✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Wed, 05/19/2010 - 13:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5723 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अतिशय

नील_गंधार
Wed, 05/19/2010 - 14:15 नवीन
अतिशय चांगला विषय. लेखकाने मांडलेले मुद्दे अतिशय विचार करण्याजोगे आहेत. जर समाजरक्षकच आरोग्यदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याकडून व्यवस्थित काम कसे होईल? ह्याच प्रकारे इतरही लोकांचीहि वैद्यकिय तपासणी करायला पाहिजे. जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर. हि लोक देखील कामाच्या अनियमित वेळांमुळे ह्या व्याधींच्या शिकार होत असावीत. नील.
  • Log in or register to post comments

उदासिनता.....

इन्द्र्राज पवार
Wed, 05/19/2010 - 16:34 नवीन
"....जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर...." कोल्हापुरातील रोटरी आणि तत्सम उपक्रमात सहभागी असणार्‍या काही डॉक्टर्स मंडळींनी याबाबत स्थानिक डेपो मॅनेजरशी संपर्क साधला होता. त्यांनी या टीमच्या लीडर्सना कामगार नेत्याकडे पाठविले.... आता त्या नेत्याला यात आपल्या सभासदांना येनकेन प्रकारे "ड्युटीसाठी अपात्र" ठेवण्याचा हा डाव आहे असे वाटले. मग पुढे काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना आली असेलच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नील_गंधार

चांगला लेख

सहज
Wed, 05/19/2010 - 14:57 नवीन
कोणी आत्महत्या करते, कोणी वरिष्ठांना, सहकार्‍यांना गोळ्या घालुन मारते. आजकाल ह्या बातम्या जास्त येउ लागल्या आहेत. तब्येतीची काळजी ज्याने त्याने आपली घेतलीच पाहीजे. बरेचदा रुग्णानेच आरोग्याची हेळसांड केली असते. पोलीस आरोग्य, मनस्वास्थ अहवाल, उपाययोजना नक्कीच उहापोह झाला असेल पण प्रत्यक्ष परिणाम काय झाला आहे ह्याचा पुरावा कुठे मिळणार?
  • Log in or register to post comments

काळजी....!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/20/2010 - 16:01 नवीन
"....तब्येतीची काळजी ज्याने त्याने आपली घेतलीच पाहीजे.... हे व्यवसाय धंद्यात जे आहेत त्यांना एकवेळ शक्य आहे कारण आपले वेळापत्रक ते स्वत: आखू शकतात...बँक, विमा, आय.टी. आदी ठिकाणी नोकरी करणार्‍यांनादेखील शक्य आहे.... पण पोलिस नोकरीच्या ठिकाणी हे केवळ अशक्य आहे अशीच भावना येथे काम करणार्‍यांच्यात झाली आहे. १८ तास "पुतळा ड्युटी" हा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे? काय करत असतील हे पोलिस "शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर" आदींच्या पुतळ्याभोवती मांडी घालुन? आणि अशा स्थितीत काय आणि कशी तब्येतीची काळजी घ्यायची? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
गुरुवार, 05/20/2010 - 16:20 नवीन
म्हणुनच बहुदा ते मोर्चावर लाठीमार करायचा झाला की तावडीत सापडणार्‍यांना जीव तोडून बडवताना दिसतात. :D १८ तास पुतळा ड्युटी - यावर एक चर्चा होउ देच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

चांगला

भडकमकर मास्तर
Wed, 05/19/2010 - 16:29 नवीन
चांगला लेख.. विचार करायला लावणारा.. सहजराव म्हणतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष बदल कसा दिसणार? असेच म्हणतो _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments

सर्व

अरुंधती
Wed, 05/19/2010 - 17:46 नवीन
सर्व पोलिसांना शारीरिक तंदुरुस्ती फार आवश्यक आहे, कारण त्याच जोरावर ते त्यांचा तणावपूर्ण जॉब, अनियमित वेळा, कटकटी यांना सामोरे जाऊ शकतात. तसेच मानसिक तंदुरुस्तीसाठीही त्यांनी नियमित योगसाधना, मैदानी खेळ यांत भाग घेतला पाहिजे. परंतु ज्या खात्यात मनुष्यबळ कमी आहे, रिकामी पदे भरलीच गेली नाहीत अशा खात्यात पोलिसांना कायमच तणाव, नैराश्य, आजार यांना सामोरे जावे लागते. भरपूर दबावाखाली काम करावे लागते. पोलिसदलातील रिकाम्या जागा आधी भरल्या पाहिजेत, म्हणजे अतिरिक्त कामाच्या बोज्यातून काही अंशी तरी सध्याच्या पोलिसांची सुटका होईल. शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्यमापनही नियमित रूपात व्हायला पाहिजे व त्यात आढळणार्‍या कमतरतांना भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा अजून अनेक पोलिस असेच वेगवेगळ्या आजारांचे बळी पडत राहतील. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वेगवेगळ्या आजारांचे बळी .... !

