Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मृगनयनी on Fri, 05/21/2010 - 10:25
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU....... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
  • Log in or register to post comments
  • 55510 views

प्रतिक्रिया

Submitted by भारद्वाज on Fri, 05/21/2010 - 10:28

Permalink

...

:( :''( :(
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Wed, 05/22/2013 - 10:26

In reply to ... by भारद्वाज

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 05/22/2013 - 10:36

In reply to (No subject) by पुष्कर जोशी

Permalink

जर्मन फारसं समजत नाही. जेवढं

जर्मन फारसं समजत नाही. जेवढं काही समजलं त्याप्रमाणे राजीव गांधी हे डिक्टेटर होते, शहा पहलवी, सद्दाम हुसेन, पॅलेस्टाईनचे अबु निदाल इ. सारखे असं दिसमजलं. हे जर बरोबर समजलं असेल तर लोकशाही देशाचा पंतप्रधान, राजेशाहीचा राजा, देशाचा डिक्टेटर आणि अस्तित्त्वात नसणार्‍या देशाचा नेता यांची तुलना का केली हे काही समजलं नाही. या सगळ्यांना एकाच बातमीच बसवण्याचा अट्टाहासही कळत नाही. स्विस बँकेत किती पैसा आहे हे तर सुब्रमण्याम स्वामीही सांगतात. कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 05/23/2013 - 14:35

In reply to जर्मन फारसं समजत नाही. जेवढं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>> स्विस बँकेत किती पैसा आहे

>>> स्विस बँकेत किती पैसा आहे हे तर सुब्रमण्याम स्वामीही सांगतात. कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सुब्रह्मण्यम स्वामी काय सांगतात याच्याकडे आपल्या सुसंस्कृत, मितभाषी, हाडाचे राजकारणी नसलेले, शांत, अर्थतज्ज्ञ, कणखर, कमालीचे स्वच्छ इ. गुणांची खाण असलेल्या पंतप्रधानांनी किंवा इतर कोणीही दुर्लक्ष केलं तरी सर्वोच्च न्यायालय मात्र त्यांचे सांगणे लक्ष देऊन ऐकते आणि म्हणूनच आज राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, २जी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श इमारत घोटाळा, दक्षता आयोग प्रमुख घोटाळा इ. घोटाळे बाहेर येऊन संबधित मंडळी आत गेली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 05/21/2010 - 10:59

Permalink

येस वी

येस वी स्टील मीस यु :< शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Fri, 05/21/2010 - 11:06

Permalink

तडफदार पण दुर्दैवी

भारतीय उपखंडाला वेगळे वळण देऊ शकणारे तडफदार पण दुर्दैवी व्यक्तिमत्व. भावपुर्ण आदरांजली..... शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/21/2010 - 13:13

In reply to तडफदार पण दुर्दैवी by शशिकांत ओक

Permalink

गांधी

गांधी आडनाव सोडले तर फार काही पोटेंशिअल होते असे वाटत नाही... तडफदार तर फार दुरची गोष्ट... एंगेदार (हम करेंगे, देखेंगे) भाषणे ही रटाळ असत... दुर्दैवी ठिक आहे. (यांच्या जाण्यामुळेच ९०/९१ ला काँग्रेस सत्तेत येऊ शकली अन्यथा त्या निवडणूकीत काँग्रेस जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हती.) आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 05/21/2010 - 13:19

In reply to गांधी by आंबोळी

Permalink

नॉलेज कमिशन

सॅम पित्रोदासारख्या गुणी लोकांना भारतात परत आणलं राजीव गांधीनीच! मलाही त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही, पण कोणी लिहील्यास वाचायला जरूर आवडेल. अदिती अवांतरः मराठीत लिहीताना राजीव'जी अशी "आप्पाची टोपी" लावण्याचे शुद्धलेखनाचे नियम नवीन आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 05/21/2010 - 15:31

In reply to नॉलेज कमिशन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अंकल सॅम

बरेच लोकांचा समज आहे की सॅम पित्रोदा यांना राजीव गांधी यांनी बोलाविले पण सुरवातीला त्यांची अन राजीव गांधी यांची ओळख ही नव्हती. १९८१ साली सॅमने इंदिरागांधींना अनाहुत पत्र लिहीले होते त्या पत्रात भारतातिल काही समस्या सोडविणे शक्य आहे पण फारसे कोणी संवेदनक्षम नाही की जागरूक नाही त्यामुळे सोपे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहे ,कोणीही थेट काम करायला तयार नाही असे नमुद केले होते त्यावेळी इंदिराजींनी सॅमला बोलावून घेतले तिच त्यांची पहिली भेट होती. सॅमने दिल्लीत राहून काम करायला सुरवात केली. त्याने हातात घेतला टेलीफोन म्हणजेच संदेशवहनाचा प्रश्न. त्या़काळी भारतात ५० टक्के फोन बंद तरी असायचे किंवा उरलेल्या फोनवरुन चुकीचे नंबर तरी लागायचे हा जागतिक विनोदाचा भाग झाला होता. राजीव गांधींनी जी टेक्नोलोजी मिशन्स स्थापन केली, त्याचे सुत्रसंचालन सॅम कडे दिले. त्यातून खरी टेलिकोम क्रांती सुरु झाली. राजीव - सॅम ही टीम नसती तर आज जे मोबाईल टेलिफोनचे जाळे दिसते ते दिसलेच नसते. सॅमने १९८५ साली टेलिकोम क्रांती सुरु केली अन अवघ्या ३ वर्षात टेलिफोन फेक्स चे जाळे पसरले. १९८७ साली मुंबईहुन डोंबिवली ला पण फोन लावणे जिकरीचे होते. ४-४ तास एस-टी-डी लाईन मिळत नसे . आज भारतातुन कुठूनही अगदी दुबई , वाशिंग्टन ला पण तत्काळ फोन करता येतो. हि क्रांती राजीव-सॅम यांच्या टेक्नोलोजी मिशन ने आणली. सॅम उत्तम चित्र कार ही आहेत सॅम पित्रोदा- वयाच्या सत्तरीत आलेल्या या माणसाची सळसळ विशीतल्या माणसाला लाजविल अशीच आहे. <:P आता कोणीही अंबानी फंबानी / महाजन मुंडेंचे नाव घ्या पण खरे टेलिकोम चे शिल्पकार अंकल सॅमच आहेत ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 05/21/2010 - 17:42

In reply to अंकल सॅम by वाहीदा

Permalink

धन्यवाद

धन्यवाद वाहिदा!..... खरोखर ज्ञानात अधिक भर पडली..... _____ अतिअवांतर : देशात आज ७०%(भोळी) जनता अशी आहे, की जी "राहुल गांधीं" मध्ये 'राजीव गान्धीं' ना बघतेय.. (आणि प्रियान्का गान्धी-वधेरां'..मध्ये "इन्दिरा"जीं ना) :) सोनिया गान्धी यांना अजूनही "परके" मानणारे लोक आहेत.. (आणि ते का नसावेत... हा वादाचा मुद्दा होऊ शकतो!!!) कुणी काहीही म्हणा....पण अनेक टीका, टोमणे सहन करत, आज या "मॅडम" सगळ्यांना "कन्ट्रोल" मध्ये ठेवून 'एकहाती' देश चालवत आहेत.... हे निश्चितच कौतुकास्पद आहे! || जय हिन्द || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/21/2010 - 17:47

In reply to धन्यवाद by मृगनयनी

Permalink

>>आज या

>>आज या "मॅडम" सगळ्यांना "कन्ट्रोल" मध्ये ठेवून 'एकहाती' देश चालवत आहेत.... असहमत... आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा.... काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय.... त्यांच्या पेक्षा किती तरी उत्तम प्रशासक आणि नेते काँग्रेसमधे आणि इतर पक्षात आहेत.... वरती म्हणल्याप्रमाणे हा फक्त गांधी आडनावाचा परिणाम आहे. त्या आडनावाशिवाय काँग्रेस पक्ष एकदम गलितगात्र होतो. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 05/21/2010 - 18:04

In reply to >>आज या by आंबोळी

Permalink

तुमच्या वाक्याचा अर्थ नाही समजला

काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय एका स्त्री ने देश चालविणे चुकीचे आहे का ? कि एका स्त्री ला महत्व मिळणे चुकीचे आहे ???? अन शेवटी हि लोकशाही आहे, ती कोणा एका मुळे चालत नाही . इंदिरा गांधी , राणी लक्ष्मी बाई , रजिया सुलतान देखील स्रीयाच होत्या . As an Administrator, Indira Gandhi Was a Class apart ! bening Woman and being able to Lead India in right Direction is really really Admirable . . Unfortunatley people realised Indira Gandhi's value after her assasination. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/21/2010 - 18:13

In reply to तुमच्या वाक्याचा अर्थ नाही समजला by वाहीदा

Permalink

>>एका

>>एका स्त्री ने देश चालविणे चुकीचे आहे का ? तुम्ही विषय चुकीच्या दिशेने घेउन चाललाय... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 05/21/2010 - 18:10

In reply to >>आज या by आंबोळी

Permalink

आजुन

आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा.... काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय.... त्यांच्या पेक्षा किती तरी उत्तम प्रशासक आणि नेते काँग्रेसमधे आणि इतर पक्षात आहेत....वरती म्हणल्याप्रमाणे हा फक्त गांधी आडनावाचा परिणाम आहे. त्या आडनावाशिवाय काँग्रेस पक्ष एकदम गलितगात्र होतो. आज "मॅडम"च्या शिवाय कॉन्ग्रेसचं पानही हलत नाही... हे विदारक असलं तरी सत्य आहे. नपुंसक वृत्तीचे नेते उत्तम प्रशासक होऊच शकत नाही,,, मग भले ती नपुंसकता... कशीही आलेली असो!... आणि "गांधी" ह्या नावाचा दबदबा निर्माण केला... तो इन्दिरा' जी आणि राजीव'जींनी... हे तर सर्वज्ञात आहे!.. पण तो टिकवायला सोनिया गांधींनाही काहीतरी कष्ट पडलेच असणार ना! इतर पक्षांची सूत्रे त्यांच्या अंतर्गत राजकारणातच फिरत आणि गुन्तत असल्यामुळे त्यांच्या नेत्यांमधले प्रशासकीय सुप्त गुण गंजून गेलेले आहेत.. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! आज सोनियांच्या हातात "सत्ता" आहे... म्हणून देशात कॉन्ग्रेस'चे वर्चस्व अधिक आहे... मग भले कारण काही का असेना.... पण सगळा "कॉन्ग्रेस" त्यांना वचकून असतो... "एकहाती" कारभारामुळे इतर पक्षांपेक्षा "कॉन्ग्रेस" मध्ये बर्‍यापैकी "सिस्टीम" आहे.. कदाचित 'परकीय लोकांचं आकर्षण" भारताला नेहमीच वाटत आलंय ' ( परकीयांनी गाजवलेला अधिकार - असा अर्थ घ्यावा)... हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं! असो... कारण काही का असेना... पण या देशाच्या "नाड्या" सोनिया गांधींच्या हातात आहे... हे नक्की! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 05/21/2010 - 18:31

In reply to आजुन by मृगनयनी

Permalink

कदाचित

कदाचित 'परकीय लोकांचं आकर्षण" भारताला नेहमीच वाटत आलंय ' ( परकीयांनी गाजवलेला अधिकार - असा अर्थ घ्यावा)... हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं! >>>>> ही अशी बेफाम विधाने कुठल्या आधारावर करता तुम्ही. गांधी घराण्याला सर आँखोपे घेणार्‍या हिन्दुस्थानी जनतेच्या विचारसरणितच मुळ दोष आहे. कारण गुनवता अनुंवशिक नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Sat, 05/22/2010 - 09:20

In reply to आजुन by मृगनयनी

Permalink

"गांधी"

"गांधी" ह्या नावाचा दबदबा निर्माण केला... तो इन्दिरा' जी आणि राजीव'जींनी... हे तर सर्वज्ञात आहे!.. पण तो टिकवायला सोनिया गांधींनाही काहीतरी कष्ट पडलेच असणार ना! आज सोनियांच्या हातात "सत्ता" आहे... म्हणून देशात कॉन्ग्रेस'चे वर्चस्व अधिक आहे... मग भले कारण काही का असेना.... पण सगळा "कॉन्ग्रेस" त्यांना वचकून असतो... "एकहाती" कारभारामुळे इतर पक्षांपेक्षा "कॉन्ग्रेस" मध्ये बर्‍यापैकी "सिस्टीम" आहे.. व्यक्तीपुजक मानसिकता पाहून थक्क झालो. तुम्हाला प्रणाम. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Sat, 05/22/2010 - 11:17

In reply to "गांधी" by आंबोळी

Permalink

व्यक्तीपु

व्यक्तीपुजक मानसिकता पाहून थक्क झालो. कृपया, पूर्वग्रहदूषित गैरसमज नसावा...... आज कॉन्ग्रेस मधला एक तरी नेता असा दाखवा... की जो स्वतःच्या (इन्डिव्हिज्युअल) अकलेचा वापर करून चालतो... अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचच उदाहरण घ्या.... पुण्यात साहित्यसंमेलनाच्या पूर्वनियोजित उद्घाटनाला "अशोक चव्हाण" मॅडमच्या आदेशानुसार येऊ शकले नाही.. (आणि एक भाषण कमी झाल्यामुळे अमिताभ'जींच्या कवितेचा आस्वाद पुणेकरांना जास्त घेता आला.. ;) ) 'विलासराव देशमुखांपासून नारायण राण्यांपर्यंत प्रत्येकजण (चरफडत का होईना.. पण) मॅडम'ची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करतो!... 'रमेश बागवें'सारखे नेते 'राहुल बाबा'चे बूट पण प्रेमाने छातीशी कवटाळून ठेवतात..... हे असं आजवर कुठल्या पक्षात पाहिलेलं नाही! याला काय म्हणतात ? आंबोळी, माझी मानसिकता पडताळण्यापेक्षा कॉन्ग्रेस-वाल्यांच्या या मानसिकतेला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा... :-? कदाचित... यालाच "व्यक्तिपूजा" म्हणत असावे बहुधा! ;) भारत देशाची एक सुजाण नागरिक म्हणून मी जेव्हा काँग्रेस-पक्षाकडे आणि त्यांच्या नेत्यांकडे बघते... तेव्हा सोनिया गांधींच्या तालावर नाचणार्‍या खादीच्या / कॉटनच्या कपड्यातल्या ,जाड्या जाड्या पोट सुटलेल्या बाहुल्याच मला दिसतात... कदाचित सोनियांपेक्षा जास्त कुशल राजकारणी या देशात, इतर पक्षात असतीलही.... पण त्यांचे ऐकतंय कोण ? :-? त्यांच्या पक्षातलीच लोकं त्यांना पुढे येऊ देत नाहीत.... तर मग आम जनतेला त्यांचा उपयोग कसा होणार ? सासूबाईंमुळे आणि पतीदेवांमुळे कॉन्ग्रेस'ची जबाबदारी सोनियांवर पडली.... आणि ती त्या समर्थपणे पेलत आहेत.... हेच आजचे चित्र आहे... ते बदलायचे की तसेच ठेवायचे... हे येणारा काळच ठरवेल.... :) तुम्हाला प्रणाम. तुमचे मंगल असो! आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो! :) आंबोळी (पक्षनिरपेक्ष, तटस्थ ) -मृगनयनी. जय हिन्द | जय महाराष्ट्र | जय परशुराम | जय गाडगेबाबा | जय भवानी | जय शिवाजी | जय सियाराम | जय राधेश्याम | युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 05/22/2011 - 00:01

In reply to व्यक्तीपु by मृगनयनी

Permalink

''आज कॉन्ग्रेस मधला एक तरी

''आज कॉन्ग्रेस मधला एक तरी नेता असा दाखवा... की जो स्वतःच्या (इन्डिव्हिज्युअल) अकलेचा वापर करून चालतो...''- यावर मी एवढेच म्हणेन, की सोनियाचा असा एक तरी निर्णय सागा जी ती स्वताच्या अकलेनं घेते. एका राज्याच्या महिला मुख्यमंत्री स्त्रीला त्या पदावरुन हटवु शकत नाही, उगा जगात जे अमेरिका करते ते इथं देशात करायचा प्रयत्न करुन काही साध्य होत नाही. उदाहरण - उत्तर प्रदेश,कर्नाटक वैग्रे. ''सासूबाईंमुळे आणि पतीदेवांमुळे कॉन्ग्रेस'ची जबाबदारी सोनियांवर पडली.... आणि ती त्या समर्थपणे पेलत आहेत.... हेच आजचे चित्र आहे...'' - एकदम बरोबर सोनिया फक्त काँग्रेसचीच जबाबदारी पेलत आहेत आणि तिचा मुखवटा करुन तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे कुशल राजकारणी कुशलपणे देशाचे राजकारण करत आहेत. या सरकारचा मुखवटा मनमोहन सिंग नाहीत तर सोनिया गांधी आहेत. मनमोहन सिंग हे निश्चितच सोनिया गांधी पेक्षा कुशल, चतुर आणि क्रुर राजकारणी आहेत. एक लक्षात घ्या जेंव्हा तुम्ही एखाद्या सत्ता नको असलेल्याला सत्ता देता तेंव्हा त्याच्याकडुन ती काढुन घेण्याची धमकी देउन हवी ती कामे करुन घेउ शकत नाही, कारण एखादे काम करायला नकार देउन तो सत्ता सोडायला तयार असेल तर तुम्ही काहीच करु शकत नाही. गेल्या ५-७ वर्षात बारामती - अकलुज भागात काम करणा-या एखाद्या पत्रकाराला भेटा म्हणजे राजकारण कोण करतगे,का आणि कसं आणि कुठं याचा अंदाज येईल थोडासा. येत्या मध्यावधी निवडणूकीत शक्यता ही आहे की या माय लेकरापैकी एक जण मारला गेल्याशिवाय काँग्रेस पुन्हा सत्तेत येउ शकत नाही, फार वे़ळ नाही, डिझेल्चे रेट मार्केट रिलेट आणि घरगुती गॅस ५५०/- ते ६२५/- करण्याचा निर्णय ही या सरकारची शेवटची विकेट आहे आण ती पडल्याशिवाय देश चालु शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 05/21/2010 - 18:36

In reply to >>आज या by आंबोळी

Permalink

आजुन

आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा.... >>>>> अगदी बरोबर. बोफोर्समध्ये हात काळे केले. आई संकटात असताना इटलित तोंड लपवुन बसला. गुप्तहेर खात्याने अनेक वेळा इशारा देवुनही अति प्रसिध्दीच्या हव्यासापायी फुकापुदडी जिव गमावुन बसला. अशा माणसाला 'तडफदार' म्हणणे म्हणजे तडफदारीचा अपमान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलेकर on गुरुवार, 09/05/2013 - 17:45

In reply to >>आज या by आंबोळी

Permalink

परफेक्ट

परफेक्ट !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 05/21/2010 - 13:24

In reply to गांधी by आंबोळी

Permalink

+१

आंबोळीस प्लस वन आणि वरुन मिळालेलं गांधी आडनाव सुद्धा दत्तक घेतलेलं आहे :) असो ...
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 05/21/2010 - 14:29

In reply to +१ by टारझन

Permalink

"कॉम्पुटर"

"कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले. ९० व्या शतकात कॉम्पुटर'ला नाके मुरडणार्‍यांची संख्या कमी नव्हती. 'कॉम्पुटर ' भारतात येऊ नये म्हणुन ..पार २ दिवस संसद बन्द पाडेपर्यंत काहींची मजल गेलेली होती. पण तरीही भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून राजीव'जींनी कॉम्पुटर'द्वारे आय. टी. क्षेत्रातील भारताचे स्थान सुनिश्चित केले. ________________ "बोफोर्स" प्रकरणामुळे किन्वा अन्य काही कारणांमुळे राजीव'जी जरी बदनाम झालेले होते.... तरी पण क्षणार्धात मानवी बॉम्ब हल्ल्याला बळी पडलेल्या राजीव'जींचा अपमृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेला.. :| आजही -राजीव'जींचा मृत्यू, त्यावेळी टी.व्ही. वर दाखवले जाणारे त्यांचे अंत्यसंस्कार, जनमानसाचा टाहो... इ. गोष्टी आठवून मन विषण्ण होते.... त्यामुळे 'राजकारणी' म्हणून कोणाचं त्यांच्याबद्दल काहीही मत असलं तरीही, त्यांचा असा ... देहाच्या छिन्नविछिन्न चिन्धड्या उडून ...अकाली मृत्यू व्हायला नको होता.... असे आजही वाटते... आणि नकळत डोळे पाणावतात... _______________ Rajeev'ji...... really miss you......... :| युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/21/2010 - 14:41

In reply to "कॉम्पुटर" by मृगनयनी

Permalink

>>पण तरीही

>>पण तरीही भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून हे अत्ता म्हणणे सोपे आहे हो.... >>तरी पण क्षणार्धात मानवी बॉम्ब हल्ल्याला बळी पडलेल्या राजीव'जींचा अपमृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेला.. असा मृत्यू कुणालाच येऊ नये... राजीव गांधींच्या नशिबी आला याचे नक्कीच वाईट वाटतय.... पण..... >>जनमानसाचा टाहो... मन विषण्ण होते.... चटका लावून गेला.. आणि नकळत डोळे पाणावतात... हे अतीच फिल्मी होतय.... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 05/22/2010 - 10:44

In reply to >>पण तरीही by आंबोळी

Permalink

+१

असा मृत्यू कुणालाच येऊ नये... राजीव गांधींच्या नशिबी आला याचे नक्कीच वाईट वाटतय....
+१.
>>जनमानसाचा टाहो... मन विषण्ण होते.... चटका लावून गेला.. आणि नकळत डोळे पाणावतात... हे अतीच फिल्मी होतय....
याबद्दलही +१. खास करून ते 'जनमानसाचा टाहो'बद्दल. राजीव गांधींच्या मृत्यूच्या घटनेवरून त्या काळात निघालेले लोकप्रिय अश्लील आणि पाणचट विनोद या कानांनी ऐकलेले आहेत. घाणेरड्या विनोदांना 'टाहो' म्हणायला लागले काय हल्ली? - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Sat, 05/22/2010 - 11:41

In reply to +१ by पंगा

Permalink

हे अतीच

हे अतीच फिल्मी होतय.... याबद्दलही +१. खास करून ते 'जनमानसाचा टाहो'बद्दल. राजीव गांधींच्या मृत्यूच्या घटनेवरून त्या काळात निघालेले लोकप्रिय अश्लील आणि पाणचट विनोद या कानांनी ऐकलेले आहेत. घाणेरड्या विनोदांना 'टाहो' म्हणायला लागले काय हल्ली? पंगा'जी... राजीव'जींचा मृत्यू झाला... तेव्हा मी बर्‍यापैकी लहान होते.. 'आपल्या लाडक्या पंतप्रधानांना एका बाईने बॉम्बचा वापर करून मारून टाकले' येवढेच तेव्हा माहित होते... त्यावेळी टी.व्ही. वर दाखवला जाणारा आक्रोश... लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया..राजीव'जींची जळती चिता....... इ. सर्व गोष्टी मनामध्ये इतक्या खोलवर रुजल्या आहेत... की ते सर्व आठवले... तरी आजही खरंच रडू येते.... May be... राजीवजींचा अपमृत्यू ज्याप्रकारे झाला... तो प्रकार खूपच भीषण होता.... आणि माझ्या मनातून तो काही केल्या जात नाहीये.. माझं मन जास्त सेन्सीटीव्ह आहे... म्हणूनही असेल असं कदाचित! :-? कदाचित 'अशी' प्रतिक्रिया माझ्यापुरती च मर्यादित असू शकते..... 'स्ट्रॉन्ग' मनाच्या माणसांवर या घटनेचा कदाचित जास्त परिणाम झालेलाही नसेल! बाकी सुदैवाने 'ते' पाणचट जोक्स वगैरे... माझ्या तरी ऐकीवात नाही! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 05/21/2010 - 15:38

In reply to "कॉम्पुटर" by मृगनयनी

Permalink

+१०००१ सहमत

कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले. अगदी खरे आहे !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 05/21/2010 - 19:13

In reply to "कॉम्पुटर" by मृगनयनी

Permalink

>>>"कॉम्पुटर"

>>>"कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले. हो का? बरे झाले हे जन्माला आले. नाहीतर आम्हाला काँप्युटर पहायलाही मिळाला नसता. =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 05/22/2010 - 23:04

In reply to >>>"कॉम्पुटर" by मितभाषी

Permalink

-१

राजीव गांधींबद्दल बाकी काहीही म्हणा, पण संगणक कशाशी खातात हे देशात फारसे कोणालाच माहीत नसण्याच्या आणि म्हणूनच संगणक आणि संगणकीकरण यांना जोरदार आंधळा विरोध असण्याच्या काळात त्यांनी थोडा पुढचा विचार करून संगणकीकरण संकल्पना आणि संगणक उद्योग भारतात रुजवण्याच्या दृष्टीने नेटाने जो पुढाकार घेतला, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. त्या काळातला हा आंधळा विरोध मी पाहिलेला आहे. फार कशाला, त्या काळात कॉलेजात असणारे आमच्यासारखे बरेच अतिशहाणेही सुरुवातीसुरुवातीला विरोधात असत. कारण एक म्हणजे अक्कल नव्हती, अनुभव नव्हता आणि यातून पुढे कायकाय होऊ शकते याची फारशी कोणालाच कल्पना किंवा दूरदृष्टी नव्हती. शिवाय भारतासारख्या देशाला ही 'नसती थेरे' परवडणार काय, याने माणसाची गरज राहणार नाही, लोकांच्या नोकर्‍या जातील, आधीच एवढी बेरोजगारी त्यात भरपूर आणि वाढती लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशाला हे घातक ठरेल, यासारख्या अनेक चमत्कारिक कल्पना डोक्यात होत्या आणि जनतेत लोकप्रिय होत्या. पुढे या क्षेत्रात काम करू लागल्यावर त्यातला फोलपणा कळू लागला. (कल्पनेतला. क्षेत्रातला नव्हे. त्याला पुष्कळ वेळ लागला.) मात्र जनतेत असल्या कल्पना फैलावलेल्या असताना याला सामाजिक आणि राजकीय पातळीवर किती टोकाचा विरोध होऊ शकत असेल याची कल्पना करता येईल. या असल्या विरोधाच्या नाकावर टिच्चून आपली कल्पना पुढे दामटणे, यह भी कोई कम बात नहीं है, गुरु| - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 05/22/2010 - 13:53

In reply to >>>"कॉम्पुटर" by मितभाषी

Permalink

कार्य-कर्ता

>>बरे झाले हे जन्माला आले. नाहीतर आम्हाला काँप्युटर पहायलाही मिळाला नसता यातील उपरोध मान्य करायचा तर यापुढे कुठल्याच व्यक्तीबद्दल काहीच म्हणायला नको. चापेकरांनी रॅण्डला मारले नसते तरी रॅण्ड केव्हातरी मेलाच असता. ऑपॉप म्हातारा होऊन. ;) टिळक, भगतसिंग, गांधी, सुभाष बोस नसते तरी भारताला स्वातंत्र्य मिळालेच असते. (ब्रिटिश गेले कारण लुटण्यासारखे काही उरले नव्हते आणि महायुद्धात प्रचंड हानी झाली होती हे आपले लाडके मत असतेच नाहीतरी). इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये बांगलादेश मुक्त केलाच नसता तरी केव्हातरी तो मुक्त झालाच असता. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला नसता तरी केव्हातरी तो मांडला गेला असताच. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 05/22/2010 - 14:12

In reply to कार्य-कर्ता by नितिन थत्ते

Permalink

धन्य आहात थत्ते !!

ब्रिटिश गेले कारण लुटण्यासारखे काही उरले नव्हते =)) =)) =)) हा प्रतिसाद वाचून हसू आवरत नाही .. धन्य आहात तुम्ही ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Sat, 05/22/2010 - 14:30

In reply to कार्य-कर्ता by नितिन थत्ते

Permalink

गुरुत्वाक

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला नसता तरी केव्हातरी तो मांडला गेला असताच. +१ ह्या सगळ्यापेक्षा 'अॅडम & इव्ह' मधल्या इव्ह' ने "ते" सफरचंद खाल्लंच नसतं...... तर हा मानवजातीचा उपद्व्याप उद्भवलाच नसता! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 05/22/2010 - 16:07

In reply to गुरुत्वाक by मृगनयनी

Permalink

विरजणसम्राट यांना हा प्रतिसाद समर्पित

खराय! सगळीच वानरं अजूनही दगडगोटे उचलत बसली असती!! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Sat, 05/22/2010 - 16:35

In reply to विरजणसम्राट यांना हा प्रतिसाद समर्पित by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

छे छे!....

छे छे!.... काही विक्षिप्त माकडं एकमेकांच्या शेपट्यांनाच नाड्या समजून ते ओढत बसली असती! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 05/21/2010 - 19:16

In reply to "कॉम्पुटर" by मृगनयनी

Permalink

९० व्या

९० व्या शतकात कॉम्पुटर'ला नाके मुरडणार्‍यांची संख्या कमी नव्हती>>>>>>>> =)) =)) =)) =)) =)) बाब्बव ठार मेलो.
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 05/21/2010 - 14:17

In reply to गांधी by आंबोळी

Permalink

हाहाहा

एंगेदार ...शब्द लई आवडला :)
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Fri, 05/21/2010 - 18:50

In reply to गांधी by आंबोळी

Permalink

राजीवजी ...

अहो थोडंसं मागे जावून आठवून पहा ... राजीवजींनी २१ व्या शतकाचा नारा दिला तर सर्वजण त्यांची यथेच्छ टवाळी करायला लागले. त्यांनी संगणक व टेलीकम्युनिकेशन या क्षेत्रांची खर्या अर्थाने क्रान्ती घडवली , म्हणून तर आज आपण इंटरनेटवर ही एव्हढी चर्चा करू शकतो आहोत. त्या वेळ्च्या विरोधी पक्षीयांकडे एव्ह्ढी दूरद्रुष्टी होती का? देवीलाल यांनी तर शेतकर्यांच्या सभेत आरोप केला होता की वीज निर्मिती करून सर्व कस काढलेले पाणी तुम्हा शेतकर्यांन्ना शेतीसाठी दिले जाते ... =)) आता बोला ...
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 05/25/2010 - 21:23

In reply to गांधी by आंबोळी

Permalink

'एंगेदार'वरून आठवले...

एंगेदार (हम करेंगे, देखेंगे) भाषणे ही रटाळ असत...
याच भाषणांमुळे राजीव गांधींच्या काळात काहीजण भारताला 'बनाना रिपब्लिक' म्हणत असल्याचेही ऐकलेले आहे. ('हमें बनाना है...') (शिवाय 'देश के कोने कोने में' हेही असायचे अनेकदा. आता देश के कोने कोने में बनानाच बनाना झाल्यावर देशाचे बनाना रिपब्लिक नाही होणार तर मग दुसरे काय होणार?) - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/26/2010 - 07:57

In reply to 'एंगेदार'वरून आठवले... by पंगा

Permalink

पंग्याची

=)) =)) =)) =)) पंग्याची प्रतिक्रीया "ठो ठो ठो " आणि "धो धो धो " =)) =)) =)) =)) मस्त रे ... - टारिव गांधी हमें मिसलपांव के कोनेकोने मे अवांतर जाल बनाना है !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 05/21/2010 - 15:42

Permalink

खर्रं

खर्रं आहे!!! आज राजिव गांधी नसते तर भारत संगणकापासुन वंचित राहिला असता :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 05/21/2010 - 17:43

In reply to खर्रं by टारझन

Permalink

टंकनदोष

आज राजिव गांधी नसते तर भारत संगणकापासुन वंचित राहिला असता यामधे एक टंकनदोष आढळला... आपल्याला, "णसते" असे म्हणायचे आहे का? :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 05/21/2010 - 18:28

In reply to खर्रं by टारझन

Permalink

राजीव

राजीव गांधींनी शांतीसेना पाठवण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का अयोग्य हे जाणुन घ्यायला आवडेल. तसेच काही ठिकाणी वाचल्यानुसार शांतीसेनेच्या पथकाकडून श्रीलंकेतील काही सामान्य जनतेवर अत्याचार केले गेले हे कितपत खरे आहे ? शांतीसेना पाठवण्याच्या निर्णयाचा त्यांना आणी भारताला काय फटका बसला ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 05/21/2010 - 18:47

Permalink

कोण हे

कोण हे राजीव गांधी ? धन्यवाद ! ------ डॉन्या अभ्यंकर
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Fri, 05/21/2010 - 19:10

Permalink

राजीवजींना श्रध्दांजली

मी राजकारण वाचायला लागल्यापासून कॉंग्रेस पक्षाचा विरोधकच राहिलो आहे. पण तरीही काही गोष्टी स्पष्ट केल्याच पाहिजेत. १. इंदिरा गांधींच्या दोन मुलांमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये खूप अंतर होते. संजय हा आक्रस्ताळा तर राजीव शांत आणि नम्र होता. संजयने आणिबाणीच्या काळात घातलेला धुमाकुळाविषयी तर काय बोलावे? संजयचे अपघाती निधन झाल्यानंतर वर्षभराने राजीव गांधी राजकारणात आले.त्यापूर्वीच्या काळात घरातच निरंकुश सत्ता असतानाही आणि त्या सत्तेचा स्वत:चा सख्खा भाऊ दुरूपयोग करत असतानाही राजीव गांधींनी यापैकी काही केल्याचे दिसत नाही. आणिबाणीवर (बहुदा इंदिरा गांधींचे सचिव पी.एन.धर यांनी लिहिलेल्या) पुस्तकात संजयने इंद्रकुमार गुजराल यांची माहिती आणि प्रसारण मंत्री पदावरून आणिबाणीदरम्यान उचलबांगडी कशी करवली आणि त्या जागी विद्याचरण शुक्ला या ’सेन्सॉरशीप फेम’ मंत्र्याला कसे आणले याची माहिती आहे. वास्तविक संजय हा कोणतेही घटनात्मक पद भूषवित नव्हता. त्याला सरकारमध्ये अशी ढवळाढवळ करायचा काय अधिकार होता? राजीव गांधी मात्र या काळात राजकारणापासून पूर्णपणे आलिप्त होते. आपण बरे आणि आपली वैमानिकाची नोकरी आणि बायकामुले बरी असा सरळसोट विचार राजीव गांधींचा होता. राजीव गांधी जर विरोधक म्हणतात तितके वाईट होते तर त्यांनी घरात निरंकुश सत्ता असताना त्या सत्तेपासून स्वत:ला दूर का ठेवले? २. राजीव गांधींकडे भारताला नव्या युगात न्यायचा एक दृष्टीकोन होता हे त्यांच्या अगदी कट्टर शत्रूलाही नाकारता येणार नाही. भारतात आज जी संगणक आणि मोबाईल क्रांती दिसत आहे त्याची पायाभरणी राजीव गांधींनी केली होती. २०१० च्या जगात हास्यास्पद वाटेल पण राजीवजींनी टेलिफोन धोरण अवलंबायला सुरवात केल्यानंतर सुरवातीच्या काळात ’भारतात अर्ध्या लोकांना दोन वेळचे खायला मिळत नाही. मग करायचेत काय टेलिफोन’ अशा स्वरूपाची टिकाही त्यांच्यावर झाली होती. मला वाटते शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी केलेली ’इंडिया’ आणि ’भारत’ अशी विभागणी त्याच काळातली. भारताला आज आंतरराष्ट्रीय समुदायात जो मान आहे त्यामागे काही महत्वाची कारणे आहेत असे मला वाटते. राजीवजींचे संगणक आणि टेलिफोन क्षेत्रातील दूरदृष्टीचे धोरण हे त्यातील एक आहे असे मला वाटते. (इतर कारणे: लालबहादूर शास्त्रींनी सुरू केलेली आणि इंदिरा गांधींनी पूर्ण केलेली हरित क्रांती, नरसिंह राव-मनमोहन सिंह यांचे १९९१ चे नवे आर्थिक धोरण आणि १९९८ मध्ये घेतलेल्या अणुचाचण्या असे मला वाटते). ३. राजीव गांधींना मुळातच राजकारणात पडायचे नव्हते हे जगजाहिरच आहे. संजयच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींना आधार देण्यासाठी ते राजकारणात आले आणि मग ते त्याच जंजाळात फसले. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरही राजीव गांधींनी पंतप्रधान होऊ नये अशी गळ सोनिया गांधींनी त्यांच्याकडे घातली असे या डॉक्युमेन्टरीमध्ये म्हटले आहे. तसेच राजीव गांधींच्या निकोलस न्युजंट यांनी लिहिलेल्या चरित्रातही तसाच उल्लेख आहे असे वाचल्याचे आठवते. पंतप्रधानपद ही आपल्यावर लादलेली जबाबदारी आहे असे राजीव गांधींना वाटत होते असेही त्या चरित्रात म्हटले आहे. एक राजकारणी म्हणून धूर्त आणि चाणक्यनितीचे खेळ करण्यात राजीव गांधींना अपयश आले आणि त्यामुळेच त्यांच्या काळात कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. पण म्हणून राजीव गांधी हे हलकट, नालायक होते असे कशावरून सिध्द होते? ४. प्रश्न राहिला कॉंग्रेस पक्षातील घराणेशाहीचा. आपल्याला नेता म्हणून कोण पाहिजे हे त्या पक्षातील लोकांना ठरवायचा पूर्ण अधिकार आहे. जर त्या पक्षाला गांधी घराण्यातीलच कोणी व्यक्ती नेतेपदी पाहिजे असेल तर तो त्यांचा प्रश्न झाला. अनेक लोक म्हणतात की राजीव गांधींना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून पंतप्रधान केले. मला ते पटत नाही. फार तर त्यांना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले हे मान्य करता येईल. पण पंतप्रधान म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले होते. आपल्या राज्यव्यवस्थेत कोणाही व्यक्तीला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेल तर पंतप्रधान बनता येते. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून अशा वैध मार्गानेच निवडून आले होते. मग त्याविषयी तक्रार का? असो. मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते. राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना यशस्वी पंतप्रधान असे म्हणायला अवघड जाते. त्यांचे श्रीलंका धोरण फसलेच. भारताला एक नवी आधुनिक दिशा द्यायची त्यांच्याकडे क्षमता होती असे मला वाटते. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही. त्यांना श्रध्दांजली विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 05/21/2010 - 19:23

In reply to राजीवजींना श्रध्दांजली by क्लिंटन

Permalink

आभार

माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार, क्लिंटन आणि वाहीदा! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Fri, 05/21/2010 - 19:36

In reply to राजीवजींना श्रध्दांजली by क्लिंटन

Permalink

भारतीय राजकारणातील विरोधाभास

राजीवजींना विरोध कोण करते बघा-- भाजीपचे (भारतीय जीना पक्षाचे) नेते. भारतीय राजकारणातील विरोधाभास कसा स्पष्टपणे दिसतो बघा. १९७७ च्या निवडणुकींमध्ये विरोधकांनी संजय गांधी, प्रकाशचंद्र सेठी, विद्याचरण शुक्ला, बन्सीलाल आणि जगमोहन या आणिबाणीदरम्यान बदनाम झालेल्यांवर टिकेचा भडीमार केला. पण नंतरच्या काळात कधीना कधी याच भाजपने प्रकाशचंद्र सेठींचा अपवाद वगळता इतर सर्वांना कधीना कधी डोक्यावर घेतले होते. १. स्वत: संजय गांधींचे १९८० मध्ये निधन झाले. नंतरच्या काळात इंदिरा गांधी आणि मेनका गांधी यांच्यात कडाक्याची भांडणे झाली आणि मेनकांना घर सोडावे लागले. नंतरच्या काळात मेनका गांधी कॉंग्रेसमधून बाहेर पडून संजय गांधींच्या ’विचारांचा’ प्रसार करण्यासाठी ’राष्ट्रीय संजय विचार मंच’ नावाचा पक्ष स्थापन केला होता. आजही संजय गांधींच्या आणिबाणीदरम्यानच्या भूमिकेवर अर्थातच मेनका गांधी मौन पाळतात. याच मेनका गांधी भाजपच्या खासदार आहेत. वाजपेयी सरकारमध्ये त्या मंत्रीपण होत्या. संजयपुत्र वरूण गांधीने आजपर्यंत कोणतेही मोठे काम केलेले नाही पण त्याच्या बेलगाम भाषेवरून आक्रस्ताळेपणात तो संजयची गादी चालवणार असे दिसते. २. विद्याचरण शुक्ला २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून छत्तिसगडमधील महासमंद लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या अजित जोगींकडून पराभूत झाले. ३. बन्सीलाल १९९६ ते १९९९ या काळात हरियाणाचे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. तसेच भाजप त्या सरकारमध्ये सामील होता. ४. जगमोहन १९९६ ते २००४ या काळात नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे खासदार होते. त्यांनी १९९० मध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगली कामगिरी केली असे म्हणतात पण ते आणिबाणीदरम्यान ’तुर्कमान गेट’ प्रकरणी बदनाम झालेच होते. संजय प्रतिनिधी असलेली आक्रस्ताळी मंडळी नंतरच्या काळात भाजीपबरोबर संलग्न झाली आणि संजयपेक्षा अनंतपटीने सुसंस्कृत असलेल्या राजीव गांधींचे समर्थन कॉंग्रेसमध्येच राहिले. हा भारतीय राजकारणातील एक मोठा विरोधाभास आहे. आणि तरीही भाजप राजीव गांधींना टिकेचे धनी बनवतेच. असो. विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by हवालदार on Sat, 05/22/2010 - 03:25

In reply to राजीवजींना श्रध्दांजली by क्लिंटन

Permalink

राजीव गान्धीनी १९९१ पर्यन्त स्वबळावर

सत्ता मिळवली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. १९८४ ला इन्दीरा लाट होती तर १९८९ ला पराभव झाला होता. हो १९९१ ला त्यन्च्या बलीदाना मुळे सत्ता मिळली खरी. नहितर तेव्हही काही खरे न्हवते.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 05/22/2010 - 11:04

In reply to राजीव गान्धीनी १९९१ पर्यन्त स्वबळावर by हवालदार

Permalink

वेगळा मुद्दा

मान्य. राजीव गांधींनी १९८४ ची निवडणुक जिंकली असे म्हणण्यापेक्षा मृत इंदिरा गांधींनी ती जिंकली असे म्हटले तरी चालेल. १९८० मध्ये इंदिरा गांधींचे पुनरागमन झाल्यानंतरच्या काळात इतक्या समस्या भेडसावू लागल्या. त्यामुळे विरोधकांनी आपापसात न भांडता काही प्रमाणात तरी एकी दाखवली असती तर इंदिराजींना १९८५ मधील निवडणुक जिंकणे कठिण गेले असते असे राजकिय निरीक्षक मानू लागले होते (संदर्भ: इंदर मल्होत्रा यांनी लिहिलेले इंदिरा गांधींचे चरित्र) पण सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईनंतर परिस्थिती थोड्या प्रमाणात बदलली आणि इंदिराजींची हत्या झाल्यावर तर कॉंग्रेसच्या झंझावातात विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले. त्यात इंदिरा हत्येचा वाटा मोठा आहे. माझा मुद्दा निवडणुक कोणी जिंकली हा मुळातच नाही. माझा मुद्दा आहे की राजीवजींना लोकसभेत बहुमताचा पाठिंबा होता आणि त्यामुळे आपल्या राज्यव्यवस्थेत त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा होता. गांधी घराण्यातलाच कोणीही लोकसभेत बहुमत नसेल तर पंतप्रधान बनू शकणारच नाही आणि जर गांधी घराण्यातील कोणाकडे (किंवा अन्य कोणाकडेही) लोकसभेत बहुमत असेल तर त्या व्यक्तीस पंतप्रधान बनण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तेव्हा राजीवजींच्या पंतप्रधानपदास्चा घराणेशाहीशी संबंध का जोडतात हे मला कळलेले नाही. विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 05/22/2010 - 11:41

In reply to वेगळा मुद्दा by क्लिंटन

Permalink

माहीतीपुर्ण प्रतिसाद

क्लिंटन , तुमचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहीतिपुर्ण ... आवडला :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 05/22/2010 - 11:27

In reply to राजीवजींना श्रध्दांजली by क्लिंटन

Permalink

शेवटच्या मुद्द्याबद्दल +१.

मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते. राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना यशस्वी पंतप्रधान असे म्हणायला अवघड जाते.
+१. 'सरळमार्गी'पेक्षासुद्धा 'काही चांगले उद्देश मनात बाळगून असलेले' म्हणता येईल. (Well-meaning.) त्यातले त्यांना जमले किती हा वेगळा मुद्दा. इतर राजकारण्यांच्या तुलनेने स्वच्छ असावेत. बोफोर्स अलाहिदा. 'धूर्तपणा नव्हता' खराच, शिवाय माणसाची पारख, कोणावर किती विश्वास ठेवावा आणि किती अवलंबून राहावे, या बाबतीत थोडे कच्चे असावेत. त्यामुळे आपल्याच माणसांनी टांग देण्याचे बळी पडत असावेत. बोफोर्स प्रकरणात म्हणूनच मोरू झाला असावा. पण एकंदरीत त्यातल्या त्यात 'चांगला, विश्वास ठेवण्यालायक माणूस' किंवा 'विचारांची काही एक निश्चित दिशा असलेला माणूस' वाटायचा खरा. मात्र एकंदरीत तितकेसे प्रभावी किंवा यशस्वी ठरले नाहीत हे मान्य करता येईल. - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 05/21/2010 - 19:27

Permalink

सहमत

मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते
सहमत.
आपल्याला नेता म्हणून कोण पाहिजे हे त्या पक्षातील लोकांना ठरवायचा पूर्ण अधिकार आहे
बरोबर्.पूर्वी घराणीशाहीच्या नावाने बोंब मारणारे महाराष्ट्रात घराणेशाहीच राबवत आहेत व त्यांचे मित्रपक्षही माना डोलवत आहेत.भारतात कुठलाही पक्ष असो, पक्ष चालवणार्‍यांची मानसिकता सारखीच असते.निवडणूका जिंकायच्या असतील तर पैसा आणि लोकांमधली छबी ह्या दोन्ही गोष्टींना महत्व आहे.काँग्रेसने ह्या गोष्टींचा पूर्वीपासुन वापर केला.ईतर पक्षांनीही नंतर तोच कित्ता गिरवला.
एक राजकारणी म्हणून धूर्त आणि चाणक्यनितीचे खेळ करण्यात राजीव गांधींना अपयश आले
९१ साली चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा वायफळ कारण देवून राजीव गांधींनी काढून घेतला होता.
भारताला एक नवी आधुनिक दिशा द्यायची त्यांच्याकडे क्षमता होती असे मला वाटते
सहमत. त्यांना श्रध्दांजली P = NP
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com