✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"एक्स्पोर्ट सरप्लस"

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 10/29/2009 - 15:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6268 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

एक्स्पोर्ट सरप्लसची

मदनबाण
गुरुवार, 10/29/2009 - 16:02 नवीन
असा एक्स्पोर्ट सरप्लस करण्यासाठी या लोकांना १२ महिने लागणारे जिहादाचे खत (की विष) पुरवले जाते आणि ते संपुर्ण अंगात भिनवले देखील जाते. सध्याचा नवा टोळी प्रमुख हकीमुल्ल्ह मसूद हा आता अनेक कारवाय पार पाडेल असेच दिसते. http://topics.nytimes.com/topics/reference/timestopics/people/m/hakimullah_mehsud/index.html हे राक्षस मेले असे पाकिस्तानी सरकार जाहीर करते व काही दिवसात हे आपले नवे व्हिडीयो प्रसारित करुन मोकळे होतात... http://www.youtube.com/watch?v=pJ24kzws5A4 (१२ ही महिने यांचा धर्म खतर्‍यामधे कसा असतो ? जिहाद चा खरा अर्थ या लोकांना तरी माहित आहे का ? ) :? मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

वास्तववादी!

प्रमोद देव
गुरुवार, 10/29/2009 - 16:02 नवीन
की ’विस्तववादी?’ ;) मस्त लिहिलंय. ======== कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

शंका

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/29/2009 - 16:41 नवीन
भारतातून ब्रेन ड्रेन होण्याचं हेच कारण का? अदिती
  • Log in or register to post comments

व्यनि पहा

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 16:51 नवीन
व्यनि पहा ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हालाही

निमीत्त मात्र
गुरुवार, 10/29/2009 - 20:47 नवीन
आम्हालाही दाखवा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

खरे नाव सांगाल तर दाखवेन

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 22:16 नवीन
आपले खरे नाव कळल्यावर ठरवेन दाखवायचा कीं नाहीं. नुसत्या "निमित्त मात्र"ला दाखविण्यासारखा नाहीं! नाहीं तर 'open forum' वर नसता का लिहिला? सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

दुसर्‍यां

टारझन
गुरुवार, 10/29/2009 - 22:21 नवीन
दुसर्‍यांचं बघायची एवढी हौस पहिल्यांदाच पाहिली !! अभिंदन ! काका दाखवा हो ह्याला बी :) काय एकेकाची आवड ... असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

हाहाहा! हा मुद्दा लक्षात नव्हता आला!

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 22:27 नवीन
हाहाहा! हा मुद्दा लक्षात नव्हता आला! ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

दहशदवाद हे

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/29/2009 - 19:27 नवीन
दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत. (हा कोणाला टोला असेल तर माहित नाही) काळे साहेब लेख अतिशय सुंदर लिहिला आहे. भारताने कारगीलच्या लढाईच्या वेळी पी.ओ.के घ्यायचा चान्स सोडला. त्यामागे काय राजकीय हेतु होता ते त्यांनाच ठाऊक.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 22:18 नवीन
धनंजय-जी, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. (लेख अतिशय सुंदर लिहिला आहे.) सहमत (दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत.) ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

लेख आवडला!

सायबा
गुरुवार, 10/29/2009 - 21:17 नवीन
काळेसाहेब, लेख लै आवडला बघा! लिहा अजून आसंच!! सायबा
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 22:25 नवीन
सायबा-जी, धन्यवाद! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायबा

सुधीरजी

अनामिका
गुरुवार, 10/29/2009 - 21:58 नवीन
सुधीरजी ! इतक वास्तववादी लिखाण की भारत- पाकिस्तान मैत्रिचे गोडवे गाणार्‍यांना वाचुन झिट यायची.......बिचारे आखाती देशातुन काम करणारे पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात याला कारण जिहादी .बाहेरुन आलेल्या व्यक्तीकडे मजबुत पैसा आहे असे एखाद्या अतिरेकीसंघटनेच्या निदर्शनास आले कि आलीच कंबख्ती........(कारण सर्वसामान्य माणुस कोण आणि अतिरेकी कोण हेच कळायला मार्ग नाही) स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्‍हास करतोय पण झाली चुक सुधारे पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन गायब झालेल नसल म्हणजे मिळवल......? खुद्द मुशर्रफ़ यांच्या गाडीखाली बाँब उडवून त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. हे असेच काश्मिरी नेत्यांच्याबाबतीत झालेले प्रयत्न नेहमीच कसे फसतात? हे निदान मला न उलगडलेल कोड आहे. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

आता या भस्मासुराला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची?

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 22:24 नवीन
<<स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्‍हास करतोय>> मी अगदी हाच शब्द या संदर्भात इतरत्र वापरला आहे! आता या 'भस्मासुरा'ला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची हाच एक मोठा प्रश्न आहे. <<पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात>> माझ्या ओळखीचे इथले पाकिस्तानीही कांहींसे असेच सांगातात, पण थेट outright बोलायला हिम्मत त्याना इथेही होत नाहीं. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

कलियुगात

अनामिका
गुरुवार, 10/29/2009 - 22:47 नवीन
कलियुगात भस्मासुराचा नाश करायला मोहिनीची गरज नाही .मोहिनी हे फक्त माध्यमच होत, पण पाकिस्तानने नकळतच स्वहस्ते इतक्या मोहिन्यांची निर्मिती स्वदेशातच केली आहे की आपल्याला नविन मोहिनी कुठुन आणायची याची चिंताच करायचे कारण नाही... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

झियाच्या आणि बेनझीरबाईंच्या बाबत त्यांना यश मिळालं!

सुधीर काळे
Fri, 10/30/2009 - 11:28 नवीन
पहिलं यश त्यांना झियाच्या बाबतीत मिळाले होते! त्या पाठोपाठ बेनझीरबाईंच्या बाबतीत! आजच तुझ्या सिग्नेचरकडे लक्ष गेलं! Wow! मस्त आहे अर्थ! ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

एक्स्पोर्ट सरप्लस

सहज
Fri, 10/30/2009 - 06:46 नवीन
एक्स्पोर्ट सरप्लस मुद्दा रोचक आहे. पाकीस्तान लष्कर त्यांनीच निर्माण केलेल्या तालीबानला काबूत ठेवू शकत नाही (की मुद्दाम तसा समज करुन द्यायचा आहे) काही कळत नाही.
  • Log in or register to post comments

गुणवत्ता

आनंद घारे
Fri, 10/30/2009 - 08:57 नवीन
एक्स्पोर्ट सरप्लस माल बहुतेक वेळी चांगला असायचा. ज्या काळात आयात कठीण होती त्या काळात तो दुधाची तहान ताकावर भागवत असे. बहुतेक जागी स्फोट घडवणारे अतिरेकी हाती लागत नाहीत यावरून त्यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता दिसून येते. मला त्यांचे कौतुक करायचे नाही, पण ही वस्तुस्थिती दाखवायची आहे. ही निर्यात फक्त पाकिस्तानातूनच आणि फक्त भारतातच होते असे दिसत नाही. त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत असल्यामुळे ती आपल्याला ठळकपणे जाणवते. कमीअधिक प्रमाणात ही जगभरातली समस्या आहे. अतिरेकी वापरत असलेली संहारक शस्त्रे कुठे कुठे तयार होतात आणि ती कशा प्रकाराने इकडे तिकडे पाठवली जातात हे दाखवणारे अनेक इंग्रजी चित्रपट अमेरिकेत निघाले आहेत. त्यातला १ टक्का भाग जरी खरा असला तरी ते भयानक आहे. पुराणकाळापासून भस्मासुर, महिषासुर, हिरण्यकश्यप वगैरे असामान्य शक्तीशाली खलनायकांचा अखेर नाशच झाला (त्यांच्याकडे असलेली अस्त्रे आधिक गुणवत्तेची असूनसुद्धा) आणि वाईटपणाचे इतके फायदे असतांनासुद्धा माणसातला चांगुलपणा टिकून राहिला यावरूनच मला भविष्यकाळातही असेच होईल अशी आशा वाटते आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'!

सुधीर काळे
Fri, 10/30/2009 - 09:12 नवीन
आनंद, तुझा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. मी जेंव्हा 'एक्झोडस (exodus)' हे पुस्तक दुसर्‍यांदा वाचले तेंव्हां मला धक्काच बसला कारण त्यात ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमधून ब्रिटिशांना लवकर हकलून द्यायला अस्सेच स्फोट कसे घडवून आणले होते याचे वर्णन अतीशय अभिमानाने 'लियॉन यूरिस (Leon Uris)' या लेखकाने दिले आहे. (पहिल्या वेळी एक्झोडस वाचले तेंव्हा हा मुद्दा इतका जोरदारपणे register झाला नव्हता! या अतिरेकी प्रकारांचा असा दुरुपयोग करण्याचे pioneers ज्यू तर नाहींत? आणि आज तोच भस्मासुर त्यांना छळतो आहे. पेरावे तसे उगवते हे तर खरेच. पण न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

तण

आनंद घारे
Mon, 11/16/2009 - 08:08 नवीन
'पेरावे तसे उगवते' या म्हणीचा अर्थ 'त्याहून चांगले किंवा वेगळे फळ मि़ळत नाही' एवढ्यापुरता मर्यादित आहे. पेरलेल्या पिकामध्ये न पेरलेले तण माजतच असतात. अगदी त्यांची पाळेमुळे खणून काढून ती जाळून टाकली तरीसुद्धा ते 'एक्स्पोर्टसरप्लस' होऊन कुठून तरी येतात आणि पिकाला दिलेले खतपाणी फस्त करून फोफावतात हा शेतकर्‍यांचा अनुभव असतो. त्यामुळे वेळोवेळी ते उपटून टाकणे, वीडीसाइडची फवारणी करणे हे काम करत रहावे लागतेच. त्याला इलाज नाही. 'फ्रीडम मीन्स इटर्नल व्हिजिलन्स' असे कोणीतरी सांगितले आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

एकदम बरोबर!

सुधीर काळे
Mon, 11/16/2009 - 08:19 नवीन
प्रिय आनंद, सुरेख प्रतिक्रिया. एकदम बरोबर व पूर्णपणे सहमत! मी तुझ्या ब्लॉगवर जाऊन त्यातला स्वातंत्र्यदेवता व वॉशिंग्टन डीसी हे लेख वाचले आहेत. माझा मुलगा वॉशिंग्टन डीसीच्या थोडासा बाहेर (व्हर्जिनिया) येथे रहातो त्यामुळे हे शहर बर्‍यापैकी 'पाठ' झाले आहे. सवडीने त्याबद्दल लिहीन. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

सापेक्षता

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/30/2009 - 09:13 नवीन
काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणार्‍यांना "स्वातंत्र्य-सैनिक" म्हणायचे पण त्याच्या स्वतःच्या गाडीखाली बाँब लावणार्‍यांना मात्र खुनी, गुन्हेगार म्हणायचे अशा निरनिराळ्या व सोयीस्कर व्याख्या मुशर्रफने बनविल्या.
स्वातंत्र्यपुर्व काळातील इंग्रज सरकारच्या लेखी असलेले अतिरेकी यांना आपण देशभक्त वा स्वातंत्र्यसैनिक म्हणतो. जिंदा सुखाला देखील हुतात्मा म्हणणारे पंजाब मधे आहेत लेख उत्तम. क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

क्रौर्य, हिंसा यालाही धर्म नसतो आणि माणुसकीलाही धर्म नसतो!<YES>

सुधीर काळे
Fri, 10/30/2009 - 10:28 नवीन
किती बरोब्बर! पूर्णपणे सहमत. <<क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो>> सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आढावा

Nile
Fri, 10/30/2009 - 10:38 नवीन
आढावा आवडला! काहे गोष्टी खर्‍या तर काही घडवलेल्या असाव्यात असे वाटते. पाकीस्तान संपणे म्हणजे नक्की काय ह्याचा विचार व्हायला हवा. पाक किंवा अफगाण पुन्हा सामान्य जिवन जगु शकले नाहीत तर ते भाडोत्री अतिरेकी कारखानेच बनतील अशी शक्यता आहे. भारताची ही समस्या लवकर सुटेल असे दुर्दैवाने वाटत तरी नाही.
  • Log in or register to post comments

छान,

विसोबा खेचर
Fri, 10/30/2009 - 11:21 नवीन
छान, इंटरेस्टींग लेख.. तात्या.
  • Log in or register to post comments

दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर"मधे हा लेख प्रकाशित झाला आहे!

