उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा" पुस्तक
नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो.
यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो. छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. भारावलेल्या अवस्थेत बाहेर येतांना अभिप्राय वहित हे सगळं पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध व्हावे असे लिहुन आलो. अशीच प्रतिक्रिया अनेक जणांनी आधीच लिहुन ठेवली होती. पुढे बरेच दिवस काहि कानावर आले नाहि.
पण यावेळी मात्र हि सगळि छायाचित्रे असेलेले पुस्तक हाती लागले आहे - उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा". अलभ्य लाभ! पानांवर क्रमांक नाहित पण साधारण पणे १००-१५० पाने असावीत. पुस्तकाची मांडणी आकर्षक आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद आणि छपाई उत्कृष्ठ दर्जाची आहे. किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे. प्रत्येक (माझ्या मते!) मराठी माणसाच्या संग्रहात हवे असे हे पुस्तक आहे.
म.टा. बातमी: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5866015.cms
सकाळ बातमी: http://72.78.249.124/esakal/20100428/5285395004349812569.htm
जय महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
खरे आहे
अवांतर
मला वाटते...
सुंदर
उद्धव
उद्धव
ह्म्म्म...
किंमत
भेट
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१