मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरडवहीच्या बैलाला....

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
मला बर्‍याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे. अजुन कोणाकोणाला हा त्रास सहन करावा लागत आहे का ?

वाचने 29036 वाचनखूण प्रतिक्रिया 147

इल्ला !!! मला तर सकाळपासून व्य.नि. + खरडी मिळाल्या आहेत; आणि मी त्यांना प्रतिसादही दिले आहेत. [त्यात डॉनरावांच्याही खरडी आहेत ~ अर्थात धमकीच्या...!!!!]. याचाच अर्थ असा की, आमच्या 'शांग्रीला' त सारं काही आलबेल आहे.... तुमच्या Twilight च्या बेलाच्या गणितात गडबड झालेली दिसत्ये. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आमची खव सुविधा बंद असल्याचा आणि आम्ही हा धागा काढल्यावर अंमळ बिज्जी झाल्याचा फायदा घेउन मिपावरील काही कंपुबाज प्रस्थापितांनी आमच्या नावानी इथे जो शिमगा घातला आहे त्याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल ह्याची त्यांनी जाण ठेवावी. दुर्लक्षीत पॅंथरच्याच सदस्यांना फक्त ह्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याने हे सर्व तांत्रिक प्रॉब्लेम मुद्दाम घडवुन आणल्याचे स्पष्ट दिसतच आहे. ह्यासर्वाचा निषेध म्हणून आम्ही आज संध्याकाळी ६ वाजता ह्याच धाग्यावर श्री. डॉन्राव तसेच त्यांच्या राको अदितीबै तसेच आमच्या दूरध्वनीची दखल न घेणारे श्री. निदे ह्यांच्या पुतळ्याचे दहन करणार आहोत. तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Tue, 10/19/2010 - 11:20
>>तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा. बरं बरं, दखवा दाखवा ... मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे ( थत्तेचाचा तो आवाज मोजतील, त्यांना अनुभव आहे, त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई होईल ). आणि हो, ते "आणीबाणी" चे विसरु नका बरं का ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गांधीवादी Tue, 10/19/2010 - 11:25
>>मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे जंगलातला वाघ/सिंह कधी डेसिबलचा विचार करून डरकाळी मारताना पाहिलाय का ?

In reply to by छोटा डॉन

च्यायला त्या थत्ते चाचांचा पार मिपावरचा ए.के. हंगल करुन टाकलाय तुम्ही लोकांनी ! आमचा आवाज ५० डेसीबलमध्ये मावायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्यालच ! आणि आणिबाणी आणणार्‍यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले. @निळ्या विदेशी परवडत नाही ! प्यासामधुन एक चपटी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि आणिबाणी आणणार्‍यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.
आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही! बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही!
लादणारे शेवटी तुमच्या सारखे प्रस्थापितच होते हे विसरुन कसे चालेल अवखळकरतै ?
बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल ? आगे बढो आणि खड्डे पे पडो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी लागणारी 'तैल'बुद्धी त्यांच्याकडे आहे हे विसरलात वाटते! :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी लागणारी 'तैल'बुद्धी त्यांच्याकडे आहे हे विसरलात वाटते!
त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही !

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही ! अन् त्यांना मेंदुवडा आहे ह्यावर आमचा विश्वास नाही ! :)

In reply to by छोटा डॉन

नितिन थत्ते Tue, 10/19/2010 - 11:52
कोणत्याही सभेला कधीही बंदी/नियंत्रण घालू नये असे मत असल्याने, मोजलेल्या डेसिबलचा अहवाल + शिफारस योग्य त्याप्रकारेच देण्यात येईल. अनेक दुर्लक्षित पुढे प्रस्थापित होऊन आणीबाणीची भाषा बोलतात हे "उदाहरणां"नी सिद्ध झालेच आहे. असो. ज्यांना आवाजाचा त्रास होईल त्यांनी दहिसरला जावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