इन्द्र्राज पवार
Wed, 05/19/2010 - 18:12 नवीन
अरुंधतीताई... माझा या ना त्या निमित्ताने पोलिस खात्यात काम करणार्‍या लोकांशी (वर्दी...आणि कार्यालयीनसुद्धा) त्यामुळे मला यांच्या जीवनशैलीची बर्‍यापैकी ओळख आहे, जाण आहे. तीवरुन मी पक्के विधान करू शकतो की, या लोकांना (अगदी क्रमांक १ ते शेवट...) जेवण झाल्यावर हात धुवायलादेखील वेळ नसतो.... आजचे जेवण स्टेशनमध्ये घेतले पण उद्याचे तिथेच होईल याचा शून्य भरवसा.... मग अशा लोकांना कुठला वेळ आहे नियमित योगसाधना करायला? हां... काही अगदी वरिष्ठ पदावर (आणि युपीएससी माध्यमातून आलेले मूठभर...) काम करणारे सोडले तर "योगा" करणे राहू दे, ९०% कर्मचारी "अहो पवार, हे म्हणजे काय वो ?" असेच मला विचारतील. फार विचित्र वेळापत्रक आहे यांचे.... या राजकारण्यांनी (अगदी राज्यपातळीपासून ते गल्लीबोळात फोफावलेल्या फाळकूट दादापर्यंत...सर्वांनी) यांचा अगदी गार्बेज कॅन केला आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

आज त्यांनी

अरुंधती
Wed, 05/19/2010 - 18:34 नवीन
आज त्यांनी स्वतःसाठी रोज थोडातरी वेळ काढला नाही तर उद्या त्यांच्यापाशीच वेळ उरणार नाही हे तुमच्या लेखातील आकडेवारीच सांगते. रोज किमान १५ मिनिटे ते अर्धा तास ते स्वतःसाठी देऊ शकतील? दारू, सिगरेट, तंबाखू इत्यादी शरीराची हानी करणार्‍या सवयींपासून दूर राहू शकतील? पोलिसांनाही तणावमुक्तीची सध्या सर्वात जास्त गरज आहे. अन्यथा तणावात राहून काम केल्यावर त्याचा कामाच्या दर्जावर व प्रकृतीवर असाच परिणाम होत रहाणार. पोलिसांनी सरकारकडे ह्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बघणे सोडून स्वतःच शारीरिक तंदुरुस्तीबाबत तरी आत्मनिर्भर व्हायला हवे. त्यांचे त्या विषयीचे जर अज्ञान असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न आरोग्यविषयक स्वयंसेवी संस्थांमार्फत करता येऊ शकतो. मुळात पोलिसांच्या मनात आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावायची इच्छाशक्ती पाहिजे, तरच हे साध्य होईल. लोकांमध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा मुळात मलीन, भ्रष्टाचारी, आळशी, कामचुकार, दिरंगाई करणारे अशी आहे. ती जर बदलायची असेल तर त्यासाठी पोलिसदलाला व प्रत्येक पोलिसालाच सक्षम व्हावे लागेल. अन्यथा स्टोरी मागल्या पानावरून पुढे चालू राहील. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

प्रतिमा....!

इन्द्र्राज पवार
Wed, 05/19/2010 - 23:00 नवीन
"....मुळात पोलिसांच्या मनात आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावायची इच्छाशक्ती पाहिजे, तरच हे साध्य होईल...." आपली या विषयाबाबतची आस्था मी आपल्या लिखाणाच्या धारेवरून सहज समजू शकतो. या बाबतीत माझा अभ्यास असे सांगतो की, आपल्या राज्यातील पोलिस दलातील (इथे पोलिस म्हणजे ज्यांना आपण "कॉन्स्टेबल" किंवा मराठीत "हवालदार" असे म्हणतो... तो वर्ग) कर्मचारी हा ७ वी ते १० इतपतच शिकलेला असतो.... आज अशा हवालदारांची संख्या आहे : १,४८,९१२ यापैकी "एक" टक्क्यापेक्षाही कमी लोकांना पुढील प्रमोशनची ओढ असते, कारण तेवढेच फक्त आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करीत असतात. बाकीचे "ड्युटी"च्या रगाड्याखाली चेपले जातात. "जागरण" हाच यांचा सर्वात मोठा शत्रू आहे.... अधिक वरीष्ठांच्या दारात अक्षरशः "कुत्र्या"च्या मोलाने काम करणे, त्यांच्या हलकटपणाच्या सीमा ओलांडलेल्या शिव्या खाणे हेच यांचे काम. आपण फक्त "ट्रॅफिक" पोलिसांचा रुबाब पाह्तो; पण वर दिलेल्या आकडेवारीत त्या विभागात केवळ पंचवीस हजार आहेत, बाकीचे अन्य घाण पुसायला. तुम्हाला "पुतळा ड्युटी" हा प्रकार माहित आहे? अंगावर काटा येईल तुमच्या जर का मी त्याबद्दल काही लिहित गेलो तर....!! "...लोकांमध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा मुळात मलीन, भ्रष्टाचारी, आळशी, कामचुकार, दिरंगाई करणारे अशी आहे...." नक्कीच आहे... आणि त्यात ते खाते स्वत:च तितकेच जबाबदार आहे. पण हा विषय आपण नंतर केव्हा तरी चर्चेला घेऊ. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

+ १/ -१

प्रसन्न केसकर
Wed, 05/19/2010 - 23:34 नवीन
काही बाबींमधे सहमत तर काहीत असहमत. आपल्या राज्यातील पोलिस दलातील (इथे पोलिस म्हणजे ज्यांना आपण "कॉन्स्टेबल" किंवा मराठीत "हवालदार" असे म्हणतो... तो वर्ग) कर्मचारी हा ७ वी ते १० इतपतच शिकलेला असतो.... आज अशा हवालदारांची संख्या आहे : १,४८,९१२ हे ग्रामीण भाग/ छोटी शहरे इथले वास्तव आहे पण मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद अश्या शहरात चित्र वेगळे आहे. तिथे जवळपास १०० टक्के कॉन्टेबल आणि ८० टक्के हवालदार, सउनि पदवीधर आहेत. सक्षमीकरण हे शिक्षणाने होतेच पण त्यासाठी अनुकुल परिस्थिती देखील लागते. महाराष्ट्राच्या पोलिस दलात ती नाही. याला राजकारणी तर जबाबदार आहेतच पण त्याहुनही जबाबदार आहेत वरिष्ठ, अतिवरिष्ठ नोकरशहा. त्यांनी भ्रष्टाचारालाच यंत्रणा बनवण्यात त्यांचा बराच मोठा हात आहे. बदली, नियुक्तीकरता होणारी पैशांची देवाणघेवाण, आपापसातली गटबाजी अश्या अनेक गोष्टीत ते गुंतलेले आहेत. त्यांच्या राजकारणात अनेकदा पोलिस कर्मचारी बळी जातात. रस्त्यावर उभे रहाणारा ट्रॅफिक पोलिस जेव्हा १०० रुपये घेतो तेव्हा त्याला त्यातले अगदी थोडे पैसे मिळतात. उरलेले पैसे वरिष्ठांमधेच वाटले जातात. हे राजकारण्यांना चांगले माहिती असते आणि नेते याचा फायदा घेऊन पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणे, बदली आणि नियुक्ती करतापैसे घेणे करतात. पोलिसांवर सेवेअंतर्गत अन्याय झाला तर त्यांना कॅट, मॅट, न्यायालये इत्यादी ठिकाणी दाद मागता येते. तेथे हजारो प्रकरणे दरवर्षी जातात पण त्यातली बहुसंख्य वरिष्ठ अधिकार्‍यांची असतात. उपनिरिक्षक, सहाय्यक उपनिरिक्षक, हवालदार, नाईक, शिपाई या पदावरच्या लोकांची तिथे डाळ शिजणे अवघड असते. तीच बाब खात्याअंतर्गत चौकशीबाबतही लागु होते. अश्या परिस्थितीत कसले आलेय सक्षमीकरण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

पदवीधर पोलिस....!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/20/2010 - 09:30 नवीन
"....मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद अश्या शहरात चित्र वेगळे आहे. तिथे जवळपास १०० टक्के कॉन्टेबल आणि ८० टक्के हवालदार, सउनि पदवीधर आहेत...." माझ्याकडील आकडेवारी ही थेट गृहखात्याशी संबंधीत विभागाकडील आणि रितसर परवानगी घेऊन तयार केलेली आहे. तुम्ही म्हणता तशी "पदवीधर" संकल्पना (वास्तव असले तरी....) "पोलिस आणि कॉन्स्टेबल" तत्सम पदाना लागू होत नाही, म्हणून वरिष्ठांच्या दृष्टीने ते अद्दापही "शिपाई"च राहिले आहेत. परवाच आपल्या या संस्थळावर एका धाग्याच्या चर्चेत असे दिसून आले की, मुंबईच्या दिवाणी न्यायालयात "हमाल" पदासाठी दिलेल्या जाहिरातीला ६६१ पदवीधर आणि ७३ पदव्युत्तर युवकांनी अर्ज केले.... आणि भरतीसाठी अट होती ५ वी पास. काय करणार आता? पुढे जर तुम्ही किंवा मी "हमाल" संदर्भात जर एखाद्या धाग्यावर चर्चा करु लागलो तर हमालांची प्रतवारी कोणत्या निकषावर लावणार? बिलिव्ह मी.... पोलिस खात्यातील वरिष्ठांना असे "अती" शिकलेले पोलिस अजिबात नको असतात. (हा सर्व्हे मी स्वतः केलेला आहे.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

मग अशा

अरुंधती
गुरुवार, 05/20/2010 - 18:35 नवीन
मग अशा अवघड परिस्थितीत, अशा तणावाच्या वातावरणात पोलिसांसमोर हेच प्रश्न, समस्या पुन्हापुन्हा येत राहणार! अवघड काम, त्यामुळे तब्येतीची होणारी हेळसांड व त्यातून उद्भवणार्‍या समस्या अशाच चालू राहणार, नव्हे वाढतच जाणार! पोलिसांनाच ठरवावे लागेल की समस्येचा एक भाग बनून जगायचे की त्यावर उपाय शोधायचे! इतरांकडून मदतीची अपेक्षा व्यर्थ आहे. त्यांनाच अग्रक्रम ठरवावे लागतील. कारण जोवर पोलिसच स्वतःची स्वतःला मदत करत नाहीत तोवर अन्य कोणीही त्यांना मदत करू शकणार नाही! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

पोलिस दलात

स्पंदना
Wed, 05/19/2010 - 20:10 नवीन
पोलिस दलात काम करणारे माझे मामा तीन तीन दिवस घरी यायचे नाहीत. मुम्बई पोलीसान कडुन हेच वाक्य मी कायम ऐकत आले. मी ज्यान्च्या घरात भाडेकरु म्हणुन रहायचे, ते पिता, पुत्र दोघेही पोलीस होते. त्यान्ची हालत तर विचारु नका. आपण रस्त्यावर उभे राहुन खुशाल पोलीसान्ना शिव्या देतो, पण या लोकान्ना खरोखरच कुटुम्ब सहवास अतिशय कमी मिळतो. माझे मामा पोलीस निरिक्षक होते, पण कधी तरी दुपारी त्यान्चा घरी येतोय म्हणुन फोन आला की मामी धावपळ करुन काही तरी चान्गल चुन्गल बनवायला बघायच्या. त्यन्च्या तोन्डी "हे ना! घरचे पाहुणे" नका पाहु त्यान्ची वाट कधीच वेळ नसतो त्यान्ना" आत्ता खुप विचार करायला लावते. "....जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर...." एकदा कोल्हापुर् हुन बाहेर गावी जात असताना सर्वात समोरच्या सिट वर जागा मिळाली. सहज गप्पा सुरु झाल्या. माझ्या तोन्डुन अगदी सहज एक वाक्य गेल, म्हन्टल रिटायर्ड झालात की परत तुम्हाला प्रवास करावासा वाटत नसेल नाही. क्षण भर माझ्या कडे त्या पन्नाशीच्या ग्रुहस्ताने रोखुन बघीतले. २५ वी शीच्या या पोरीला काही सान्गाव की नको या विचारात ते थबकले, अन त्या नन्तर " सवय होते शरीराला कायम प्रवासाची.प्रवास थाम्बला की माणुस पण थाम्बला. मी तरी आज पर्यन्त दोन वर्षाच्या वर पेन्शन खाल्लेला ड्राईव्हर बघीतला नाही. अस अगदी गम्भीर पणे ते बोलुन गेले. काटा आला मला त्यान्च्या त्या नजरे कडे बघुन, शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

काटा.....!!!

इन्द्र्राज पवार
Wed, 05/19/2010 - 21:18 नवीन
".... मी तरी आज पर्यन्त दोन वर्षाच्या वर पेन्शन खाल्लेला ड्राईव्हर बघीतला नाही..." बाप रे !! झरदिशी अंगावर काटा आला हे वाक्य वाचून... मी इथे बसून वाचत असताना असे म्हणतो.... मग तुमची तर काय अवस्था झाली असेल हे वाक्य प्रत्यक्ष त्या इसमाच्या तोंडी आले तेव्हा ?? तुम्ही खरं तर अशा प्रसंगावर एक स्वतंत्र धागा करावा असे सुचवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा सुरु आहे....

प्रसन्न केसकर
Wed, 05/19/2010 - 21:11 नवीन
http://misalpav.com/node/8454 इथं पुर्वी या विषयावर लिहिलं होतंच पण पुनरुक्तीचा धोका लक्षात घेऊनही परत लिहिण्याचा मोह आवरेना. सहज म्हणतात तसा पोलिसांचे आरोग्य, त्यांच्यावरचा तणाव या बाबींचा उहापोह शासकीय तसेच सेवाभावी संस्थांच्या पातळीवर गेली दोन दशके तरी नक्कीच सुरु आहे. अनेक योजना बनवल्या जातात पण त्यातल्या फार थोड्यांची अंमलबजावणी होते अन झाली तरी त्यांचा फायदा कनिष्ठ कर्मचार्‍यांना होणे शक्य होत नाही. पोलिसांना दिवसाला बारा तास ड्युटी असते पण बहुतेकदा ते १६-१८ तास काम करतात आणि बहुतेकदा आठवड्याच्या सुट्ट्या, रजा बंद असतातच. कामातला बराचसा वेळ बंदोबस्तात जातो. बंदोबस्त आणि तपासासाठी खात्याअंतर्गत समांतर यंत्रणा बनवण्याबाबत बरेच बोलले लिहिले गेले आहे पण कुणीच कधीच काही केलेले नाही. पोलिसभरती मधे खेळाडुना प्राधान्य दिले जाते पण भरतीनंतर कामाच्या रामरगाड्यात त्यांचे खेळ सुटतात ते कायमचे. पोलिसांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, योगा, प्राणायाम वगैरेचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात पण कामाच्या रगाड्यात तिथे जायला वेळ मिळण्याची मारामार असते. पोलिसांच्या आजारीपणाची रामकहाणी अजुनच वेगळी असते. पुर्वी संजिवनी निधी नावाचा निधी असे, आजारपणाच्या खर्चासाठी. त्यासाठी पोलिसांच्याच पगारातुन दरमहा पैसे कापले जात आणि कुणी आजारी पडला की मदत मिळे. पण ती मदत देखील नंतर पगारातुन पैसे कापुन परत वसुल करुन घेतली जाई. बहुतेक मोठ्या शहरांमधे पोलिस हॉस्पीटल आहेत पण त्याचे स्वरुप हॉस्पीटलपेक्षाही दवाखान्यासारखेच असते. आजारपणाची रजा मंजुर करुन घेण्यासाठी सरकारी दवाखान्याचेच सर्टीफिकेट आवश्यक असल्याने बहुतेकदा पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सरकारी दवाखान्यातच उपचार घेतात. खाजगी डॉक्टरांची फी परवडण्याचाही भाग असतोच. मुंबईत पोलिस कर्मचार्‍यांच्या मनोरंजनासाठी एक क्लब होता पुर्वी. नंतर असे कानावर आले की तो क्लब बंद केला अन तिथे अतिवरिष्ठ अधिकार्‍यांसाठी काही अतिरिक्त सुविधा सुरु केल्या.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

स्वाती२
गुरुवार, 05/20/2010 - 19:32 नवीन
चांगला लेख आणि चर्चा. पण या सगळ्यावर उपाय काय?
  • Log in or register to post comments

अरेरे!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/20/2010 - 19:46 नवीन
फौजदारांबद्दल वाचून वाईट वाटले. इतक्या जिंदादिल माणसाला पण आत्महत्या करावीशी वाटली हे भयानकच आहे. बाकी धाग्यात आणि प्रतिसादात मांडलेले वास्तव नवीन नसले तरी जळजळीत आहेच. काटा येतोच अंगावर. मला व्यक्तिशः पोलिसांबद्दल राग नाही सहानुभूति वाटते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

योग्य मापन...!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/20/2010 - 22:13 नवीन
"....मला व्यक्तिशः पोलिसांबद्दल राग नाही सहानुभूति वाटते....." हे तुम्ही लाख मोलाचे बोलला आहात बिपिन जी. दीडदमडीचीही किंमत नसलेले हिंदी/मराठी सिनेमे आणि दळभद्री टीव्ही मालिका पाहुन आपण एखाद्या व्यवसायाची/नोकरीतील अवस्थेची, सत्याचा अपलाप करणारी, प्रतिमा मनी ठसवितो... अन् प्रत्यक्ष जीवनात ते समोर आले की त्याच नजरेने त्यांना चितारतो. अर्थात या गटात सर्वच धुतल्या तांदळासारखे आहेत असे मी कधीच विधान करणार नाही, नव्हे, करूच शकत नाही. पण तसे पाहीले तर अन्य सार्वजनीक क्षेत्रातदेखील बजबजपुरी माजलेली आहे, आणि तो एक वेगळाच विषय आहे. आपला हा धागा "ड्युटीचे स्वरूप" इतकाच आहे. पोलिस नाम हा एक बदनाम बुक्का आहे हे खरे आहे, पण अन्य नोकरी क्षेत्रात काम करणारे हे साईबाबाच्या धुनीतील धूप आहेत असे कुणी मानू नये... इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

अर्धसत्य

विकास
Fri, 05/21/2010 - 00:07 नवीन
वरील घटना खूपच दुर्दैवी आहे. कुणाच्याही बाबतीत असे होवू नये असेच वाटते. पोलीसातील भ्रष्टाचार, कधीकधी माजुरडेपणा, पांडू हवालदार पासून ते अब तक पचपन सारख्या चित्रपटात चित्रित केलेली प्रतिमा - एक ना अनेक गोष्टींमुळे पोलीस म्हणले की फार काही चांगले वाटत नाही... नाण्याची दुसरी बाजू कधीच समजत नाही कारण सरकारी असल्याने त्यांना कुठवर बोलावे यावर मर्यादा असतात असे वाटते. बाबूगिरीच्या माजुरडेपणा बद्दल आणि राजकारण्यांच्या नोकरासारख्या अमर्याद वापराबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. बाबूगिरी हा तर एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्यावर परत कधीतरी अधिक, पण एकच वाटते की त्यांना असलेले सुरक्षाकवच (job security) ही निघून गेली पाहीजे. कदाचीत नवीन काही प्रश्न निर्माण होतील पण याचा दूरगामी फायदाच होईल... ८०च्या दशकात, नक्की कधी ते आठवत नाही, पण एकदा अति झाले असे वाटून महाराष्ट्र पोलीसांनी यावर आवाज उठवला होता. इतका की ते रस्त्यावर शस्त्रे घेऊन उतरले. मला वाटते, तेंव्हा शिवाजीराव पाटील नीलंगेकर मुख्यमंत्री होते. बर्‍याच पोलीसांना निलंबीत केले गेले (अर्थातच त्यातील "पॉवर" नसलेल्यांना). तेंव्हा शरद पवारांनी पोलीसांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते... पण स्वतः सत्तेत आल्यावर काय केले कोण जाणे. वर अरुंधतींनी म्हणले आहे, "पोलिसांनाच ठरवावे लागेल की समस्येचा एक भाग बनून जगायचे की त्यावर उपाय शोधायचे!" आज वास्तव असे आहे की हाच प्रश्न सामान्य नागरीकाच्या बाबतीतही आहे असे वाटते. जेंव्हा वरीष्ठांच्या दडपणात स्वत:चे काम राहील का, राहीले तर कुठे आणि कसे रहाणार असे प्राथमिक प्रश्न पडलेले असतात, तेंव्हा एक आजचा दिवस कसा निघतो ही विवंचना सोडल्यास बाकी काही सुचणे शक्यच नाही असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा