"कूटलिपी - एक विचार" आणि "स्याद्वादा" या लेखांवरील विवेचनातून नाडी ग्रंथांवर प्रकाश
मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,
मिसळपाव आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले. नाडी ग्रंथाच्या कूटलिपी बाबत याठिकाणी काही लेखन झाल्याने येथे चर्चेला ते लावत आहे.
श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या स्याद्वादा वरच्या लेखाला मी प्रतिक्रिया लिहिली होती. - त्याप्रमाणे नाडीग्रंथांच्या पुर्ण अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधाराने निष्कर्ष काढण्याची गरज मी माझ्या लेखनातून वेळोवेळी अधोरेखित करत आलो आहे. विचारवंतांनी यावर नाडी ग्रंथांची फक्त टिंगलटवाळीने दुर्लक्ष न करता विचार करावा ही नम्र विनंती मी केली होती. त्यावर विविध उदाहरणे देत शेवटी "प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो" असे लिहून धनंजयांनी अनुभवाचे श्रेष्ठत्व हेच प्रमाण असल्याचे मान्य केले आहे.
एक अभ्यासक म्हणून धनंजय ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतुहल आहे. त्यांनी व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका- टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात. हे सर्व विदित आहे. श्री. हैयो ह्यांच्या लेखाच्या संबंधी त्यांनी नाडी ग्रंथांच्या पट्टयांची छायाचित्रे देता आली असती तर... असे म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हैयोंनी माझा (ओकांचा) उल्लेख करून नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांचे फोटो किंवा स्कॅन त्यांना वा अन्य कोणालाही सहजासहजी मिळवणे अवघड असल्याचे म्हटले आहे.
श्री. हैयोहैयैयो यांच्या विविध लिपिशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून नाडी ग्रंथांच्या लिपीचा, मजकुराचा शोध घेता आला तर किती बहार येईल. असे वाटून मी त्यांना विनंती करतो की मी माझ्या बाजूने जी काही शोध साहित्याची मदत करता येणे शक्य असेल ती आनंदाने करीन. त्यांनी त्या शोधसाहित्याची फोड करून त्याचा अर्थ व माहिती वाचकांना प्रस्तूत करावी.
श्री. धनंजयांना विनंती, की त्यांनी नाडी ग्रंथलेखनावर अधिक प्रकाश पाडण्यासाठी मदत करावी तसेच ह्याबाबत अधिक काय करता येईल त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण मते सुचवावीत.
या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
नाडी ग्रंथ प्रेमी - शशिकांत ओक
वाचने
13473
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
सलाम !
In reply to सलाम ! by अवलिया
+ १
मिसळपावाच्या वाचकांसाठी.
शुभेच्छा
प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे
In reply to प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे by धनंजय
मुद्दे.
In reply to मुद्दे. by हैयो हैयैयो
(१) कसले कुतूहल - स्पष्टीकरण, (२) उपलब्ध वेळ
In reply to (१) कसले कुतूहल - स्पष्टीकरण, (२) उपलब्ध वेळ by धनंजय
विचारार्ह मुद्दा.
In reply to (१) कसले कुतूहल - स्पष्टीकरण, (२) उपलब्ध वेळ by धनंजय
ए धन्या,
छान चर्चा
काय हे
वा छान
नाडी ग्रंथ 'भविष्य' विषयाला बिचकता का?
In reply to नाडी ग्रंथ 'भविष्य' विषयाला बिचकता का? by शशिकांत ओक
मर्यादा
शुभेच्छा दिल्या असत्या...
अंनिसच्या कडेवर बसून
तरीही शुभेच्छाच
अरे काय रे
In reply to अरे काय रे by विसोबा खेचर
+१ सहमत
खरंच् . काय
In reply to खरंच् . काय by सुप्रिया
मला
श्री हैयो