मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी पण पळालो...

विमुक्त · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते... "पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या "हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत... सराव नाही अजिबात...". त्याला म्हणालो... "अरे, सराव नसला तर काय झालं?... इच्छा तर आहे ना!... हळूहळू पळ... अगदीच दमलास तर थोडावेळ चालायचं आणि मग परत पळायचं... करावं वाटतयं तर काहीतरी कारणं देऊन टाळू नकोस... रेस पुर्ण केल्यावर फार भारी वाटेल तुला... चल आता, नेहरु स्टेडियमला जावून नोंदणी करुन येऊत..." मी आणि रव्याने १० कि.मी. च्या रेस मधे भाग घेतला होता (पुरुषांसाठी हाफ मँरेथॉन नव्हती म्हणून)... मँरेथॉनच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला सकाळी ७.३० च्या सुमारास सगळी मान्यवर मंडळी आली... हाय, हँलो झालं आणि पुरुषांची फुल मँरेथॉन (४२ कि.मी.) सुरु झाली... त्यानंतर थोड्याच वेळात १० कि.मी. च्या रेसला सुरुवात झाली... वातावरणात प्रचंड उत्साह होता... त्यात we will, we will rock you ह्या गाण्यामुळे अजूनच भर पडली... पब्लिकचा भरपुर धिंगाणा चालू होता... शिवाजी महाराज, भवानी माता आणि अजून बऱ्याच जणांचा जयजयकार करत पब्लिक पळत होतं... ठरल्या प्रमाणे आम्ही सुरुवात निवांत केली... सुरुवातीला गर्दीमुळे जोरात पळणं शक्य नव्हतच... सोबत बरेच तरुण, साठी-सत्तरीतले आजोबा, स्त्रीया, लहान मुली आणि मुलं पळत होते... आवड असली की वय, शारिरीक क्षमता आणि इतर कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत ह्याचच हे प्रतीक होतं... साधारण २ कि.मी. नंतर गर्दी जरा कमी झाली आणि पळताना मस्त ह्रीदम सेट झाला... रस्त्याच्या दोन्ही बाजूला मँरेथॉन बघायला लोक जमले होते... पळणाऱ्यां बद्दलच कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं... पहिले वीसएक मिनीटं मी आणि रव्या सोबतच पळत होतो... मग मी जरा जोरात पळायला लागलो... थोड्याच वेळात ५ कि.मी. पुर्ण झाल्याची खुण दिसली... "५ कि.मी. झालं पण?... अजून दमलो सुध्दा नाही... सही रे!" असा मनात विचार आला... अधे-मधे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँडच्या आवाजाने उस्ताह अजूनच वाढायचा... बऱ्याचदा दम लागणं, न लागणं हे मानसीक असतं... इच्छा असली की शरिर साथ देतच... ५ कि.मी. ते ९ कि.मी. पर्यंत पेस मेन्टेन केला... नंतर जोरात पळायला लागलो... काहीजणांना मागे टाकून मंगलदास रोडवर फिनीश लाइन पार केली... वाटलं होतं त्यापेक्षा फारच सोपं गेलं... मला रेस पुर्ण करायला ५१ मिनीटं लागली... रेस पुर्ण करुन थोडं स्ट्रेचिंग करत होतो तर रव्या सुद्धा पोहचला... रव्या पण नॉनस्टॉप पळाला... अजिबात सराव न करता... आज एक स्वप्न पुर्ण झालं... पुणे मँरेथॉन मधे पळायचं... आता आत्मविश्वास वाढलायं... हाफ-मँरेथॉन तर आता नक्कीच पळू शकेन... "Ask yourself : 'Can I give more?'. The answer is usually : 'Yes'." -Paul Tergat, Kenyan professional marathoner (रेस नंतर एक दिवस Indian express मधलं pune newsline चाळत हो्तो... त्यावर पुणे मँरेथॉनचे फोटो आले होते आणि त्यातल्या एका फोटोत मी आणि रव्या होतो...) (कॉपीराईटमुळे फोटो काढून टाकावा लागतोय. क्षमस्व्!)-संपादक

वाचने 5235 वाचनखूण प्रतिक्रिया 21

मदनबाण गुरुवार, 12/10/2009 - 18:07
व्वा... मी पण पळण्यात सहभागी होतो आता... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

चतुरंग गुरुवार, 12/10/2009 - 18:09
जोरदार अभिनंदन. स्वतःच्या क्षमता चाचपून बघण्याचा प्रयत्न स्तुत्य. (विमुक्ता तू दिलेला फोटो हा कॉपीराईटेड असल्याचे निदर्शनाला आणून दिल्या कारणाने काढून टाकावा लागतोय. क्षमस्व!) -चतुरंग

In reply to by चतुरंग

विमुक्त गुरुवार, 12/10/2009 - 21:15
क्षमस्व काय त्यात... फोटो टाकताना कॉपीराईटचा वगेरे विचार माझ्या डोक्यातच आला नाही...

गणपा गुरुवार, 12/10/2009 - 18:34
विमुक्ता अभिनंदन रे.. अरे Indian express ची लिंक दे की एकडे. शिर्षक वाचुन वाटल की राजे पुण्यात पोहोचला त्याचं वार लागल की काय तुला :? असो संभ्रम दुर झाला. -माझी खादाडी.

अजय भागवत गुरुवार, 12/10/2009 - 18:39
अभिनंदन!!! १० किमी पळाल्यानंतर शारीरीक स्थिती कशी होती?- खूप थकवा येतो का? मागील वर्षी मी मुलाला घेऊन गेलो होतो- त्याला पळायचे होते. शर्यत सुरु होण्याच्या अगोदर तेथे इतके भारलेले वातावरण होते की बस्स. बॅंड पथकं, ढोल-ताशा-लेझिम पथकं ह्यांनी जो दणका सुरु केला आणि माझे सगळे बुरखे खाली पडून मी मनसोक्त नाचलो खंडूजीबाबा चौकात!!!

विकास गुरुवार, 12/10/2009 - 19:27
तुमचे आणि तुमच्या मित्राचे अभिनंदन! फक्त अजिबातच सराव न करता कसे काय इतके पळू शकलात? का थोडाफार सराव आहे पण १० किमीचा नाही? तुम्ही दरोज अथवा आठवड्यातून ठरावीक वेळेस काही सराव करता का? अवांतर: मला मॅरॅथॉन बद्दल कायम एक प्रश्न पडतो, इतके लांब पळून गेल्यावर त्यांची परत येण्याची व्यवस्था काय असते? :? बाकी यातील विनोद बाजूला ठेवूया पण बॉस्टन मॅरॅथॉनमधे असे ऐकीव महाभाग आहेत जे परत उलटे पण दोन पायांवरच (गाडीविना) तितके अंतर परतून आले!

In reply to by विकास

विमुक्त गुरुवार, 12/10/2009 - 21:10
मी रेग्युलर trekking करतो आणि अधून-मधून पळायला पण जातो... पण माझ्या मित्राचा अजिबात सराव नव्हता...

In reply to by विकास

शाहरुख Fri, 12/11/2009 - 08:30
मी बहुतेक २००४ किंवा ०५ मधे काही सराव नसताना पुणे मॅरेथॉन मधे भाग घेतला होता. तेंव्हा हौशी लोकांसाठी ४ किलोमीटरची स्पर्धा होती. स्पर्धा पूर्ण केली मी पण त्यानंतर ३-४ दिवस माझी चाल बघताच सगळ्यांना कळून येत होते की मी स्पर्धेत भाग घेतला होता ते :-)

प्रभो गुरुवार, 12/10/2009 - 20:37
मस्त रे विमुक्ता......अभिनंदन --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

रेवती गुरुवार, 12/10/2009 - 21:30
मस्त, मस्त, मस्त! मला पण पळायला जावंसं वाटायला लागलय. तुमच्या वर्णनानुसार वातावरण कसलं भारी होतं हे कळलं. छान वाटलं. रेवती

भानस Fri, 12/11/2009 - 00:22
आपले अभिनंदन! :) जमेल का नाही असे वाटत होते मनात पण आपले यश पाहून उत्साह वाढला.

वेदनयन Fri, 12/11/2009 - 06:41
मला वाटले त्या पळपुट्या राजे सारखा तु पण पळाला की काय? बाकी मँरेथॉनचा पराक्रम विशेषच - अभिनंदन!!! बायोडेटात टाकायला विसरु नकोस.

अभिनंदन रे विमुक्ता ! स्वतःला आजमावण्याची ही पद्धत आवडली आपल्याला तर ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सहज Fri, 12/11/2009 - 12:01
सही रे!! (अनेक मॅरेथॉनमधे नाव नोंदवुन फक्त टि शर्ट व गुडी बॅग घरी आणणारा) सहज

sneharani Fri, 12/11/2009 - 12:45
अभिनंदन...मस्तच. १०किमी बाप रे खूप मोठ अंतर पार केलतं.!