द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३ (अंतिम)
In reply to सुरेख रसग्रहण by वाचक
In reply to कोलटकर प्रणाली....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to कोलटकर प्रणाली....!!! by इन्द्र्राज पवार
जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का?डिस्क्लेमर हे मुख्यत्वे चर्चा मर्यादित ठेवण्यासाठी लिहिलं होतं. संस्थळांवरचं लेखन व त्यावरच्या चर्चा कुठे कशा भरकटतील हे सांगता येत नाही. एखाद्या विभूतीविषयी थोडे वेगळे शब्द आले तर मूळ विषय बाजूला राहून चर्चा वाटेल तिथे जाऊ शकते.
ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का?त्यांनी डिस्क्लेमर्स लिहिली नाही, पण त्यांच्या चिरीमिरीतील काही कवितांतून अश्लीलतेचा आक्षेप घेणार्यांवर टीका केलेली दिसते. (ती त्या लोकांना किती कळली ही गोष्ट वेगळी!) कोलटकरांना माझ्या डिस्क्लेमर्स मधला खवटपणा पसंत पडला असता असं वाटतं.
In reply to कोलटकर प्रणाली....!!! by इन्द्र्राज पवार
ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे.रसग्रहणाने "अरुण कोलटकर" या रसायनापेक्षा 'द्रोण' या कवितेला वाचण्याची चेतना जागविली आहे. .... 'बिनकिमतीचे' डिसक्लेमर मलातरी अत्यावश्यक वाटले. नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून या डिसक्लेमराला बरीच किंमत आहे.
शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात.रसग्रहणाचा अतिशय चपखल शेवट. द्रोणाचा अर्थच उलगडतो. पानाच्या दोन बाजू जोडल्या जातात. सामावू शकणार्या.
In reply to काही मुद्दे....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to काही मुद्दे....!!! by इन्द्र्राज पवार
केवळ श्री कोलटकरांची कविता असा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे................ तुमच्या प्रतिसादात मात्र श्री कोलटकर हे अमुक प्रकारचे कवी आहेत, त्यांना अमुक अमुक दृष्टी आहे, त्यांची तुलना फलाण्या लेखकाशी करता येईल अशा छापाची विधाने आहेत. ज्यांचा 'द्रोण' या कवितेच्या रसग्रहणाशी फारसा संबंध नाही. कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला. .................... आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते.
In reply to अर्थातच by अक्षय पुर्णपात्रे
In reply to "अस्थानी" by मुक्तसुनीत
कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते.हे योग्यच आहे. असा दृष्टीक्षेप व्यक्त करायचा असल्यास त्याचा प्रस्तुत कवितेशी संबंध जोडला जावा इतकेच. केवळ नावांची जंत्री असू नये असे माझे मत आहे. श्री पवार यांना 'द्रोण' व कोल्हटकरांच्या इतर कविता यावर विस्तृत भाष्य करता येईल असे वाटते. त्यांनी तसे न करता एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर असतो तशा छापाचा प्रतिसाद लिहिला आहे. जो मला अस्थानी वाटतो.
In reply to काही मुद्दे....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to कवी, कविता, व पूर्वग्रह by राजेश घासकडवी
In reply to चर्चा....!! by इन्द्र्राज पवार
श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते.हे बरोबरच आहे. वर श्री सुनीत यांना लिहिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या संदर्भांना संदर्भ म्हणता यावेत इतपत बळ पुरविले जावे, निव्वळ शेरेबाजी नसावी.
In reply to ++ by मनिष
In reply to :-) by सहज
पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.एखाद्या समाजात, टोळीत, राष्ट्रात जेव्हा प्रस्थापित व्यवस्था एका गटाला दडपत असते तेव्हा त्यांच्यापुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढून ती बदलणे. दुसरा म्हणजे तीपासून दूर जाऊन (स्वातंत्र्य मिळवून) सवतासुभा बनवणे. इथे दुसर्या मार्गाविषयी लिहिलं आहे. यासाठीही काही भांडवल लागतं. हे कुठून मिळणार, तर निसर्ग व आसपासच्या परिस्थितीतून. त्याच गटातील लोक हेही या परिस्थितीचा भाग असतात. या सर्वांचं प्रतीक म्हणून सीता येते. ती रामाच्या अधीन असली, तरी या वानरांना देखील काही देणं लागते. तिच्याकडून घेतलेली शक्ती म्हणजे हे द्रोण. यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात.
