✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रेसेंट /आहेर

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Wed, 11/11/2009 - 20:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7753 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

पळून जाउन

बाकरवडी
Wed, 11/11/2009 - 20:56 नवीन
पळून जाउन लग्न करावे. काहीच प्रॉब्लेम नाही. असो, पण आहेर न घेण्याबद्द्ल आग्रही..... :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

आहेर /अहेर

गणपा
Wed, 11/11/2009 - 21:11 नवीन
आहेर /अहेर जरुर घ्यावा. च्यायला सोडायचा कशाला? तुम्हाला गरज नसेल तर सरळ एखाद्या सामाजीक संस्थेला, अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला दान करावे. घ्या आम्ही आमचे २ पैसे टाकुन धाग्यास पावन केले आहे ;)
  • Log in or register to post comments

अहो पण

बाकरवडी
Wed, 11/11/2009 - 21:23 नवीन
अहो पण आहेर घेतल्यावर रीटर्न गिफ्ट द्यावे लागते. म्हणजे काही तरी साडी,शर्टपीस्,एखादं भांड, चिवडालाडू वगैरे वगैरे..... त्यामुळे परत खर्च वाढतो. मुळात आहेर न घेण्याचे मुख्य कारण लग्नातील खर्च कमी करणे हा आहे. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

रे

गणपा
Wed, 11/11/2009 - 21:33 नवीन
रे बाकरवड्या , लग्नाचा खर्च कमी कारायचाय तर मग कोर्टात लग्न लावाव ना. साला हाय काय आन नाय काय? आणी खर्चाच म्हणशील तर लग्नच करु नये. आयुष्यभर होणारा खर्च वाचेल ;)
  • Log in or register to post comments

आहेर/अहेर

चिरोटा
Wed, 11/11/2009 - 22:57 नवीन
अहेर्/आहेर घेतले की लग्नाच्या दुसर्‍या दिवशी सर्वात आधी बायका कोणी किती अहेर दिला आहे ते बघतात्.त्यात पैशाची पाकिटे असली की मग व्यक्तीचे नाव्/अहेर डायरीत लिहिले जाते. सहसा आपण लोकांना जेवढा अहेर दिलेला असतो साधारण तेवढाच आपल्याला परत मिळतो!! आपला आशीर्वाद हाच आमचा आहेर हे मला योग्य वाटते.या,अक्षता टाका,भोजन करा आणि निघा. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

>> पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये....

संदीप चित्रे
Wed, 11/11/2009 - 23:11 नवीन
जर पत्रिकेवर स्पष्ट लिहिले आहे तर त्यांच्या मताचा आदर करून आहेर देऊ नये. पत्रिकेवर काहीच लिहिले नसेल तर मात्र द्यावा. सिंपल अ‍ॅज दॅट !
  • Log in or register to post comments

जर

रेवती
गुरुवार, 11/12/2009 - 00:25 नवीन
जर पत्रिकेवर 'आहेर आणू नये' असे लिहिले असेल तर तसे करावे. एका वाढदिवसाला लिहिल्याप्रमाणे मी प्रेझेंट नेले नव्हते. बाकीच्यांनी मात्र आणले होते, तिथे थोडी पंचाईत झाली. अनेकदा आहेर घेण्याचा मानस नसताना आलेले पाहुणे, " हे काय? आमच्याकडून घेणार नाही का आहेर?" अशी भावनापूर्ण गळ घालतात. यजमानांकडून काय उत्तर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष असते. पाकिटे आणि पैसे घेऊनच येतात लोक्स! माझ्या एका नातेवाईकांनी त्यांच्याकडच्या लग्नात जबरदस्तीने दिलेल्या भेटवस्तू त्या त्या लोकांच्या घरी नेऊन दिल्या होत्या. माझ्या मुलाच्या बारश्याला आलेल्या साड्या तशाच पडून आहेत. सात वर्षात एकदाही हात लागलेला नाही. असे होण्यापेक्षा आहेर न घेतलेला चांगला. गरिब असो वा श्रीमंत, त्या लोकांचे पैसे आणि वेळ भेटवस्तू आणताना खर्च झालेले असतात. रेवती
  • Log in or register to post comments

आहेर नकोच ...

मी-सौरभ
गुरुवार, 11/12/2009 - 00:45 नवीन
घेतलाच नाही की द्यावा पण लागत नाही ना......:) सौरभ
  • Log in or register to post comments

असहमत. समजा

गणपा
गुरुवार, 11/12/2009 - 02:44 नवीन
असहमत. समजा तुम्ही घेतला नसेल एखाद्याकडुन पण त्याने त्याच्या लग्नात अहेर आणु नये अस छापल नसेल तर काय तुम्ही नसते हात हलवत जाणार का? लोक लाजेस्तव काहितरी निदान पाकिट तरी द्यालच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आहेर देणं

रेवती
गुरुवार, 11/12/2009 - 02:55 नवीन
आहेर देणं परवडलं पण घेणं नको! माझ्याच लग्नात आलेले ५ थर्मास, स्टिलचे डबे, साड्या, शेभेच्या वस्तू, पानसुपारीचे बॉक्सेस........ मी तर सासूबाईंना म्हटलही होतं की त्यांना अजू दोन तीन मुलं असती तरी सगळ्यांचे संसार व्यवस्थित चालू झाले असते एवढ्या सामानावर!;) त्यातल्या त्यात कॅश ठिक आहे......देणंही आणि घेणंही! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चालेल...

मिसळभोक्ता
गुरुवार, 11/12/2009 - 15:37 नवीन
त्यातल्या त्यात कॅश ठिक आहे......देणंही आणि घेणंही! चालेल. पुढच्या वेळी कॅश देऊ ! :-) :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

किंबहुना

विनायक प्रभू
गुरुवार, 11/12/2009 - 15:42 नवीन
कॅश द्यायचा प्रसंग यावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

कॅश

विनायक प्रभू
गुरुवार, 11/12/2009 - 15:45 नवीन
पुढच्या वर्षी सिल्वर ज्युबीली आहे हो. सर्वांनी कॅश पाठवावी अशी अग्रिम सुचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मी

चिरोटा
गुरुवार, 11/12/2009 - 16:12 नवीन
सध्या कॅशलेसचा जमाना आहे. पार्टी(पक्षी-आपण) मालदार असल्याने पार्टी कुठे देणार ते सांगा.पार्टीत- कोंबडी वडे/मटण पुलाव/मोरी. आणी जेवल्यावर धोंडस पाहिजे. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

भेंडीभाऊं

रेवती
गुरुवार, 11/12/2009 - 22:57 नवीन
भेंडीभाऊंशी सहमत! आम्ही लेस कॅशवाले आहोत त्यामुळे मोअर कॅशवाले अर्थात प्रभूसर मालदारांनीच पार्टी द्यावी.;) मांसाहारींनी त्यांची मागणी केली आता शाकाहाराचीही आमची मागणी आहे. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

किती

रेवती
गुरुवार, 11/12/2009 - 22:50 नवीन
किती पेट्या बोला?:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छ्या!

रेवती
गुरुवार, 11/12/2009 - 23:00 नवीन
छ्या! काहीपण! मला नाही आवडली प्रतिक्रिया! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

माझ्या

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/12/2009 - 10:20 नवीन
माझ्या मामाच्या लग्नात आहेर आणु नये लिहिले होते...त्यामुळे पुष्पगुच्छ आले होते, ते हि महागच असतात की. माझ्या लग्नात चुक सुधारली गेली. आहेर व पुष्पगुच्छ आणु नये लिहिले गेले. नातेवाइक व जवळ्चे मित्र्-मैत्रीणीनी केळवण केले तेव्हाच आहेर दिला. म्हणुन हल्ली ज्याना खरच आहेर द्यायचा असतो त्यानी लग्नाआधी जे केळवण केले जाते तेव्हाच आहेर द्यावा :P सो हॉलमधे छान वातावरण राहिल. नाहितर ज्यानी आणलाय ते घ्या घ्या म्हणतात व ज्यानी नाहि आणलाय त्याना लाजा आणतात. चुचु (व्यवहारी चतुर कोब्रा)
  • Log in or register to post comments

सहमत आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/12/2009 - 10:33 नवीन
चुचु बैं शी सहमत आहे ... असे प्रायव्हेटमधेय गुपचुप आहेराचे कार्यक्रम उरकुन घेण्यात शहाणपण असते. पण खरच सांगत ते आहेर वगैरे घेतल्याशिवाय कार्याला मज्जा नै साला. उगाच काय तोंड लांब करुन दिवसभर स्टेजवर उभे रहायचे जर गिफ्ट्स मिळणार नसतील तर ;) स्वगत : चला, आमंत्रितांची येणार्‍या आहेराच्या ताकदीनुसार लिस्ट फ्रीज करायची आहे, लै गडबड आहे भौ ! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

म्हणुन

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/12/2009 - 18:12 नवीन
म्हणुन हल्ली ज्याना खरच आहेर द्यायचा असतो त्यानी लग्नाआधी जे केळवण केले जाते तेव्हाच आहेर द्यावा वाह ! म्हणजे ज्यांना आहेर द्यायचा आहे त्यांनी पदरमोड करुन केळवणाचा पण घाट घाला. चुचु पक्की कोब्रा ग बये तु !! ©º°¨¨°º© परानल खाणे पराठे ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

माझ्या

विजुभाऊ
गुरुवार, 11/12/2009 - 11:07 नवीन
माझ्या लग्नात आलेले कूकर / लेमन सेट / डबे/शर्ट पीस आणि तत्स॑म आहेर मी इतर बर्‍याच लग्नात आहेर म्हणून उपयोगात आणले आहेत
  • Log in or register to post comments

) चुचु

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/12/2009 - 11:10 नवीन
:O 8| :O) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काय हो

गणपा
गुरुवार, 11/12/2009 - 13:30 नवीन
काय हो विजुभौ कुकर, डब्या वरची नाव बदलुन दिलीत की तशीच? बाकी काही नाही मागाहुन ईज्जतीचा फालुदा व्हायचा हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

हो आमच्याकडे आलेला एक आहेर हा तसाच्या तसा मूळ

चतुरंग
गुरुवार, 11/12/2009 - 22:57 नवीन
पॅकिंगसकट आला होता. म्हणजे ज्यांनी आम्हाला दिला त्यांच्याकडे ज्यांनी जसा दिला होता तसाच त्यांनी पुढे पास केला. मूळ देणार्‍याचे नाव सुद्धा आत तसेच होते! :( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा घ्या..........

jaypal
गुरुवार, 11/12/2009 - 22:56 नवीन
गणपा कडुन हा घ्या..........घरचा आहेर "काय हो विजुभौ कुकर, डब्या वरची नाव बदलुन दिलीत की तशीच? बाकी काही नाही मागाहुन ईज्जतीचा फालुदा व्हायचा हो "Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा