मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीके !

वेदश्री · · काथ्याकूट
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात? पहिला पीके मीच विचारते.. दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?

वाचने 30693 वाचनखूण प्रतिक्रिया 83

अभिज्ञ Fri, 04/25/2008 - 16:13
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक? कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -) असे असावे. अबब

In reply to by स्वाती राजेश

मन Fri, 04/25/2008 - 22:56
त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल.... कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !! आपलेच, साठ्यांचे कार्टे .

वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:21
अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत. नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?

वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:29
एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:36
अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे ! १३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )

वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:38
एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.

In reply to by वेदश्री

मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:41
कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे. झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!

In reply to by मनस्वी

वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:43
अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)

नंदन Fri, 04/25/2008 - 16:43
एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 16:48
१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते २. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम अशी अजून करता येतील...

नंदन Fri, 04/25/2008 - 16:52
प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by आनंदयात्री

मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:12
तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत.. म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!

In reply to by मनस्वी

आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:14
तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))

In reply to by नंदन

नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:19
आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.

शितल Fri, 04/25/2008 - 17:17
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?

आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:18
मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ... वेदश्री चा विजय असो ! पीके चा विजय असो ! मिपाधर्माचा विजय असो !

धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:23
एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात... पहिला हत्ती पडतो...का? दुसरा पण पडतो...का? तिसरा पण पडतो...का? चौथा पण पडतो....का? शेवटी झाड पण पडते...का का का?

धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:29
बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो. आता सांगा दुसरा का पडतो?

नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:32
पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क. तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो. आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...

शितल Fri, 04/25/2008 - 17:33
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही? अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?

धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:37
दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक! चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक.. आणि शेवटी.............. झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....

शितल Fri, 04/25/2008 - 17:39
एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?

In reply to by शितल

धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:41
हॅ हॅ हॅ.... दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 17:42
भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ". अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ?????? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 17:48
धम्या लेका अगदी सह्ही जवाब. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

शितल Fri, 04/25/2008 - 17:45
बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?

In reply to by शितल

मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:51
अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!

सरपंच Fri, 04/25/2008 - 22:59
या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.