प्राजू, कल्पना विस्तार ठीक आहे पण
इ इ जी की इ सी जी?
हृदयाचे दुखणे असेल तर इ सी जी असायला हवा!
आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
मस्त रंगवलय प्राजु.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
'इमर्जन्सी केअर' ह्या पाटीची थट्टा अमेरिकेइतकी कुठे होते की नाही कल्पना नाही. जास्त पैसे घेऊन सगळ्यात उशिरा सर्विस मिळते. हा माझ्यासकट माझ्या माहितीतले जे जे लोक इमर्जन्सीला जाऊन आलेत त्या सगळ्यांचा १००% अनुभव आहे.
तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण सर्विस मिळणे अवघड! ;)
असो पुढे वाचायला उत्सुक आहे! :)
चतुरंग
हे असले कसले हे कल्पनारंजन?
बाकी आपल्या चित्रपटांमध्ये रूग्णाला खाटेवर घालून ती खाट पळवत ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असल्याचे बघण्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे इमर्जन्सी रूममध्ये वेळ लागला की, हे काय भलतेच, असे वाटते. प्रत्यक्षात डॉक्टरांची इमर्जन्सीकडे पाहण्याची पद्धत वेगवेगळी असावी असे वाटते. इमर्जन्सी दोन प्रकारच्या असाव्यात - एक अगदी गंभीर, आणि दुसर्या ज्यांना दोनतीन तास उशीर चालू शकतो अशा. आम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी तीनदा इमर्जन्सी रूममध्ये जाण्याची वेळ आली होती - तीनही वेळा विविध अनुभव आले. ते परत कधीतरी.
इमर्जन्सी विभागात गेल्या-गेल्या "हा मिनिटा-मिनिटाचा जीवनमरणाचा प्रश्न आहे का?" अशा प्रकारचा ढोबळ कयास पटकन केला जातो.
ज्या परिस्थितीत मिनिटांची किंमत फार असते, त्यांचा इलाज धावत-पलत होतो. (रक्तस्राव, बेशुद्ध करणारा हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचा झटका... येथे इलाजाची सुरुवात व्हायला तासापेक्षा कमी विलंब लागावा.)
या नीरक्षीरविवेकाला "ट्रियाज" म्हणतात.
ज्या रुग्णांचा जीवनमरणाचा प्रश्न पुढच्या काही तासांमध्ये नाही, त्यांचे हळूहळू काम होते.
इमर्जन्सी विभागात कर्मचारी मोठ्या प्रमाणात टंगळमंगळ करत नाहीत. (आळस हे विलंबाचे प्रमुख कारण नसते.) खरोखर तातडीच्या रुग्णांकडे लक्ष देता-देता कमी तातडीच्या रुग्णांकडे विलंब करणे आवश्यक होते. सर्वांनाच तातडीची सेवा देण्याइतपत कर्मचारी/विभाग बसवणे आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नसते.
यू.एसमधल्या मोठ्या इस्पितळांच्या इमर्जन्सी विभागांत तातडी नसलेल्या लोकांची इतकी रेलचेल का असते? त्याचे एक कारण असेही : इमर्जन्सी विभागात विमा असला-नसला तरी भरती करून घ्यावे लागते, चाचणी+प्राथमिक इलाज करावा लागतो, असा कायदा आहे. ज्यांना डॉक्टराकडे जायला परवडत नाही, त्यांना इलजासाठी हे एक ठिकाण उपलब्ध असते.
अन्य कारणेसुद्धा असतील.
रंगाशेठ हे भारीच
तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण...........
प्राजुजी कवितां इतकाच लेख पण आवडला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात
आता यात कसला क्रमश:?
सांग कि पटापट!
नै तर काय...!
हे असे छातीत कळेबिळेचे वाचले की मलाही डाव्या बाजूला चमका निघाल्याचा भास व्हायला लागतो.
आणि लक्षणं तशीच तर नाही ना, अशी शंका यायला लागते. :(
-दिलीप बिरुटे
[डरफोक]
कुठेतरी वाचल्याचे आठवतय.. बहुतेक ढकलपत्र असावं, पण ऊपाय छान होता..
अश्या वेळी "विठ्ठल" हा शब्द जोर-जोरात जमले तर ऊड्या मारत म्हणावा.. ५-१० मिनिटात वायु सरुन मोकळे होतात म्हणे.. च्कटफु आहे, प्रयत्न करुन बघायला हरकत नाही !! ही कसली तरी उपचार पध्दती आहे, स्वर आणि व्यंजन यांच्या ऊच्चारावरुन असे प्रकार बंद होऊ शकतात.
अवांतर :- अमेरीकेत ईनो मिळत नाही का??
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
गॅसेसमुळे असेल, किंवा आणखी कशामुळे, पण छातीत/पोटात दुखत असतांना उड्या मारणे हा अघोरी प्रकार आहे. कोणीही असे काही करू नका..!
अर्थात, विठ्ठलाच्या दर्शनाची भलतीच आस लागली असेल, तर हरकत नाही.
अग काय गं... बरी आहेस ना? आता ही रचित कथा म्हणावी का खरेच् घडलेय? अग आजकाल तू दिसलीही नाहीस तिकडे.... बाकी इमर्जन्सीचे वर्णन मात्र १००% बरोबर.... ताटकळत बसून अर्ध्यांचे दुखणेच पळ काढतेय की..... लवकर उलगडा करा..... उगा पल्स काहून वाढवून राहिले वो बाय....
प्रतिक्रिया
प्राजू, इ इ जी की इ सी जी?
दुरूस्ती
हम्म!
मस्त
बाबा रे!
आला का ?
हे हे हे!
बापरे
होय - ट्रियाज
हा हा हा
आता यात
नै तर काय ?
कल्पनाविलास अति होतोय.. पण अंमळ मजेदार
गावठी सल्ले नकोत.
:-D
प्राजु,
या पुढे