In reply to द्रोण हे प्रतीक by राजेश घासकडवी
In reply to अच्छा by सहज
महात्मा गांधीना द. अफ्रिकेत भारतीय व्यापारी, मजुरांची मदत, लगान मधील मेमसाबची मदत वगैरे आठवले. "द्रोण" किती साली लिहले होते?कोणत्याही शोषणाधारित व्यवस्थेमध्ये शोषक व शोषित यांची एक मोठी साखळी असते, असं मला वाटतं. त्या साखळीतले काही दुवे वरच्यांचं शोषण सहन करून खालच्यांचं शोषण करतात. उदा: जमीनदाराकडे पिढ्यान् पिढ्या राबणारा एखादा शेतमजूर घरी येऊन बायकोला मारझोड करत असू शकतो. इथे सीता व वानरं दोन्ही शोषित आहेत, पण सीता (रामाची बायको असल्यानं) साखळीत वानरांपेक्षा वर आहे. सीतेचं वर्तन याउलटही होऊ शकलं असतं - म्हणजे सासूकडून सासुरवास भोगल्यावर एखादी स्त्री आपल्या सुनेचा आणखीच छळ करून वड्याचं तेल वांग्यावर काढते तसं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की अशा शोषितांच्या साखळीतले भले-बुरे दुवे हे खूप वैश्विक आहेत, कारण ते वेगवेगळ्या प्रकारांच्या शोषणांत सापडतात. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to प्रस्थापित आणि उपेक्षित by चिंतातुर जंतू
In reply to द्रोण हे प्रतीक by राजेश घासकडवी
In reply to गलबत...!! by इन्द्र्राज पवार
"द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे.द्रोण सीता बनवते, हेही महत्त्वाचं आहे. स्त्रीची सर्जनशीलता काहीतरी सामर्थ्यवान घडवते. ते मुळात अस्तित्वात नव्हतं. द्रोणाचा आकारही खोलगट म्हणजे काहीतरी सामावून घेणारा असतो. टोकदार शस्त्रं वगैरे पुरुषी सामर्थ्य दर्शवणार्या प्रतिकांपेक्षा हा सामर्थ्यवान आकार सौम्य, शांत आणि म्हणून सीतेला अधिक साजेसा आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.वानर शोषित कसे काय? रूपक आहे हे समजले. पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का? वर वाचलं की इंग्रज राज्यकर्त्यांनी इथल्या नेटीव्ह लोकांना (वानरांना) त्यांच्यासारखं बनवून आपल्या फायद्यासाठी वापरून घेतलं. पण रामानं रावणाशी युद्ध करण्यासाठी वानरांना माणसाचं रूप दिलं नव्हतं. जर ते तसं रामानं केलं असतं, आणि आपलं काम झाल्यावर पुन्हा त्यांना वानर बनवून टाकलं असतं तर म्हणता आलं असतं की बिचार्या वानरांचं शोषण झालं. शिवाय रामानं किष्किंधेचं राज्य ना स्वतः घेतलं होतं, ना त्याने कुठला रिमोट कंट्रोल ठेवला होता. किष्किंधेतून कर वसूल करून ना तो आपल्यासाठी काही घेत होता ना अयोध्येला काही पाठवत होता. मग वानर हे भरडले जाणारे पददलित कसे काय ठरतात? मुळात ते पददलित नव्हतेच. त्यांचं स्वतःचं राज्य होतं. त्यांच्यात नल नील यांसारखे तज्ञ शिल्पी होते. त्यांचे युद्धशास्त्र पुढारलेले होते, आणि म्हणून तर ते रावणाच्या त्रिखंडजेत्या सेनेशी लढू शकले. मारूती तर श्रेष्ठ आध्यात्मिक व्यक्ती होता. त्याला बुद्धीमंतांचा अग्रणी म्हटलेले आहे. तर असे हे वानर ना पददलित होते, ना भरडलेले होते. तसेच राम काही परकीय राज्यकर्ता वगैरे नव्हता. ना तो जेता होता, ना वानर हे जित. कवितेतली ही पार्टी कुठे झाली? लंकेत की अयोध्येत? जितांच्या अवशेषांवर आणि 'लुटी'वर झाली म्हणजे लंकेतच झाली असावी. वानरांना माणूस होण्याची संधी देऊन इतर माणसांच्या बरोबरीला आणले म्हणजे तिथे माणसं होती तरी किती? राम, लक्ष्मण आणि सीता सोडलं तर तिथं कुणी माणूसच नव्हता. वानरांना माणूस करायची गरजच नव्हती. कुठल्या वानरानं आपल्याला पाच मिनिटांसाठी माणूस होता आलं तर किती बरं होईल असाही विचार केला असण्याची शक्यता वाटत नाही. लंकादेखील लुटली वगैरे जाण्याचे कुठे संदर्भ वाचण्यात आलेले नाहीत. रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले. आणि वर्तुळ पूर्ण झाले म्हणे. पटत नाही. कवीला काहीतरी वाटत असते, ते रूपकामध्ये बसवण्यासाठी एखाद्या सेट झालेल्या कथानकाची उगीच मोडतोड करायची काय गरज आहे? विचार चांगला आहे. जेते, जित, अन-ट्यापड रिसोर्सेस, नवीन तंत्रज्ञानाचे बळ, संस्कृतींचा संघर्ष इत्यादि. चर्चाही चांगली चाललेली आहे. बरेच नवीन मुद्दे समोर येत आहेत. स्त्रीची समावेशक सृजनता, पुरुषांची आक्रमक विध्वंसक वृत्ती. सीता म्हणजे शक्ती, जनतेची एकत्रित सामायिक उपलब्धी, इत्यादि. राम लय भारी वगैरे होता, आदर्श मर्यादा पुरुषोत्तम होता, की शंबूकाला मारणारा, सीतेला नाकारणारा टिपिकल व्यवस्थारक्षक होता या वादात मला पडायचे नाही. तसेच पंचतंत्रात सिंह कसा बोलेल, सिंहाला बोलता येतं का, असल्या शंकाही काढायच्या नाहीत. पण रूपक चुकीचे वापरले आहे असे आमचे स्पष्ट (आणि अडाणि) मत आहे. (अडाण्यांचा) राजा
In reply to असले कसले रूपक by आळश्यांचा राजा
In reply to असले कसले रूपक by आळश्यांचा राजा
पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का?कथानकाला जाणूनबुजून धक्का लावायचा हेतू असेल/ नसेल किंवा रूपक वापरले/ नाही वापरले तरीही महाकाव्यांतून स्फुरलेले साहित्य निर्माण करताना मूळ गाभ्याला धक्का लागतो असे दिसून येईल. उदा. जांभुळाख्यानात द्रौपदी कर्णावर भाळते असे दाखवले आहे. साध्वी समजली गेलेली द्रौपदी परपुरुषावर भाळते यातही कथानकाच्या आत्म्याला, लोकांच्या समजुतीला धक्का आहे. खुद्द उत्तर रामायण प्रक्षिप्त मानले आणि मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे पकडले तर रामायणाच्या उत्तरार्धाला किंवा रामाच्या प्रतिमेला काहीजणांच्यामते धक्का पोहोचतो. मलाही राम आदर्श/ चूक की बरोबर यात पडायचे नाही. एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते. अनेक लोककथा आणि लोककाव्यांतही असे केल्याचे आढळते. थायलंड मधील रामायणात सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी असल्याचे सांगितले जाते. हाही धक्काच. आता कथा अशी बदलल्यावर तिला मूळ वाल्मिकी रामायणाचे संदर्भ लावण्यापेक्षा तिचा आहे त्या स्थितीत आस्वाद घेणे मला योग्य वाटते. म्हणून मला हे रसग्रहण आवडले.
वानर शोषित कसे काय?वानरांना रामाने बरोबरीचे स्थान दिलेले नाही हे निश्चित आहे. तसे ते मूळ रामायणातही आढळते. एवढेच नाही तर श्रेष्ठत्वाचा आणि कनिष्ठ दर्जा देण्याचा प्रयासही दिसतो. कनिष्ठांचे शोषण कसे होते, येथे वानर शोषित कसे आणि त्या अनुषंगाने विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे राजेश देतील असे समजू. मीही वाचण्यास उत्सुक आहे.
In reply to असले कसले रूपक by आळश्यांचा राजा
एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते.कुठच्याही कलाकृतीबद्दल असे आक्षेप घेता येतात. खर्या मुंबई शहरात तुम्ही बटाट्याची चाळ शोधायला गेलात तर तुम्हाला ती सापडणार नाही. पण त्या लेखनाने मुंबई शहराच्या आत्म्याला धक्का पोचतो का? हे थोडंसं टोकाचं उदाहरण झालं. कारण पुलंनी खर्या मुंबईत केलेला बदल हा खूपच मामूली आहे. पण नावेतील तीन प्रवासी मध्ये मिरासदारांनी महाराष्ट्रात एक नवीनच नदी तयार केलेली आहे. ते धक्का लावायला पुरेसं आहे का? मुद्दा असा आहे की साहित्यात येणार्या 'खर्या' गोष्टी या संदर्भापुरत्या येतात. शहराला पुणे, काळ पेशव्यांचा, आणि तिथला कारभारी नाना फडणवीस म्हटलं की लेखकाला चित्रनिर्मिती करणं सोपं जातं. इतर सर्व संदर्भ त्या रेफरन्स फ्रेमशी जोडले जातात. पण कथेत जे येतं ते खरं तर 'पुण्यासारखं शहर, काळ पेशव्यांच्या कालासारखा, तिथला कारभारी नाना फडणवीसासारखा' असंच असतं. त्यापलिकडचं सगळं लेखकाचं. हे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ करता न आल्यामुळेच घाशीराम वर अनैतिहासिकतेचे आरोप झाले. `म्हणून आत्म्याला धक्का, सेट कथेची मोडतोड वगैरे आक्षेप बाद होतात. कोलटकरांनी वानर हे रूपक वापरताना 'वानरांना माणसं खालच्या प्रतीची समजत' हे गृहित धरलेलं आहे. माकडापासून (प्रगत होऊन) माणूस झाला ही समजूत देखील त्यांनी वापरली आहे.
रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले.यातलं 'उपाय' व 'जणू सूड' हे शब्द बरोबर वाटत नाहीत. संस्कृतींच्या विजयाचे वारे कधी इथून तिथी तर कधी तिथून इथे वाहातात इतकंच.
आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या, हे त्याला कसं माहीत असणार? विनाकारण हळहळत तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत. आपण किती भाग्यवान आहोत हे त्याला समजलेलंच नव्हतं शेपटीचं गतवैभव त्याला परत मिळालेलं होतं निरुपयोगी नाकाच्या बदल्यात. इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी. म्हणजे, निसर्गाने जसं घडवलं, तसं राहणं परवडलं, पण निरूपयोगी 'नाक', अर्थात बाह्य सौंदर्य आणि त्या अनुषंगाने येणारी 'प्रगत' संस्कृती, तिने केलेला पृथ्वीचा पचका नको. सीतामाईनं फार मोठं बळ दिलं, समावेशकता दिली. पण झेपली का ती वानरांना? पृथ्वीचा पचकाच केला. गड्या आपुला गाव बरा, जुने ते सोने, या प्रकारचा एक "luddite" विचार दिसतो. काही विचारवंत वानर पूर्वी म्हणालेले असतात - थोडा वेळ गंमत म्हणून हे माणूस होणं ठीक आहे. अज्ञाताची भीति, नवीन गोष्टींविषयी संशय या भावना यात येतात. शेवटच्या सर्गात आपले मत व्यक्त करून कवीने सुचवलेले आहे, की ते विचारवंत वानर बरोबरच होते. असे वाटते. आळश्यांचा राजा
In reply to ओके. अजून एक. by आळश्यांचा राजा
कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी.कवीचं मत त्या बाजूला झुकतंय असं वाटतं खरं. सुसंस्कृतपणा बरोबर जर सीतामाईच्या आईलाच काळीमा फासण्याची जबाबदारी येत असेल तर त्याऐवजी मुळात सीतेकडून दान न घेणंच बरोबर, असं कवी म्हणतोयसं दिसतं. त्यात वर आलेलं नाक हे शिष्ठपणाचं प्रतीक असावं, तर शेपूट हे निसर्गाशी असलेल्या धाग्याचं प्रतीक असावं. किंवा शेपूट हे माणसाने जे गमवलं आहे त्याची गोळाबेरीज असेल. पण पुन्हा हे काव्य वानरांनी लिहिलेलं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते खरोखरच कवीचे विचार आहेत की त्याने 'पपईमुख' चे विचार नोंदवले आहेत हे कळणं कठीण आहे. राजेश
सुरेख रसग्रहण