फक्त तूझ्या बछडीसाठी...
लेखनप्रकार
प्रिय बाबा,
आज डोळ्यात अश्रू...
मुलीला वाढवताना
होणार्या कष्टांमूळे थकलास का?
म्हणून डोळे भरुन आले का?
खरच आजच वाटलं,
आज आई असती तर...
बाबा, मी जन्माला आले अन्
आई गेली, तुझ तर
सर्वस्वच हरपल..
मग आपल्या जगात आपण दोघचं
तू अन् मी...
बाबा तू कधी शिकवलच नाहीस
तूला 'तुम्ही' म्हणायला
आज ही ये जा करते तूला
ही तुझी बछडी, इतक प्रेम दिलयस
की आईची आठवण कधी
मनाला शिवत सुध्दा नाही...
जगायच कस हे तु शिकवलसं,
अन् आज ही शिकवत आहेस..
आठवतय का, तूला
तुझ्या वाढदिवसाची तारीख
विचारत होते
किती छान हसलास..
कशाला गं बेटा..
अस काय बाबा
सांग ना रे..
माझे हे बोबडे बोल
आज ही आठवतायेत...
पुढच्याच महिन्यात होता
वाढदिवस... रविवारी
सकाळी पळत पळतच
गाठल माळरान..
मी न सांगता गेल्यावर
सैरभैर झाला असशील..
काळजी करत असशील
अस माझ्या बालमनाला
त्यावेळी वाटलच नाही....
हवा कुंद, चिखलाचा मार्ग..
पाण्याचा ओढा...तरीही
तिथेच गेले धावत
कारण तिथेच होती रे
हर रंगाची फूले...
माझ्या हातात बसतील तेवढी
तोडून घेतली खर...
पण येताना बरीच गहाळ झाली
अन् चिखला-पाण्यातून
धडपडत येईपर्यंत
हाती देठच शिल्लक राहिलेले...
कळकटलेली, मळकटलेली तुझी
बछडी ज्यावेळी तूला दिसली तेव्हा
तुझ्या डोळ्यात जो आनंद, अश्रू
यांचा जो मिलाफ रंग पाहिला त्यापुढे
इंद्रधनुची सप्तरंगी उधळण आजही
मला फिकीच वाटते...
तुला वाढदिवसाची भेट म्हणून फुले
आणली हे बघ असं म्हणतच
हात पुढे केला अन् तुझ्या कुशीत
पडून रडरड रडले...
ए माझी बछडी, अजून छोटी आहेस..
अग हे तुझ्या हातातले देठ आहेत ना
तेच मला फार आवडतात..
यावरच तर फूल उमलत होय ना
हाच तर फूलाला आधार देतो
म्हणूनच फूल सूंदर दिसतं
अशी बराच वेळ समजूत
घालत राहिलास..
मला माहिती आहे
आजही तुझ्या डायरीत ती
वाळलेली देठं ठेवलीयेस तुझ्या
या छोट्या चिमुरडीनं दिलेली...
ज्या ज्या वेळी तुझ्या
कुशीत शिरलेय तेव्हा
ऐकलयं तुझ्या ह्रदयाच्या
स्पंदनांच संगीत...
माझ्यासाठी प्रेमाचेच स्वर होते
त्या संगीतात..
मी जरी फूल असले तर तू
देठ आहेस्...मोठा आधार आहेस
तू माझ्यासाठी....
खेळताना घोडा व्हायचास
फक्त माझ्यासाठी...
चूल पेटवताना पाहिलय तूला
फक्त माझ्यासाठी
रात्रं-दिवस काम करताना पाहिलय
फक्त माझ्यासाठी...
अशा किती गोष्टी म्हणून
तूला सांगू...फक्त तुझ्या
या बछडीसाठी केलेल्यास
तुझी घुसमट समजून घ्यायला
मी अजून छोटी आहे हे माहितीय मला
पण आज मला तुझ्या चेहर्यावर
हसू बघायच आहे..
मग हसशील ना
एकदा....
फक्त तुझ्या बछडीसाठी...
वाचने
4424
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
का वो ? असं कशा पाई
In reply to का वो ? असं कशा पाई by jaypal
+१
In reply to का वो ? असं कशा पाई by jaypal
प्रथम पियुशांना धन्यवाद धागा
मस्त... छान
अप्रतिम
चांगलं
In reply to चांगलं by विजुभाऊ
सहमत.कविता खूप आवडली.डोळे
आवडली
In reply to आवडली by प्रभो
+१
आवडली.
स्नेहाराण
अप्रतिम
सुंदर
मस्त....
जयपाल आनि विजुभाऊ शी
फ्यान झालेलो आहे.