मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल (सांज्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश · · पाककृती
या दोन प्रकारे करता येतात. गुळाच्या किंवा साखरेच्या. पण सर्वसाधारणपणे सांज्याच्या म्हटल्यावर गुळाच्याच केल्या जातात. साहित्यः १ वाटी जाड रवा दिड वाटी गुळ २ वाट्या पाणी १/२ च. जायफळ पूड १/२ च. वेलदोडा पूड १/२ वाटी रिफाडंड तेल पाव च.मीठ २ वाट्या कणिक १/२वाटी मैदा पाव वाटी तेल तांदळाची पिठी १.जाड रवा रिफाइंड तेलात खमंग भाजून घ्यावा. २.दोन वाट्यापाणी+२ वाट्या गुळ एकत्र उकळत ठेवावे. गुळ विरघळला कि त्यात रवा घालून हलवावे व वाफ आणावी. चांगली वाफ येऊन रवा शिजला कि त्यात वेलदोडा -जायफळ पूड घालावी. व उतरून गार करावा. ३.मैदा+कणिक चाळून मीठ घालून पाव वाटी तेलातील अर्धे तेल घालून भिजवावी. ४.दोन तास कणिक भिजल्यावर पाणी व तेलाचा वापर करून सैलसर तिंबावी (पुरण पोळीच्या कणिकेप्रमाणे) ५.कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याच्या दुप्पट सांज्याचा गोळा घेऊन कणकेच्या उंड्यात भरावा व तांदळाच्या पिठीवर पोळ्या हलक्या हाताने लाटाव्यात. नॉनस्टीक तव्यावर बदामी रंगावर भाजाव्यात. पोळीला एकदाच उलटावे. न तुटता होतात. टीपः रवा रिफाइंड तेलातच भाजावा. डालड्यात भाजू नये. सांजा कोरडा वाटला तर दुधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा. वरील साहित्यात ८-१० मध्यम आकाराच्या पोळ्या होतात.

वाचन 6877 प्रतिक्रिया 0