Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 17:50
  • Log in or register to post comments
  • 16748 views

Book traversal links for पीके - २

  • ‹ पीके !
  • Up
  • पीके - ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 04/25/2008 - 17:52

Permalink

जिराफ !

३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल कारण तो फ्रिजात असतो ना !
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/25/2008 - 17:53

In reply to जिराफ ! by मुक्तसुनीत

Permalink

हे हे हे

वा वा ... च्यामारी शुक्रवारची संध्याकाळ साजरी झाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 17:55

Permalink

असा नियम केला तर? ;-)

कोड्याचे लॉजिकल उत्तर जर ते कोडे विचारणारालाच द्यावे लागले, तर इतरांना काय शिक्षा? एक मिसळपाव पार्टी ! कसें? असा जर काही नियम झाला तर मला दोन पार्ट्या मिळतील असा नूर दिसतोय एकंदरीत.. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:00

In reply to असा नियम केला तर? ;-) by वेदश्री

Permalink

सुंबाल्या?

अरे बापरे ! पार्टी द्यावी लागेल म्हणून सगळ्यांचा सुंबाल्या का???? मी नुसतं गमतीने म्हणाले होते.. :))))
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:02

In reply to सुंबाल्या? by वेदश्री

Permalink

इतकं

डोकं पकवणं चांगलं नव्हे. मिसळ पाठवून देतो. पण आता उत्तरं द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:04

Permalink

अहो वेदश्रीताई द्या आता उत्तरं

जास्त पिळू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:05

Permalink

हिंट..

१३ च्या निम्मे ८ रोमन पद्धतीचे आकडे वापरून मिळवता येते का बघा बरं.. पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:07

In reply to हिंट.. by वेदश्री

Permalink

:-०

पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)
आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू!
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:14

In reply to :-० by मनस्वी

Permalink

१३च्या निम्मे ८ आणि पक्याची शास्त्रज्ञगिरी !

>आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू! बापरे ! ठीके.. देते बापडी उत्तरे.. १३ हा आकडा रोमन लिपीमध्ये XIII असा लिहितात तर त्यात मध्ये आडवी रेष मारायची.. म्हणजे निम्मा केल्याचाच प्रकार ना? वरती जो भाग राहील ( VIII ) तो असेल रोमन ८ सारखा.. म्हणजे झाले की नाही १३ च्या निम्मे ८?! आता जाऊया पक्याकडे.. प्रकाशला त्याचे दोस्त काय म्हणायचे - पक्या पक्याच्या उलट काय होते? - कॅप कॅप म्हणजे काय? - टोपी टोपीच्या उलट काय? - पीटो पीटो म्हणजे काय? - मारा माराच्या उलट काय? - रामा रामा हा कोण होता? - देव देवच्या उलट काय? - वदे वदे म्हणजे काय? - बोलो बोलोच्या उलट काय? - लोबो लोबो हा कोण होता - शास्त्रज्ञ.. म्हणून पक्यादेखील शास्त्रज्ञ !!! हुश्श... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:16

In reply to १३च्या निम्मे ८ आणि पक्याची शास्त्रज्ञगिरी ! by वेदश्री

Permalink

जरा...

तुमच्या पायांचा फोटो पाठवा. ते उलटे नाहीत ना पाहू द्या. सरळ असतील तर वंदन करतो. उलटे असतील तर टांगून ठेवतो. आयला काय डोकं पकवलंय... लय भारी. नारायण, नारायण...
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 04/25/2008 - 18:19

In reply to १३च्या निम्मे ८ आणि पक्याची शास्त्रज्ञगिरी ! by वेदश्री

Permalink

ये....आये.....................

अरे काय हे? काय चाललय काय नक्की? मला माझा टी.एल. रोखून बघतोय...नजरेत "च्यायला मेंटल हॉस्पिटलात' फोन करावा लागणार " भाव!!! मी एकटाच गडगडाटी हसतोय पण आणि स्वत:चे केस ओढतोय.... शेजारची तामिळी-कानडी गाढवं बावचळून गेलीयेत.... अगं ए वेदश्रीताई....पाय कुठायत तुझे? फोटो चढव इथेच त्यांचा...हार फुलं हळद-कुंकु वाहीन म्हणतो....
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 04/26/2008 - 18:27

In reply to ये....आये..................... by धमाल मुलगा

Permalink

ही ही ही ही

=)) हे त्या कोडाच्या उत्तरासाठी. धमाल माझी अवस्था देखील तुझ्यासारखीच झाली रे. फक्त आज वीकेंड असल्याने आमचा टी ली लवकर पळालाय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:21

In reply to १३च्या निम्मे ८ आणि पक्याची शास्त्रज्ञगिरी ! by वेदश्री

Permalink

तुझे तोंडभरून कौतुक!

लोबोच्या उलटे काय - बोलो बोलो म्हणजे काय - वद वदच्या उलटे काय - दव दवच्या उलटे काय - वद वदतात कुठून - तोंड तर तुझे तोंडभरून कौतुक!
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:08

In reply to हिंट.. by वेदश्री

Permalink

म्हंटलं ना...

मिसळ पाठवतोय. आईनस्टाईनकन्ये, दे आता उत्तर. भास्कराचार्यकन्ये, दे आता उत्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:08

In reply to हिंट.. by वेदश्री

Permalink

ये... आलं.. मला आलं

XII आणि VII (मधे आडवी रेघ देउन.)
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:09

In reply to ये... आलं.. मला आलं by मनस्वी

Permalink

आईनस्टाईना, भास्कराचार्या...

जरा समजावून सांगा रे हे काय आहे ते....
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:11

In reply to आईनस्टाईना, भास्कराचार्या... by नारदाचार्य

Permalink

मुनीवर्य

मुनीवर्य.... रोमन १३ म्हणजे XIII आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:13

In reply to मुनीवर्य by मनस्वी

Permalink

वर

थोडं चुकलं काय मनस्वी? तिथं बारा आणि सात दिसताहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:15

In reply to वर by नारदाचार्य

Permalink

१२च्या निम्मे ७ !

अरे वा ! म्हणजे नविन पीके १२च्या निम्मे ७ सिद्ध करा !!! :))
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:20

In reply to ये... आलं.. मला आलं by मनस्वी

Permalink

सहीये !

एकदम सहीये मनस्वी ! मला उगाच धमकावलं म्हणजे मगाशी.. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:12

Permalink

नारायण नारायण...

निषेध, निषेध, निषेध. आमचं डोकं खाणाऱ्यांचा आणि त्यानंतर तंगवणाऱ्यांचा निषेध.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Fri, 04/25/2008 - 18:15

Permalink

नारायण नारायण

नारायण नारायण करत नारदाचार्य तुम्ही इकडचे तिकडे करता.... साधी एक काडी तुम्हाला इकडची तिकडे करता आली नाही.;))) तुम्ही कसले हो नारद? ह.घ्या.:))))
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:19

In reply to नारायण नारायण by स्वाती राजेश

Permalink

आम्ही...

नारद नव्हे. नारदाचार्य. ते काड्या इकडून तिकडं करायचे. आम्ही फक्त काड्या घालत असतो. 'ह. घ्या.'ची गरज नाही हो. येऊन जाऊन चार घटका विरंगुळ्याचा इथं हेतू. त्यात ते ह. घ्या. हे टंकीत करण्याचे कष्ट कशाला. सारं काही ह.च घेऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 04/25/2008 - 18:20

In reply to नारायण नारायण by स्वाती राजेश

Permalink

स्वातीताई

ते कोडे पाहून नारद सुद्धा गारद झाला म्हणायचा. बाकी काड्या लावणार्‍या नारदाला साधी एक काडी हलवता येऊ नये याचे आश्चर्य वाटतंय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:24

In reply to स्वातीताई by इनोबा म्हणे

Permalink

नारद सुद्धा गारद

हे आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 04/25/2008 - 18:16

Permalink

वा वा

रोमन १३ म्हणजे XIII आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII हे मला खूप आवडलं ते पक्याचं काय? शास्रज्ञ पकाऊ असतात असं काहीतरी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:20

In reply to वा वा by वरदा

Permalink

वरदा,

थोडं वर जाऊन पहा. उत्तर पडलंय तिथं.
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 04/25/2008 - 18:24

Permalink

अरे

पाहिलच नाही...सॉलीड पकाऊ आहे ... आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:24

Permalink

आर्थिक पीके !

लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 04/25/2008 - 18:29

In reply to आर्थिक पीके ! by वेदश्री

Permalink

:)

लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का? बँक ऑफ बिहार मध्ये गुंतवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:31

In reply to :) by इनोबा म्हणे

Permalink

अम्ह्म..

अम्ह्म.. गुंतवा मग बँकेकडे तोंड ताणा.. वो झोल नहीं मंगता है.. अभ्भीके अभ्भी अपनका रोकडा डबल होनेको मंगता है.. :))
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 04/25/2008 - 18:31

In reply to आर्थिक पीके ! by वेदश्री

Permalink

दुमडा....

दुमडा....
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:32

In reply to दुमडा.... by धमाल मुलगा

Permalink

नाही..

नाही.. दुमडा, फाडा.. असे नाही करायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 04/25/2008 - 18:36

In reply to नाही.. by वेदश्री

Permalink

मग असं करा....

मग झेरॉक्स करा. सोप्पय की नाई? समर्थ झेरॉक्स,डेक्कन जिमखाना,पुणे-४ (आमच्याकडे कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढल्या जातील) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:38

In reply to मग असं करा.... by इनोबा म्हणे

Permalink

नाही

नाही हो.. झेरॉक्स करण्याइतकापण वेळ नाहीये आपल्याकडे. लग्गोल्लग दामदुप्पट पायजेल आपल्याला..
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 04/25/2008 - 18:42

In reply to नाही by वेदश्री

Permalink

आईशप्पथ....

लई पकवलं.आता सांगून टाका एकदाचं. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:43

In reply to आईशप्पथ.... by इनोबा म्हणे

Permalink

शिंपल..

शिंपल.. पैसे आरशासमोर ठेवायचे !!!
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 04/25/2008 - 18:50

In reply to शिंपल.. by वेदश्री

Permalink

वाटलंच

Image removed.वाटलंच होतं,हे असं काही उत्तर असेल ते.(मग सांगीतलं का नाहीस लेका?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:53

In reply to वाटलंच by इनोबा म्हणे

Permalink

ए....

पक, पक, पकाक!
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 04/25/2008 - 18:45

Permalink

एकदा बंदे

देऊन दोनदा सुट्टे मागा..थोडं भांडण झालं तरी चालेल ते घ्याच....
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 04/25/2008 - 18:45

Permalink

हात्तेरीकी

मी उगाच डोकं खाजवलं.....
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:53

Permalink

राजकीय (?!) पीके..

लाल आहे पण मिरची नाही, कृष्ण आहे पण काळा नाही, आड आहे पण पाणी नाही आणि वाणी आहे पण दुकानच नाही.. असे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 18:55

In reply to राजकीय (?!) पीके.. by वेदश्री

Permalink

हा

लालकृष्ण आडवाणी
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:56

In reply to हा by नारदाचार्य

Permalink

:-)

:-) बरोबर !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 04/25/2008 - 18:57

Permalink

बाबौ

अरे ..... श्वास घ्यायला जागा द्याल का नाही ! नुसते टणाटणा फुटाणे फुटत आहेत .... हापिसातले लोक मला वेड्यात काढणार ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 18:58

Permalink

मी पण..

१ आहे पण २ नाही.. सांगा काय?
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 18:59

Permalink

नॉनव्हेजी तरीही प्युअर व्हेजी पीके..

वरून आली घार तिला मारले ठार रक्त पिले घटाघटा मास खाल्ले चटाचटा ! तर असे हे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/25/2008 - 19:00

In reply to नॉनव्हेजी तरीही प्युअर व्हेजी पीके.. by वेदश्री

Permalink

नारळ

कृपया बालवाडीतील कोडी घालू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Fri, 04/25/2008 - 19:02

In reply to नारळ by मनस्वी

Permalink

अगदी

हेच म्हणतोय (दहावी फ) नारदाचार्य
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Fri, 04/25/2008 - 19:04

In reply to अगदी by नारदाचार्य

Permalink

सॉऽऽऽरी !

सॉऽऽऽरी !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com