मनोगत आवडल. पण काहि दिवसांपुर्वी झालेला शिक्षणाच्या आयचा घो चा वाद आठवला.....
........................................................................
तुमच्या शिव्या आमच्या ओव्या............
लेखाचे शिर्षक वाचुन होळीचा लेख आला काय असे वाटुन गेले.
असो.
परदेशातील गमती जमती वाचायला मौज येते. परदेशारतील लोक भारताबद्दल काय म्हणतात, त्याचा एक लेख जमला तर येउद्यात.
पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो.
विचार करण्याजोगा मुद्दा. तुम्ही नेहमी हा मुद्दा मांडता. असो.
बिका, वेगळ्याच विषयावर काय सुंदर लेख लिहीला आहेत हो. आम्ही बायका या आनंदाला मुकतो खर्या.
मला माझ्या एका मैत्रीणीचे शब्द आठवतात ती नवर्याविषयी त्राग्याने बोलत होती आणि तो त्रागा इतका अनावर झाला पण पडली बाई मग शिवी कशी देणार?
एवढच म्हणाली - "नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरचा विंचू .... वहाणेनी मारताही येत नाही आणि पूजाही होत रहाते." ......... मनात तिचे शब्द इतके खोल रुतले म्हणून सांगू.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
बायका पण देतात बरं शिव्या . (शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने) खालच्या वर्गातील बायकांच्या तोंडच्या शिव्या ऐकून गपगार व्हायला होईल.
बायकांच्या तोंडी 'हलकट मेला' तर अगदी कॉमन शिवी आहे. तसेच बावळट , नालायक .
जय महाराष्ट्र , जय मराठी !
आरारारारारारा =)) =)) =)) =)) =)) =))
जबरा रे .... हे एक संपादक आणि खुद्द आपले मालक ... ह्यांच्या साठी शिव्या कशा लक्ष्मिनारायण चिवड्यातल्या काजु सारख्याच ... :)
- (शिव्या प्रेमी) टार्या
लेख खुमासदार झालाय.
नवीन कुठलीही भाषा शिकायची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच त्यातले लडिवाळ शब्द. माझ्या तेलुगु आणि तमिळ मित्रांनी मला या बाबतीत समृद्ध केलेले आहे.
माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा... अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी...भावनिक गरज बनली.
वा. हे म्हणून तुम्ही शिव्यांना कलेच्या पातळीवर नेऊन ठेवलंत. आणि शिव्या या एकाच वेळी अनुभवांचं व्यक्तीकरण आणि दुसऱ्यांच्या 'कलाकृतीला' दिलेली दाद असू शकते...
भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच.
आपण गुलगुलीत गोड किती वेळा बोलतो, आणि शिव्या किती वेळा देतो याची मोजदाद कोणी केली तर मानवाविषयी एक छान चित्र तयार होईल.
पण शिव्या मानवाच्या उत्क्रांतीत कधी तरी आल्या हे म्हणणं मला पटत नाही. त्या त्याहीआधीपासून असल्या पाहिजेत. प्राणी अतिशय उत्कृष्ट, इरसाल शिव्या देऊ शकतात. माझा अनुभव सांगतो.
मी पूर्वी काम करत असे तिथे कॅफेटेरिया बाहेर मोकळ्या हवेत झाडांखाली टेबलं टाकलेली होती. लंचसाठी आम्ही बऱ्याच वेळा बाहेर बसत असू. तिथे खूप पक्षी आसपास फिरायचे. सांडलेले कण आणि लोकांनी टाकलेले तुकडे खाऊन त्यांचाही लंच व्हायचा. एकदा गंमत म्हणून मी एका पक्ष्याला मिरचीचा तुकडा टाकला. तो त्याने खाल्ला. तो खाऊन त्याची प्रतिक्रिया विलक्षण झाली. तो उडून टेबलावर आला. इतर पाच जणांना सोडून माझ्यासमोर उभा राह्यला. माझ्याकडे रोखून बघितलं. आणि अतिशय जोरजोरात माझ्यावर बराच वेळ केकाटला. मला त्याची भाषा कळली नाही, पण त्या आई-बहिणींवरून दिलेल्या अत्यंत गलिच्छ शिव्या होत्या हे स्पष्ट झालं. मलाच काय, वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या इतर पाच जणांनाही ते कळल्यावाचून राहिलं नाही.
सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष
निर्विवाद सत्य. एकंदरीतच जग आपल्यावर अशा शिव्या सतत हासडत असतं असं वाटतं.
दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा.
सहमत...
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
बिपिन, शिव्यांवर उत्तम निबंध. शिव्यांचे फायदे कळले. आता शिव्यांच्या विविध रुपांवर आणि तोट्यांवर येऊ दे. पुरूषाशी संबंधित शिव्या साधारण व्यवसायांशी (त्यातही देहविक्रयाच्या व्यापारात) संबंधित असतात. स्त्रियांशी संबंधित शिव्या मात्र वेगळ्या (काहीशा एककल्ली) स्वरुपाच्या असतात. त्यातही पुरुष जरा जास्तच शिव्या देतात आणि ज्याला उद्देशून शिव्या आहेत त्याचा उगम कुठे असावा? याविषयी भाष्य करतात. या सगळ्या प्रकारात काहीतरी लैंगिक राजकारण आहे. येऊ द्या त्याच्यावर पण लेख.
(बा*** भां*** मिपा आज उघडतच नव्हते. लई वेळा प्रयत्न केला.)
आधीच मिसळपाववर शिव्यांचे उदात्तीकरण झाले आहे, त्यात हा लेख. होळी गाजणार एकंदरीत.
दरम्यान आम्ही 'सेव्हन सी'ज ऑफ कम्युनिकेशनमधला 'कर्टसी' हा कसा महत्वाचा आहे यावर विचार करावा म्हणतो.
अक्कलकोटच्या महाराजांच्या उल्लेखाने हे आठवले....
सन्जोप राव
जो दवा के नाम पे जहर दे
उस चारागर की तलाश है
"कर्टसी" या अतिप्रिय विषयावरची आणि "ती आणि तो" या जिव्हाळ्याच्या विषयावर असलेली एक अप्रतिम कविता वाचून मी एकदा प्रेमात पडून एक कवितांच पुस्तक विकत घेतलं होतं.... ती कविता पुढे -
एनी हज्बंड ऑर वाइफ
लेट अस बी गेस्ट्स इन वन अनदरस हाउस
विथ ड्रीड्फुल नो अॅंड कर्टीअस येस
लेट अस टेक केअर टू हाईड अवर फूलीश मूड्स
बिहाईंड अ सरटन शो ऑफ चीअरफुलनेस
लेट अस अव्हॉइड ऑल सलन सायलन्सेस
वी शुड फाईंड फ्रेश अँड स्प्राईट्ली थिंग्स टू से
आय मस्ट बी फीअरफुल लेस्ट यु फाईंड मी डल
अँड यु मस्ट ड्रीड टू बोअर मी एनीवे
लेट अस नॉक जेंटली अॅट ईच अदेर्स हार्ट्स
ग्लॅड ऑफ चान्स टू लूक विथिन - अँड येट
लेट अस रिमेंबर टू फोर्स वन्स वे
इज द अनपारडनड ब्रीच ऑफ एटीकेट
सो शॅल आय बी होस्ट, यु द होस्टेस
अन्टिल ऑल नीड फॉर एंटरटेनमेंट एंड्स
वी शॅल बी लव्हर्स व्हेन द लास्ट डोअर शट्स
बट व्हॉट इस बेटर स्टील वी शॅल बी फ्रेंड्स!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर परदेशी जाण्याचे वेध लागले होते. भाषेचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये शिकून आलेल्या मुलांबरोबर मैत्री केली. तांत्रिक विषयांवरील त्यांची शब्द संपदा माझ्याहून जास्त नव्हतीच, पण बी, एफ आणि एस या अक्षरांपासून सुरू होणारे अपशब्द तोंडात बसल्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
हे बाकी खरं हो! सुरुवातीला कॉन्वेंटच्या मुलांबरोबर वावरताना त्यांच्या शिव्या (तेव्हा कडक वाटायच्या आता सवय झाल्यावर त्या शिव्यांत काहीच दम नाही हे कळले, ते सोडा) माहित असुनही आत्मविश्वासाने देता येत नव्हत्या. (म्हणुन इंग्रजी कच्ची!) हळु हळु जमले, तेवढ्यात त्यांनाही आमच्या चार इरसाल शिकवल्या, आता भेतल्यावर आमच्याच वापरतो आम्ही. अजुन काय लिहणे? ;)
च्यायला, हा बिका काय घेऊन येईल काय नेम नाही. बरं चतुर म्हणतात त्याप्रमाणे गोष्ट अशी मस्त रंगवतात की बोलायची काय सोय नाही. असो, लेखन आवडले.
शिव्या समाजातून नाहिशाच झाल्या तर खुनाची संख्या वाढेल असे वाटते. शिवी दिल्यामुळे राग जरासा कमी होतो. माणूस प्रचंड रागात असला की, तो शस्त्र शोधायला लागतो. [फेकून मारायला दगड,काठी, कशाची तरी शोधाशोध सुरु होते] त्यापेक्षा शिव्यांचा वापर केला तर राग हळू हळू कमी व्हायला लागतो हे मात्र खरं आहे.
अवांतर : पुर्वी ते ऋषीमुनी भडकल्यावर संतापाच्या भरात शिव्याच देत असावे. पण संस्कृतमधे योग्य शब्दांनी रागाचा निचरा होत नसेल तेव्हा त्याचं भव्य रुप म्हणजे 'शाप' असेल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
लेखाला प्रतिसाद द्यायचा राहिला असता तर दुर्लक्ष केले आहे (आणि अपमान!) असे वाटले असते ना, म्हणून घाबरून प्रतिसाद देते आहे - लेख आवडला.
कृ. ह. घ्या!
लेख खरेच आवडला.
च्यामारी, विषय किती रंगवून सांगवावा माणसानं!!
फक्कड झालाय लेख मालक! बाकी लेखात शिव्यांचा प्रतिसादांत ऋषिमुनींचा उल्लेख पाहून तो सारखा "भें** नेम चुकला" म्हणणारा शिकारी आणि त्याला शिव्या घालण्यापासून परावृत्त करू पाहणारा साधू यांचा एक 'जोग' आठवला!! बर्याच जणांना माहिती असावा, पण तरीही सांगतो.
जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्यानं शेवटी गोळी झाडलीन. ती दुसरीकडेच गेली. सगळि कबुतरं उडाली.
"गेली चायला.. भें** नेम चुकला.." - शिकारी.
शेजारी एक साधू काही जप करत बसलाय. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.
शिकार्याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..
"आयघातली .. काय चाललंय.. भें** नेम चुकला परत.."
त्या साधूला शिकार्याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्याला म्हणाला.. "बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती.."
"अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे.." - शिकारी.
साधू गप्गार होऊन पुन्हा जप करू लागला.. "पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन.."
आता शिकार्याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडलीन .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. " भें** नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं रांडेचं.. ए साधुरड्या .. बघ भें** नेम चुकला.."
आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. " हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकला नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात
राख राख होईल.." असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..
तोच आकाशातून जोरदार आवाज आला..
"भें** ... नेम चुकला!!!!!""
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
=)) =)) =))
हाहाहा !! माहित होता हा जोग ... पण पुन्हा वाचून पुन्हा मजा आली .. धन्यवाद रे मेघवेड्या .. बाकी त्या फुल्या कमी केल्या असत्यास आणि सरळ "भांचोद" अशी भावणांची वाट सुळसुळीत मोकळी केली असतीस तर आनखिन मजा आली असती.
असो !!
- केकवेडा
भावणांची वाट आता थोडी थोडी सुळसुळीत मोकळी होतिये... थोडं ऑयलिंग चाललंय ;)
होईल.. थोड्या दिवसांत नक्कीच होईल हो टारझनभाव! मग फुल्ल ऑन भज्जि-सायमंड्स खेळू ;)
हॅहॅहॅ
-- हरभझन
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मस्त लेख आणि अनुभव! (राजेश यांचा अनुभव तर जबराच!)
सध्याच्या नागरी जगात शिव्या देणे हे असंसदीय / असभ्य मानले जाते. त्यामुळे एकदा एका मित्रावर मी, "परसेंट, पाऊंड्साईन, अॅट, अॅपर्सँड" असे ओरडलो. बिचार्याला काहीच कळले नाही. मग त्याला लिहून दाखवले, "%&@&"... मग लगेच समजले :-)
बाकी अजून असतो का ते माहीत नाही, पण पुर्वी सरकारी हापिसात "सौजन्य सप्ताह" असायचा. (एरव्ही कसेही वागा). त्याचा वापर करत सई परांजपे यांनी "टूरटूर" मधे केलेली शाब्दीक मजा यामुळे आठवली. ;)
बायका शिव्या देतात का नाही हा जरा वादग्रस्त मुद्दा आहे (विशेष करून अमेरिकेत!) तरी मंगळागौरीतील काही गाणी/खेळ तसेच भोंडल्याच्या गाण्यात तोंडाची वाफ जरा मोकळी करायला विशेष जागा करून ठेवली आहे असे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मला शिव्या द्यायला आवडत आणि कोणी मला दिलेल्यासुद्धा आवडत नाही. ह्यावरुन महाविद्यालयात असताना खुप भांडणे झाली होती. माझी मजल मुर्ख, बावळट इथपर्यंतच आहे.
--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
विषय चांगला टवा़ळ आहे, व्यासंगी लोकांनी शिव्यांची शब्दकोडी घालायला हरकत नाही, तेवढाच काही लोकांचा शिव्यासंग्रह वाढेल.
---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
श्रीनिवास हेमाडे यांचा लोकसत्तेतील जुन्या लेखाचा संदर्भ आठवला . संस्कृती वरच असलेला तो लेख दुवा
सर्वांनी वाचलाच पाहिजे असा लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
पकाकाका, मलाही त्याच लेखाची आठवण झाली. शिवाय या रविवारच्या लोकसत्तेतही सुबोध जावडेकरांनी त्यावरच लेख लिहिलाय. ईथे वाचा. बाकी बिकांचा लेख खुसखुशीत.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
शिव्या देता आल्याच पाहीजेत. शिव्या अशा खरमरीत असाव्यात की समोरच्याची झांज उतरली पाहीजे. आता पुण्याचाच एक किस्सा सांगतो. पुण्याच्या शाळेत दोन मुलांचे भांडण झाले. त्यातील एक सदाशीवपेठी तर दुसरा घाटी. त्यांच्यातील (वि)संवाद.
स. पे. = ऐ माझी खोड काढु नकोस हं. मला फार राग येतो तुझा.
घा. = काढील खोड चल. काय करशील?
स. पे. = ये चुप बैस. नाहीतर मी तुला शिवी देइल हं.
घा. = हा दे तर शिवी. बघतोच तुझ्याकडे.
स. पे. = बघ हं, मी फार घाण शिवी देइल.
घा. = हा दे तर बघु.
स. पे. = बघ हं, मागावुन चिडशील तु.
घा. = हा तु शिवी तर दे. मग बघु पुढे काय करायच ते.
स. पे. = बघ हं.
घा. = हा दे....
स. पे.= तुझं ..... ढुंगन.
घा. = =)) =)) =)) =)) =)) च्यायला ही काय शिवी झाली भोसडीच्या.....
असो. तात्पर्य हे की चांभाराच्या देवाला खेटराचीच पुजा पाहीजे, तिथे गुळ्-पोळीचा नैवेद्य कसा चालेल.
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.
एकदम सहमत. चांगला लेख!
प्रतिक्रिया
आयचा घो....
लेखाचे
बिका
छान....
मग
मग उकळलेल्या पाण्याने अभिषेक
बायका पण
खुसखुशीत आणि वैचारिकही
सहमत
सहमत आहे
सुंदर लेख
आरारारारा
बिका,
वाह वा!!!
खुमासदार
सुंदर लेख
मस्त
तिच्यायला!!
शिवाशिवीच
दुर्लक्ष
मस्त रे
चला
कर्टसी
हा बिका भोसडिचा
जुनी आठवण
हा हा हा!!
हे बाकी
च्यायला,
बापरे
च्यामारी,
हाहाहा !!
भावणांची
मस्त लेख
मला शिव्या
बिका भो**** !
विषय
शिव्याशाप
दुवा
सर्वांनी वाचलाच पाहिजे असा लेख आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
पकाकाका,
कधी कधी...
सही
हॅहेहॅ !!
वैज्ञानिक विश्लेषण
एक नंबर
बिप्पिनशे
पण मला खरं विचाराल तर सगळ्यात
मस्तच!