मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावली देणारे पण ...

sagarparadkar · · काथ्याकूट
माझ्या शेजारच्या आंगणातलं गुलमोहोराचं झाड चांगली सावली देत होतं. पण त्याची मुळं वर जमिनीतून पसरून ८/१० फुटांवरील इमारतीलाच धोका ठरू लागली. म्हणून शेवटी शेजार्याने ते पाडून टाकलं. आता दिवसभर दोघांच्याही अंगणात कडक ऊन लागते. म्हणून मी अश्या झाडांच्या शोधात आहे, जे वरती छान सावली देईल पण त्याची मुळं जमिनीत खोलवर जातील, जेणेकरून माझ्या किंवा आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीला त्या झाडामुळे धोका संभवणार नाही. अशी कोणती झाडं सहज उपलब्ध होत असल्यास तज्ञांनी ह्याच धाग्यावर कळवावे ही नम्र विनंति.

वाचने 3485 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by वेताळ

इंटरनेटस्नेही गुरुवार, 10/28/2010 - 01:20
एसी ने आपली वीज देयके अधिक रकमेची येतात हे मान्य... पण ते हवेत थंडावा येण्यासाठी लावलेल्या झाडांच्यामुळांमुळे आपली इमारतच पडण्यापेक्षा केव्हाही किफायतशीर ठरावे! हो की नाही? ;) . . . ह. घ्या. ;)

५० फक्त Wed, 10/27/2010 - 15:34
अशोकाची झाडे लावु शकाल, भर दुपारी जरी सावली मिळाली नाहि तर संध्याकाळी तरी निश्चित सावली मिळेल. हर्षद.