चेरी टोमॅटोची पिशवी.
चेरी टोमॅटोची पिशवी
५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले. आता हा करतो तरी काय हे मी बघत होते.
रस्त्याच्या कडेला बास्केट ठेऊन तो जरा बाजूला जाऊन बसला, पण कोणीच फिरकले नाही. आयडिया सुचुन एकच पिशवी हातात घेउन येणारया प्रत्येकाला विचारू लागला. २ पिशव्या विकल्या गेल्या. एका गाडीवाल्याने गाडी थांबवून तिसरी पिशवी घेतली. मुलाला आत्मविश्वास आला. अजून दोघीनी दोन पिश्व्या घेतल्या आणि त्याच्या सर्व पिशव्या विकल्या गेल्या.
मुलाला किती पैसे मिळाले हे महत्वाचे नव्हते. आपल्या पिशव्या विकल्या जात नाहीत तर आपली विक्रीची पद्धत बदलली पाहिजे हे जाणवून त्याने तसा विचार केला. परक्या लोकांशी बोलतांना त्याचा वाढत जाणारा आत्मविश्वास व काहीतरी मिळविल्याचा आनंद हे महत्वाचे. प्रत्येकशी बोलताना आदराने बोलत होता.पिशवी विकत घेतल्यावर आभार मानत होता. मुलगा अस्खलीत जर्मन भाषा बोलत होता. मला त्या मुलाचे खूपच कौतुक वाटत होते.
वरचा प्रसंग मी आमच्या खिडकीतून बघत होते. गेली १९-२० वर्षे मी महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील ३-४ शाळांमधून शिकवले आहे.असाच एक प्रसंग आठवला. वर्गातल्या एका मुलाच्या वडिलांचे बाजारात भाजीचे दुकान होते. तो मुलगा मिरच्या, लिंबे, कोथिंबीर एका छोट्या टोपलीत घेउन विकत असे.एक दिवस वर्गातील कोणीतरी त्याला ते विकताना पाहिले. दुसरया दिवशी वर्गात तो मुलांच्या चर्चेचा विषय होता. मी त्याना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व मुले "उच्चभ्रू" समाजातील असल्याने, आपल्या वर्गातील एक मुलगा बाजारात भाजी विकतो हे काही त्यांना रुचत नव्ह्ते. पालकांच्या प्रतिक्रियाही साधारणपणे मुलांसारख्याच होत्या.
प्रतिक्रिया
मानसिकता
खरंच आहे... समाजाची मानसिकता
वडीलान्चा व्यवसाय
निरीक्षण आवडले. शेवटच्या दोन
परस्परसंबंध?
अनुभव तर छान आहेच पण आपले
मुलगा फारच हुषार आहे. आपलं
आपण...
श्रम प्रतिष्ठा..
लेट , बट ऑन टाईम !! सेम
आपल्याकडे श्रम प्रतिष्ठा
आभारी
चांगला लेख.
इंट्या लेका नुसता चांगला लेख
धन्यावाद दादा.. मी लवकरच