".....तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने ...." ~~ असला आचार्य अत्रीय आकडा आणण्याची अवदसा अचानकच अवतरली आहे. मुळात 'दहन' कार्यक्रम आटोपल्यानंतर उपस्थित असणार्‍या सो-कॉल्ड दुर्लक्षित बांधवांच्या अमृततुल्य टपरीवरील बिल होईल खच्चून पंधरा-वीस रूपये...! त्यामुळे 'लाखो' आकड्याचे प्रयोजन प.रां. नी कशासाठी योजिल्ये? तरीदेखील वरील आवाहनातील 'अदितीबै' यांच्या पुतळ्याचे दहन ही बाब मनाला भावली. तिचे याच काय पण अन्य कुठल्याही कारणास्तव तसे होण्यास्/करण्यास माझा हार्दिक पाठिंबा आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पुतळा दहनामुळे आमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही बाब श्री. चन्द्रराज गवार यांच्या निदर्शनास आणू इच्छिते. बाकी चालूदेत तुमचे पालथे धंदे, जळजळकुमार!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या भव्य निषेध मोर्च्याच्या नुसत्या कल्पनेनेच प्रस्थापितांची पळापळ झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. @ इंद्रदा ट्रक / गाड्या भरुन माणसे येतील बघा !

In reply to by अवलिया

छोटा डॉन Tue, 10/19/2010 - 12:16
आम्हाला ह्या "लाखोंच्या" सभेचे खरोखर टेन्शन होते. त्यात थत्तेचाचा ऐनवेळी व्यासपिठावर जाऊन बसले. >>गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ? मात्र आता नान्या आला आणि आमचे टेन्शन संपले, आता नुस्ती कागदोपत्री "लाखांची" गर्दी जमणार. प्रत्येक्षात "१ माणुस १० जणांच्या नावे सह्या ठोकुन पैसे ढिले करणार" ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किन्तु नाही. नान्याला तशी सवयच आहे ;) आता शेकडा जमला तरी पुष्कळ, व्यासपिठावरच्या नेत्यापेक्षा खालची जन्ता जास्त असावी हीच सदिच्छा !!! :) - ( अनुभवी ) छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

शुचि Tue, 10/19/2010 - 21:07
मा. संस्थापक परा, पुढील घोषणा कशा मोर्चासाठी वाटतात? :) (१) प्रस्थापित मुर्दाबाद दुर्लक्षित झिंदाबाद (२) १-२-३-४ दुर्लक्षितांचा जयजयकार ५-६-७-८ दुर्लक्षितांशी आहे गाठ (३)कंपूबाजी कंपूबाजी गुंद, उद्दंड भारी पाजी

In reply to by अवलिया

=)) =)) अबे रंगाचे नाही पैशाचे काय करायचे असे विचारत होतो. कुठुन आणायचे ? अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शुचि Tue, 10/19/2010 - 20:47
>> अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय? >> म्हणजे? पैसे वगैरे भरावे लागतील क्का???? नको त्यापेक्षा संस्थेमधून बाहेर पडतो आम्ही . आता कुंपणच शेत खातय म्हटल्यावर .... आम्ही दीन दुर्लक्षितांनी कुठे बघायचं? :(

In reply to by इन्द्र्राज पवार

गणपा Tue, 10/19/2010 - 13:05
वावावा अजुन होळी पेटतीच आहे का येतो थोड्या वेळात उलटा तळहात तोंडावर ठेवुन बोंबा मारायला. आग विझु देउ नकारे तो वर.

अधूनमधून मलाही अशा एरर्स यायच्या तेव्हाचं माझं निरिक्षण की प्रोफाईल एडीट केली तर असा मेसेज यायचा! खवच्या उघड्या असलेल्या टॅब्ज एकदा काहीही खरडी न लिहीता रेफ्रेश करून खरडी टाकल्यावर एरर्स येत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

~~ एकवेळ अरुण कोलटकराची "भिजकी वही" समजेल...पण ही बाई काय लिहित्ये काहीही समजत नाही...! प.रा. यांना वाटेल, 'च्यामारी ते इरर मेसेजेस परवडले, पण हा ठाणेकरी खुलासा नको...." इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

भलत्या वयात भलतं काही बघितलं नाही की असंच होतं इन्द्रा! या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही? तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

".....या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही?..." ये भी कुछ नही समझ्या !! ".....तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??...." उंहूं .... भटिंड्यात नाही...इकडे कोल्हापुरात आहे....वकिलाच्या 'त्या' प्रकरणाबाबतच्या नोटीशी आल्यात ढीगभर....आणि तसाच ढीगभर पाऊसदेखील कोसळत आहे कोल्हापुरात...पुण्याप्रमाणेच... डोक्यातदेखील गिज्ज झाल्ये ढीगभर....'भिजकी वही' च जणू सेकंड एडिशन ! इन्द्रा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....केसरी जीवन घेत चला...." ~~ आता हे काय असतं? मला शनिवारवाडा परिसरातील गायकवाड वाड्यात असणारा 'केसरी' माहित आहे, पण 'केसरी-जीवन' हा कुठला द्वंद्व समास आहे आणि तो कुठे मिळतो वा त्याचा काय उपयोग करतात याचा अभ्यास नाही. त्यामुळे भिजकी वहीच्या संदर्भात ती मात्रा चालणार नाही असे वाटते. "...अगदीच काही नही तर ३०+ तरी..." ~ हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

Nile Mon, 10/18/2010 - 23:17
हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते.
ओ पवार, तुमची हार्डडिस्क कीती टीबीची आहे हो? का भरपुर एक्स्टर्नल एच डी पण मिळाल्यात तुम्हाला?

In reply to by Nile

अहो, तसं काही नाही ओ नाईल जी ! आम्ही आपलं त्या मोकाट सुटलेल्या बकरीसारखं दिसल त्या शेतातील, प्लॉटमधील चारा खात हिंडत असतो आणि तेच मग डोक्यात आपसुक बसतं, पुढे केव्हा केव्हा रंवथ करताना काही मेंदूच्या कप्पात आत जावून बसलेल्या गोष्टी आठवत राहातात, इतकंच ! आणि अजून इथं एकट्याच्या राहाण्याचा पत्ता नाही, अन् मग एक्स्टर्नल एच.डी. कुठून आणू ? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

ये भी कुछ नही समझ्या !!
बाळा, या वयात मिपासारख्या सायटींवर वेळ घालवण्यापेक्षा काही बर्‍या पॉपकॉर्नी साईट्स पहात चल एवढंच बोलू इच्छिते!

In reply to by पैसा

काय नशीब !!! या तिघी खरं म्हणजे म्हणजे रॅमसे बंधूंच्या बहिणीच आहेत...एकापेक्षा एक टेरर...हॉरर !! तुम्ही तिघींनी आपापले पाय पुढे करा म्हणजे मी डोके ठेवतो त्यावर ! अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे आणि दुसर्‍या बाजूला वकील 'त्या' घरबांधणीमुळे रक्त पीत आहेत....इथे भटिंडा आणि तिथली भानगड कुठून आली ???? इथे चिरमुरे फुटाणे खायाला खिशात पाच रुपये नाहीत....आणि भांगरा कुठला करतोय !! इन्द्रा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile Mon, 10/18/2010 - 23:15
"वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या खर्चुन खरडवहीची सोय केलेली आहे" असं म्हणण्याची सोय सुद्धा उरली नाही सद्ध्या!

In reply to by Nile

पुष्करिणी Mon, 10/18/2010 - 23:51
आमच्या वैयक्तिक गप्पांत तुम्हांला का हो इतका इंटरेष्ट निळोबा आणि वैयक्तिक काय , पवारसाहेबांच्या समोर इतका जटिल प्रश्न आहे तो सोडवतोय

In reply to by इन्द्र्राज पवार

पुष्करिणी Mon, 10/18/2010 - 23:40
अरे वा,एकदम मुहूर्तावर घर बांधायला काढलस की भटिंडात ..अभिनंदन हं! (होणार्‍या) सासर्‍यांना न सांगता असं काही केलं तर कोर्टाच्या नोटीसा येणारच ना.. पण आईलातरी सांगायला हवं होतं हं! आणि चार - दोन रूपये कशाला हवेत..आख्खी बँक आहेकी खिशात आता

In reply to by इन्द्र्राज पवार

स्पंदना Tue, 10/19/2010 - 09:01
>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे >>>>> माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी..........

In reply to by स्पंदना

"....माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी.........!!" अगं अपर्णा.... आपल्या कोल्हापुरातील मुली या इथल्या तिघींना नको आहेत माझ्यासाठी ! फार दुष्ट आहेत.... मी असाच कायम जसलमेरच्या वाळवंटात राहुटी बांधून सरडे अन् साळींद्र पकडत बसावे असे या तिघींना वाटते. इन्द्रा

In reply to by गणपा

सर्वश्री असुर, विजुभाऊ, गणपा....असे नाही ओ मंडळी...., तशा त्या तिघी चांगल्याच आहेत....मायाळु आहेत....काळजी घेतात माझी....[म्हणजे त्यांना वाटत असते कायम....आहे एकटाच, करू दे बिचारा लग्न, मग कळेल पुस्तक आणि पासबुक यात महत्वाचे काय असते ते.... आणि लागू दे भाकर्‍या थापायला, बाजार करायला....यासाठी], त्यामुळे जरी तशा त्या रोहिणी-नीला खाणार्‍या, रक्तपिपासू असल्या तरी त्यांची नावे माझ्या रेशन कार्डावरून काढून टाकावित असे कधी मला वाटणार नाही. राहता राहिला....सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न.....तर ते लग्नाच्या वेळी पाहून घेतो...त्यावेळी भावाने थोरल्या बहिणींचे पाय धुवायचे असतात, असा काही प्रकार असतो असे म्हणतात ना? [आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको आहे असे त्यांनी यापूर्वीच कळविले आहे....बघा, किती मोठ्या मनाच्या आहेत...] असुरबाबा,.....ओळी तीनपेक्षा झाल्या आहेत. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

Nile Tue, 10/19/2010 - 18:17
आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको
मी चुकुन मानापमान वाचलं, म्हणणार होतो, हो हो अपमानाची जबाबदारी त्या तिघीच घेतील. ;-) (पळा च्यामारी)

In reply to by पैसा

असुर Tue, 10/19/2010 - 19:26
गैरफायदा घेणार्‍यांचा जाहीर णीसेद! णीसेदसभा दि. २० रोजी पणजी/पुणे/ठाणे/बेसिंगस्टोक या ठिकाणी होईल. :-) मा. इन्द्रादा ('चंद्ररावजीपंतसाहेब' हे आलंच), मी सर्वश्री असुर की असुरबाबा हे ठरवा की आधी! एकाच प्रतिसादात नानाविध अवतार घेण्याइतकी ताकद अजून नाहीये माझ्यात. तुमचा प्रतिसाद सुरु होताच संपला म्हणून एक शंका वाटून गेली इतकंच. आपल्याकडे लोक कशावरुन दंगा घालतील काय नेम नाही! :-) आणि कोण तो ज्याने तुमच्यावर हे आरोप केले, त्याला पाशवी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. त्याचा कुकर आणि तवा लवकरच चोरीला जातो की नै बघा! ;-) --असुर

In reply to by असुर

पैसा Tue, 10/19/2010 - 22:50
पाशवी शक्तीना तुमच्या आसुरी शक्तीचा पाठिंबा मिळालेला पहून धन्य धन्य वाटलं! णिसेद सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करा असे आवाहन सर्व पाशवी शक्तीना करण्यात येत आहे.

प्रियाली Mon, 10/18/2010 - 17:30
तुमच्या खरडवहीवर पेश्शल कार्यवाही झालेली आहे. ;) इतरांना नडणार्‍या सदस्यांना तांत्रिक कारणांनी नडवण्याचा संपादक मंडळाने नवा मार्ग शोधला आहे. ;) (ह. घ्यावे)

In reply to by प्रियाली

अवलिया Mon, 10/18/2010 - 17:38
या निमित्ताने संपादक मंडळातील काही जण सदस्यांना नडवावे या मताचे आहेत हे समजलं. (अजिबात हलके घेऊ नये ;) )

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 18:33
>>मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय. व्यनीसंदर्भात केवळ "सहजरावां"च्या तक्रारीची दखल घेतली जाईल. बाकीच्या वापरकर्त्यांचा चिल्लर वापर लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे. तोवर बाकीच्यांनी उगाच "माझी फ्री-किक आजकाल झॅवीसारखी जात नाही"च्या सुरात व्यनीच्या तक्रारी करु नये. आम्हाला आमचे काम करु द्यात ( म्हणजे नक्की काय ते विचारु नये, अपमान आणि इतर बरेच काही होईल ) - छोटा डॉन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया Mon, 10/18/2010 - 17:40
त्यासाठी खरड व्यनी करावे लागतात. तुमचं आपलं "गुपचुप बैठे हो जरुर कोई बात है" असं असतं

नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 17:41
मला पण मधून मधून हा प्रॉब्लेम आज येत आहे. :( पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये. ;)

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 17:47
>>मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये हां ऽऽऽ थत्तेचाचा, बीग ब्रदर इज वॉचिंग हां !! - छोटा डॉन

In reply to by नितिन थत्ते

पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये.
बघा, बघा, हे खरे चाचा. इतरांबद्दल किती कळवळा. किती कणव. किती दया. किती हे. किती ते. पाणावले. ;)

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 17:44
ज्यांना ज्यांना असे एरर येताहेत त्यांना त्यांची पापं भोवत आहेत असे स्पष्ट सांगु इच्छितो. पापाच्या प्रमाणानुसार देव शिक्षा करत आहे, ह्या हिशेबाने अदितीचे खातेच ब्लॉक व्हायला हवे, पण असो. ;) आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे. माझा आजपासुन देवावर व मास्तरांवर विश्वास वाढला. आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन. तोवर पराने माझ्या खरडवहीत "माझी चुक झाली" ही खरड १०० वेळा टाकावी असे सुचवतो. - छोटा डॉन

In reply to by अवलिया

आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.
आता डान्याए मास्तरच डान्याला बाबा म्हणत होते हे ऐकून पापं कोणाची जास्त तेच कळेना मला. असो. आपल्याला काय...

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 17:58
ओ मालक*, जरा जपुन. इथे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जातो, उगाच पुन्हा मागाहुन तक्रार करु नका. * मालक : इथे मालक हे संबोधन आहे, ह्याचा अर्थ असा नाही की बिपिनदा खरेच मालक आहेत. तसेच बाबाचेही आहे, पण मालक असलेले बिपिनदा हे सम्जुन घेण्याची शक्यता नाही, म्हणुनच ते कदाचित मालक आहेत ;) - छोटा डॉन

In reply to by अवलिया

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 17:50
विज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी ( ह्यावर खरे तर मला एक डिट्टेल लेख लिहायचा आहे / होता, पण असो ) ह्याविषयी घोर अज्ञान असणार्‍या उपरोक्त प्रतिसादाला "फाट्यावर" मारले आहे. कळावे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

असुर Mon, 10/18/2010 - 17:49
ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार| त्यांसी दिसतो देव 'लवकर', असुर म्हणे|| पराजीरावांना पुखशु!!!! --असुर

In reply to by सुहास..

मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 18:01
कशाला उगाच सुहाश्याला शिकवायच्या भानगडीत पडतात ? सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे ( बाळ सुहास, आज एवढाच शब्द घोटुन ये, उद्या बाकीचे पाहु, कसें ? ) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सुहास.. Mon, 10/18/2010 - 18:08
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे >>> हे हे हे ..चल तस तर तस !! पण माझा प्रश्न अनुत्तरीतच रहातो ना ? वत्स डॉन !! महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .हे म्हणजे (नारळाच्या काथ्यासदृश दिसणारा)आपल्या (नारळाईतकाच मठ्ठ)डोक्यावरील महिरप वाढवण्यासारखं काही आहे का ?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुहास.. Mon, 10/18/2010 - 18:12
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा >>> शेपुट घातले आहे (मी नव्हे डॉन्यानी) असो ... नवीन लेख लिहावा वाटत आता ..अर्धमागधीचा ऊगम आणी एक फटाल ऐरर

In reply to by विनायक प्रभू

सुहास.. Mon, 10/18/2010 - 18:58
मास्तरांनी केलेल्या विश्लेषणाशी असहमत आहे .. प्रश्न फरकाचा नव्हताच मुळी , प्रश्न होता की महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .

In reply to by सुहास..

मेघवेडा Mon, 10/18/2010 - 18:00
वाढवून आणि वाढून मधला फरक कळाला असता तर असा प्रश्न पडला नसता.. म्हनुन सांगित व्हतो शेट.. शालंत जा शालंत जा.. बगलात .. हिशेब चुकला ना.. :D

शुचि Mon, 10/18/2010 - 17:56
"Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494" हा मेसेज मला देखील येतोय दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय? :P का ते स्वतःच गंडले आहेत?

In reply to by शुचि

सुहास.. Mon, 10/18/2010 - 18:41
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय >>> अहो शुचीतै !! त्यांनीच तर प्रकरणाला धागावाचा फोडली ना !! मेम्बर दुर्लक्षीत पँथर

In reply to by शुचि

सुहास.. Mon, 10/18/2010 - 19:17
तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे >>> अभ्यास , अभ्यास ,अभ्यास कमी पडतोय आपला शुचितै !! आम्ही पर्‍याच्या कुठल्याही मिपाजामिक संघटनेत बाय डिफॉल्ट असतो

इंटरनेटस्नेही Mon, 10/18/2010 - 18:07
अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक मंडळाचे अध्यक्ष श्री. प. रा. राजवाडे यांना असा त्रास सहन कारवा लागत आहे हे पाहुन डोळे पाणावले. निषेध! निषेध! निषेध!

In reply to by इंटरनेटस्नेही

गणपा Mon, 10/18/2010 - 18:09
बिका तुम्हाला मिळालेला एक रुमाल यांना पण द्या. बाकी पर्‍याचा धागा हॅक कसा करावा ते या संपादकांना विचारा ;)

In reply to by गणपा

बाकी पर्‍याचा धागा हॅक कसा करावा ते या संपादकांना विचारा
गप बे... मोठ्याने बोलू नको. बाय द वे... पराला दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या की नाही? तो लै भारी शुभेच्छा देतो. ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

पैसा Mon, 10/18/2010 - 19:39
उर्फ इण्टरनेटप्रेमी, तुझ्या खवमधे काही लिहिलं तर fatal error मेसेज येतोय. पण मेवे, प्रभो, इंद्रा यांच्या खव नीट चालू आहेत. काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. ;)

In reply to by पैसा

इंटरनेटस्नेही Mon, 10/18/2010 - 21:36
काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय ही ही ही ही ही हहे हेहे हे एहे हेह हॅ हॅ हॅ! (खास हे संबोध्न वाचुन जसं हसायला आलं तसं टंकलं आहे!) (खास) इंट्या.

Nile Mon, 10/18/2010 - 18:15
कोण किडे करतोय रे कोडात? डान्रावांना सांगा की कोड दुरुस करायला, ते नुसते कोडकडे पाहुन कोड कंपाईल करतात!!

In reply to by गणपा

वा स्टाईल तर जमली. त्याखाली
-गणात्या
अशी सही करायची होतीस. पण नाही केलेस ते चांगले झाले. नाहीतर 'गणात्या' म्हणजे गणा + आत्या असे समजून गणा हा हा नसून ही आहे अशा गैरसमजातून काही जेष्ठ सभासदांनी 'मज्यंशी मयत्री कर्नर कं' अशा खरडी टाकल्या असत्या. असो. गणपा वाचलास रे.

Nile Mon, 10/18/2010 - 18:24
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, डान्रावांचा केस कोडात अडकल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

In reply to by Nile

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 18:28
ह्या अडचणी सोडवताना "Nile" ह्या सदस्याच्या खात्याचे किंचित नुकसान झाले आहे. ते दुरुस्त करोस्तोवर सदर खाते पुढील घोषणेपर्यंत बंद राहिल. गैरसोईकरता क्षमस्व !!! - छोटा डॉन

श्रावण मोडक Mon, 10/18/2010 - 18:33
या धाग्यावर अद्याप सहज आणि धमु यांचे प्रतिसाद नाहीत. म्हणजेच हा प्रश्न खरा नाही. पऱ्याने टाकलेला "दूसरा" आहे हा.

In reply to by श्रावण मोडक

गणपा Mon, 10/18/2010 - 18:38
श्रामो काका, व्यनी आणि खव अनुक्रमे सहजराव आणि धम्याला वचकुन असावेत. आय बिशाद लागुन गेली आहे त्यांची या महानुभवांना नडण्याची. ;)

In reply to by गणपा

छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 18:46
काका ? ही हिंमत ? श्रामोकाका, तुम्हाला काका म्हटल्याबद्दल ह्या गणपावर काय अ‍ॅक्शन घेऊ ते नुस्ते सांगा, चांगला धडा शिकवु ह्याला. काय म्हणता ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

श्रावण मोडक Mon, 10/18/2010 - 19:08
हलकट! निमित्त साधून घेतोस काय? बघून घेईन. पुढं मागं संधी मिळेलच. अजून दोनाचे चार व्हायचे आहेत तुझे. नीट होऊ द्यायचं आहे ना? ;) आता हे सगळं ह घ्या हेही सांगावं लागणार आहे का?

चिंतामणी Mon, 10/18/2010 - 23:26
अजून एक XXXXधागा. :( सुज्ञास अधिक सांगणे न लगे. (वैधानीक इशारा- Xच्या संख्येचा आणि अपेक्षित शब्दातील अक्षरांची संख्या सारखीच असेल असे नाही) ;)

चिंतामणी Mon, 10/18/2010 - 23:49
मला बर्‍याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे. मिपाचा लाडका डायलॉगपापी लोकांना फटु दिसत नाही. हा प्रकार तसाच असावा असे वाटते. तज्ञांनी मार्गदर्शन करावे अशी पामराची माफक इच्छा आहे. :( ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

चिंतामणी Tue, 10/19/2010 - 09:22
१०० प्रतिसाद होउन गेलेत आणि "आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो" असे गौरवोद्गार (?) काढलेत म्हणुन प रा बसायला बोलवेल (कमीशन मिळाले तरी) अशी अपेक्षा ठेवु नका.

विजुभाऊ Tue, 10/19/2010 - 10:50
परा जेवायला बोलावेल आणि वर जेवण कुठे आहे असं विचारेल! परा च्या ( पुणे ३० च्या ) भाषेत जेवायला या . म्हणजे तुम्ही जेवण घेऊन आमच्या कडे या असा होत असावा

In reply to by विजुभाऊ

इंटरनेटस्नेही Tue, 10/19/2010 - 17:35
आम्ही तर पुणे - ३० मध्ये वास्तव्यालाच होतो काही काळ... आम्ही तिकडे अनुभवलेला पाहुणाचार http://www.misalpav.com/node/13771 इथे वाचता येईल. :) बाय द वे.. पुणे ३० मधील सुगरन्स या हॉटेलातील मटणाची सर कशालाच येणार नाही! (नॉनव्हेज प्रेमी) इंट्या.