✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सैपाकाची पथ्ये

र
राजेश घासकडवी यांनी
Wed, 08/04/2010 - 08:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31480 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

पूर्वी १४ विद्या व ६४

Nile
Wed, 08/04/2010 - 12:14 नवीन
पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे.
याबद्दल अधिक वाचायला आवडेल. खास करुन जर तुम्ही अशा पुस्तकांचे परिक्षण लिहलेत, त्यातील दोन चार रेसीप्यांचे फोटू टाकलेत तर उत्तम. अशाच एका पुस्तकाबद्दल ऐकले होते, पण त्यात फक्त वेगवेगळ्या रेसीपी करतानाचे फोटुच होते फक्त, बाकी कसे करावे वगैरे काही माहिती नव्हती. तुम्ही म्हणता ते खरे असेल तर अशा गुप्त गोष्टी बाहेर यायलाच हव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

तुमचा आमचा सेम मुद्दा.

Nile
Wed, 08/04/2010 - 11:31 नवीन
अहो मी तेच म्हणले आहे, फारतर मुलींना थोडेफार शिक्षण मिळते (दिले जाते असे नाही) अदिती म्हणते त्याप्रमाणे ताई वगैरे कडुन असेल. बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड

शहराजाद
Wed, 08/04/2010 - 11:51 नवीन
बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे.
क्षमस्व. नावावरून कळले नाही म्हणून मुळात मी संदिग्ध लिहिले होते. नाईल हे नदीचे नाव असल्यामुळे कदाचित तुम्ही स्त्रीही असू शकाल असे वाटले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

असु द्या हो, खरं तर गेले दोन

Nile
Wed, 08/04/2010 - 12:27 नवीन
असु द्या हो, खरं तर गेले दोन तीन दिवस सैपाक विषयावर मी दाखवलेल्या रुचीमुळेही कदाचित असु शकेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

सैपाकात रूची दाखवली म्हणजे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/04/2010 - 12:32 नवीन
सैपाकात रूची दाखवली म्हणजे आयडी स्त्रीचाच असेल किंवा पुरूषाचाच असेल हे असे स्टीरीओटाईप्स बदलायला हवेत. सैपाक शिकण्यात हे ही एक पथ्य शिकवलं गेलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

:)

ऋषिकेश
Wed, 08/04/2010 - 09:50 नवीन
माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते.. बॅचलरहूड मधे ठिक आहे. एकदा स्त्री-पुरूषांचं लग्न झालं (प्रसंगी लग्न न होताही एकत्र राहत असल्यास) एकमेकांकडून-एकमेकांसाठी सैपाक करून घ्यावासा वाटु लागतो. व त्यात गैर काहिच नाहि. एकमेकांना सैपाक करून घालणे ही भारतीयच नाहि तर अखिल मानवीय संस्कृती आहे सैपाक करण्यास कंटाळा येणे, कमी मजा येणे, ताकद नसणे वगैरे कारणांमुळेच बाजारात सैपाकाची अनेक आधुनिक साधने मिळतातच! :) :)
  • Log in or register to post comments

माणसाला 'स्वयं'पाक करणे

Nile
Wed, 08/04/2010 - 09:53 नवीन
माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते..
खरे आहे, पण म्हणुनच काही फास्ट रेसीपीज अस्तित्त्वात आहेत. याचे धडे लहानपणी मिळाले असते तर बॅचलहुड अधिक सुखकर झाले असते. ह्या रेसीपीज अर्थात सद्ध्या अनेक लोक स्वानुभवाने शिकतातच, पण मग चुका होतात वगैरे. म्हणुन पुन्हा बॅक टु माय पाईंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा

ऋषिकेश
Wed, 08/04/2010 - 09:55 नवीन
सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा विषय सुरू करता येईल म्हणणर होतो. पणे तिथे काहि अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय इतक्या लहान वयात सैपाकाची उपकरणे वापरण्याने सैपाक शिकवण्याचा मुळ उद्देश साध्य होत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

असे काही नाही. शाळेत सुरुवात

Nile
Wed, 08/04/2010 - 10:23 नवीन
असे काही नाही. शाळेत सुरुवात झाली तर उत्तमच. सहज सोप्या गोष्टी तिथे शिकवता येतील. उदा, कोशींबीर बवनणे वगैरे. एकदा का सैपाकाची भिती मेली, की आयुष्यात पुढे अडचण येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

थोडे मतभेद आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/04/2010 - 10:26 नवीन
थोडे मतभेद आहेत. विशिष्ट काही पाकृ शिकण्यापेक्षा 'स्वयंपाकाची पूर्वतयारी' असे धडे शाळेत गिरवता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बव्हंशी सहमत. बव्हंशी यासाठी

ऋषिकेश
Wed, 08/04/2010 - 10:30 नवीन
बव्हंशी सहमत. बव्हंशी यासाठी कारण काहि उत्साही मुले व मुली पूर्वतयारी शिकवली की लगेच टिव्हीवर बघुन अथवा कुठेतरी वाचुन विशिष्ट पाककृती करू पाहतील. अर्थात मित्रांकडून पाककृतीची चुकीची माहिती होऊन पुढे प्रॉब्लेम होण्यापेक्षा शाळेत शिकवलेली बरीच बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तेच म्हणणे आहे. पण

Nile
Wed, 08/04/2010 - 10:35 नवीन
अहो तेच म्हणणे आहे. पण मुख्यतः हे शिक्षण पुस्तकी असणार म्हणुन किमान कोशिंबीरीसारख्या सोप्या कृती करायला शिकवण्याने त्यांनाही कृतीचा अनुभव येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शाळा

राजेश घासकडवी
Wed, 08/04/2010 - 10:37 नवीन
तुम्ही शाळेचा उल्लेख केल्यामुळे एक मुद्दा मांडावासा वाटतो. शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. या महत्त्वाच्या विषयाचं ज्ञान केवळ बाय द वर्ड ऑफ माउथ व्हावं हे लांच्छनास्पद आहे. शिक्षणाच्या आधिकारिक धोरणात या महत्त्वाच्या विषयाची किमान तोंडओळख करून देण्याची दखल घेतली जावी असं आम्हाला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/04/2010 - 10:58 नवीन
अन्न वस्त्र निवारा वगैरे गरजातील अन्न ही मुलभुत गरज आहे. वस्त्राची तमा न बाळगणारे अनेक आहेत म्हणुनच प्राधान्यक्रमात अन्न हे प्रथम आहे. अन्न या मुलभुत गरजांकडे लक्ष देण्यासाठी सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती नक्कीच लांछनास्पद आहे. विचारवंतांनी याचा विचार केला पाहिजे. आता काही लोक सैपाक हा शिक्षणाचा विषय आहे की संस्काराचा? तो शाळेत शिकवला जावा कि समाजात? असे प्रश्न उपस्थित करतील ही. पुर्वी गुरुकुल पद्धतीत निसर्गाकडुनच काही शिक्षण व्हायचे. सैपाकाचा कच्चा माल हा शेवटी निसर्गाकडूनच मिळतो . आदिमानव हा पुर्वी कच्चे मांस खात असे. अरण्यात वणवा पेटल्यावर भाजले गेलेले प्राणी हे अधिक रुचकर लागतात हे त्याला निसर्गोत्पातामुळेच समजले. मसाल्याचे पदार्थ वापरल्यामुळे अन्न अधिक काळ टिकते हे देखील त्याला निसर्गातुनच समजले. पण माणुस हा वेगळा प्राणी आहे. प्रत्येक वेळी ठेच लागल्यावरच शिकावे का? पुढच्यास ठेच मागचा शहाणा. कशाला प्रत्येकाने ठेचा खाव्यात? शिक्षणाने माणुस बदलतो. पिढी बदलते. त्यामुळे सैपाकाचा शिक्षणात समावेश केला पाहिजे. अभ्यासक्रमात थिअरी प्रॅक्टिकल हा भाग ठरवता येईल पण तो नंतर. राजेश म्हणतो तशी विषयाची तोंड ओळख तर प्रथम झाली पाहिजे. रस नंतर निर्माण होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>> शाळांमध्ये सैपाकाच्या

गणपा
Wed, 08/04/2010 - 11:02 नवीन
>> शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आमची शाळा बरीच पुढारलेली होती म्हणायची मग. कार्यानुभव च्या तासांमध्ये थोडफार शिक्षण मिळायच कुकिंग बद्दल. कधी कधी तर स्पर्धा पण असायच्या. लकी मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>कार्यानुभव च्या तासांमध्ये

झिन्ग
Wed, 08/04/2010 - 11:21 नवीन
>>कार्यानुभव च्या तासांमध्ये थोडफार शिक्षण मिळायच कुकिंग बद्दल. कधी कधी तर स्पर्धा पण असायच्या. हे अस असेल तर नक्कीच बरीच पुढारलेली होती म्हणायची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आमच्या शाळेत सिनीअर

Nile
Wed, 08/04/2010 - 12:22 नवीन
आमच्या शाळेत सिनीअर विद्यार्थ्यांनी सैपाकाबद्दल बरीच माहिती पुरवली होती पण बहुतांश माहीती ऐकिव असावी असे तेव्हा वाटत असे. एकट्यापुरता सैपाक करायचे धडे मात्र तेव्हाच मिळाले असावेत. पहिला चहा शाळेत असतानाच केला होता हे आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सध्या सोप्या पाकृ करता येतील

शिल्पा ब
Wed, 08/04/2010 - 09:58 नवीन
सध्या सोप्या पाकृ करता येतील कि नवशिक्यांना... उदा. भात आणि सांबर अथवा रसम...माझा नवरा एकदम फस्क्लास बनवतो... अजून साधी फोडणी देऊन कडधान्ये करता येतील... अवघड काय त्यात ? चवीचं म्हणाल तर हळूहळूच माणूस शिकतो...एकदम कसे येणार ?
  • Log in or register to post comments

शिल्पा काकुंना इथे त्या

Nile
Wed, 08/04/2010 - 10:21 नवीन
शिल्पा काकुंना इथे त्या रेसीपी, फोटुसकट, टाकुन नवशिक्यांची मदत करावी अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/04/2010 - 10:22 नवीन
विनंतीला दुजोरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ठार मेलो......

शैलेन्द्र
Wed, 08/04/2010 - 23:14 नवीन
ठार मेलो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ज्यांना गरज आहे त्यांनी

शिल्पा ब
गुरुवार, 08/05/2010 - 11:07 नवीन
ज्यांना गरज आहे त्यांनी इंटरनेटवरून रेसिपी घ्याव्यात...फोटूसकट उपलब्ध असतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक

लिखाळ
Wed, 08/04/2010 - 11:11 नवीन
चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक झाली.
अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल. तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते. -- अजानुकर्ण
-- अजानुकर्णाचे मत पाहून चर्चाप्रस्ताव कोणत्या विभागात आहे ते पाहीले. विनोद, विरंगुळा, क्रिडा या विभागात पाहून मजा वाटली ;) शेवटचा दुवा उघडून वाचला नाही. 'कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले :) कळावे... :)
  • Log in or register to post comments

अनुभवी

Nile
Wed, 08/04/2010 - 12:24 नवीन
कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले
लिखाळ काकांकडुन कुकरची शिट्टी काढण्यात रंजन होते की नाही हे ऐकण्यास उत्सुक. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

कुकरची शिट्टी

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/04/2010 - 13:27 नवीन
या पुर्वी कुकरच्या शिट्टीवर कौल झाला होता. (कौलचा दुवा घ्यावा. ) आमच्य मते हे उर्जा नियोजनासाठी याचा उपयोग खुप होतो. कुकरला शिट्टी नसेल तर कुकरचा स्फोट होउ शकतो. कुकरच्या शिट्टीला मनोरंजन मुल्या पेक्षा सुरक्षिततेचे मूल्य अधिक आहे. उर्जेचे योग्य नियोजन केले तर शिट्टीची वेळ येणारच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत

Nile
Wed, 08/04/2010 - 13:49 नवीन
कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत पुन्हा लिहतो. शीटी कडे लक्ष दिलेत तर उर्जाही वाचते अन डाळही शिजते. शिटी न होता शिजवणे लांबवले तर उत्तम. एकाच शिटीस डाळ शिजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कुकरची शिट्टी म्हणजेच कुकरचा

लिखाळ
Wed, 08/04/2010 - 13:53 नवीन
कुकरची शिट्टी म्हणजेच कुकरचा बोळा असावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/04/2010 - 14:20 नवीन
काकांचा मुद्दाही पटला. ऊर्जेचे योग्य नियोजन नाही केले तर (कुकरची) शिटी वाजेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सोवळ्यात किंवा ओलेत्याने

नगरीनिरंजन
Wed, 08/04/2010 - 11:18 नवीन
सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे. सैपाक करताना दृष्टी, चव आणि गंधाबरोबरच स्पर्श हाही एक महत्वाचा घटक आहे. उदा. कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे. तर असा पंचज्ञानेंद्रियांना आनंद देणारा सैपाक करण्यास कोणत्याही पुरुषाने मागे राहू नये. ज्याप्रमाणे जेवण हे उदरभरण नसून यज्ञकर्म आहे त्याप्रमाणेच सैपाक हे एक काम नसून कला आहे. मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

