न लिहिलेल्या खरडी
प्रास्ताविकः खरडवह्या व त्यांचा वापर याविषयी नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. पण खाली दिलेल्या खरडी कोणीही कुठेही लिहिलेल्या नाहीत. या खरडींचे लेखक प्रत्यक्षात अस्तित्वात असले तरी हे लिखाण पूर्णतः काल्पनिक आहे. खरड लिहिणार्याच्या नावाचे फक्त आद्याक्षर लिहिले आहे. ती खरड कुणी कुणाच्या खरडवहीत लिहिली असेल ते ज्याने त्याने ठरवायचे आहे. 'ता' म्हणजे 'ताकभात' समजा वा 'ताडी' समजा. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.
सदर लेखन गंभीरपणे घेण्यास सक्त मनाई आहे. तसा प्रयत्न करणारे परिणामास 'खुद जिम्मेदार' राहातील याची कृपया नोंद घ्यावी. प्रास्ताविक संपले.
टा: ओ काका, तुमचं लक्ष कुठं आहे? या प्राजुने आपल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं किती आयडी उघडे केलेत बघा की. मिसळभोक्ता म्हणजे सर्किट, नाना चेंगट म्हणजे अवलिया, केशवसुमार म्हणजे अनिरुद्ध अभ्यंकर... काय चाललंय काय आं? असंच चालू राहिलं तर उद्या राजेश घासकडबी, वसंत सुधाकर लिमये, अक्षय पुर्णपात्रे, धम्मकलाडू या सगळ्यांचे चेहरे उघडे पडतील की! तुम्ही संपादक मंडळी काय संपादन करता का हजामती?
रा. घा.: नमस्कार. तुमच्या खरडवहीत माझ्या आयडीबद्दल खोडसाळपणाने लिहिलेला मजकूर वाचला. माझा एकमेव आयडी राजेश घासकडबी हाच आहे. माझ्यावर डूख धरुन असणार्या लोकांनी असले काहीबाही लिहावे हे मिसळपावच्या परंपरेला शोभणारे नाही. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना समज द्यावी.
टा: ओ काका, आम्ही अशा समजांना फाट्यावर मारतो . आणि खोडसाळ कुणाला म्हणता? खोडसाळ हा कुणाचा आयडी आहे सांगू का?
भ.मा: शरदिनीतै, तुझी अर्थगर्भ कविता फार दिवसात वाचली नाही. तुझ्या आणि प्राजुच्या कविता हे मिपाचं भूषण आहे.
शः दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. कृपया प्राजु आणि माझा उल्लेख एकाच वाक्यात करु नये. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी. मनात आणलं असतं तर असे चारपाच कवितासंग्रह मी अकलूज, येडेनिपाणी , गडमुडशिंगी , जत अशा गावांत प्रकाशित केले असते. मुद्दाम खरड लिहिल्याबद्दल आभार, पण पुन्हा प्रतिसाद देताना हे ध्यानात ठेवावे.
मु: तात्या, तुझ्या संकेतस्थळावर शुद्धलेखनाचे एवढे काही नाही असे तू म्हणतोस. (तुझ्या भाषेत फाट्यावर मारतोस) पण सर्व उर्जा बलसंवर्धनात व्यय झाल्याने बुद्धीमांद्य आलेले वळू इथे सगळ्यालाच हरताळ फासत आहेत. या सगळ्याला तुझीही फूस असावी असा माझा कयास आहे. एका कानामात्रेने, एका अक्षराने, र्ह्स्वदीर्घाने काय फरक पडतो हे मी तुला सांगायला नको. 'धरावे' चे 'मारावे' होते. 'चिरदाह' चे 'चीरदाह' होते. 'सगेसोयरे' चे 'गेसोयरे' होते. तू याला कुठे तरी आवर घालावास एवढेच मला सुचवावेसे वाटते.
वि: आपले सर्व संपादकीय अधिकार काही काळापुरते काढून घेण्यात येत आहेत. संपूर्ण लोकशाही तत्वांवर चाललेल्या या संकेतस्थळावर फायनल शब्द माझाच आहे, हे ध्यानात ठेवावे.
बि: अशी कशी गं तू?
प्रि: मी आहे तशी आहे. कुणीतरी आल्यागेल्यांची टवाळी करावी, हे मला तरी सहन होणार नाही. आंतरजालावर प्रसिद्ध लोकांच्यावर चिखलफेक करायची हल्ली फॅशनच आली आहे. आणि माझ्यापेक्षा प्रसिद्ध आंतरजालावर कुणीच नाही, हे मलाही ठाऊक आहे. सारखे मलाच टार्गेट करतात मेले.
मिभो: सुकांना त्यांच्या लेखांपेक्षा आपण सध्या कुठे आहोत, काय करत आहोत हे सांगण्यात अधिक रस आहे, असे दिसते. क्याथे प्यासिफिकच्या इकॉनॉमी क्लासमध्ये असलेले झुरळही बराच प्रवास करते म्हणावे!
ला: ताई, कित्ती गोड, कित्ती गोड गं तुझ्या कविता! 'गुण्गुणू मी कशी, रंग मेंदीचे पुन्हा, जावळावरी तुझ्या, आज प्रीतीच्या खुणा' डोळे भरुन आले गं! कसं कसं सुचतं गं तुला हे?
वि: डॉक्टरसाहेब, माझ्या लेखाला तुमच्या दुसर्या आयडीकडून एकही प्रतिसाद नाही. आपलं काय ठरलंय? तरी माझ्या लिखाणात मी चेकॉव्हबिकॉव्ह सगळे टाकले आहेत
प्रा: माफ करा हां भाऊ. अहो, जरा नेटवर उर्दू शायरीचा शोध घेत होतो. मायला या उपक्रमावर शायरीशिवाय प्रतिसाद देणं मुश्किल होऊन बसलं आहे बॉ!
इंपः माफ करा हां सायेब. मी नवीन असल्यामुळे जरा अडचण येते. या एकदा कोल्लापुरला आमच्या. मस्तपैकी तांबडा-पांढरा पिऊ!
ऋ: तुमच्या या प्रतिसादावरुन हे आठवले!
जे: अहो, मी कसला ग्रेट? बरं आता तुम्ही म्हणताय, त आहे मी ग्रेट. बस? एकदा ग्रांट रोड स्टेशनवर रमेश भाटकर दिसला तर चटकन जाऊन त्याचे पाय धरले. 'काय, काय..' म्हणत खिसा सावरत मागे सरला. म्हटलं, कसाही दिसोस बाबा, स्नेहलजींचा मुलगा आहेस तू....
श्रामो: बाणेदारपणा वगैरे काही नाही. बांधिलकीही नाही. माझे लिखाण मी एकापेक्षा अधिक संकेतस्थळांवर एकाच वेळी टाकतोही. जिथे क्लास तिथे प्रतिसाद कमी, जिथे मास तिथे जास्त असे तू म्हणतोस. ते तर मलाही ठाऊक आहे.
प्रः 'रोशनी' च्या अलीकडच्या भागाने मला माझे जुने मत बदलावेसे वाटू लागले आहे.
साबा: भटाबामणांच्या इतर संकेतस्थळांसारखे हे स्थळ नसावे असे वाटते. हिंदुस्थान जिंदाबाद!
चि: माझे प्रतिसाद कंटाळवाणे न होता रंजक व्हावेत यासाठी माझ्या 'जनुकात' काही बदल घडवून आणता येणे शक्य आहे काय?
धः विकासरावांना विचारा. रटाळ प्रतिसाद हे खाते आजन्म त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
प्रदे: पांचाळे आजारी पडण्याचा आणि माझा त्यांच्या गजलांना चाली लावण्याचा काही संबंध नाही. उगीच वडाची साल पिंपळाला चिकटवत जाऊ नका.
चः आंद्याला म्हटलं होतं, सिसिलियन डिफेन्स वापरु नको. नाही ऐकलं त्यानं. म्हटलं, मर...
प्रा: भारत, त्यातल्या त्यात महाराष्ट्र, त्यातल्या त्यात कोल्हापूर म्हटलं की मला भरुन येतं. रंकाळा, अंबाबाईचं देऊळ, त्या कुस्त्या, तो उसाचा रस, ती काकवी... मग मी वॉलमार्टमध्ये शॉपिंगला जाते.
प्रतिक्रिया
:-)
वळाया लागल्या जिव्हा
ओटमील
कुछ जम्या
काहीशी सहमत
सहमत... जरा
+१
बहुधा हि खरड
हा हा
पण,
येक नंबर
व्वा...
जे
दिल्खुष... पान मसाला...!!
रावसाहेब...
+१
जराशी गंमत
हा हा हा.....
+१
कल्पकतेला
मूळ लेख
लगे रहो...!
आहे छान पण...
...
लय भारी
जय हो !!!!