योगसाधना कुणाकडून आली आहे?
गेल्या आठवडाभरात आधी न्यूयॉर्क टाईम्स मधे आणि पाठोपाठ टाईम्स ऑफ इंडीया मधे योगसाधना, ज्याला इंग्रजीत "योगा" असे म्हणले जाते त्याचे मूळ कुठले आहे आणि त्यावरून चालू झालेल्या "टेक बॅक योगा" चळवळीबद्दल बातम्या आल्या आहेत.
१८९३ साली विवेकानंद अमेरिकेत पहील्यांदा आले आणि त्यांनी योगसाधनेची ओळख या नवीन जगास करून दिली. त्यानंतर ज्याला चेटूक म्हणत हिणावले गेले होते, दुर्लक्षित केले गेले होते त्या "योगा" मधील आरोग्यसंवर्धनाचा उपयोग समजल्यावर त्याचा आरोग्यासाठी आणि धंद्यासाठी उपयोग करण्याचे प्रमाण तेजीत आले. आरोग्यविमाच्या कंपन्या आता योगाक्लब मधे जाणे हे preventive medication समजून त्यांच्या सभासदांना त्यासाठी प्रोत्साहन देऊ लागल्या आहेत. त्यात काही नवल देखील नाही.
कदाचीत स्वामी विवेकानंदांनंतर बिट्ल्सच्या योगसाधनेतील आकर्षणाने अमेरिकेचे लक्ष वेधले गेले. असे शिकवत असताना कधी कोणी "गर्वसे कहो योगा हिंदू है" असे देखील म्हणले नाही कारण तसा या संत-महर्षी-गुरूंचा आणि भारतीय संस्थांचा उद्देश देखील नव्हता. "आपणास जे जे ठावे, ते ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन" ह्या उक्तीप्रमाणे, अनेक अधुनिक योगमहर्षींनी आणि भारतीय संस्थांनी येथे योगसाधनेच्या प्रचारात योगदान केले. हे सर्व चांगलेच होते...
मात्र त्यानंतर दोन गोष्टी घडू लागल्या:
यातील धंदेवाईक काही योगासने पेटंट करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याला उत्तर म्हणून भारत सरकारने देखील योग्य पाऊले उचलून १०० च्या वर योगासने पेटंट करणे चालू केले... (टाईम्स ऑफ इंडीयाच्या वरील दुव्यात ४००० योगासने म्हणले आहे)
दुसरा भाग हा धर्मकारण-राजकारणाशी संबंधीत आहे. आता काही जण टूम काढू लागले ज्याप्रमाणे थोडक्यात योगसाधना भारतातील नाहीच, असली तर त्याचा धर्माशी संबंध नाही आणि असला तर तो बुद्ध धर्माशी असेल... म्हणजे काही झाले तरी ह्याचा हिंदू संस्कृतीशी संबंध नाही हे दाखवण्याचा हा आटापिटा...
या संदर्भात न्यूजवीकच्या लिसा मिलर यांचा, "The Clash of the Yogis - Do the Hindu roots of yoga matter?" हा लेख पण वाचनीय आहे.
आता एक लक्षात असुंदेत की हे केवळ अमेरिकेपुरतेच मर्यादीत राहील का? अर्थातच नाही... बर्गर संस्कृती असुंदेत अथवा आयपॉड संस्कृती, ती विश्व व्यापणार असे किमान गेल्या शतकापासुनचे पुढच्या काही शतकांपर्यंतचे तरी चित्र रहाणारच आहे. म्हणजे आज अमेरिकन्स म्हणतात म्हणून उद्या तुम्ही आम्ही देखील "योगा योगा " करत नकळत मुळं विसरणार
योगाचे मुळ हिंदू संस्कृतीत आहे म्हणजे योगसाधना केवळ हिंदू आहे, अथवा हिंदूंचीच आहे अथवा पाव टाकलेल्या विहीरीतील पाणी प्यायल्याप्रमाणे त्यामुळे धर्मांतर घडणार आहे असे कोणी म्हणू इच्छित नाही. केवळ हिंदू मुळं म्हणून योगसाधना नाकारायची उद्या हिंदू म्हणणवर्या माणसास देखील दुर्लक्षयाचे असे होऊ शकते. म्हणजे आधी हळद, मग योगसाधना आणि नंतर अजून काही करत आपले चांगल्याचे श्रेय काढून लाटण्याचे प्रकार आहेत.
रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?
वाचने
18711
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
कधीकधी वाय एम सी ए मध्ये
व्हरमाँट च्या चर्च स्ट्रीटवर
In reply to व्हरमाँट च्या चर्च स्ट्रीटवर by शुचि
समांतर उदाहरण
हम्म, बर्याच गोष्टींवरून
मूळ आसने पेटंट करू नये
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
<<<जुन्यामध्ये फक्त जे काय
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
मला वाटते...
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
व्याख्या
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
चांगला मुद्दा!
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
लै भारी मुद्दा! आता मी एक
In reply to लै भारी मुद्दा! आता मी एक by अवलिया
घेतो?
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
GI
In reply to GI by सुनील
माझ्या मते
In reply to माझ्या मते by श्रावण मोडक
प्रायर आर्ट
In reply to प्रायर आर्ट by धनंजय
मुदत
In reply to मुदत by श्रावण मोडक
थोडेसे
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
शंका
जग बदलयं... इथे ज्ञानाच्या
In reply to जग बदलयं... इथे ज्ञानाच्या by मदनबाण
संग्रह
In reply to संग्रह by बेभान
हे वाक्य मी माझ्या जी-टॉकच्या
वाचत आहे.... मेकॉले आणि
In reply to वाचत आहे.... मेकॉले आणि by अवलिया
ठराविक
In reply to ठराविक by नितिन थत्ते
सिद्ध करा माझे म्हणणे खोटे
In reply to वाचत आहे.... मेकॉले आणि by अवलिया
संबंध मुळीच कळला नाही
In reply to संबंध मुळीच कळला नाही by धनंजय
खुलासा
अतिशय वाईट आहे हे.. खुप संताप
बडगा
योग संदर्भात जास्त माहित
समांतर अवांतर
In reply to समांतर अवांतर by पंगा
हा हा
In reply to हा हा by आजानुकर्ण
आभार
In reply to आभार by पंगा
अपघाताने
In reply to समांतर अवांतर by पंगा
आवडला
In reply to समांतर अवांतर by पंगा
आग रामेश्वरी...
गो॑धळ
In reply to गो॑धळ by kamalakant samant
<<<योग ही भारताची विश्वाला