सुधीर काळे
Sun, 11/15/2009 - 11:02 नवीन
तात्यासाहेब, तीन-चार दिवसापूर्वी दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर" या सदरात हा लेख प्रकाशित झाला आहे व अजूनही आहे. http://tinyurl.com/ylyc6v4 सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंद घारे
Mon, 11/16/2009 - 08:14 नवीन
दैनिक सकाळमध्ये तुझा लेख प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन. लेखाची गुणवता उत्तम आहेच,त्यात तिळमात्र शंका नाही, पण परदेशात राहून हे भारतातल्या दैनिकात प्रकाशन वगैरे करायला तुला कसे जमते? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लिहा असेच माहितीपूर्ण पुढेही

पारंबीचा भापू
Sun, 11/15/2009 - 13:24 नवीन
पहिल्यावेळी हा लेख मिपावर आला त्यावेळी वाचायचा राहिला असावा. आजच वाचला. खूप आवडला. आता इंटरनेटवर जाऊन सकाळवरचाही बघेन. लिहा असेच माहितीपूर्ण पुढेही. भापू
  • Log in or register to post comments

भस्मासूर

ऋषिकेश
Sun, 11/15/2009 - 17:12 नवीन
मीही आजच लेख वाचला.. आवडला. आता हे भस्मासूर आहेत का स्वतःच्याच रक्ताच्या एका थेंबातून १०० पटीत जन्म घेणारे राक्षस आहेत हे काळच ठरवेल. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

मलेशियात भेटलेल्या थायलंडस्थित पेशावरी तरुणाचा मनोरंजक किस्सा

सुधीर काळे
Sun, 11/15/2009 - 21:17 नवीन
ऋषिकेश-जी, तुमचा हा नवा दृष्टिकोन (एका थेंबातून १०० पटीने जन्म घेणारे राक्षस) भावला. छान! कुटुंबनियोजनाबद्दल पाकिस्तानातले कायदे किंवा तिथले रिवाज काय आहेत ते मला माहीत नाहीं, पण कुटुंबनियोजन फारसे लोकप्रिय नसावे. तरीही ज्या वेगाने तिथे माणसं मरत आहेत ते पहाता १०० कांहीं निर्माण होत असतील असे वाटत नाहीं. हे लिहिताना मला पेशावरला जन्मलेल्या, थायलंडला काम करणार्‍या व क्वाला लुंपूर (मलेशिया) येथे भेटलेल्या एका पाकिस्तानी तरुणाचा मनोरंजक किस्सा आठवला. तो खूप सांगण्यासारखा आहे. म्हणजे हा माणूस किती जुन्या काळात वावरत होता ते ऐकून मी धन्य झालो. Hopefully, he does not represent the majority of Pakistanis. सांगेन एक दोन दिवसात. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

जरा विस्कटून

ऋषिकेश
Sun, 11/15/2009 - 22:48 नवीन
जरा विस्कटून सांगतो १तून १०० जन्माला येण्यामागे वाढती लोकसंख्या हा विचार नव्हता. तर अतिरेकी व त्यांचे निर्माते एकमेकांना मारताना निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे अनेकांचे जीवन विस्कळीत होते. त्यापैकी अनेक रिकामी डोकी/रिकामे हात नाईलाजाने/उद्वेगाने शस्त्र उचलून नवे अतिरेकी बनतात. तेव्हा त्याच्या भांडणात ते एकमेकांना मारून त्यांचा भस्मासूर होईल का त्यामुळे अधिक अतिरेकी तयार होतील(१ तून १००) हे काळ ठरवेल असे म्हणायचे होते ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

विचार केल्यास छाती दडपून जाते

सुधीर काळे
Mon, 11/16/2009 - 08:33 नवीन
ऋषिकेश-जी, मी तो शेरा lighter vein मध्ये केला होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक अतिरेकी मारला कीं त्याची जागा कुणी ना कुणी घेतोच आहे. जे लोक या अतिरेक्यांना उद्युक्त करतात त्यांच्या असे टोकाचे व एकांगी विचार अतिरेक्यांच्या मेंदूत भिनविण्याच्या हातोटीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अर्थातच एकादी गोष्ट बिघडवणे सोपे असते, पण बिघडलेल्या माणसाला सुधारवणे खूप अवघड असते. पाकिस्तानात नुकतीच स्थापित झालेली लोकशाही जर यशस्वी झाली तर अशा सरकारांना किती अवघड काम करावे लागणार आहे याचा विचार केल्यास छाती दडपून जाते. प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा