो नक्कीच. त्या काळातील शिक्षक वेगळेच होते.

चिंतामणी
Mon, 02/21/2011 - 08:45 नवीन
थोडे विषयांतर होत आहे. पण सांगायलाच पाहीजे म्हणून लिहीतो. त्यांनी आम्हाला फक्त शिकवीण्याचे काम केले नाही तर, इतर अनेक गोष्टी शिकवील्या. त्यातील मैदानावर खेळाचा आनंद लुटणे, चांगले संगीत ऐकणे, समुहगान इत्यादी गोष्टी या नक्कीच काळाच्या पुढच्या नसतील कदाचीत पण नक्कीच वेगळ्या होत्या. ह्यातील काही शिक्षकांचा दरारासुद्धा होता. प्रार्थना सुरू झाल्यावर शाळेत प्रवेश केल्यास संपेपर्यन्त दरवाज्यात थांबणे, नंतर छडीचा प्रसाद देउन वर्गात पाठवणे इत्यादी गोष्टीसुध्दा होत्या. (त्या काळी पालकसुध्दा मुलाला का मारले असे विचारायला शाळेत जात नसत. आणि आलेच तर "तो चुकला असेल तर अजून दोन छड्या मारा" असे सांगत.) पण त्याचे वाईट नाही वाटले कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

बढिया !

ज्ञानेश...
Sun, 02/20/2011 - 21:06 नवीन
खरोखर अविस्मरणीय सामना होता तो ! मला क्रिकेट थोडेफार कळायला लागले ते ९२ च्या विश्वचषकापासून. (कारण जन्म ८२चा.) आणि आजवर सर्वात जास्त लख्खपणे स्मरणात राहिलेला विश्वचषक आहे श्रीलंकेने जिंकलेला- १९९६चा. त्यात तेंडूलकरने सर्वात जास्त- ५२३ धावा केल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकावर होता मार्क वॉ, पण त्याने सचिनपेक्षा एक सामना जास्त खेळला होता. या विश्वचषकातला सर्वात अविस्मरणीय क्षण- भारत वि. पाकिस्तान मॅच. त्यात आमिर सोहेल आणि सईद अन्वरने केलेली घणाणाती सुरूवात- वेंकटेश प्रसादच्या बॉलवर आमिरने एक चौकार मारल्यानंतर त्याला डिवचण्यासाठी बॅटने बाऊंड्रीकडे निर्देश करणे, आणि पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याचा स्टंप उखडणे.. केवळ अविस्मरणीय. हा प्रसंग इतक्या लख्खपणे मनावर कोरला गेला आहे की उद्या मला स्मृतिभ्रंश झाला तरी मला तो एक प्रसंग आठवत राहील. याच विश्वचषकातल्या आणखीही काही आठवणी आहेत- सेमिफायनलला श्रीलंकेने भारताचा केलेला पराभव ईडन गार्डनच्या जनतेला पचवता न येणे, त्यांची हुल्लडबाजी, विनोद कांबळीचे अश्रू वगैरे. तशीच २००३ च्या फायनलमधली रिकी पॉंटिंगने झहीर वगैरे मंडळींची केलेली धुलाईही विसरू शकत नाही. ९६ चा दक्षिण अफ्रिकेचा आणि ९९ चा ऑस्ट्रेलियाचा संघ हे माझ्या मते विश्व क्रिकेटमधले सर्वोत्तम संघ होते. २००७ चा वर्ल्डकप कधी आला कधी गेला मला काहीही आठवत नाही. यावेळी बघू, काय होते.
  • Log in or register to post comments

ता. क.

ज्ञानेश...
Sun, 02/20/2011 - 21:08 नवीन
वरचा पूर्ण प्रतिसाद गुगल न वापरता लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

आमचा 'आनंदजी डोसा'

सुधीर काळे
Mon, 02/21/2011 - 10:36 नवीन
सचिनचे विश्वचषक स्पर्धेतील मला माहीत असलेले सर्व विक्रम 'मेरा सचिन महान' या माझ्या आजच 'मिपा'वर पोस्ट केल्या गेलेल्या लेखात आहेत. कांहीं भाग माझ्या आठवणीवरून तर कांहीं माझ्या सहकार्‍याने दिलेल्या आकडेवारीवर आधारलेला आहे. त्याने कदाचित 'गूगल' आणि 'क्रिकइन्फो' या दोन संस्थळांची मदत घेतली असेल. (तसा तो आमचा 'आनंदजी डोसा'च आहे!)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा