Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सन्जोप राव on Sun, 12/06/2009 - 18:08
  • Log in or register to post comments
  • 16628 views

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-४

  • ‹ माझे खाद्य-पेय जीवन-३
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 12/06/2009 - 18:23

Permalink

क्या बात है!!!

मास्तर, सलग चारपाच दिवस कधी मोकळा वेळ आहे? :D खानपानसेवा अगदी जोरात चालू आहे. बाकी प्रत्यक्ष हे सगळे खाणे पिणे जमेल तेव्हा जमेल पण तुमच्या या लेखमालेने बर्‍याच मस्त आठवणी जागवल्या... सुख सुख म्हणतात ते हेच की हो! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 12/06/2009 - 18:50

In reply to क्या बात है!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बास्स

ठरवा एकदाचं काय ते! येता बुधवार? की शनिवार? हे अवांतर नाहीये. हा खरा प्रतिसाद आहे! त्यामागचे भाव शासनकर्ते (छ्या, काय शब्द आहे हा! आणि असल्या रसील्या लेखावरच्या प्रतिसादात वापरावा लागतोय) ध्यानात घेतील, अशी आशा आहे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 12/06/2009 - 18:36

Permalink

न बोललेलेच

न बोललेलेच बरे 8| :| चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 12/06/2009 - 18:58

In reply to न बोललेलेच by पर्नल नेने मराठे

Permalink

रसाळ लेख पण,

हेच म्हणते. न बोललेले बरे! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Sun, 12/06/2009 - 18:44

Permalink

जुनी दारु

जुनी दारु नव्या बाटलीमधे पुन्हा. न राहवून पुन्हा एकदा प्रतिसाद्रुपी हे चिंतन- आज मला सगळे ते हवे-हवेसे वाटते आहे मादक ते सगळे प्यावेसे वाटते रिचवले पेले फुल्ल भरुन हे असले एव्हढाले अग बाई, हे काय, हे तर आजच आले वाटते? खोटंच हसत म्हणालो, "धुंदीत मजा असते" पण मीच घेते, का तुला घेणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे झिंगणे तुझ्या सारखे नकोसे वाटते!" आण काही तू नवे आता, बाटल्या नको त्या जुन्या तेच-तेच शेंगदाणे नि मांचोरीयन नकोसे वाटते थंडीत घेतात का ती ब्रॅंडी भरपुर व सारखी? औषध जरी असले तरी एकटे पिणे नकोसे वाटते!
  • Log in or register to post comments

Submitted by chipatakhdumdum on Sun, 12/06/2009 - 18:52

Permalink

वाहवा..!

उत्क्रुष्ट लेख्..१०/१० मार्क.. ( हा क्रु कसा लिहायचा)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 12/06/2009 - 19:11

Permalink

हम्म्म्म...

कोणे एकेकाळ बिअरच्या यत्तेतून उत्तीर्ण झालो पण नंतर पुढच्या यत्तात काही राम वाटेना म्हणून शाळा सोडून दिली! :D त्यामुळे पीएचडी, डबल डॉक्टरेट अशा लोकांत आपले काम नव्हे, आपली प्रगती 'मधुशालेचे' भाषांतर करण्यापर्यंतच! पण तरीही लेख वाचला, मद्यप्रेमीने लिहावा तसा चांगला लिहिलाय. (यत्ता पहिली)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sun, 12/06/2009 - 19:39

Permalink

>>आयुर्वेदा

>>आयुर्वेदाला टांगावे आणि विविध फळांचे मिल्क शेक्स प्यावेत. जे बात. सन्जोपराव मस्त जमलय पेयपान. :) --(शत्रूवर प्रेम करणारा)- गण्या
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 12/06/2009 - 19:52

Permalink

वा वा...

वा वा... मस्त लेख. बियर ते अ‍ॅब्सिंथ असा प्रवास डॉळ्यांपुढे तरळून गेला... - (ब्ल्याक लेबल) भट बाकी दुधापासून बनवलेली पेये हा आपलाही वीकपॉईंट. ज्यूसची वेगळी गोडी असली तरी मिलकशेक ते मिलकशेक. एकदा मथुरेला गेला असताना भर थंडीत एका अस्सल उत्तरप्रदेशी भैय्याच्या ठेल्यावर सकाळ सकाळ गरमागरम दूध प्यालो होतो. त्याची सर तर आजतागायत कुठल्याही पेयाला आली नाही. - (मिल्कशेक प्रेमी) भट
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 12/06/2009 - 20:00

Permalink

छान लेख!

छान लेख! माझी धाव मात्र मॉकटेल इतपतच.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 12/06/2009 - 22:27

Permalink

अरेच्चा लस्सीबद्दल लिहायचे विसरुनच गेलो!