नाही

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/04/2010 - 11:30 नवीन
सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.
तुम्हाला प्रचंड भुक लागली आहे अशा वेळी केवळ धार्मिक परंपरा म्हणुन सोवळ्या ओवळ्यानेच वा ओलेत्यानेच सैपाक केला पाहिजे हा अट्टाहास आनंदा पेक्षा दु:ख देणारा आहे. अशा वेळी पारोश्याने जरी सैपाक केला तरी अन्न वेळेवर मिळणे हा भाग अधिक महत्वाचा असतो. पण हा स्खलनशील विचार धर्मपंडितांनी पाखंडी ठरवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

स्पर्श, गंध

राजेश घासकडवी
Wed, 08/04/2010 - 12:10 नवीन
नगरीनिरंजनभाऊ, तुम्ही एकदम चोक्कस बात केलीत. सर्वसामान्य पाककृतींच्या पुस्तकांत रुक्ष मोजमापं, पदार्थांची जंत्री व यांत्रिक कृतीचं वर्णन इतकंच असतं. पण पंचेंद्रियांना सैपाकातून आनंद मिळू शकतो हे अगदी खरं आहे. उदरभरण हे केवळ अंतिम ध्येय असतं. खरा आनंद असतो तो तिथपर्यंत पोचण्याच्या मार्गात. एकाच वेळी भूक वाढवण्याचं आणि मग ती भागवण्याचं भाग्य मिळतं त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मला स्वतःला सैपाकात प्रचंड

Nile
Wed, 08/04/2010 - 12:20 नवीन
मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.
वा वा! पारंगत पुरुषानी IT wife असे धागे काढुन रडारड करण्यापेक्षा गरजु स्त्रीला सैपाक शिकवला तर समाजात एकही अडाणी स्त्री राहणार नाही. (व आपल्या आवडत्या स्त्रीला आपणच सैपाक शिकवु या प्रेरणेने एकही अडाणी पुरुष राहणार नाही) ह्या विचाराने केव्हढा सुखावलो. बाकी असेच आमचे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओलेत्याने सैपाक केल्यास

रामदास
Wed, 08/04/2010 - 13:26 नवीन
अरसिक माणूस ,ओलेत्याने सैपाक करायचा ? अवांतर : दृष्टी, चव आणि गंध आणि स्पर्श गेले ते दिन गेले..... (तूर्तास बेंच बहाद्दूर) रामदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओलेत्याने सैपाक

बेसनलाडू
Wed, 08/04/2010 - 21:26 नवीन
सैपाक हे काम नसून कला आहे, हे मान्य करणे ही एक प्रेरणा होऊ शकेल. स्वतःच्याच जिभेचे चोचले पुरवायचे असतील, तर स्वतःच स्वयंपाक करण्यासारखा परमानंद नाही, हेही खरे! (बल्लवाचार्य)बेसनलाडू ओलेत्याने सैपाक करण्यात कसली अरसिकता रामदासकाका? (ओलेत्याने सैपाक करणारा IT WIFE चा नवरा किंवा) नुकतेच अंघोळ करून बाहेर आलेली, कवेत घेतल्यावर काहीशी ऊन, सुगंधी लागणारी, अंग पुसावयाचा टॉवेल केसांच्या बुचड्यावरून बांधून बाथरोबवरच सैपाकघरात पळून आमटी/भाजी फोडणीला टाकणारी बायको हे 'अन्न हे पूर्णब्रह्म' बनण्यातील एक प्रमुख घटक आहे, असे आमचे ठाम मत आहे :) किंबहुना हे सैपाकाचे प्रमुख पथ्य म्हणून पाळले जावे, अशा मताचे आम्ही आहोत ;) (मतदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

काम असून कला आहे

धनंजय
Wed, 08/04/2010 - 21:30 नवीन
"काम असून (किंवा असल्यामुळे) कला आहे" असे वाचावे. "कलातुराणां न भयं न लज्जा ।"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हे काम कधी करावं?

राजेश घासकडवी
Wed, 08/04/2010 - 21:46 नवीन
कबीरानेच सांगून ठेवलं आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

ऊन, सुगंधी लागणारी

आमोद शिंदे
गुरुवार, 08/05/2010 - 07:34 नवीन
ऊन, सुगंधी लागणारी बायको?? म्हणजे काय? अजाबात झेपली नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

कणकेचे गोळे तिंबणे, दाणे

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/05/2010 - 08:25 नवीन
कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. हा अश्लीलपणा नाही का? काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे डोक्यावरुन गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आता बास हो स्वयंपाकाचे

अनिल २७
Wed, 08/04/2010 - 11:25 नवीन
आता बास हो स्वयंपाकाचे (सैंपाकाचेही) धागे.. कंटाळा आला आता..
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 08/05/2010 - 08:30 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

सगळे स्वयंपाक वाले धागे

गणपा
Wed, 08/04/2010 - 21:30 नवीन
सगळे स्वयंपाक वाले धागे जामीनावर मुक्त झाले कि काय?
  • Log in or register to post comments

ओले ओले

विनायक प्रभू
Wed, 08/04/2010 - 21:38 नवीन
ओलेत्याने 'स्वयं'पाक मस्त होतो.
  • Log in or register to post comments

अररर मास्तर U २ ओलेत्याने

गणपा
Wed, 08/04/2010 - 21:48 नवीन
अररर मास्तर U २ ओलेत्याने 'स्वयं'पाक करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

उपास

विनायक प्रभू
Wed, 08/04/2010 - 21:53 नवीन
उपाशी राहाण्यापेक्षा बरे गणपाजी.
  • Log in or register to post comments

कधी कधी पॉटलक

एक
Wed, 08/04/2010 - 22:21 नवीन
वगैरे करावं म्हणजे..इतरांचा सैपाक कसा होतो? किंवा एखाद्याची (चा) बायको (नवरा) कशी सुग्रण आहे. याचा पण अनुभव येईल..
  • Log in or register to post comments

गरज

क्रेमर
गुरुवार, 08/05/2010 - 06:35 नवीन
पोट भरण्यासाठी काम करावेच लागते. सैंपाक कामच असल्यामुळे सैंपाक शिकणे गरजेचे आहे. मी एकट्याने व मिळून सैंपाक केलेला आहे. पण दोनापेक्षा जास्त लोकांनी मिळून सैंपाक करण्याचा प्रयत्न केल्यास डिश बिघडण्याची शक्यता असते. (आम्ही तसा प्रयत्न अजुन केलेला नाही/ करण्याची शक्यता-संधी दिसत नाही.) पूर्वीच्या आमच्या स्वाक्षरीत अशा एका टूमेनीपणाने बिघडलेल्या पदार्थाबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

भेसळीचा परिणाम

क्रेमर
गुरुवार, 08/05/2010 - 06:40 नवीन
नुकतेच अन्नपदार्थात होत असलेल्या भेसळीबाबत वाचले. अशा प्रकारच्या भेसळीमुळे सैंपाकावर तसेच पदार्थाच्या अंतिम रूपावर काय परिणाम होऊ शकतात? जाणकारांनी फोकस मारावा.
  • Log in or register to post comments

पथ्ये

सहज
गुरुवार, 08/05/2010 - 07:07 नवीन
आजकालच्या डिन्क (डबल इन्कम नो किड्स)च्या आय टी / मॉडर्न जमान्यात एक दोघांच्या स्वयंपाकाचे जरा अतीच कौतुक होते आहे असे मला वाटते बॉ. आयत्यावेळी म्हणजेच पूर्वसुचना न देता येणार्‍या अनेक पाहुण्यांचे आपल्या पाककौशल्याने पोट भरणार्‍या अन्नपूर्णेच्या महान भारतीय संस्कृती मधे हे तर अजिबात पटतच नाही. वरचेवर मोठ्या मेजवान्या आयोजीत करणार्‍यांची पथ्ये, अनुभव ऐकण्यास उत्सुक! महर्षी वेदव्यास यांनी यावर काही प्रकाश टाकला आहे का? नाही म्हणले तरी द्रौपदीला पाच जणांच्या आवडीनिवडी सांभाळायला लागत असतील ना. तर द्रौपदीची पथ्ये यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल काय?
  • Log in or register to post comments

अक्षयपात्र

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/05/2010 - 10:48 नवीन
वा, द्रौपदीकडे अक्षयपात्र होतं हे तुम्हाला माहीत नाहीसं दिसतंय. (हा शब्द वाचून का कोण जाणे, पण माझ्या एका जुन्या मित्राची आठवण झाली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

च्यायला. सगळ्याच

अर्धवट
गुरुवार, 08/05/2010 - 10:42 नवीन
च्यायला. सगळ्याच सदस्यांविषयीचा आदर शतपटीने वाढला, ही चर्चा बघुन...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा