flying jewels अर्थात फुलपाखरं भाग १

jaypal's picture
jaypal in कलादालन
30 Nov 2009 - 9:14 pm

नम्स्कार मंडळी,
"ताजे होउन जा" या सदरात फुलांच्या फोटोचा आनंद घेतलात आता पाहुयात फुलपाखरं. सहसा दर रविवारी किंवा वेळ असेल तेंव्हा अजुनही सकाळी ६/६.३० वाजता भटकंती साठी घराबाहेर पडतो. साधारण २ वर्षापुर्वी ही भटकंती व्यायाम,निसर्गसान्नीध्य येवढ्या पुरतीच मर्यादीत होती.एके दिवशी गळ्यात कॅमेरा, पाठीवर सॅक घेतलेला माझा जुना शालेय मित्र "युवराज" येउरच्या जंगलात भेटला. अवांतर गप्पा आणि जुने किस्से चघळताना कळलेकी तो फुलपाखरांचे फोटो काढण्यासाठी वरचेवर येतो. कुतुहल म्हणुन त्या दिवशी मी पण त्याच्या बरोबर भटकलो.घरी परतत असताना त्याने सांगीतले की गेली १५/१७ वर्षं तो फुलपाखरांचा आभ्यास करतो आहे आणि त्यासाठी बरचसा भारत पालथा घातला आहे/ घालतो आहे. त्याने स्वतःचे yuwarajgurjar.com हे संकेतस्थळ सुद्धा चालु केलं आहे. फुलपाखरां विषयी मराठीतुन सर्वसमावेशक माहिती देणारं हे एकमेव संकेतस्थळ असावं. त्याने काढलेले फोटो पाहुन मनोमन मी त्याचा चाहता कम शिष्य जादा झालो आणि फोटोग्राफीचा नाद लागला. काही रत्न तुमच्या समोर उघड्तोय खरा पण त्याची नावे (वापरातील किं शास्त्रीय)अजुन मला माहीत नाहीत त्या बद्दल क्षमस्व. जभरातील फुलपाख्रारांच्या २८०००/३०००० जाती आत्ता पर्यंत माहीती झाल्या आहेत. आकारातील (मुलच्या हाताच्या करंगळीच्या नखा एवढ ते फुट भर मोठं) व रंगातील प्रचंड वैविध्यता पाहुन थक्क व्हायला होत. एवढासा जिव पण ब्रिडिंग सिजन मधे फजारो कि.मी. स्थलांतर करतो यावर विश्वासच बसत नाही.

फुल पाखराचे जिवन चक्र म्हणजे अंडी, आळ्या(सुरवंट),कोश(प्युपा) आणि फुलपाखरु माझ्या कडे अद्याप अंडी व कोशाचे फोटो नाहीत.अंड्यातुन बाहेर पड्ल्यवर सुरवंटाच एकच काम जास्तीतजास्त खादाडी. मादी देखील हा विचार करुनच त्या त्या प्रकारच्या पानांवर अंडी घालत असते.

वरील सुरवंट स्वताला कोशस्थ करतात आणि मग काटेरी सुरवंटाचे होते हे फुलपाखरु. अजुन पंख ओले कोवळे आहेत. काही तासातच पखांत भरीव पणा येतो आणि काटेरी वाल्याचा वाल्मिकी होतो.

काही वयस्क फुलपाखरं

बहुसंख्य फुलपाखरांचा पंखाच्या खालचा आणि वरचा भाग रंगाच्या बाबतीत वेगळा असतो. हे पंख अत्यंत नाजुक अश्या खवल्यांनी (स्केल्स) बनलेले असतात.आपण जर फुलपाखरु पकडल तर हे रंगीत खवले आपल्या बोटांना चिकटलेले दिसतील. हे निघालेले खवले परत तयार होत नाहीत. कायम स्वरुपी नुकसान सोसुन ते पंगु झालेल असत.
खालुन बघीतल्यास....

तेच वरुन बघीतल्यास.....

सुर्यस्नान (सन बास्किंग) करतो आहोत.

वरील काही फोटोत पहात आहात कसं उन्हात पंख पसरुन कसं अंग शेकत बसल आहे ते? रात्र भर थंडी आणि पहाटेच दव पार गारठुन जातो हा छोटा जिव. म्हणुन मग उन्हात आपले पंख (सोलार पॅनल सारखे) पसरुन उष्णता शोषुन घ्यायची, पंख धडाला जिथे मिळतात तो आखडलेला स्नायु चार्ज करायचा आणि मग दिवसभर भटकायच. याला सुर्यस्नान म्हणता येइल. अजुन चार्ज नसल्याने फोटो काढण्याची हिच एक संधी असते.म्हणुनच सकाळी उन्ह वर यायच्या आत फोटो काढायला पोचाव लागत.एकदा का चार्ज झाले की मग सापडत नाहीत लवकर. हे सगळ कश्या साठी तर पोटासाठी .....

खुप झालं चरण थोडा आराम पाहीजे आता आम्हाला (प्लीज डोन्ट दिस्टर्ब नाउ.नाहीतर संपादकाना कळविण्यात येइल. उर्वरीत भाग खालिल ३ फोटो नंतर क्रमशः)

कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

30 Nov 2009 - 9:27 pm | प्रभो

मस्त रे जय.....सही आहेत फोटो... के व ळ अ प्र ति म !!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विशाल कुलकर्णी's picture

1 Dec 2009 - 1:19 pm | विशाल कुलकर्णी

क्या बात है जेपाळ्भौ, लै जबरा !
आवाडलं पगा आमास्नीबी ! ठांकू बर्का ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मदनबाण's picture

3 Dec 2009 - 10:46 pm | मदनबाण

जबरदस्त फोटो...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

गणपा's picture

30 Nov 2009 - 9:40 pm | गणपा

मस्त तितलियॉं..

प्राजु's picture

30 Nov 2009 - 11:28 pm | प्राजु

सुंदर!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मीनल's picture

1 Dec 2009 - 2:48 am | मीनल

+१
मीनल.

सहज's picture

1 Dec 2009 - 7:54 am | सहज

+२

अजुन येउ दे!

घाटावरचे भट's picture

1 Dec 2009 - 8:14 am | घाटावरचे भट

वा वा!!

दशानन's picture

1 Dec 2009 - 11:54 am | दशानन

वा !
सुरेख फोटो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

महेश हतोळकर's picture

1 Dec 2009 - 12:04 pm | महेश हतोळकर

धन्यवाद सुरेख फोटो बद्दल आणि युवराजची ओळख करून दिल्याबद्दल. आत्ताच भेटून आलो.

महेश हतोळकर's picture

1 Dec 2009 - 12:07 pm | महेश हतोळकर

धन्यवाद सुरेख फोटो बद्दल आणि युवराजची ओळख करून दिल्याबद्दल. आत्ताच भेटून आलो.

टारझन's picture

1 Dec 2009 - 12:11 pm | टारझन

केवळ तिणंच शब्द , खं ग री

जयपाल , मला माहित नव्हतं तुम्हीही एक उत्तम फोटूग्राफर आहात ते! :)

आपलाच,
टार्‍या

sneharani's picture

1 Dec 2009 - 12:56 pm | sneharani

खरंच खूप सूंदर फोटो आहेत..!

सूहास's picture

1 Dec 2009 - 8:38 pm | सूहास (not verified)

वॉव...

सू हा स...

चतुरंग's picture

1 Dec 2009 - 10:03 pm | चतुरंग

अतिशय उच्च फोटू!! पुढली फुलपाखरे लवकर टाका!! :)

(चतुर)चतुरंग

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 12:52 am | श्रावण मोडक

(चतुर)चतुरंग
हे बाकी उच्च!!!!

टारझन's picture

2 Dec 2009 - 5:46 pm | टारझन

अवांतर प्रतिक्रिया :)

- साबण चोळक

स्वाती२'s picture

2 Dec 2009 - 7:03 pm | स्वाती२

मस्तच!
>>फुलपाख्रारांच्या २८०००/३०००० जाती आत्ता पर्यंत माहीती झाल्या आहेत
चांगलाच व्यासंग दिसतोय. खूप पेशन्स लागत असेल ना? मुलाच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने फक्त मोनार्क चा अभ्यास केला होता. एकाच फुलपाखराने एवढ थकवलं होतं.

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:55 am | विसोबा खेचर

वा!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Dec 2009 - 2:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त्च.

विजुभाऊ's picture

4 Dec 2009 - 5:16 pm | विजुभाऊ

धारावी डेपो समोरच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात फुलपाखरांची सॅंक्चरी आहे. १०० एक प्रकारची फुलपाखरे पहायला मिळतात.

भानस's picture

5 Dec 2009 - 4:19 am | भानस

सगळेच फोटो सुंदर आलेत. मला विशेष करून नंबर ५ चा फोटो खूप आवडला.:)