✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

प — पाषाणभेद, Wed, 09/15/2010 - 04:56
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर? शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ|| निसती मिरची कुट ग जरा तीचा खर्डा कर ग चवीला बरा भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१|| त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा लाव भाकरीला एक हात लोण्याचा घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं लवकर टाक त्यात उलीसा गुळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||२|| उगा नको जास्त सैपाक करू नको हातावर हात तू धरू मला जायाचं हाय लई लांब काय नाट लावती म्हनं "जरा थांब" वाट आडवून थांबवू नको मला बळंबळं शेतात जायाची माझी झाली आता येळ ||३|| नांगर घेवून जातो मी ग मळा मंग दुपारच्याला तू बी ये की जरा खुरपणी करून तण काढू भरभरा पाखरं उडवूया करून दगडी मारा कवाधरनं थांबावं आम्ही झाली की ग सकाळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १५/०९/२०१०

प्रतिक्रिया द्या
1956 वाचन

💬 प्रतिसाद (4)

हा हा मस्त!!

शुचि
Wed, 09/15/2010 - 05:08 नवीन
हा हा मस्त!!
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Wed, 09/15/2010 - 07:35 नवीन
दफोराव च्यामारी तुम्ही येग येगळ्या इषयावर लय मस्त मस्त कविता करुन राह्यलात बघा...
  • Log in or register to post comments

त्याच्यासंग दे ग तू कांदा

विसोबा खेचर
Wed, 09/15/2010 - 10:46 नवीन
त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा लाव भाकरीला एक हात लोण्याचा घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं लवकर टाक त्यात उलीसा गुळ
केवळ अपतिम कविता..!
  • Log in or register to post comments

एक फार सुंदर कविता

NEWYORKER
गुरुवार, 09/16/2010 - 01:13 नवीन
जिवंत चित्रच उभे केले आहे. शेतकय़ाचे जीवन आणि इतर श्रमजीवी लोकांच्या जीवनात फरक फार नाही!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा