अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे.
म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत. अनेक सोपे आणि चपखल पारिभाषिक शब्द हेही त्यांचं मराठी भाषेसाठीचं एक महत्त्वाचं योगदान ठरावं. केळकरांचा आंतरक्षेत्रीय व्यासंग आणि उदार, अभिनिवेशरहित भूमिका समकालीन मराठी वाड्मयक्षेत्रात उल्लेखनीय मानली जाते. त्या निमित्तानं लोकसत्तेत आलेल्या दोन लेखांचे दुवे देत आहे.
आस्वादमीमांसेचा भाषाविद् - प्र. ना. परांजपे
भाषेचे सर्वस्पर्शित्व जाणणारा विचारवंत - नीलिमा गुंडी
त्यांचं इंग्रजीतलं लेखन या दुव्यावर उपलब्ध आहे.
अवांतर - या धाग्याला शंभर प्रतिसाद वगैरे यावेत अशी अपेक्षा नाही. मराठी आंतरजालात दत्तजयंतीनिमित्त आलेल्या लोकप्रिय लेखांच्या सुकाळामध्ये बिचार्या केळकरांची त्या निमित्तानं मराठी आंतरजालाला थोड्या वेळापुरती का होईना, पण आठवण/ओळख व्हावी एवढाच उद्देश आहे. इथल्या किमान काही वाचकांना ही बातमी वाचून आनंद होईल अशी आशा आहे.
वाचने
5132
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
केळकर ह्यांचे अभिनंदन!
श्री. अशोककाकांचं अभिनंदन! ते
In reply to श्री. अशोककाकांचं अभिनंदन! ते by रेवती
+१
अभिनंदन
पुरस्काराचाच गौरव होय....!
अभिनंदन आणि आभार!
In reply to अभिनंदन आणि आभार! by सुनील
+१
अशोककाकांचं मनःपूर्वक अभिनंदन!
डॉ. केळकरांचे
वा!
डॉ केळकर यांचे अभिनंदन!
अभिनंदन!! एकदम छान बातमी!
डॉ. अशोक केळकर यांच्याबद्दल
विनंती
In reply to विनंती by राजेश घासकडवी
:-)
In reply to :-) by चिंतातुर जंतू
माझी योग्यता नाही, पण तरी
In reply to माझी योग्यता नाही, पण तरी by धनंजय
बापरे!
अशोक केळकरांसह इतर मान्यवरांचे ही अभिनंदन
डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या
उत्तम