भाववाढ आणि नियंत्रण
नुकताच ऋषिकेश यांनी दिशाहीन विरोधी पक्ष असा धागा काढला होता. त्यात आणि त्यावरील चर्चेत वाढलेली आणि वाढती महागाई हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यावर सरकारने नियंत्रण आणणे आवश्यक आहे असे मिपाकरांचे मत दिसले.
मला व्यक्तिश: सरकारने भाववाढ आटोक्यात आणावी हे म्हणणे पटले होते. परंतु मी त्यावर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तेव्हा मला वाटत असलेले भाववाढ आटोक्यात आणावी हे मत चुकीचे असल्याचे वाटू लागले. इतकेच नव्हे तर भाववाढ नियंत्रण करावे हे माझे मत दळभद्री समाजवादाचे आपल्यावर जे ४० वर्षे संस्कार झाले त्यातून आलेले होते हेही लक्षात आले. म्हणून मला जाणवलेले अर्थशास्त्रीय विचार खाली देत आहे.
---------------
सध्याच्या (जागतिक) विचारसरणीनुसार मार्केट हे स्वतःच अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवते. सध्या भाव वाढत आहेत कारण वाढलेल्या भावाला कांदे घेणे ग्राहकांना परवडत आहे. ग्राहकांना नसेल परवडत तर साहजिकच कांद्याची मागणी कमी होऊन भाव उतरतील. किंवा हे भाव टंचाईमुळे वाढलेले असतील तर जेव्हा टंचाई दूर होईल तेव्हा भाव उतरतील. बाजाराच्या इक्विलिब्रियमपेक्षा कृत्रिमपणे भाव कमी करण्याचा सरकारने प्रयत्न करणे म्हणजेच पोथीनिष्ठ समाजवाद. तो तर आपल्याला नको आहे कारण तो विकासाच्या आणि प्रगतीच्या आड येतो. प्रगतीच्या आड येतो हे म्हणणे खरे असल्याचे पूवी समाजवादी धोरणे असतानाची भारताची प्रगती आणि समाजवादाला क्रमशः सोडचिठ्ठी दिल्यानंतरची प्रगती यांची तुलना केल्यास सहज स्पष्ट होते.
यूपीए-२ सरकारची स्थापना डाव्यांच्या लोढण्याशिवाय झाली म्हणून आपल्याला खरोखरच हायसे वाटले होते.
-------------
या बाजाराभिमुख धोरणामुळे काही लोकांना कांदा खाणे शक्य होणार नाही. पण बाजारव्यवस्थेत ते आपण अटळ म्हणून स्वीकारले पाहिजे. मलासुद्धा रोज बासमती तांदुळाचा भात खाणे शक्य होत नाही. म्हणून सरकारने बासमती तांदूळ सर्वांना परवडेल असा हस्तक्षेप बाजारात करावा असे म्हणणे योग्य नाही. मला बासमती खाता येत नाही कारण बासमती तांदुळाचा भात खाण्याची माझी लायकी नाही हेच खरे नाही का?
पुढे असेही होईल की मला बासमतीच काय कोणताच तांदूळ परवडेनासा होईल. माझी उपासमार होऊन मी मरून जाईन. माझ्यासारखेच इतर नालायकही मरून जातील. त्यामुळे समाजातल्या नालायकांची संख्या क्रमाने कमी होत जाईल. पुढे शिल्लक राहिलेला समाज अधिक लायक व्यक्तींचा असेल त्याने समाजाचा विकास अधिक वेगाने होईल. भविष्यात समाज बलवान व्हावा म्हणून आज माझ्यासारख्या नालायक व्यक्तींनी हा त्याग करायलाच हवा. नाहीतरी मी नालायक असल्यामुळे समाजावर ओझेच आहे.
--------------
आता काही लोक असा युक्तिवाद करतील की हे चढे भाव खरोखरची टंचाई असल्यामुळे वाढलेले नसून व्यापार्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे वाढले आहेत. त्यावर मी असे म्हणेन की काय हरकत आहे? मागणी आहे म्हणून त्यांनी साठेबाजी केली असेल. त्यांनी मागणी नसताना साठेबाजी केली असेल तर त्याचे प्रायश्चित्त त्यांना लवकरच कोसळलेल्या भावांच्या रूपात मिळेलच.
---------------
कांद्याच्या किंवा इतर वस्तूंच्या वाढलेल्या भावांचा बाजारव्यवस्थेत कोणता फायदा होतो हेही आपण लक्षात घ्यायला हवे. गेल्या काही वर्षांत शेतीचा विकासदर खूप कमी राहिला आहे असे आपण म्हणतो. आता भाजीपाला, धान्ये डाळी वगैरेंचे भाव चढे राहिले तर नफ्याच्या आशेने या जिनसांच्या व्यापारात अधिक लोक उतरतील. पर्यायाने हे व्यापारी शेतकर्यांकडे अधिक जिनसांची मागणी नोंदवतील. ती पुरी न होऊ शकल्याने शेतकर्यांनाही चांगले भाव मिळू लागतील.
शिवाय व्यापारी अधिक श्रीमंत झाल्यामुळे ते बाजारात अधिक पैसा खर्च करतील त्यामुळे अधिक व्यक्तींना रोजगार मिळू लागेल.
भाव पडेल राहिले तर हे फायदे होणार नाहीत.
---------------
जीडीपी म्हणजे देशात विक्री केल्या गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत असे असल्याने भाव चढत राहिल्याने जीडीपीची ग्रोथ डबल डिजिट मध्ये जाणे शक्य होईल.
(काही खोडसाळ इकॉनॉमिस्ट 'जीडीपी ग्रोथ इन रिअल टर्म्स' अशी भाववाढीचा दर वजा करून काढतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे).
---------------
लेट द मार्केट फोर्सेस डिसाईड हेच तत्त्व अंगिकारावे हे उत्तम.
---------------
आपल्या देशात लोकशाही असल्याने सरकारला निवडून यावे लागते. भाववाढ आटोक्यात न राहिल्यास सरकारी पक्षाला मते कमी मिळून निवडून न येण्याची शक्यता आहे. पण सरकारने मतांचे राजकारण सोडून देऊन जे अंतिम हिताचे आहे असे मी वर दाखवले आहे त्या मार्गावर चालण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी.
प्रतिक्रिया
चांगला विषय
वा थत्तेकाका...
माझ्यासारखेच इतर नालायकही मरून जातील
अनॅलिसिस बर्यापैकी प्रिमिटिव वाटल.
ठीक आहे. उद्यापासुन प्रत्येक
बाजाराची मुक्तता
भाववाढ
लौकीक अर्थाने काही कमी पडते आहे का?
खुलासा
माझी उपासमार होऊन मी मरून
सहमत
सहमत
ब-याच अंशी सहमत.अशाच विषयावर
दहा बारा वर्षापूर्वी
एक उद्बोधक व्याख्यान
छान
>>>लेट द मार्केट फोर्सेस
लेखाचा बाज आवडला असला तरी
पगार वाढीचे काय..डि.ए पण तसाच
प्रतिक्रियेसाठी जागा राखून
अर्थशास्त्रीय खिचडी !!
निसर्गाचे नियम मोडण्या मुळे कदाचीत,
पर्फेक्ट काँम्पिटीशनमुळे