वा फारच सुंदर माहीतीपूर्ण लेख. इतिहासातील ही घटना म्हणजे इवल्याशा उंदरानी सिंहाला सोडवण्यासारखच आहे. म्हणजे त्या लहानशा होड्यांचा जीव किती पण त्यांनी किती भरीव आणि मोलाचा वाटा उचलला महायुद्धात : )
असे लेख मिपावर यावे. खूप आवडला. सोप्या शब्दात छान लिहीलाय.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
डंकर्क ही एक मोठीच घटना होती. विषेश म्हणजे जर्मनीने हे का होउ दीलं याच्याविष्यी बरेच तर्क वितर्क केले जातात. एक श्क्यता अशी की जर्मन आर्मीला सगळं श्रेय घेउ द्यायचं नाही म्हणुन लुफ्तवाफ ने हिटलरच मन धरणी केली. आर्मी पोहोचल्यावर राहीलेल्या त्या छोट्याश्या त्रिकोणात बॉम्बफेक करताना आर्मी चं खुप नुकसान होईल असा एक दावा लुफ्तवाफनी केला.
शिवाय, ब्रिटीश सैनिक एवढ्या संखेने मारले गेले तर ब्रिटनशी युध्ध अपरीहार्य होइल असाही एक तर्क जर्मनीने केला असावा. (हिटलरला स्वताला ब्रिट्नशी युध्ध नको होतं. फ्रान्स काबिज केल्यावरदेखील ब्रिटीशांशी युध्ध्बंदी करयचे प्रयत्न झाले. ब्रिटीश धैर्याचा महामेरु असलेल्या चर्चील या प्रयत्नाना पाने पुसली)
डंकर्क नंतर मायदेशी परतलेल्या आणि खचलेल्या ब्रिटीश फौजेमधे प्राण फुंकणारे चर्चील हेच शेवटी दुसर्या महायुध्धाचे शिल्पकार ठरले.
ब्रिटनच्या डंकर्क कडुन धडा घेण जर्मनीला जमलं नाही. जर्मन ६ वी आर्मी (जी जर्मनीची सगळ्यात मोठी फौज होती आणि जीने पॅरीसमधे एका विजयोन्मादात प्रवेश केला होता) माघार न घेतल्यामझाली रशीयन आघाडीवर संपुर्णपणे नष्ट झाली
शेवटी रुडेंस्डंड आणि मनस्टीनचे टॅक का थांबले याचं उत्तर गुढचं राहीलं. .
सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन.... हा इतिहास अगदी तोंडपाठ आहेच...पण तुम्ही म्हणता तसेच अजूनही मनात आहेच की, अशी काय घटना घडली असेल "हिटलर चेम्बर्स" मध्ये की, त्याने अचानक शेवटच्या हल्ल्यास जय्यत सज्ज असलेल्या आपल्या जनरल्सना आगेकूच थांबविण्याचे हुकूम दिले. दुसर्या महायुद्धातील हा फार मोठा डावपेचाचा भाग होता की, अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली? या एका विषयावर दोन्ही बाजुकडून उलटसुलट खुलासे पुस्तक रूपानी, चर्चा माध्यमातून पुढे येत असतात. फॉक्स हिस्टरी चॅनेलवर तर "डंकर्क..." यावर दोन तासाची एक डॉक्युमेंटरी आहे. पुष्करिणी यांनी दिलेल्या या माहितीमुळे ती फिल्म आठवली.... फार चांगले वर्णन केले आहे लेखिकेने या डंकर्क स्पिरीटचे !
शेवटी रुडेंस्डंड आणि मनस्टीनचे टॅक का थांबले याचं उत्तर गुढचं राहीलं. .
श्री. पटवर्धन यांच्या प्रतिक्रियेला पुढे नेत आहे....
युद्धशास्त्रसंबंधी इतिहासकारांनी आपापल्या परीने या "गूढा" चे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही दुसर्या महायुध्दावर जिथे जिथे चर्चा चालू असते तिथे "डंकर्क पॉलिसी"चे टेबलवर येणे अपरिहार्य असते. बर्याच तज्ज्ञांनी यातील खरा कर्ता-करविता "गोअरिंग" असल्याचे म्हटले आहे ज्याला रुंड्स्टेंड आणि जनरल गुडेरियन हे विषय पोटदुखीचे वाटत होते. त्यावेळी असेही असेल की, हिटलरचा इतर जनरल्सपेक्षा गोअरिंगवर जास्त विश्वास असल्याने त्याच्या शब्दाला त्याने इतरांच्या आग्रहापेक्षा जास्त महत्व दिले. "सैनिक व चिलखत दल दमले असेल..." या सारख्या कल्पनांना हिटलरच्या लेखी जास्त महत्व कधीच नव्हते, कारण त्याला खात्री होती आपल्या सैनिकांच्या क्षमतेची. कदाचित असेही असेल की, त्याला डंकर्कशिवाय अन्य आघाड्यांकडे लक्ष देणे जास्त गरजेचे वाटले असेल.
काहीही असो, "डंकर्क" मधुन सुखरूप परत आलेले सैनिक पाहुन चर्चिलच्या अंगावर ढिगभर मांस चढले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
डंकर्कच्या वेळी जर्मन सैन्याचं नेतृत्व करणारे सेनाधिकारी हे old Prussian guards म्हणजे थोडक्यात उच्चवर्गातले होते. ' आॅस्ट्रियन काॅर्पोरल ' हिटलरचे आदेश मानणं हा एक त्यांच्या शिस्तीचा भाग असला तरी मनोमन त्यांनी त्याला आपला नेता म्हणून स्वीकारला नव्हता. त्यामुळे जर डंकर्कच्या यशाचं श्रेय त्यांना मिळालं तर अापल्याला ते पुढे डोईजड होतील अशी भीती हिटलरला वाटत होती, म्हणून त्याने विश्वासातल्या गोअरिंगच्या हवाईदलाच्या मदतीने ब्रिटिश लष्कराला अडकवण्याची योजना आखली, जी सुदैवाने फसली.
छानच आहे लेख.
अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली?
हे खर वाटत नाही हो. तसच जर का असतं तर नंतर लाखो ज्यूंना तरी त्याने कशाला मारलं असतं ? आणि काही झालं तरी तो एक कर्त्व्यकठोर आणि लश्करी बाण्याचा माणूस होता.
जर्मन आर्मीला सगळं श्रेय घेउ द्यायचं नाही म्हणुन लुफ्तवाफ ने हिटलरच मन धरणी केली.
मागे एकदा आमच्या मराठ्यांच्या इतिहासात पण नाही का दमाजीराव, मल्हारराव आणि विंचूरकरांनी इब्राहिमखानाबाबत अशीच जळाऊ वॄत्ती दाखवली. तसंच काहीसं वाटतय.
"...अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली?
हे खरं वाटत नाही हो.....
होय, हे मलाही (आणि बहुतांशी लोकांना... अर्थात ज्यांचा दुसर्या महायुध्दाविषयी अभ्यास आहे...) ते पटत नाही, पण "कणव" हा शब्द एका इंग्रजी संस्थळ चर्चेत एका वरिष्ट अधिकार्याने (अर्थात रिटायर्ड मिलिटरी...) वापरला... त्याचे पूर्ण वाक्य >> "I wonder whether it was due to one of those moments of compassion in his mind." यातील 'compassion' चा अर्थ मी "कणव" असा घेतला आहे.
रहस्यभेदाची सुई फिरूनफिरून "गोअरिंग" जवळ येऊन थांबते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
याबद्दल एक तर्क असाही सांगीतला जातो, की हिटलर हा वंशाभिमानी होता आणि ब्रिटीश लोक आपल्याप्रमाणेच शुद्ध नॉर्डिक वंशाचे असल्याने उगाच आपला वंशर्हास करू नये, असे त्याला ऐनवेळी वाटले.
अर्थात, यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही.
उत्तम लेख. अजून लिहा आवडत्या घटनांवर.
दुसरं महायुद्ध, हिटलर, चर्चिल, स्टालिन वगैरेंनी शाळकरी वयाचा एक मोठा भाग व्यापला होता. आठवणी जागवल्या तुम्ही.
बिपिन कार्यकर्ते
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!
हिटलरनं जर्मन पायदळाच्या डंकर्क कडे होणार्या घोडदौडीला अचानक २४ मे ला लगाम घातल्याचे ४-५ अंदाज इतिहास तज्ञ वर्तवतात...अभिषेक पटवर्धन आणि इंद्रराज पवार यांची कारणं ही आहेतच..
* जर्मन वायुदळानं हिटलर ला असा विश्वास दिला की ब्रिटीश पायदळ संपवण आपल्या डाव्या हातचा मळ आहे, असं असताना कशाला पायदळाला उगाच कामी लावा..
* नाझी पायदळ १० मे पासून अव्याहत पणे लढत होतं, त्यांच्या ए़कंदरीत युद्धनीती प्रमाणं रणगाडे आणि पायदळ अतिशय वेगानं कूच करत असे आणि रसद, वैद्यकीय मदत नंतर येत असत्...या ठिकाणी रसदीची रेल्वे ( जी घोड्यांनी ओढली जायची ) ती फारच मागे राहिली आणि रसद टंचाइ सुरू होती, ती पोहोचायला वेळ मिळावा म्हणून...
*पायद्ळ आंणि रणगाड्यांची जास्त गरज दक्षिण फ्रांस मध्ये लागणार होती ( जी पुढची योजना होती ). डंकर्क हा भूभाग सपाट असला तरी ब्रिटीशांनी खणलेले चर आणि कालवे यांच प्रचंड जाळ होतं आणि रण्गाडे फारसे उपयुक्त ठरत नव्हते.
* हिटलर तर्फे हे एक 'गुडविल जेस्चर' होतं आणि त्याला परतफेड म्हणून ब्रिटन कडून शांतीप्रस्तावाची अपेक्षा होती .
* हिटलर आणि जर्मन नेतृत्वाला ब्रिटन असं काहीतरी करून आपल्या सैन्याला वाचवेल असं आजिबात वाटल नाही, त्यांच्यामते सुटकेची सुतरामही शक्यता नाही..शरणागती किंवा मरण याशिवाय अडकलेल्या सैन्यापुढे कोणताही मार्ग नव्हता...अर्थातच शत्रूला कमी लेखण्याची घोडचूक..
७२ तासांनी हिटलरनी हा आदेश मागं घेतला पण तोवर खूप उशीर झाला होता...आणि इथेच चर्चिल बाजी पूर्णपणे पलटवून खर्या अर्थांनं बाजीगर ठरला ...
पुष्करिणी
चित्र दर्शी आणि अचुक(टु द पॉइंट) लिखाण आवडलं.
डंकर्क प्रमाणेच दुसर्या महायुद्धाला कलाटणी देणार्या महत्वाच्या घटना आठवल्या......
१.रशियन आघाडीवरच्या सुरुवातीच्या अफाट घोडदौडीनंतर अचानक नाझींना बसलेला मार्शल झुकोव्ह चा "गळफास"
२.नाही त्या वेळी "पर्ल हार्बेर" वर हल्ला करायची जपानची खुमखुमी.
आखखा पर्ल हार्बर बर्बाद केल्यावरही तिथलं अतिमूल्यवान इंधन तसच सोडुन देण्याची जपानची चाल.
३.त्यात पुन्हा अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारण्याचं जर्मनीच (दु:)साहस
४."ओकिनावा" ची जीवघेणी लढाइ(ज्यामुळं अणु बाँब वापरण्यास अमेरिका बाध्य झाली.)
५.चिमुकल्या ग्रीसचा कणखर लढा(ज्यामुळं रशियन आघाडीला कुमक पाठवाय्ला जर्मनीला उशीर झाला;आणि सरतेशेवटी त्यांच्या सैन्याचा महासंहार.)
६.नॉर्मंडीचा दोस्त सैन्याचा प्रवेश
७.शेवटपर्यंत रशियाशी थेट युद्ध टळण्याची जपानची गूढ्/अगम्य भूमिका.(जर त्यांनी निर्णायक वेळी १९४१ च्या हिवाळ्यात एक दणका रशियाला दिला अस्ता तर जवळ जवळ आख्ख्य युध्द्याचा निकाल पालटु शकत होता.)
शिवाय "बॅटल ऑफ ब्रिटन" म्हणजे केवल डंकर्क ची घटना नसावी.
त्यानंतरही लंडनवरील बाँबहल्ल्याना ब्रिटिशांनी निडरतेने दिलेले तोंड म्हणजे ब्रिटिश धैर्याची यशोगाथा.
ह्या सगळ्यावरही एक एक लेख टाकत एखादी मालिका जमली, तर फारच बरं होइल.
आपलाच,
मनोबा
ह्यासोबतच रोमेलला रसद आणि कुमक न पाठवता रशियाच्या तेलसाठ्यांना हस्तगत करण्याची धडपड..असं म्हणलं जातं की, आफ्रिकेत अत्यंत यशस्वी ठरणार्या रोमेलला मदत पाठवली असती तर दुसर्या महायुध्दाचा चेहरामोहरा बदलला असता.
असो,
पुष्करिणी, प्रचंड छान लेख! खुप आवडला.
तुर्त इतकेच. :)
अवांतरः दुसर्या महायुध्दाचा विषय निघालाय..डॉ.दाढे...कुठे आहात तुम्ही? :)
२.नाही त्या वेळी "पर्ल हार्बेर" वर हल्ला करायची जपानची खुमखुमी.
जपानकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी जिंकून घेतलेल्या चीनच्या प्रदेशास अमेरिकेची मान्यता नव्हती. त्यांचा तेल आणि इतर गोष्टींचा पुरवठा बन्द केला होता. त्यांच्या राजाच्या मते हे योग्य नव्हते पण आर्मीचा वरचश्मा असलेल्या नेत्रुत्वास युद्ध करण्याचे खुमखुमी होती. या हल्ल्याची जबाबदारी असणार्या यामामोटोने स्पष्ट सांगितले होते, की ही लढाई आपण नक्की जिंकू पण युद्ध हरु. अमेरिकेची उत्पादनक्षमता त्यांच्या १० पट असल्याने कुठल्याही दीर्घकालीन चालणार्या युद्धात अमेरिका जिंकणार हे निश्चित होते.
आखखा पर्ल हार्बर बर्बाद केल्यावरही तिथलं अतिमूल्यवान इंधन तसच सोडुन देण्याची जपानची चाल.
त्यांना माहित नव्हते..अन्यथा सोडले नसते. खुद्द अमेरिकेचीही अशीच समजूत होती की ते तेल गेले. बदली होउन आलेल्य अॅडमिरल निमिझकडे सर्व नुकसानाचे रीपोर्टस होते. त्याच्यावर पर्ल हार्बर ची डागडूजी आणि पुढचा संभाव्य हल्ला कुठे होणार (मिडवे बेटे) हे ओळखून त्यासाठी तयारी करण्याची जबाबदारी होती. ते काम करत असताना अचानक त्यांना हे तेलाचे घबाड सापडले.
७.शेवटपर्यंत रशियाशी थेट युद्ध टळण्याची जपानची गूढ्/अगम्य भूमिका.(जर त्यांनी निर्णायक वेळी १९४१ च्या हिवाळ्यात एक दणका रशियाला दिला अस्ता तर जवळ जवळ आख्ख्य युध्द्याचा निकाल पालटु शकत होता.)
अ) चीनसोबत जपानने रशियाचाही काही भाग जिंकला होता पण रशियाने तो परत जिंकून घेतला होत, म्हणजे ते सोपे लक्ष्य नव्हते.
ब) हिवाळा हा सैन्याच्या हालचालीस अत्यंत गैरसोयीचा. जर्मनीचा रशियात पराभव होण्यामागे हे मह्त्वाचे कारण होते.
संदर्भः कमांडर विंटर हे पुस्तक.
रशियाची बिकट परिस्थिती जाणून घ्यायची असल्यास "enemy at the gates" ची पहिली १०-१५ मि. बघ
"...रशियाची बिकट परिस्थिती जाणून घ्यायची असल्यास "enemy at the gates" ची पहिली १०-१५ मि. बघ....
पहिली १०-१५ मिनिटेच का? संपूर्ण चित्रपटच अत्यंत प्रभावशाली झाला आहे. स्टालिनग्राडचा लढा अशी त्याची पूर्वपिठीका आहे... लाल सैनिक राहू दे, पण साधारण नागरिकानेदेखील आपल्या शहरासाठी कसा लढा दिला ते पाहणे रोचक आहे. रॅचेल वेझला भारतीय प्रेक्षक "मम्मी" मुळे ओळखतो, पण यातील तिची स्थानिक तरूणीची भूमिका लाजवाब आहे. ज्युड लॉ याला मी अगोदर "टॅलेन्टेड मि.रिप्ले" मध्ये पाहिला असल्यानेच सुरुवातीला "इनिमी..." ची डिव्हीडी त्याच्यासाठी घेतली होती, पण एकदा चित्रपट सुरू झाल्यानंतर समजले की, खरा हीरो आहे "स्टालिनग्राड" !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
एकावेळेस क्षमतेपेक्षा जास्त आघाड्यांवर युद्ध लढला हिट्लर. फाजील आत्मविश्वास आणी अती महत्वाकांक्षा यामुळेच त्याचा घात झाला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
मागच्या वर्षी डोव्हर चा किल्ला बघितला.. अतिशय अप्रतिम आहे.. ब्रिटीशांनी तिथे इतिहास अतिशय उत्तम रितीने जपला आहे.. तिथली भुयारी व्यवस्था तर अवर्णनीय आहे.. त्या किल्ल्यात त्या काळातील एक छोटे खानी फिल्म दाखवतात.. ती कन्ट्रोल रूम.. रामसे ची केबीन.. तिच्या खिडकीतून दिसणारा डोव्हर चा समुद्र किनारा .. तो जख्मी लोकांचा दवाखाना..दृकश्राव्य स्वरूपात तो इतिहास तुमच्या पुढे उभा करतात.. सगळे पाहून सुन्न झालो होतो..ते सगळ पुन्हा आठवले..
लेख एकदम मस्त आहे.
यात हिटलर असे का वागला, नक्की काय झाले यावरून वर झालेल्या चर्चेतील माहीती पण रोचक आहे.
माझ्या लेखी त्याची काही कारणे असली तरी या प्रसंगातील सगळ्यात महत्वाचे आणि स्फुर्तीदायक काय असेल तर, पुष्करिणीच्या वाक्यातील, "सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला " डंकर्क स्पिरीट!
एखाद्या देशाचा/स्थल-कालाचा, इतिहास कसा घडतो हे त्या देशातील/काळातील केवळ नेतृत्वावरच नव्हे तर त्या जोडीला असलेल्या तितक्याच असामान्य जनतेवर देखील अवलंबून असते...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
असामान्य धैर्य, सामान्य नागरिकांमध्ये असलेलं देशप्रेम आणि पराकोटीची शिस्त ह्या तीन गुणांवर राष्ट्र काय करु शकतं ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
चतुरंग
लेख आवडला पुष्करिणी! डंकर्कची आठवण झालीच त्याबरोबर
सहा जून १९४४ ऑपरेशन ओव्हरलॉर्डचीही आठवण झाली.
मनोबांनी लिहिलेले सगळेच दुसर्या महायुद्धातले टर्निंग पॉईन्ट्स
आहेत. त्यात एल एलेमिनची लढाई, जर्मनीची आर्देन्स मधली
शेवटची चढाई, दोस्तांनी र्हाईन ओलांडणे आणि अखेरची
बर्लिनची लढाई हेही महत्वाचे टप्पे आहेत.
चिवटपणा आणि संकटात डगमगून न जाणे हे ब्रिटिशांचे गुण
आहेतच. दुसर्या महायुद्धात ते झळाळून उठले नसते तरच नवल.
आफ्टर ऑल इट वॉज देअर फाईनेस्ट अवर!!
त्यात नेहरु सारखा रंगेल माणुस पंतप्रधान झाला. डंकर्क वर जर हिटलरने ब्रिटिश सैन्याची दाणादाण उडवली असती तर भारताचे पंतप्रधान सुभाषबाबु झाले असते व आजचे वर्तमान वेगळेच असते.
असो,डंकर्क वर वाचलेले ब्रिटिश नशीबवान नक्कीच होते.पण त्याचे कौतुक मला तरी वाटत नाही.
वेताळ
शिवाय "बॅटल ऑफ ब्रिटन" म्हणजे केवल डंकर्क ची घटना नसावी.
त्यानंतरही लंडनवरील बाँबहल्ल्याना ब्रिटिशांनी निडरतेने दिलेले तोंड म्हणजे ब्रिटिश धैर्याची यशोगाथा.
चिवटपणा आणि संकटात डगमगून न जाणे हे ब्रिटिशांचे गुण
आहेतच. दुसर्या महायुद्धात ते झळाळून उठले नसते तरच नवल.
आफ्टर ऑल इट वॉज देअर फाईनेस्ट अवर!!
असामान्य धैर्य, सामान्य नागरिकांमध्ये असलेलं देशप्रेम आणि पराकोटीची शिस्त ह्या तीन गुणांवर राष्ट्र काय करु शकतं ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
-------------------------------------------------------------------------
संवादाची दिशा चुकते आहे. असे फसू नका.
दुसरे महायुद्ध म्हणजे दांभिक ब्रिटनची अब्रू वेशीवर टांगली गेली ती वेळ.
आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका, खंडप्राय भारत आणि इतर अनेक देश ( मनुष्यबळ आणि साधनसंपत्ती) वर्षानुवर्षे दिमतीला असतानादेखील अमेरिका आणि रशियाची ऐन वेळी मदत झाली नसती तर हरण्याची नामुष्की आली असती. ते धैर्य नव्हते, कमरेचे वाचवण्याची केविलवाणी धडपड होती!
हिटलरची कृष्णकृत्ये वगळता कौतुक करण्यासारखे आहे ते जर्मनीचे..त्या नागरिकांचे. पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून कोणतीही वसाहत नसताना स्वतःच्या जीवावर इतका पराक्रम गाजवला. एखादा चांगला नेता असता आणि काही चुका टाळल्या असत्या तर जिंकलेही असते.
-------------------------------------------------------------------------
अवांतरः वरती लिहिलेल्या सगळ्या देशांमधे, खंडांमधे सत्ता मिळवण्यासाठी आणि स्वार्थासाठी ब्रिटनने गुलामगिरीत ढकललेली , शेकडो वर्षे छळलेली, संपुर्ण संस्कृती नष्ट करून देशोधडीला लावलेली, ठार मारलेली निरपराध माणसे आणि उण्यापुर्या ८ वर्षात (१९३६-१९४४) जर्मनीने मारलेले ज्यु यात जास्त संख्या कोणाची ? जड पारडे कोणाचे? खरे हैवान कोण ?
पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून कोणतीही वसाहत नसताना स्वतःच्या जीवावर इतका पराक्रम गाजवला.
जर्मनीच्या प्रगतीबाबत शाळेच्या इतिहासाचे सर म्हणाले होते की 'दुसरं महायुद्ध केवळ जर्मनी करत होती...दोस्त राष्ट्रे अजुन पहिलंच महायुद्ध केल्यागत करत होती'
जय हिंद जय ब्राझील
पेनरावांशी सहमत आहे. पूर्णतः सहमत आहे. विषेशतः भारतात केल्या गेलेल्या 'बिज्यन' पद्धतीची हत्याकांडे किती क्रूर होती ते वाचल्यावर तर अधिक सहमत व्हावे लागते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
जगातले सगळ्यात हराम म्हणजे हे ब्रिटिश लोक.ते शुर होते,ते वीर होते अशी विशेषणे लावुन त्याचे कौतुक जरा अतीच होते असे वाटते.ब्रिटीश हे जगातले नावाजलेले दरोडेखोर आहेत. बाकी काही नाही.
वेताळ
श्री. पेन आणि श्री. वेताळ यांनी "ब्रिटिश" मनोवृत्तीबद्दल जे लिहिले आहे ते अत्यंत योग्य असे निरिक्षण आहे. हिटलर हरला म्हणून तो लगेच "क्रूरकर्मा" कारण ब्रिटिशधार्जिण्या मिडीयाने "ज्यू" सर्वनाशाची चित्रे प्रसृत केली. पण याच ब्रिटिशांनी भारतातील "जालियानवाला बाग" येथे जो काही धिंगाणा घातला होता.... (आणि अशाच प्रकारचा त्यांची सत्ता ज्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी)...त्यांच्या चित्रफिती आणि ज्यू विरूध्द हिटलर चित्रफितीमध्ये असे किती अंतर आहे?
शिवाय दुसरी एक बाब.... जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर येण्याच्या अगोदरही ज्यू लोकांच्या सामाजिक वर्तनावरून वादंग घडत होते.... आणि ज्या ज्यूंचा ज्याना कळवळा आला त्या खुद्द इंग्लंडने त्या जमातीला हीन दर्जाचीच वागणूक दिली होती. अगदी शेक्सपीअरसारख्या जागतिक पातळीवरील नाटककाराने "मर्चन्ट ऑफ व्हेनिस" मध्ये "शॉयलॉक" हा ज्यू सावकार कशा रितीने रंगवलाय? त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे. मग तो सर वॉल्टर स्कॉटचा "इसाक" असो वा चार्ल्स डिकन्सचा ऑलिव्हर ट्विस्टमधील "फॅगीन" असो... ज्यू ना ट्रीटमेन्ट देण्याच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रे (ब्रिटन आणि जर्मनी) एकमेकाशी हस्तांदोलनच करीत होती.
त्याबाबतीत हिटलरल्या दोष देताना त्याच विषयासाठी ब्रिटनला वगळून चालणार नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
"द मर्चंट ऑफ व्हेनिस" हे शेक्सपियरचे नाटक "द ज्यू ऑफ व्हेनिस" या नावानेही ओळखले जात असे, आणि अगोदरच्या काळी या नावाने त्याचे काही प्रयोगही झालेले आहेत, असे कळते. याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल काय?
त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे.
फार कशाला, आपल्याकडे मारवाडी-बनिया-शेठची जनमानसातली सर्वसाधारण प्रतिमा याहून वेगळी नेमकी काय आहे?
घाऊक पातळीवर "दुसर्या"चा द्वेष करण्याची माणसाची वृत्ती तशी जागतिक असावी. (हे योग्य अर्थातच नाही, पण हे होते.) पण हिटलरने तिचा राष्ट्रीय धोरणाचा पाया म्हणून अवलंब केला आणि त्यावरून कृती घडवून आणली, घाऊक नरसंहार घडवून आणला. फरक तेथे आहे.
जलियांवाला बाग हत्याकांडाचे हे अर्थातच समर्थन नाही.
(बाकी 'काळी प्रतिमा', 'त्या दुसर्या' समाजाबद्दलची हीनत्वभावना किंवा तिरस्कार वगैरेंबद्दल बोलायचे झाले तर या भावना उभयपक्षी होत्या, असे तत्कालीन किंवा त्याच्या थोड्या आधीच्या काळातल्या युरोपीय ज्यू लेखकांचे साहित्य थोडेसे जरी वाचले असेल तरी लक्षात यावे. शोलोम अलैखेम या झारशाही रशियातील ज्यू लेखकाने आपल्या विविध लेखनातून केलेले रशियातील ज्यूंच्या जीवनाचे आणि वृत्तीचे वर्णन या दृष्टीने उद्बोधक ठरावे. किमानपक्षी, ते एके काळी वाचून माझी तरी तशी धारणा झाली होती.
हिटलरपूर्व युरोपात ज्यूंना मिळालेल्या वागणुकीचे, त्यांच्यावर वेगळ्या वस्तीत राहण्याकरिता झालेल्या जबरदस्तीचे, हीनत्वाच्या वागणुकीचे आणि एकंदरीतच छळाचे समर्थन करण्याचा हेतू अर्थातच नाही. हिटलरच्या कृतींचेही हे समर्थन नाही. या सगळ्याचे समर्थन होऊच शकत नाही. केवळ "आम्ही-श्रेष्ठ-ते-तुच्छ", "आमचे-नाक-वर" अशा प्रकारच्या भावना उभयपक्षी होत्या, मग ते ज्यू असोत किंवा जेन्टाइल, एवढेच मांडायचे आहे.
दोन विभिन्न समाज एका जागी आले, की त्यांच्यात हेवेदावे, उच्चनीचत्वाच्या भावना, प्रसंगी अगदी टोकाचा द्वेषसुद्धा, हे सर्व होणे हे नैसर्गिक असावे. अर्थात हे सर्व झालेच पाहिजे असे नाही, पण झाल्यास नवल नसावे. आणि अनेकदा होतेही. अशा वेळी परस्परसामंजस्यासाठी प्रयत्न करणे हे दोन्ही समाजांच्या हिताचे हे खरेच, पण हे दर वेळेस तातडीने होऊ शकतेच किंवा होतेच, असे नाही. ही स्थिती आदर्श जरी नसली, तरी जोपर्यंत परिस्थिती याहून अधिक चिघळत नाही, तोपर्यंत दोन्ही समाज त्या ठिकाणी सुखाने नाही तरी किमानपक्षी आपापले अस्तित्व टिकवून राहू शकतात. अशा परिस्थितीत अशा द्वेषभावना योग्य प्रकारे हाताळून त्यांचा मर्यादेबाहेर उद्रेक होऊ न देणे एवढे किमान करता येते, आणि जोपर्यंत ते होत असते तोपर्यंत पुढेमागे कधी परिस्थिती सुधारल्यास सामंजस्यासाठी प्रयत्न होण्याची आशाही बाळगता येते. प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा एक समाज दुसर्याचे (किंवा दोन्ही समाज एकमेकांचे) अस्तित्व पद्धतशीरपणे नष्ट करण्याचे प्रयत्न राबवू लागतो (किंवा लागतात). आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे अशा प्रयत्नांना जेव्हा प्रतिष्ठा किंवा सरकारमान्यता मिळते तेव्हा, किंवा खुद्द सरकार आपल्या अधिपत्याखालील एखाद्या समाजाचा नायनाट करू लागते तेव्हा.
परंतु जोपर्यंत असे टोकाचे काही होत नाही, तोपर्यंत केवळ द्वेषभावना असणे हे आम असावे. योग्य जरी नसले, तरी विशेषही नसावे.
अतिअवांतर आणि डिस्क्लेमर: शोलोम अलैखेमच्या 'तेव्या द डेअरीमन' या कथेवर 'फिडलर ऑन द रूफ' हा प्रसिद्ध चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र ही कथा असलेला एक कथासंग्रह फारा वर्षांपूर्वी वाचलेला आहे. तपशील आता फारसे आठवत नाहीत, आणि तो कथासंग्रह आता माझ्या संग्रहीही नाही. केवळ वीसबावीस वर्षांपूर्वी जे काही वाचले होते त्यावरून ज्या धारणा झालेल्या आठवतात, त्याच्या आधारावर हे सर्व लिहिले आहे. चुका असू शकतात. अभ्यासाचा कोणताही दावा नाही. इतरांची मते याहून पूर्णपणे भिन्न असू शकतात. असोत. ही सर्व माझी मते आहेत. (फॉर व्हॉटेवर दे आर वर्थ.) मांडावीशी वाटली, मांडली. या विषयावर याहून अधिक चर्चा माझ्याशी करून काही पदरी पडणे नाही, आणि यावर याहून अधिक चर्चा माझ्याकडून होणेही नाही. धन्यवाद.)
- पंडित गागाभट्ट.
"....दोन विभिन्न समाज एका जागी आले, की त्यांच्यात हेवेदावे, उच्चनीचत्वाच्या भावना, प्रसंगी अगदी टोकाचा द्वेषसुद्धा, हे सर्व होणे हे नैसर्गिक असावे. अर्थात हे सर्व झालेच पाहिजे असे नाही, पण झाल्यास नवल नसावे. आणि अनेकदा होतेही. ...."
तुमचा हा मुद्दा घेवून पुढील प्रतिसादात लिहित आहे :
मी जरी वाचलेले असले तरी "माईन काम्फ" चा संदर्भ देत नाही, कारण ते पुस्तक (अर्थातच) एकांगी आहे, पण असे असले तरी केवळ हिटलरच नव्हे तर पहिल्या महायुध्दातील पराभवानंतर आणि व्हर्सायच्या लाजिरवाण्या तहानंतर त्या पिढीतील प्रत्येक जर्मन ज्यू द्वेष्टा बनला होता. त्याला इतिहासातील काही घटना कारणीभूत होत्याच, जशा :
१. १९२० पासून १९३२ च्या युरोपमधील जागतिक मंदीच्या पट्ट्यात ज्यू लोकांनी (सावकारच होते ते...) ऑस्ट्रीया आणि जर्मनीमध्ये मोकाच्या ठिकाणी आपले बस्तान बसविले होते, जे जर्मन युवाला खटकत होते.
२. पराभूत जर्मनीमधील एक मोठा गट "व्हर्साय"चा तह घडवून आणण्यात ज्यू बॅन्कर्स कारणाभूत आहेत असे मानणारा होता.
३. "आर्यन रेस" ही श्रेष्ठ आहे असे ठाम मत असलेला एक जर्मन वर्ग होता, त्यांना ज्यूचे आपल्या देशातील आर्थिक वर्चस्व सलत होते.
४. अर्थात हिटलर ज्यावेळी म्हणत असे की, "जर्मनी मला स्वच्छ करायचा आहे.." त्यावेळी त्याच्या नजरेसमोर केवळ ज्यू च नव्हते, तर कम्युनिस्टही अग्रक्रमात होते तसेच हिंडेनबर्गच्या काळात फोफावलेला उदारमतवादी गट, होमोज, जिप्सी जमात आदी प्रकार होते आणि पुढे सत्तेत आल्यानंतर त्याने हे केलेच, पण हा विषय फार खोल आहे.
तूर्तास इतकेच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
शिवाय दुसरी एक बाब.... जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर येण्याच्या अगोदरही ज्यू लोकांच्या सामाजिक वर्तनावरून वादंग घडत होते.... आणि ज्या ज्यूंचा ज्याना कळवळा आला त्या खुद्द इंग्लंडने त्या जमातीला हीन दर्जाचीच वागणूक दिली होती. अगदी शेक्सपीअरसारख्या जागतिक पातळीवरील नाटककाराने "मर्चन्ट ऑफ व्हेनिस" मध्ये "शॉयलॉक" हा ज्यू सावकार कशा रितीने रंगवलाय? त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे. मग तो सर वॉल्टर स्कॉटचा "इसाक" असो वा चार्ल्स डिकन्सचा ऑलिव्हर ट्विस्टमधील "फॅगीन" असो... ज्यू ना ट्रीटमेन्ट देण्याच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रे (ब्रिटन आणि जर्मनी) एकमेकाशी हस्तांदोलनच करीत होती.
== ज्यु लोकांना मध्ययुगात कसे वागवत होते त्याच काही उल्लेख सापडले.
As previously mentioned in reference to the plague's sociocultural impacts, renewed religious fervor and fanaticism bloomed in the wake of the Black Death. Some Christians targeted "various groups such as Jews, friars, foreigners, beggars, pilgrims",[22] lepers[23][24] and Roma, thinking that they were to blame for the crisis. Lepers, and other individuals with skin diseases such as acne or psoriasis, were singled out and exterminated throughout Europe.[citation needed] Anyone with leprosy was believed to show an outward sign of a defect of the soul.[citation needed]
Differences in cultural and lifestyle practices also led to persecution. Because Jews had a religious obligation to be ritually clean they did not use water from public wells and so were suspected of causing the plague by deliberately poisoning the wells. Christian mobs attacked Jewish settlements across Europe; by 1351, sixty major and 150 smaller Jewish communities had been destroyed, and more than 350 separate massacres had occurred.
According to Joseph P. Byrne in his book, The Black Plague, women also faced persecution during the Black Death. Muslim women in Cairo became scapegoats when the plague struck.[25] Byrne writes that in 1438, the sultan of Cairo was informed by his religious lawyers that the arrival of the plague was Allah’s punishment for the sin of fornication and that in accordance with this theory, a law was set in place stating that women were not allowed to make public appearances as they may tempt men into sin. Byrne describes that this law was only lifted when “the wealthy complained that their female servants could not shop for food.”[16]
http://en.wikipedia.org/wiki/Consequences_of_the_Black_Death
Jews are burnt alive.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
आत्ताच वाचून काढली ही लिंक आणि त्यासमवेतचे साहित्य. फार अभ्यास करावा अशी माहिती आहे. जरूर खोलवर वाचेन. धन्यवाद विकास जी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
जगातले सगळ्यात हराम म्हणजे हे ब्रिटिश लोक.ते शुर होते,ते वीर होते अशी विशेषणे लावुन त्याचे कौतुक जरा अतीच होते असे वाटते.ब्रिटीश हे जगातले नावाजलेले दरोडेखोर आहेत. बाकी काही नाही.
अहो ब्रिटिश लोक नालायक असतील, क्रूर असतील पण त्यांच शौर्य नाकारण्यात काय अर्थ आहे ? वास्को-द-गामा, अल्फोन्सो द अल्बुकर्क,कोलंबस सारखे लुटारु दर्यावर्दी असोत किंवा हिटलर्, चर्चिल सारखे साम्राज्यवादी असोत ते शूर होतेच की.
मी तर म्हणेन की सिंधुबंदी आणि अटकबंदी सारख्या खुळचट प्रथा पाळणार्या आमच्या कूपमंडूक पूर्वजांपेक्शा ते कैक पट सरस म्हटले पाहिजेत.
तर भारताचे पंतप्रधान सुभाषबाबु झाले असते व आजचे वर्तमान वेगळेच असते.
ह्याची खात्री काय ?
ब्रिटिशांनीही भारतावर अत्याचार केलेतच पण ब्रिटिशांच्या राज्यातच
टिळक, गांधी वा सावरकर इ राष्ट्रीय नेत्यांनी चळवळी केल्या, सरकार
विरोधी भाषणे, लेख इ आंदोलने केली. हे सर्व हिटलरच्या राज्यात; गेस्टापो आणि एस्.एस संघटनांच्या दहशतीच्या छायेत केवळ
अशक्य होते. जे कोणी नाझी राजवटीविरूद्ध सूर काढण्याची हिंमत
करेल त्याची रवानगी सरळ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्येच होत होती. ब्रिटिश
निदान आपल्या नेत्यांशी वाटाघाटी करण्याचे सौजन्यतरी दाखवत होते. जनरल डायरवर ब्रिटिश संसदेत सणकून टीका झाली होती;
निषेध झाला होता (रादर चर्चिल यांनीच केला होता). हिटलर
त्यांच्या जागी असता तर त्याने डायरला आयर्न क्रॉस विथ ओक
लीव्ज बहाल केल्या असत्या.
माझी दिशाभूलही झालेली नाही व मी ब्रिटिशभक्तही नाही. पण
माझ्या मते हिटलरच्या टाचेखाली आलेल्या पोलंड, झेकोस्लोव्हाकिया
पेक्षा ब्रिटिश अंकीत भारतातले सामान्य नागरिकांचे जगणे पुष्कळच
सुसह्य होते. पुढे जाऊन मी असेही म्हणेन की ज्यांचे आजचे स्वकीय
राज्यकर्ते खुनी नराधम आहेत त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीबद्दल
काहीच बोलू नये. रॅम्से मॅकडोनाल्ड, अॅटली, चेम्बर्लेन, चर्चिल, बाल्डविन, लॉईड जॉर्ज हे निदान सुसंस्कृत सभ्य तरी होते, त्यांचे
आपल्या देशावर जीवापाड प्रेम होते..त्यांनी भारताला वा आफ्रिकेला
लुटले पण ते आपल्या राणीचे साम्राज्य श्रीमंत करण्यासाठी. ह्यांची तुलना आपल्या लालूप्रसाद, राबडी, अर्जुनसिंग, शिवराज पाटील, मायावती, छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास आठवले, रमेश बागवे ह्यांच्याशी करण्याची हिंमतच होत नाही.
चर्चिलने पहिल्या महायुद्धात स्वखुशीने मंत्रीपद सोडून 'माझ्या
देशाला मंत्र्यापेक्षा सैनिकाची जास्त गरज आहे' असे म्हणून सैन्यात
पुनर्प्रवेश केला होता, प्रत्यक्ष रणांगणात दोन हात केले होते. आपल्या कुठल्या नेत्याच्या ** मधे एव्हढा दम आहे? अरे नुसते अंगरक्षकाशिवाय एक तास राहून दाखवा! ह्यांना अतिरेकी नाही, ह्यांनीच पूर्वी मुडदे पाडलेल्यांचे भाऊबंद चेचतील.
चर्चिलच्या देशभक्तीच्या आणि प्रामाणिकपणाच्या पुष्कळ गोष्टी देता येतील पण ही ती जागा नाही.
ब्रीटिश अजिबात साव नव्हते. मलाही त्यांची भलावण करायची नाहीये. पण ज्या गुणांमुळे ते मोठे झाले, एका टिचभर देशाने संपूर्ण जगाला पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली त्याला नाकारुन काय होते? त्यांची शिस्त, चिवटपणा, देशप्रेम हे गुण मान्यच करायला हवेत. त्यापासून आपल्याला काही शिकता आले तर बघायला हवे इतकेच.
चतुरंग
त्यांचे गुण कोण नाकारतय ? नुसतीच महत्त्वाकांक्षा बाळगली नाही, तर प्रत्यक्ष जग जिंकून दाखवले. सिकंदरालाही जे जमले नाही ते सुर्य मावळत नसे असे राज्य त्यांनी बनविले.
मी म्हणतोय, अशा महाबलाढ्य आणि सामर्थ्यवान, वैभवाच्या ऐन शिखरावर असणार्या सत्तेस, चिमुरड्या जर्मनीने केवळ स्वतः च्या जीवावर चीतपट केलेच ना ? मग श्रेष्ठ कोण ?
दुसर्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटन-वगैरेंना चितपट केले नसून "जबरा शह दिला" असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. (चितपट म्हणजे "अखेरचा विजय", शह म्हणजे "अतिशय धोका, पण सावरता येण्यासारखा". असा काही अर्थ मी घेतलेला आहे.)
दृष्टांत : हल्लीच श्री. चतुरंग यांनी आनंद विरुद्ध टोपालोव्ह बुद्धिबळाच्या सामन्यांचे वर्णन केले आहे. त्यात टोपालोव्हने कित्येकदा आनंदला शह दिला आहे. मात्र शेवटी आनंद विजेता घोषित झाला. टोपालोव्हच्या शहांवरून असे दिसते, की टोपालोव्ह उच्च दर्जाचा खेळाडू आहे, तरी शेवटी आनंद सध्यातरी टोपापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या उपमेने - दुसर्या महायुद्धात जर्मनीचे सैन्यबळ-सेनापती उच्च दर्जाचे होते असे डन्कर्कवरून दिसते. पण त्या महायुद्धात तरी शेवटी ब्रिटन जर्मनीपेक्षा श्रेष्ठ ठरले. दृष्टांतात काही खोट असल्यास जरूर सांगा.
पण त्या महायुद्धात तरी शेवटी ब्रिटन जर्मनीपेक्षा श्रेष्ठ ठरले. दृष्टांतात काही खोट असल्यास जरूर सांगा.
तुम्ही सगळे मुख्य मुद्दा दुर्लक्षित करत आहात किंवा...असो.
ब्रिटन नव्हे, महाकाय अमेरिका आणि रशिया संयुक्तपणे चिमुकल्या जर्मनीविरुद्ध श्रेष्ठ ठरले.
ते आणि त्यांनी केलेली मदत नसती तर ब्रिटन तगही धरु शकले नसते (एवढ्या सगळ्या वसाहतींमधून वर्षानुवर्षे साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ हडपूनसुद्धा).
प्रतिक्रिया
उत्तम !
वा फारच
छान लेख.
असेच म्हणतो
+२
+३
खुपच
डंकर्क ही
सुंदर आणि
रहस्य....!!!
एक तर्क असाही आहे की
छानच आहे
"कणव...."
कणव
डंकर्क
उत्तम लेख.
सर्व
लेख आवडला...
सुंदर
उत्तम लेख!
तुमचं
+१
मन
इनिमी अॅट दि गेट्स...!!
एकावेळेस
उत्तम लेख
उत्तम!
+ अगदी बरोबर!
लेख आवडला
लेख आवडला.....
वेताळ
पेना...स्वातंत्र्य मिळाले पण तुकड्या तुकड्याने....
वेताळा
धागा वरती आणण्यासाठी :-))
चतुरंग, डॉ. दाढे
असेच म्हणतो
पेनरावांश
अगदीच मनातले बोललास.....
ज्यू ~~ जर्मनी आणि ब्रिटन...!!
अवांतरः द मर्चंट ऑफ व्हेनिस, काळी प्रतिमा वगैरे...
हेवेदावे...!
शिवाय
लिंक...!
जगातले
फॉरवर्ड ब्लोक हा कम्युनिस्ट
ब्रिटिशां
+ १ डॉ.साहेब माझ्या मनातले बोललात!
चतुरंग
चितपट नव्हे, शह
धनंजय