✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 04/22/2010 - 02:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6615 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

मनःपूर्वक शुभेच्छा

बेसनलाडू
गुरुवार, 04/22/2010 - 03:55 नवीन
बुद्धीबळात फारसे प्राविण्य नसले तरीही आपण आनंदचे जुने फ्यान आहोत आणि त्याच्या बव्हंशी सगळ्या सामन्यांकडे डोळे लावून बसलेले असतो. आनंदला या लढाईसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू आनंदची सचिनशी केलेली तुलना पटली. (तुलनात्मक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:19 नवीन
+१ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+१

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 04/22/2010 - 04:14 नवीन
.
  • Log in or register to post comments

आनंदला या

प्रभो
गुरुवार, 04/22/2010 - 05:32 नवीन
आनंदला या लढाईसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

६४ घरांतलं नाट्य

राजेश घासकडवी
गुरुवार, 04/22/2010 - 10:30 नवीन
सर्व जग दृ्क्श्राव्य माध्यमांच्या आहारी जात असताना नाट्य म्हणजे चित्रमय हालचाली व अनुषंगिक ध्वनि असा गैरसमज होण्याची सहज शक्यता असते. हे सहज ओळखता येणारं, मनाला गुंगवण्यासाठी सोपे मार्ग चोखाळणारं विश्व. यात बुद्धीबळाच्या ६४ घरांत तितकंच नाट्य निर्माण होऊ शकतं हे कळायला ती गंमत खूप वेळा चाखावी लागते. ही अॅक्वायर्ड टेस्ट आहे. आनंद विश्वविजेता म्हणून सचिनशी तुलना करणं एक, व स्वत: त्याचे पटीय कव्हर ड्राईव्ह, अप्पर कट्स ओळखून त्याला दाद देणं वेगळं. ज्यांना हे दिसतात त्यांना जगातल्या सौंदर्यांचा एक नवीन पैलू दिसतो. ज्यांना नाही दिसत त्यांच्यासाठी केवळ देशाभिमान. मी या दोनच्या मध्ये कुठेतरी आहे. जर कोणी अधिक ज्ञान असलेल्याने समालोचन केलं तर आवडेल. तोपर्यंत 'आनंद, आगे बढो, हम तुम्हारे साथ है' इतकंच....
  • Log in or register to post comments

आनंदला

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/22/2010 - 17:07 नवीन
आनंदला शुभेच्छा! (निव्वळ देशाभिमानी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आनंदला माझ्याही शुभेच्छा.

प्रमोद देव
गुरुवार, 04/22/2010 - 10:43 नवीन
खरंच आहे...आनंद आणि सचिन...दोघेही यशाच्या अत्युच्च शिखरावर आहेत पण दोघांचे पाय अजूनही जमिनीवर घट्ट आहेत. अशा ह्या दोघां जगज्जेत्या आणि तरीही सदैव विनम्र असणार्‍यांचा मी निस्सीम पंखा आहे. क्रिकेट आणि बुद्धीबळ...दोन्हीही खेळ माझ्या आवडीचे आहेत..आणि मी ते मनसोक्त खेळलोय.
  • Log in or register to post comments

ह्या दोन

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 10:55 नवीन
ह्या दोन तुल्यबळ खेळाडूंमधला सामना कसा रंगतो हे बघायला सगळे जग उत्सुक आहे.
दोघांनाही मनापासून शुभेच्छा.. तात्या.
  • Log in or register to post comments

क्लासिक

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 11:44 नवीन
क्लासिक रंगा !!!!!!!!!!!!! - (बुद्धिबळप्रेमी) चेकेश मेटकरवी
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

ज्ञानेश...
गुरुवार, 04/22/2010 - 13:03 नवीन
आनंदला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हे ईलो

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 14:30 नवीन
हे ईलो रेटिंग आणि विश्वविजेतेपद ह्या मधे नेहमीच गोंधळ उडतो.. बाकी ह्या स्पर्धे कडे लक्ष आहेच.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

एलो रेटिंग

चतुरंग
गुरुवार, 04/22/2010 - 16:22 नवीन
फिडे हे रेटिंग देते. सामन्यांना दर्जा दिलेला असतो. ज्या दर्जाच्या सामन्यात खेळाडू खेळेल आणि जिंकेल, हरेल किंवा बरोबरी करेल त्यानुसार हे रेटिंग बदलत जाते. संख्याशास्त्रावर आधारलेली ही पद्धत आहे. उदा. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा सगळेच ग्रँडमास्टर्स खेळत असलेल्या स्पर्धेचं एलो रेटिंग जास्त असणार. लेखात देलेला विकीचा दुवा भरपूर माहिती देतो. विश्वविजेतेपद आणि फिडे रेटिंग यांचा थेट संबंध असतोच असं नाही. उदा. इथे बघ सध्याचा विजेता आनंद चौथ्या स्थानावर आहे आणि त्याचा आव्हानवीर टोपालोव दुसर्‍या. कारण मागच्या विजेतेपदापासून आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या दोघांनी ज्या स्पर्धा खेळल्या त्यावर हे रेटिंग बदलते. आणि ही स्थिती मार्च २०१० ची आहे. एप्रिलच्या शेवटाला पुन्हा कदाचित हे बदललेले असेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

सामना

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 16:59 नवीन
या सामन्याविषयी तुमचं समालोचन (च्यायला, काय म्हणावं हे सुधरेना. म्हणून हा शब्द वापरला - मला म्हणायचं आहे ते इतकंच की या सामन्याचं 'रसग्रहण' (च्यायला, परत तसंच काही तरी. असो) तुम्ही करा) वाचायचे आहे. तेव्हा तयारीत रहा ही मागणी पुरवण्यासाठी. आता ही मागणी हीच या लेखावरची दाद आहे हे समजून घ्यालच.
  • Log in or register to post comments

रंगाशेठ

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 17:03 नवीन
रंगाशेठ अशी आधीच काही प्रॉमिसं देऊन आणि ती पुरी न करता बसले आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा हा!

चतुरंग
गुरुवार, 04/22/2010 - 17:07 नवीन
तुम्हाला विश्लेषण म्हणायचं आहे बहुदा! इथे धावतं समालोचन अवघड आहे पण 'चाल'तं रसग्रहण करायचा प्रयत्न राहील! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हां...

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 18:14 नवीन
'चाल'तं रसग्रहण... करेक्ट. हेच. वर बिका म्हणतात तसं काही करू नका. लई बोटं मोडंन तुमच्या नावानं तसं काही केलं तर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मोडकांच्य

धमाल मुलगा
Mon, 04/26/2010 - 20:30 नवीन
मोडकांच्या पुर्ण प्रतिसादांशी बाडिस!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ताज्या बातमीनुसार

चतुरंग
गुरुवार, 04/22/2010 - 18:07 नवीन
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २० ऐवजी २१ एप्रिलला होईल आणि स्पर्धा २३ ऐवजी २४ एप्रिलला सुरु होईल. चला एक दिवसाची का होईना जादा विश्रांती मिळाली आनंदला. चतुरंग
  • Log in or register to post comments

विजयी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/22/2010 - 18:12 नवीन
विजयी होण्यासाठी आनंदला आणि सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी रंगाशेठला शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे [वजीर]
  • Log in or register to post comments

ताजी बातमी

चतुरंग
Sat, 04/24/2010 - 01:16 नवीन
उद्या शनिवारी पहिला सामना दुपारी २ वाजता (कोऑर्डिनेटेड युनिवर्सल टाईम - हा पूर्वी ग्रीनिज मीन टाईम म्हणून ओळखला जायचा) ला सुरु होईल. त्यानुसार आपापल्या ठिकाणच्या वेळा तपासून सामन्याचे थेट कवरेज जिज्ञासूंना खालील दुव्यावर बघता येईल http://www.chess.com/news/anand-v-topalov-live-coverage-4870 राहिलेले सर्व सामने मात्र दुपारी १२ (कोऑर्डिनेटेड युनिवर्सल टाईम) वाजता सुरु होतील. चतुरंग
  • Log in or register to post comments

पहिल्या डावात आनंद अपेशी.

प्रमोद देव
Mon, 04/26/2010 - 16:49 नवीन
आनंद पहिल्या डावात अपेशी
  • Log in or register to post comments

हो. दुसर्‍या डावात जिंकून लगेच बरोबरी केलीन!

चतुरंग
Mon, 04/26/2010 - 17:08 नवीन
आनंद स्ट्राईक्स बॅक! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

धन्यवाद रंगाशेठ.

प्रमोद देव
Mon, 04/26/2010 - 17:26 नवीन
ही बातमी नक्कीच ’आनंद’दायक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बर झाले दुसर्‍या डावात आनंद जिंकला .

वेताळ
Mon, 04/26/2010 - 19:43 नवीन
आता मजा येईल. लेखाबद्दल धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त दुवा आहे रे

संदीप चित्रे
Mon, 04/26/2010 - 20:48 नवीन
तुझ्या 'चाल'त्या रसग्रहणाची वाट बघतोय !
  • Log in or register to post comments

साला आत्ता

विसोबा खेचर
Mon, 04/26/2010 - 21:29 नवीन
साला आत्ता आमचा गॅरी असता तर दोघांना केव्हाच हरवून मोकळा झाला असता! :) (कास्पारावच्या व्यक्तिमत्वचा विलक्षण प्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

तात्या तुमची खेळी

रामदास
Mon, 04/26/2010 - 22:04 नवीन
गॅरीपेक्षा कमी नाही.गेल्या आठवड्यापासून किती मुव्ह्ज झाल्या याचा काही हिशोबच ठेवता नाही आला बॉ. तूर्तास मात्र चतुरंगाच्या पुढच्या लिखाणाकडे नजर ठेविन म्हणतो.
  • Log in or register to post comments

आनंद एक गुणाने आघाडीवर.

प्रमोद देव
गुरुवार, 04/29/2010 - 18:43 नवीन
चौथ्या फेरीत टोपोलोवला नमवून आनंदने एक गुणाची आघाडी घेतलेय. चौथ्या फेरीअखेर आता आनंदचे अडीच तर टोपलोवचा दीड..असे गुण झालेत.
  • Log in or register to post comments

ताजी बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद प्रमोदकाका!

चतुरंग
गुरुवार, 04/29/2010 - 22:19 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

पाचवा सामना बरोबरीत सुटला!

चतुरंग
Fri, 04/30/2010 - 23:29 नवीन
पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळताना टोपालोव काही वेगळा खेळ करेल असे वाटले होते पण तसे झाले नाही. १२ फेर्‍यांच्या ह्या स्पर्धेत आनंद ३-२ असा आघाडीवर आहे. उद्या शनिवार दि. १ मे रोजी सहावा डाव आनंद पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळेल. रविवारी विश्रांतीचा दिवस आहे. नियमानुसार निम्म्या फेर्‍या झाल्यावर काळ्या-पांढर्‍या मोहर्‍यांची आदलाबदल होते त्यानुसार सोमवारी आनंद पुन्हा पांढर्‍या मोहर्‍यांनी सुरुवात करेल. ----------- मानसिक दृष्ट्या आनंद आत्ता आघाडीवर आहे. पुढल्या दोनपैकी किमान एका तरी डावात जिंकून आघाडी वाढवण्यावर त्याचा भर राहील. पुढचे दोन्ही सामने रंगतदार होतील अशी चिन्हे आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

सहाव्या डावातही बरोबरी.

प्रमोद देव
Sun, 05/02/2010 - 00:00 नवीन
सहाव्या डावातही बरोबरी झालेय. आनंद: साडेतीन गुण.... टोपालोव:: अडीच गुण अजूनही १ गुणांनी आनंद आघाडीवर आहे.
  • Log in or register to post comments

व्वा...

मी-सौरभ
Sun, 05/02/2010 - 01:44 नवीन
आनंदी आनंद गडे....... ----- सौरभ =D>
  • Log in or register to post comments

हुश्श!!

चतुरंग
Mon, 05/03/2010 - 22:37 नवीन
सातवा डाव बरोबरीत सुटला ४-३ असा आघाडीवर आहे आनंद! ----------------- हा डाव हरता हरता वाचलाय आनंद. ऑलमोस्ट वाट लागलेली होती, कसाबसा निसटला! :( चतुरंग
  • Log in or register to post comments

हरला आनंद!!

चतुरंग
Tue, 05/04/2010 - 22:27 नवीन
अखेरीस टोपालोवने आठव्या डावात आनंदला पुन्हा एकदा खडे चारले! आता ४-४ अशी बरोबरी आहे! उद्या विश्रांतीचा दिवस. परवा आनंदकडे पांढरी मोहरी असणार आहेत तेव्हा आनंदने जोरदार खेळ करायला हवा. चौथ्या सामन्यात दिसलेला त्याचा खेळ पुन्हा दिसायलाच हवा नाहीतर टोपा अधिकाधिक आक्रमक होत जाईल! (गेले तीन डाव आनंद फारच बचावात्मक झालाय हे नक्की.) चतुरंग
  • Log in or register to post comments

१० वा सामनाही बरोबरीत सुटला.

प्रमोद देव
Fri, 05/07/2010 - 22:39 नवीन
आता आनंद व टोपालोवचे दोघांचेही ५-५ गुण झाले आहेत. आता फक्त दोनच सामने बाकी आहेत. मध्यंतरी ९वा सामनाही बरोबरीत सुटला होता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा