काळे काका सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुमच्या मुळे ही लेखमाला आमच्या पर्यंत पोचते आहे.
अतिशय सुंदर अनुवाद केला आहे.
अनुवादित आव्रुत्तीचे सर्व हक्क राखुन ठेवा.
अतिशय सुंदर्..पुढच्या प्रकरणाच्या प्रति़क्षेत.
धनंजय
प्रिय धनंजय,
मी ज्या उद्देशाने हा अनुवाद करत आहे ते उद्दिष्ट साध्य होत आहे याचा आनंद होतोय्. हे पुस्तक खरंच प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचले पाहिजे.
सुधीर काळे
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
अत्यंत सुंदर लेखमाला... :)
(वाचक)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
या प्रकरणाचे भाषांतर करत असताना एक गोष्ट लक्षात आली कीं १९६५ साली जेंव्हा भुत्तोंनी चीनबरोबर व्यापक असा करार केला तेंव्हा राष्ट्रपती होते अयूबखान व भुत्तो होते परराष्ट्रमंत्री! त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या कंपूत होते. त्यांची निष्ठा अशी विभागलेली नव्हती. पण तरीही असा करार भुत्तोंनी केला व अमेरिकेने भिवया वर चढवल्या नाहींत हे आश्चर्यच नाहीं कां?
पण पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाने ज्या दोन विरुद्ध दिशा घेतल्या व हे "दोन दिशां"चे धोरण यशस्वीपणे आजपर्यंत चालूही ठेवले आहे याचे कौतुक वाटते. चीनच्या संयुक्त राष्ट्र प्रवेशाच्यावेळी अमेरिकेवर आर्थिक मदतीसाठी पूर्णपणे अवलंबिलेले असूनही उघड-उघड चीनच्या बाजूने पाकिस्तानचे उभे रहाणे म्हणजे जरासे धार्ष्ट्याचेच होते. इतके कीं बुश-४१ना (जे त्यावेळी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत होते) आगाशाहींना येऊन विनंती करावी लागावी कीं तैवानला हाकलू नका हे विपरीतच वाटले. हा अमेरिकेची दुर्बलता कीं पाकिस्तानचा मुत्सद्दीपणा? ९/११ नंतर बुश-४३ने जसे सांगितले (either you are with us or with them!) तसे १९६५ साली जर सांगितले असते तर ही पाकिस्तानची दुटप्पी नीती पराजित झाली असती! पण अमेरिकेचा बोटचेपेपणा नडला?
शेवटी अमेरिकेने 'बाळा'चे अती लाड केले, त्याला अण्वस्त्राचे खेळणेही घेऊन दिले व 'बाळा'ने असे प्रताप दाखविले कीं अमेरिका-चीनकडून लाटलेले अण्वस्त्रे बनवायचे तंत्रज्ञान अमेरिकेचे "वैर्यातले वैरी" इराण व उत्तर कोरियाला दिले. पुढच्या प्रकरणांत येईलच कीं हे तंत्रज्ञान त्यांनी लिबियाच्या कर्नल गद्दाफीलाही दिले होते, पण तो पकडला गेला व त्याला हा नाद सोडावा लागला.
अमेरिकेचे असले बोटचेपे धोरण आजही चालू आहे. ते भोगायला मात्र आपल्याला लागतेय्. यातून भारताला मार्ग काढावा तर लागेलच, पण कसा?
आपल्या अलिप्ततावादाच्या धोरणासमोर पाकिस्तान्यांनी दोन्ही दलांचे सभासदत्व स्वीकारून मात केली हे मात्र खरे!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
सुधीरभाऊ,
हे प्रकरणही मस्त जमले आहे! अनुवादही छान झाला आहे. तुमच्या या मालिकेमुळे आमची खूप सोय झाली आहे, कारण इंग्रजी पुस्तक आम्ही नक्कीच वाचले नसते.
पुढच्या प्रकरणाची वाट पहात आहे.
सायबा
धन्यवाद, देवसाहेब!
http://www.indianexpress.com/news/Sharif%20met%20Osama%20fiv.../515253/
ही लिंक वाचा. आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आली आहे. बातमी सणसणीखेज आहे पण सप्टेंबर २००९ची आहे. खरे-खोटे माहीत नाहीं, पण खरे असल्यास पाकिस्तानी नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात कसे निराळे असात हे पुनश्च दिसून येईल.
आज मुशर्रफबद्दल ही बातमी झी-न्यूजवर वाचली!
http://www.zeenews.com/News607311.html हा दुवा उघडा व माझा सर्वात "लाडका" पाकिस्तानी नेता (सरडा) मुशर्रफसाहेबांची ही वक्तव्ये वाचा. झी-न्यूजला मी खालील प्रतिसाद पाठविला आहे! अजून प्रसिद्ध झाला नाहींय्. झाल्यास नंतर लिंक पाठवेन.
I have always described Musharraf is a chameleon! So nothing surprising when we see him in new colours. He still conceals that he is the one who helped build the terrorist network in occupied Kashmir. This is well-documented in the book “Deception” by Adrian Levy & Catherine Scott-Clark.
If what he says is true, how does he describe the “bomb-a-day” situation in Pakistan? Does Musharraf call people of Swat and Waziristan as “freedom fighters” as he likes to call the terrorists in J&K? He, like most Pakistani leaders, Military or Civil or ISI, fails to realize that terrorists have no religion, no nation or no faith. They are just hired operatives and can be provoked to do anything by those who always provoke them. If Muslim youth of India feel alienated in India, the Pakistani youth are alienated twice as much there.
Only thing that is harvested in Pakistan is hatred and misdirected attacks on innocent people both here and in Pakistan.
Will a good leader ever rise from the ashes of politics in Pakistan?
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
या दुव्यावर मी लिहिलेला प्रतिसाद (खालून चौथा ) झी-न्यूजवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जरूर वाचा.
http://www.zeenews.com/News607311.html
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
प्रतिक्रिया
काळे काका
उद्दिष्ट साध्य होत आहे याचा आनंद होतोय्
अत्यंत
पाकिस्तानी परराष्ट्रनीतीची खासियत!
हे प्रकरणही मस्त!
एखादी सुरस कथा वाटावी..
मस्त लेख
धन्यवाद,
मी लिहिलेला प्रतिसाद झी-न्यूजवर प्रसिद्ध करण्यात आला आहे
लेख आवडला