जुलैच्या भारतवारीत गुडगावच्या बीकानेरवालाकडून लस्सी आणली. मडक्यात बंद करुन दिलेली. रात्री १२ वाजता मस्त हिरवळीवर बसून प्यायलो. व्वा भई! ज ह ब ह र्‍या हा चव होती!! बीकानेरवाले दी लस्सी दा ज्वाब नहीं!! चतुरंग(पाजी)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 12/07/2009 - 01:02

Permalink

वाचतोय...

वाचतोय... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 12/07/2009 - 01:20

Permalink

मस्तच

मस्तच संजोप राव..लै आवडला भाग आपल्याला........ (पाणिपुरीचं पाणी,निरा, मठ्ठा, हेवर्ड्स्,आर सी,आय बी,स्मिरनॉफ,टकिला,मार्गरिटा आणी सध्या करोना वर प्रेम असलेला)प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 12/07/2009 - 07:19

Permalink

क्या बात है !

एक से एक बढिया पेयांबद्दलचा लेख खूप आवडला. ह्यातली काही पेयं आवडत नाहीत आणि काही प्यावीशी वाटत नाहीत पण तरीही हा लेख इतका आवडलाय तर पूर्ण पियक्कडला तर खूपच आवडेल ह्यात वादच नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेदनयन on Mon, 12/07/2009 - 07:58

Permalink

वाह क्या बात है!!!

एक बरस में, एक बार ही जगती होली की ज्वाला, एक बार ही लगती बाज़ी, जलती दीपों की माला, दुनियावालों, किन्तु, किसी दिन आ मदिरालय में देखो, दिन को होली, रात दिवाली, रोज़ मनाती मधुशाला।। आणी पित्र पक्ष में पुत्र उठाना अर्ध्य न कर में, पर प्याला बैठ कहीं पर जाना, गंगा सागर में भरकर हाला किसी जगह की मिटटी भीगे, तृप्ति मुझे मिल जाएगी तर्पण अर्पण करना मुझको, पढ़ पढ़ कर के मधुशाला। अर्थातच मधुशाला - हरिवंश राय बच्चन
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on Mon, 12/07/2009 - 08:30

Permalink

खरी ब्लॅक

खरी ब्लॅक रम ही फक्त ओल्ड मंकच ह्या वाक्याल +१००००० ईजीनीयरींगच्या तमाम पब्लीकची हिच पहली मोहब्बत असते. ओल्ड मंकची मजा खरा दर्दी रसीकच जाणे. लेख खलासच. चीअर्स !!! (ग्लेनफिडीचप्रेमी) सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 12/07/2009 - 09:49

Permalink

शिकंदर सरबत

कधी कधी रात्रीच्या अनेक पेयांच्या व खाद्यांच्या माहोल मधुन दुसर्‍या दिवशी बुळकांडी लागते. अशा वेळी इराण्याच्या हॉटेल मधे शिकंदर सरबतचा एक पेग नीट मारावा. लगेच बुच बसतय असा अनेकांचा अनुभव आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 12/07/2009 - 10:52

Permalink

लेख आवडला

लेख आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 12/07/2009 - 12:19

Permalink

एकूण लिखाण

एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय. निखालस पणे सांगायच तर हा लेख लेखकाच्या नेहमीच्या हातखंड्याच्या अगदीच विरुद्ध क्वालीटीचा आहे. अपेक्षाभंग झाला. प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. वाईन , व्होडका , व्हिस्की , रम , बीयर या प्रत्येकाची ढंग वेगळे असतात. चवीने पिणारासाठी त्यांचे सर्व कराय्चे थाटमाट ही निराळे असतात. साजर्‍या करायच्या वेळा / प्रसंग निराळे असतात या बद्दल काहीच लिहिले नाही. कदाचित अनुभवाचा अभाव असावा. असो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/07/2009 - 19:30

In reply to एकूण लिखाण by विजुभाऊ

Permalink

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत

एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय. निखालस पणे सांगायच तर हा लेख लेखकाच्या नेहमीच्या हातखंड्याच्या अगदीच विरुद्ध क्वालीटीचा आहे. अपेक्षाभंग झाला. सहमत आहे. विजुभौ, मनातला प्रतिसाद टंकल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे जिस जगह हम हों, वहां गर तू न हो, तो कुछ नही ! और जहा तू हो, वहां काबू न हो, तो कुछ नहीं !! -जफर
  • Log in or register to post comments

Submitted by अनाडि on Mon, 12/07/2009 - 23:23

In reply to एकूण लिखाण by विजुभाऊ

Permalink

एकूण लिखाण

एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय हम्म...चालायचच विजुभाऊ. वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेला भाग संपादित. कृपा करून मतप्रदर्शन फक्त लेखनावर असावे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नको. अनाडि. अब्दुल नारायण डिसुझा
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/08/2009 - 12:01

In reply to एकूण लिखाण by अनाडि

Permalink

संजोपराव

संजोपराव लेख आवडला :) वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेला भाग संपादित. कृपा करून मतप्रदर्शन फक्त लेखनावर असावे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नको.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 12/07/2009 - 19:09

Permalink

विजूभाउंशी ....

