(गावात प्लेग)
सार्या उदास वाटा, कापीत चाललो मी
होउन मूषक काळा, शापीत चाललो मी
नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने,
ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी
वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे,
तो घास नासलेला, शोधीत चाललो मी,
काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो,
मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी.
पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत,
प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी.
( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही..
खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय..
)
आई गं .... काय पण विषय
अगदी
हीच प्रतिक्रिया उमटली.
हीच प्रतिक्रिया उमटली.
हीच प्रतिक्रिया उमटली.
तुमच्या सगळ्याच प्रतिक्रिया
रिप्लाय केला तरी रिप्लाय
तुम्ही हिंदी मालिका फार पाहता
सॉल्लिड!
हे सुद्धा छान! 'गाठ'दार
आहाहा काय कवीकल्पना !!
ठीक
व्वा!
शी...!