(शापीत मेघ ) ...
आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने.
सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी
सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ?
रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले
अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी
रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न
झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी
झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले
नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी
डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे
आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी
क ह र!!! रे भावा..
मस्त!
विडंबन कसं, लगेच समजतं! जमलंय
छान जमलंय. मूळ कवितेपेक्षा
वा रे वा
पैसा ताई गझल नाहीये वरील ..
हे खरे