कांदे पोहे...
[संवाद... ]
आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा ...
अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा...
[गीत...]
मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!
क्षण हे गोंधळलेले
थोडेशे बावरलेले
अंगणात हृद्याच्या
नभ अवतरलेले !!
[संवाद...]
हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ...
चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची...
सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी...
अल्हाद मोहक निर्मळ... झळुक स्वप्नांची ...
[गीत]
शब्द अडखळलेले
ओठात हरवलेले
श्वासांच्या ठेक्यावरती
ह्रद्यगीत झुललेले !!
प्रीतफुल गंधाळलेले
सप्तसूर ओथंबलेले
प्रीतीची ज्योत घेवूनी
ह्रद्य धडधडलेले !!
मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!
--- शब्दमेघ ( ४/१/२०११)
कविता छान!
शब्द अडखळलेले ओठात
लग्न जमेल अशाने
कविता छान आहे ...
कांदे पोहे खाऊ जाता ओळख पटली
मस्त हो ... गतआयुष्य छान होते
विजुभाऊ