आई.. मिटलेला श्वास ... ४
आई.. मिटलेला श्वास ३ - http://www.misalpav.com/node/15127
पार्श्वभुमी : दारातील रांगोळी ही काही तरी स्मरणांचे टीपके बोलते आहे, आणी संध्या समयी जीवन सूर्य क्षितिजापल्याड गेलेला पाहुन स्वताचे वलयांकीत जीवन ही व्यर्थ वाटणारा हा नायक ..
उंबर्यावर सांजसमयी
मन माझे रडते आई
पाणावलेली आर्त रांगोळी
तुझेच स्मरणगीत गाई
सूर्यबिंबावीन क्षितिजी
किरणांचा मखर ओस
जीवनदेव्हार्यात आई
देवत्वाची जागाच रिक्त
--------- शब्दमेघ
आवडली.
सुरेख
आवडली ही सुद्धा!
काय गोष्ट आहे गणेशराव!
आवडली कविता
आवडली कविता...........छान.
माझ्या मनातील भावच जणू
माझ्या मनातील भावच जणू
उंबर्यावर सांजसमयी मन माझे