अंशतः सहमत. लिखाणात हात आखडता घेतल्यासारखा वाटला. असो "सिंगल माल्ट" ही भारतीय व्हिस्की पण खुप छान आहे. ट्राय करुन पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 12/07/2009 - 19:27

Permalink

प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते.

खरं आहे भाऊ. बियर कॉलेजातल्या मैत्रीणीसारखी. दुपार टळण्या इतपत प्यावी. रम कॉलेजातल्या मित्रासोबत प्यावी. दोस्तीचा वास्ता देत अनेक वादे ओरडून ओरडून द्यावेत आणि दुसर्‍या दिवशी विसरून जावेत. रीयुनीयनच्या मिटींगला प्यायचा आयटम. व्होडका पिण्याचं वय असतं.भलत्या सलत्या वयात पिण्याचं पेय नव्हे ते.दोन पेगाच्या वर व्होडका विरार लोकलसारखी सुसाट धावते. अंधेरीवाल्या प्यासेंजराला उतरू देत नाही.थेट बोरीवली. व्हिस्कीचं दु:ख काय सांगू . इंडीयन व्हिस्कीनी जे काय केलं आहे त्याची तुलना फक्त गुलशन कुमारनी जे जुन्या गाण्याचं पोतेरं केलं त्यासोबत करावी. स्कॉचला सोबत सुध्दा तोलामोलाची असावी लागते. नवरात्रीच्या गरब्यात गायचं गाणं नव्हे बा ते.असली ख्याल गायकी आहे बा ती. घड्याळाकडे न बघता गायची चिज आहे.फक्त नव्या गायकानी गायली तर द्रुत गाताना तराण्याचा भास होतो.लतीया टकट टारे गींगीं. बाकी वाईन प्यावी तर घरीच. फोन काढून बंद ठेवावा. मुलांना मामाकडे पाठवावं.चखणा घरचाच असावा. एखादी बाटली संपल्यावर हॉलमध्ये टिव्ही चालू ठेवून आपण बेडरूमात जावं .फेमीना चाळणार्‍या बायकोला मनोहर कहानीया सांगाव्या. आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा.आणि विजूभाऊ काय सांगू तुम्हाला. शँपेनसाठी आजही निमीत्त गावलेले नाही. मर्यादीत पिणारा रामदास
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 12/07/2009 - 19:36

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

बाकी काही म्हणा

बाकी वाईन प्यावी तर घरीच. फोन काढून बंद ठेवावा. मुलांना मामाकडे पाठवावं.चखणा घरचाच असावा. एखादी बाटली संपल्यावर हॉलमध्ये टिव्ही चालू ठेवून आपण बेडरूमात जावं .फेमीना चाळणार्‍या बायकोला मनोहर कहानीया सांगाव्या. आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा. क्या बात है! रामदासभौ असे वाचता वाचता झिंग आणणारं लिहितात की आमच्यासारख्यांना प्यायची गरज भासू नये! ;) (अजिबात न पिणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/07/2009 - 19:45

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

क्या बात है सर...!

प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. वेळ,सहकारी, प्रसंग,संगीत, या आणि अशा कितीतरी गोष्टींची संगत 'चिअर्सची' नजाकत वाढवतात. अर्थात अनुभव असला तर तो शब्दातून सहज येतो. उगाच ओढून ताणून ब्रँडची नावे लिहून मैफील रंगवता येत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 12/08/2009 - 02:01

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

व्वा !!

काय प्रतिसाद आहे... लै म्हणजे लैच आवडला. ह्या प्रतिसादाचा एक झक्कपैकी लेख करा अजून थोडे तपशील वाढवून ... वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 12/08/2009 - 10:00

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

रामदासभौ

रामदासभौ ...खरय तुमचे. बडा ख्याल ऐकत स्कॉच पिताना कशाची नशा असते तेच उमजत नाही. आहाहा..... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 12/08/2009 - 10:20

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

वा! क्या बात है

वा रामदास! अशा लिखाणामुळे आपल्याविषयी असुयायुक्त आदर वाढतो आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 05/14/2014 - 12:37

In reply to प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. by रामदास

Permalink

आपला पेला तिच्याकडून उष्टावून

आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा. _/\_ दंडवत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Mon, 12/07/2009 - 22:38

Permalink

क्या बात है !

खरा शौकीन एक चपटी, अर्धा लिटर सोडा, गार पाणी, दोनच भाजलेले पापड आणि दोन सिग्रेटी यावर जन्नतची सैर करुन येतो. अगदी खरे बोललात. -- (शौकीन) मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 12/07/2009 - 22:59

Permalink

तुफान पळतेय गाडी!!

मस्तच!! किती छान वर्णन केलंय राव! एखाद्या आशिकानं आपल्या सजणीचं वर्णन करावं अगदी तसं!!! तुमचं मद्यप्रेम लेखाच्या थेंबाथेंबातून डोकावतंय!! छा गये गुरु!!! मजा आली वाचायला! -- (किंगफिशर पासून सुरुवात करून पुढे सिग्नेचर, स्मरनॉफ, जेडी, बकार्डी अशा प्रत्येक 'सुरे'च्या प्रेमात पडलेला आणि सध्या पुन्हा 'बियर' घराण्याच्या 'क्रोनेनबर्ग' या विदेशी कन्येशी सलगी केलेला) पेगवेडा!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 12/08/2009 - 00:07

In reply to तुफान पळतेय गाडी!! by मेघवेडा

Permalink

+१

अगदी हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Mon, 12/07/2009 - 23:49

Permalink

चांगले संकलन

श्री राव, पेय पदार्थांचे चांगले संकलन. अल्कोहोल असलेली व नसलेली पेये यांच्यासाठी स्वतंत्र लेख लिहिता आला असता. असो.
खरी ब्लॅक रम ही फक्त ओल्ड मंकच.
ओल्ड मंक भारतात असतांना पीत असे पण अमेरिकेत आल्यानंतर 'कॅप्टन मॉर्गन प्रायवेट स्टॉक' ही रम अत्यंत आवडू लागली. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 12/08/2009 - 10:59

Permalink

नीरा

उन्हाळ्यातल्या पहाटेपहाटे फिरुन येतायेता नीरा प्यावी (का कुणास ठाऊक, नीरा म्हटल्यानंतर 'नीरा उपासाला चालते' आणि'नीरा गर्भवती महिलांना लाभदायक आहे' हेच आधी आठवते!)
वा वा! नीरा हे आमचे अत्यंत आवडते पेय.स्वत:ही प्यावी व इतरांनाही प्रेमळ जबरदस्तीने पाजावी असे हे पेय.याची व्युत्पत्ती 'नीर' या शब्दापासुन झाली असावी असा आमचा ठळक कयास आहे.ताड या झाडापासुन ताडी बनते तसे नीर या झाडापासुन नीरा बनत असावी असा भाबडा विचार आमच्या मनी येत असे.पण ती शिंदी नावाच्या झाडाच्या रसगळतीतुन होते असे कुणीतरी ध्यानी आणुन दिले. कारमधुन उतरुन नीरा पिणारी गर्भवती स्त्री एकदाच/ची दिसली आणि पाटीच चीज झाल्याचा आनंद विक्रेत्यापेक्षा आम्हालाच जास्त झाला. 'नीरा उपासाला चालते' याचा अर्थ आम्ही उपास करणार्‍या सहकार्‍यांना उपासाला दुसर काही चालत नाही असा करुन देउन नीरा पिण्यासाठी प्रवृत्त करीत असु. आमच्याकडुन सहकार्‍यांना नीरा मोफत व अनीवार्य असल्याने सहकारीही कुर कुर न करता पीत असत. पुण्यात नीरेचे एवढे स्टॉल्स असतात कि हल्ली आम्हाला शंका येउ लागली कि ही नीरा खरेच झाडापासुन काढतात का? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Tue, 12/08/2009 - 15:07

In reply to नीरा by प्रकाश घाटपांडे

Permalink

वा वा! नीरा

वा वा! नीरा हे आमचे अत्यंत आवडते पेय.
अगदी! कुठेशी ऐकलं होतं की कुणा एकीला बागेतला प्रेमळ (माळी)म्हातारा आज्जा पहाटे चार वाजता काढलेली ताजी निरा दररोज घेऊन यायचा. मी ते आपल्या बाबतीत कधी घडेल ह्याचं स्वप्न अजून बघतोय :) असो. बाकी सुरापानाचे अनुभव ठीक.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Tue, 12/08/2009 - 23:07

Permalink

लेख फक्कड जमला आहे.

दर्जेदार लेख. ब-याच दिवसानी सुंदर लेखन वाचायला मिळाले. अभिनंदन रावसाहेब. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 07/10/2012 - 15:27

Permalink

क्लास....

उत्खननादरम्यान सापडलेला चविष्ट लेख.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 07/10/2012 - 18:37

Permalink

मनोबा, खुप आभार हा लेख उत्खनन

मनोबा, खुप आभार हा लेख उत्खनन करून वरती आणल्याबद्दल! -( मद्यप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com