(शापीत मेघ)
आमचीही प्रेरणा http://www.misalpav.com/node/14884
पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी,
लवते न तोच पाते, कापीत चाललो मी,
वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली,
हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी.
पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा,
पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी,
बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे,
घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी,
पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी,
औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
आवडले .. वाचुन हसु आले
छान...
हॅ हॅ हॅ
भा.पो.
पाकीट
लै भारी...वेगळ्या पठाडीतलं..
क ड क!
एक लिहु का मी पण परत ?
होऊन जाऊ दे की! श्रामो: =))
वाहवा
एकदम झकास पयल्या धारंचा माल
झकास हो अडगळभौ!
मस्तच!
मस्त
मस्त!!
लै खास!
मस्त